|
बापरे कुठच्या कुठे जातेय ही स्टोरी.... पण मस्त मज्जा येत आहे...
|
Himscool
| |
| Monday, June 12, 2006 - 5:29 am: |
| 
|
लगे रहो, मायबोलीकर्स!!! लगे रहो!!!
|
बापरे कुठच्या कुठे जातेय ही स्टोरी.... >> ही स्टोरी अशीच अजून "कुठच्या कुठे" जात राहो.. ही शुभेच्छा चालू देत...
|
Jyotip
| |
| Monday, June 12, 2006 - 6:31 am: |
| 
|
सीता कलयुगमे थी? मैने तो सात बार वो movie देखी मुझे तो कही दिखी नही.
|
अरे मी बरेच काही miss केलेले दिसतय?? पण आहे बाकी एकता कपुर पेक्षा वरचढ storyline मजा येतेय वाचायला.... विका त्या एकता कपुरला ही storyline बघु
|
Deemdu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 7:31 am: |
| 
|
" तुम मेरे प्रथम नही हो " अस किंचाळत सीता गाडीच्या दरवाज्याकडे पळायला लागते आणि तेव्हढ्यात इतका वेळ गोंधळलेला तिमीर एकदम भानावर आल्यासारखा तिच्या मागे पळतो. घाबरत थांबत घामानी थबथबलेली सीता थांबते मागे बघते आणि दोन पावल पुढे पळते ???? , इकडे तिमीर दात ओठ खाऊन सीतेच्या मागे पळत असतो. एव्हढ्यात ट्रेन च्या डब्यात ( दोघांच्या धावण्यामुळे हलुन हलुन ) तिमीर च्या पाठीमागच्या बाजुला एक बॅग पडते. बॅग पडल्याच्या आवाजाकडे तिमीर वळून बघतो. ( ह्यावेळी बॅग वर आणि तिमीरच्या चेहर्यावर तिन तिनदा कॅमेरा ) बॅगच पडली आहे हे कळल्यावर तो परत पळायला म्हणून वळतो पण...... आता त्याला सीता दिसत नाही, तो सीतेच नाव घेऊन जोरात ओरडतो. तो एका एका सीट्पासुन पुढे पुढे येत असतो आणि ड्रायव्हर सीट च्या खाली बसलेली सीता क्षणाक्षणाला घाबरत असते. अचानकपणे एक भुंगा कुठुनतरी येतो आणि सीतेच्या चेहर्याभोवती गुणगुणायला लागतो, सीता त्याला झटकण्यासाठी हात हलवते आणि तिच्या हातातल्या बांगड्या वाजतात ( ह्या वेळेला घाबरलेल्या सीताच्या चेहर्यावर आनी खवळलेल्या तिमीरच्या चेहर्यावर ४,४ वेळेला कॅमेरा, आणि बॅकग्राउंडला ढॅण ढॅण म्युझिक ) इकडे सीतेच्या माहेरी सीतेचे वडील गंभीर चेहर्यानी बसलेले असतात, आणि सीतेची आई धायमोकलून रडत असते " हाय री नीका, बदजात ये तुने क्या कीया, अपनेही हाथोसे अपनी बेहेन का सुहाग छीन लिया " आणि इतक्यात दरवाजा वाजतो काय आहे त्या दरवाज्याच्या मागे ?????????? बघत रहा कुछ अपने क्Cच पराये
|
अरे पुढे न्या ना कुणीतरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Jo_s
| |
| Monday, June 19, 2006 - 12:11 am: |
| 
|
आता सगळेच बेशूध्द पडलेत
|
Mi_anu
| |
| Tuesday, June 20, 2006 - 2:07 am: |
| 
|
