|
Mi_anu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 10:54 pm: |
| 
|
धमाल आहे राव! आपण सर्वांनी ही कथा केकता कपूरला विकून त्या पैशात सर्व मायबोलीकरांना वडापाव खाऊ घालायचा का?
|
Mi_anu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 11:54 pm: |
| 
|
(एपिसोड चालू) (फायरप्लेस मधली लाकडे विझली आहेत. सकाळ झाली आहे. समभुज त्रिकोणाच्या आकाराच्या डोंगरामागून लालभडक सूर्य उगवत आहे. पक्षी चिवचिवत आहेत.विदेशी तरुणी खुर्चीत अंगाभोवती चादर घेऊन बसली आहे आणि रडते आहे.) वि. त.: अब क्या होगा प्रथम? प्रथम(भकाभका सिगरेट फुंकत आहे): घबराओ नही. मै तुम्हे अपना लूंगा. वि. त.: लेकीन मेरे पॉप्स मेरी सिर्फ एक प्रोटेस्टंट ख्रिश्चन सेही शादी करवाना चाहते है. वो इस शादीसे कभी राजी नही होंगे. प्रथम्: डार्लिंग, मै तुम्हारे प्यार के खातिर अपने धर्म की कुर्बानी देकर प्रोटेस्टंट किरीस्ताव बन जाउंगा. वि. त.: अपार्ट फ्रॉम धिस, हम दोनो अभी नाबालिग है. हम कैसे शादी करेंगे? प्रथम्: ये समाज के बंधन हमारे प्यार को नही रोक सकते. (स्वयंपाकघरात जाऊन कांद्याशेजारी पडलेली सुरी आणतो. कचकन अंगठा कापतो. मागे ५००० हर्टझ वारंवारतेची सतारची धून. प्रथम विदेशी तरुणीच्या मांग मधे सिंदूर भरतो. मागे विजांचा कडकडाट. तरुणीच्या डोळ्यात पाणी.) प्रथम शेजारच्या बंगल्यापाशी लपत छपत जातो आणि बाहेरच्या कुंडीत उगवलेलं पांढरं गुलाबाचं फूल तोडून आणतो. त्यावर सिंदूर शिंपडून विदेशी तरुणीच्या केसात फूल माळतो. (वि. त. मनात: 'काय हा घाटीपणा? मी काय याला केसात गुलाबाचं फूल घालायला याच्या जयपूर बुद्रूक गावातली चमेली किंवा गंगा वाटले काय?') प्रथम्: ये हमारे खानदान की निशानी है. मेरी पडदादी ने मेरी दादी के केस मे फूल लगाया था, जब वो ब्याहकर आयी थी. फिर मेरी दादीनेभी मॉ के सर मे फूल लगाया, और आज मै तुम्हारे सरमे यह फूल डालकर तुम्हारा हमारे रजपूत खानदान मे स्वागत करता हूं. (परत एकदा रात्र. परत एकदा फायरप्लेस. वि. त. ने त्या ओसाड घरातही लालभडक सुहाग का जोडा, सोन्याची दागिने, लिपस्टीक आदी नट्टापट्टा केला आहे. (बहुधा शेजारच्या बंगल्यातून तासाला पाच डॉलर भाड्यावर आणले असावे.)) आता फोकस प्रथमच्या चेहर्यावर. त्याच्या चेहर्यावरुन प्रेम चिरोट्यावरुन पाक ओघळतो तसं ओघळतं आहे. फोकस शेकोटीवर. मग बाजूला काढून ठेवलेल्या कपड्यांवर, मग छपरावर, मग दोन उघड्या पायांच्या जोड्यांवर. (पुढे डिटेल्स दाखवल्यास मालिकेचा महिला वर्ग कमी होतो.) असेच काही महिने जातात. वि. त. आता बर्यापैकी न जाळता पोळ्या करायला आणि पूर्ण शिजलेलं वरण बनवायला शिकली आहे. घरी बडी दादीचा वाढदिवस म्हणून प्रथम घरी जायला निघतो. वि. त. घट्ट मिठी मारुन त्याला 'लवकर ये. मी वाट पाहते' म्हणून सांगते. द्रुष्य बदल. विमान विशाखापट्टणच्या विमानतळावर उतरतं आहे. अचानक मध्ये एक दगड येतो आणि विमानाला गचका बसतो. वर ठेवलेले केबिन लगेज प्रथमच्या डोक्यात पडते आणि तो बेशुद्ध पडतो. मागे ढ्याण! प्रथमला ओळखून विशाखापट्टणमकर परीवार घरी आणतो आणि त्याच्या डोक्यावरलं टेंगूळ पाहून डॉ. ला बोलावतो. 'इसकी याददाश्त चली गयी है. शायद आजसे १० वे एपिसोड के बाद वापस आयेगी, या तो नही भी आयेगी. अब इसे दवाओं की नही, डायरेक्टरके दुवाओं की जरुरत है.' प्रथमवर १०० कि मी प्रती मिनीट वेगाने झूम इन फोकस. मं. भा. च्या चेहर्यावर छद्मी हास्य. ब. मा. च्या डोळ्यात पाणी. दादी बेशुद्ध. सर्वांच्या चेहर्यावर आळीपाळेने उभे व तिरके फोकस. मागे प्रतीध्वनी उमटणारे ढ्याण! (एपिसोड समाप्त)
|
Raina
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:52 am: |
| 
|
अनू, मस्त. तुला आता एकता कपूर नाही तर कमीतकमी स्मिता तळवलकर ईस्टोरी लिवायला आवताण देणार बघ चालु द्या !एकदाचा तो नाजायज बेटा आला हे पाहुन "हुश्Sश " झाले. आता कसं असली क्- सिरीयल वाटते आहे...
|
Raina
| |
| Thursday, June 22, 2006 - 2:17 am: |
| 
|
मागे ५००० हर्टझ वारंवारतेची सतारची धून.वा ऽ अगदी डोळ्यासमोर आली साॅरी कानावर आदळली माझ्या ! आता ती सीता जाउन, ४ बाट्ल्या ग्लिसरीन गालांवर ओघळुन त्या प्रथमला " क्यु किया, क्यु किया तुमने मेरे साथ ऐसा "? बोलो प्रथम, बोलो, चुप क्यू हो बोलो यातील "बोलो " हे चढत्या भाजणीने एक एक स्वर चढवत शेवटी परविन सुलतानाच्या तार षड्जा पर्यंत येउन थांबवेल. ( तिचा पण नाईलाज आहे- त्याच्या पुढे पेटी संपते) हा तिचा "बोलो" च्या स्वरांचा रियाज चालू असत्ताना, सर्वांच्या चेह-र्यांचे ८७२ Close up
|
Lalu
| |
| Friday, June 23, 2006 - 12:34 pm: |
| 
|
अनू, रैना, 'आवताण'? माझ्याशिवाय इथे दुसर्या कोणी हा शब्द पहिल्यांदाच वापरला असेल.
|
Raina
| |
| Saturday, June 24, 2006 - 2:40 am: |
| 
|
लालु, खरतर "आवताण" माझ्या तोंडात बसलेला, किंवा नेहमीच्या वापरातला शब्द नाही- Infact पुण्यात हा शब्द सहसा वापरत नाहीत. तेव्हा तुमचे "पेटंट" अगदी सुरक्षीत आहे. 
|
Manutai
| |
| Monday, June 26, 2006 - 3:35 am: |
| 
|
पुढे लिहा लोकहो पुढे लिहा लोकहो मजा येत आहे.
|
|
|