दरवाजा उघडतो. दारात जुना नोकर रामू असतो. 'मालिक, कोई हमारे चनेके खेतोमे बेहोश पडा है. जल्दी चलिये.' सीताचे वडील सूटाबूटात आणि आई हिरे जडवलेल्या घरातल्या साडीसकट धावत सुटतात. शेतात पाहतात तर काय, एक सोनेरी केसांची आणि तुटपुंज्या स्कर्टातली विदेशी तरुणी अस्ताव्यस्त पडलेली. मागे संगीतात एक मोठे ढ्याण! तरुणीला हॉस्पीटलात आणले जाते. सीताची आई आणि वडील चिंताग्रस्त चेहर्याने बाहेर उभे. डॉक्टर बाहेर येतात. 'इसका दिल निकामी होने के मार्ग पर है. बायपास सर्जरी करनी पडेगी. कमसे कम तीन लाख और बादमे अगर सिरीयल के डिमांड के मुताबिक लंबे समय कोमामे डालना पडेगा तो और बहुत लगेंगे. अच्छा होगा अगर आप कोई फायनान्सर पहलेसे ढुंढके रखे.' सीताच्या वडीलांच्या चेहर्यावर तीनदा फोकस. तितक्यात सीताची आई पुढे येते. ती आपल्या हिर्यांच्या बांगड्या काढून डॉक्टरांच्या हातावर ठेवते. 'आये अतिथीका सम्मान करनेके लिये फायनान्सर ढुंढना हमारे राजपूत खानदानकी परंपरा नही. आप ये लिजीये. बाकीका पैसा हम घर गिरवी रखकर आपको ला देंगे.' मागे करुण सतार वाजते आहे. सीता कशीबशी तिमीरला गुंगारा देऊन आपले सेट केलेले केस आणि आयलायनर बिघडू न देता आईबाबांच्या घरी येते. तिथे रामूकडून तिला कळते की असे असे झाले आहे. सीताच्या चेहर्यावर दोनदा फोकस. सीता हॉस्पीटलात येते. ऑपरेशन थिएटराचा लाल दिवा लागलेला असतो. सीताचे आईबाबा सचिंत चेहर्याने बसलेले असतात. सीताला हे बघवत नाही. ती आपल्या हिरेजडीत चपला भिरकावून गावाबाहेरच्या मंदीराच्या दिशेने पळत सुटते. मंदीराला १५५ पायर्या आहेत. पाच पायर्या सीता चढते. पाऊस सुरु होतो. (डिसेंबर महिन्यात बरं का! कारण कालच सीताच्या घरच्यांनी ख्रिसमस साजरा केलेला असतो.) आणखी पाच पायर्या चढते. वीजा कडाडू लागतात. आणि पाच पायर्या. ५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होतो. तितक्यात कमर्शियल ब्रेक होतो. ब्रेकानंतर सीता थेट मंदीरात पोहचलेली दाखवलेली आहे. ती पदर बांधते आणि मूर्तीसमोर तांडवनृत्य करु लागते. फोकस आळीपाळीने मूर्तीवर,सीतेच्या हिरेजडीत पैंजणावर,मूर्तीसमोरच्या फडफडणार्या दिव्यावर, घंटेवर. अशीच तीन मिनीटे जातात. आणी अचानक वीजा थांबतात. पाऊस थांबतो. मूर्तीच्या डोक्यावर वाहिलेले फूल उडून सीतेच्या जोडलेल्या हाताच्या बोटांत अडकते. त्या क्षणी सीन बदल. हॉस्पीटलात डॉक्टर बाहेर येऊन संगतात., 'उसको होश आ गया है.'. ते फूल घेऊन ती परत हॉस्पीटलात येते.. हॉस्पीटलात सीता येते. तिचे आई वडील औषधे आणायला बाहेर जाताना तिला भेटतात आणि ही आनंदाची बातमी सांगतात. मागे आनंदी सतार, वीणा, संतूर, सरोद किंवा गिटार वाजत आहे. (रुग्ण कमी असताना नर्स तिथेच पार्टटाईम वादनाचा क्लास करते हो!) सीता आत जाते. तरुणीच्या केसांवरुन हात फिरवते. तरुणीची झोप चाळवते आणि ती कूस बदलते. मिनीस्कर्ट किंचीत वर येऊन सीताला तिच्या मांडीवर गोंदलेला बदाम आणी त्यात 'पी' दिसतो. ती पुढे सरकते तर तरुणीचे गळ्यातले उघडलेले लॉकेट दिसते. त्यात तरुणी प्रथमच्या गळ्यात हात घालून उभी आहे. आणि तिच्या सोनेरी लांबसडक केसांत सिंदूराने माखलेले पांढरे गुलाबाचे फूल. फोकस तीनदा उलटा आणि तीनदा ४५ अंश कोनातून सीताच्या चेहर्यावर. मागे ढ्याण ढ्याण संगीत. (हा एपिसोड समाप्त!)
|
अरे सही हा episode तर एकदम RP style अगदी फ़ुल टू detail मधे लिहिला आहे Cool!
|
Psg
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:28 am: |
| 
|
अनु, भन्नाट लिहिलय! कथेचा सखोल अभ्यास केल्याच जाणवतय!
|
अनु, जबरी.... खि खि खि! हिरेजडित पैंजण घालून नृत्य... 
|
काय भन्नाट लिहिल आहे... एकदम जबरी
|
अनु हसुन हसुन पुरेवाट.. ते मंदीर पायर्या जबरी ते दिवे जाणे, पक्कि हिंदी Serial writer होणार ह्यात ह्संका नाहेच
|
सहि ट्विस्ट आहे. अब आयेगा मझा.
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:20 am: |
| 
|
एपिसोड पुढचा. तिमिर काली माईकडे येतो. काली माई हातावर मेंदी काढून घेत आहे. तिमिर : ( मनाशी) अजून हेच मेंदी न् टॅटू च चाललंय वाटतं बयेचं. इकडे सीता पळून जाऊ दे, रजनीगंधा मरू दे... म्हातारी अरेबिक मेंदी काढावी की पारंपारिक याची चिंता करणार. ( उघड) जय हो काली माई की. काली माई : आपला प्लॅन कामयाब झाला का? तिमिर : नही काली माई.... काली माई : क्याऽऽऽऽऽ? ये बतानेके लिये अपना काला मुंह लेके यहां आया तू? त्याच्यावर हातातला चाकू उगारते. तीनदा कालीमाई व चाकूवर फ़ोकस व तीनदा तिमिरच्या चेहर्यावर फ़ोकस. तिमिर : मै उसे शहर से बाहर लेकर जाने ही वाला था काली माई की अचानक ट्रेन रुक गई. मै क्या करता काली माई, मै तांत्रिक हूं, इंजिनीयर नही. आपही ने मेरे मां बाप के पास चुगली करके मेरी पढाई रोक दी थी. काली माई : तिमिर तू बहुत ज्यादा बोलने लगा है. चुप बैठ और मुझे इस बात की गहराईतक जाकर देखने दे की आखिर ये ट्रेन किसने रोकी? दुर्गा अचानक तिथे प्रकट होते. दुर्गा : बेकार मे क्यों परेशान हो रही हो काली माई? वो ट्रेन मैने रुकवाई थी.... मुझमे सोना चांदी च्यवनप्राशकी शक्ती जो है. अब तू मुझसे बचके रहना. सीता को तेरे चंगुल से छुडवाना था. सो तो मैने कर लिया. अब सीता उसके मा बाप के घर मे है मतलब हमारे आश्रम के प्रभाव क्षेत्रमे. अब तू उसका चाहकर भी कुछ नही बिगाड सकती. और हां काली माई बचके रहना. जल्द ही मै तेरे इस काले साम्राज्य को मिटा दूंगी. काली माई त्वेषाने मुठी आवळते. तिच्या हातावरची मेंदी विस्कटते. तीन वेळा फ़ोकस दुर्गाच्या तेजस्वी चेहर्यावर. आणि दोन वेळा काली माईच्या हातांवर. दुर्गा वळून जायला लागते. तिमिर : दुर्गा... ए.. ए.. दुर्गा.. शुक शुक.. इकडे बघ... तिमिर आहे मी. आठवतं का? शुक शुक.... दुर्गा : ( त्याच्याकडे बघून) ए गप... तुझ्यासारख्या फालतू लोकांशी बोलायला मला वेळ नाहीये. काळ्या कपड्यांतला अपशकुनी कुणीकडचा... तरातरा निघून जाते. तिमिर रागारागाने काली माईच्या समोरचा मेंदीचा वाडगा घेऊन तिच्या तोंडाला मेंदी फासतो. मागे ' मुझे रंग दे ' गाणे सुरु होते. टीप : या सीनला तसा काही अर्थ नाही. फक्त उरलेली मेंदी संपवायची होती. काहीही वाया जाऊ द्यायचं नाही हे दिग्दर्शकाचं धोरण आहे. तसेच त्यातून दाखवता आलाच तर ' तिमिरच्या संतापाचा उद्रेक ' दाखवता यावा इतकाच हेतू आहे. इकडे सीता आपल्या खोलीच्या भल्यामोठ्या खिडकीत बसली आहे. डोळ्यांतून अश्रू गळत आहेत. तेवढ्यात तिथे ती विदेशी तरुणी येते. वि. त : सीता... तुमने मेरी जान क्यों बचाई सीता? सीता चमकते. सीता : मग काय तुला तसंच शेतात पडू द्यायचं होतं? उद्या तुझं प्रेत तिथे सापडलं असतं तर आमच्यामागे पोलिस लागले असते. वि त : नही ये देखो.. मैने चिठ्ठी लिखी थी की प्रथम विशाखापट्टणमकर मुझे और मेरे बच्चे को अपनाने के लिये तैयार नही है इसलिये मै जान दे रही हूं. सीता : क्याऽऽऽऽऽ???????? जनमजली तुझे बच्चा भी है? वि त : जनमजली? जी नही सीताजी... मेरा नाम अंजली है. मेरे प्रथमने ही ये नाम रखा था मेरा. तेवढ्यात तिचे लक्ष सीतेच्या खोलीतल्या तिच्या आणि प्रथमच्या फोटोकडे जाते. पाच वेळा तिच्या चेहर्यावर आणि फोटोवर तिरका फ़ोकस. अंजली इतकी रोखून तो फोटो पाहते की फोटोची काच तडकणार असंच वाटायला लागतं. अंजली : ये सब क्या है? ये प्रथम कैसा इन्सान है. I guess Seeta, we need to talk. Lets have a coffee and discuss about this issue. चलो नीचे किचनमे जाते है. तेवढ्यात मुख्य दाराची बेल वाजते. सीता दार उघडते. बाहेर अंजलीवर उपचार केलेला doctor भेसूर अवतारात सीतेच्या आईने दिलेल्या हिर्याच्या बांगड्या घेऊन उभा असतो. एपिसोड समाप्त.
|
सितेच्या आईच्या आणि वडीलांच्या ( जे दिवाणखान्यात नुसतेच बसलेले असतात ) त्यांच्या तोंडावर ३ ३ दा camera " आईये Doctor अचानक कैसे आना किया? " सि बा भानावर येऊन म्हणतात " माफ़ किजीये बिना बताये चला आया. " आणि एकदम बांगड्या जमिनीवर फ़ेकतो. बांगड्या स्लो मोशनमध्ये जमीनीवर खण खण करत हळू हळू स्थिरावतात. सि आ : लेकिन ये तो डो : नही ये ले लिजिये वापस. आपका बिल पहेलेसे किसिने भर दिया था सि बा : ये तो बडी अच्छी बात है. किसने भरा डो : नाम मै नही बता सकता उसने मना किया है. सि बा : अच्छा अच्छा लेकिन आप तशरीफ़ रखिये. (सि आ कडे वळून) अरे मेहमानको जरा चाय पानी पिलाओ डो : नही नही मै जता हु आणि लगबगीने ते निघून जातात सि आ ( बांगड्या उचलत ) : पता नही किस भले शक्स ने हमारी मदत कियी है सिताची रुम वि त : मुझे माफ़ करदो सिता. लेकिन प्रथम शायद बेवफ़ा निकला मागे गाण लागत बेवफ़ा सनम तुझे हमने अभी अभी जाना ए लोगो तुमको क्या मैने तो अपना सबकुछ गवाया मैने तो अपना प्रथम गवाया सिता : अंजली नही ये नही हो सकता. मेरे सुहाग के बरेमे मै कुछ नही ऐसा वैसा सुन सकती. वि त : लेकिन तुम मेरी कहानी तो सुनो वो उन दिनो की बात है जब मै शिमला मे पढाई के लिये london से आयी थी. मग एकदम फ़्लॅशबॅक. शिमला चा सुखद हिरवागार निसर्ग. वि त तोकड्या स्कर्ट मध्ये कोॅलेजची पुस्तक हातात धरुन निघाली आहे. इतक्यात गुंडांचे टोळके तिच्या भोवती बाईकवरून गरा गरा फ़िरायला लागते. ती घाबरून बचावो बचावो करायला लागते. इतक्यात प्रथम बाईकवरून entry मारतो. ( लेदरचे जॅकेट, फ़ाटकी जीन्स, कानात एक रिंग आणि जुल्फ़ डोळ्यावर अशा अवतारात ) आणि मरामारी. वि त तिकडे कोपर्यात रडत उभी असते. सगळ्यांना लोळवल्यावर प्रथम वि त ची पुस्तके गोळा करतो आणि तिच्या हातात देतो. प्र : आप ठीक तो है वि त नुसतीच मान हलवते : शुक्रिया. अगर आप नही होते तो प्र : आप हमरे देश मे मेहमान है. आउर मेहमानोंकी तकलीफ़े दुर करना राजपुतोंकी परंपरा है इतक्यात पाऊस कोसळायला लागतो. वि त : हे बघवान अब मै घर कैसे जाऊंगी प्र : मेरा घर इधर पास मे ही है. अगर आपको ऐतराज नही हो तो आप जबतक बारीश नही रुक जाती वि त : हा हा क्यु नही. और मैने सुना है आप कोॅफ़ी बहोत अच्छी बनाते है प्रथम हसतो. तितक्यात ति वि त चिखलावरुन पाय घसरून पडणार असते. प्र तिला हात देतो आणि पकडतो. प्र तिच्याकडे बघत आहे आणि वि त त्याच्याकडे. परत एकदा जोरदार विज कडाडते. आणि मुसळधार पाऊस सुरु होतो. दोघे डोक्यावर पुस्तके ठेवून पळत सुटतात. दोघे घरी पोहोचले आहेत. प्र : आपला शर्ट पायजमा देऊन ये लो नही तो सर्दी जुकाम हो जायेगा. मै कोॅफ़ी बनाके लेके आता हू. वि त. कपडे बदलून fireplace समोर बसलेली आहे वि त : प्रथम तुम्हारा घर बहोत अछा है प्र कोॅफ़ी घेऊन बाहेरच्या रुम मध्ये येतो. प्र : हा छोटासाही है लेकिन काम चल जाता है वि त त्याच्याकडे बघते. प्र तिच्याकडे बघतो. विज कडाडते. प्र वि त जवळ जातो. वि त : प्र ये ठीक नही प्र वि त जवळ जातच रहातो. camera एकदम बाहेर पाउस नावाखाली खिडकीवर बदाबदा पाणी पडत असत. त्यात दोघे धुसर होतात एपिसोड समाप्त
|
Maitreyee
| |
| Wednesday, June 21, 2006 - 3:20 pm: |
| 
|
या प्रथमच्या आयुष्यात किती 'तूफ़ानी रात्री' येतायत! जिकडे जाईल तिथे 'चिराग' लावत सुटलाय
|
" ज्योत से ज्योत लगाते चलो प्रेम कि गंगा बहाते चलो " नाव द्या serial ला 
|
Manuswini
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:07 pm: |
| 
|
तो प्रथम बहुतेक 'जगाला प्रेम अर्पावे' वर विश्वास ठेवत असेल मंडळी आता सगळ्यांच एवढ मोठ दील थोडी ना असतं नाहीतर 'मेरी निशानिया' वर विशवास असेल त्याचा नाहीतर हिंदी senti dialogue उसकी फितरत ही है ऐसी
|
|
|