Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 22, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 22, 2006 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, June 21, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्चना, वेगळी आणि अर्थपुर्ण कविता.

Ninavi
Wednesday, June 21, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, धन्यवाद. खरंच छान कल्पना आहे. तरीही
>>> तर, दूरवर सोडून दिलेल्या एखाद्या पाळीव पिलासारखा तू
ओठांवरती एक ओशाळं हास्य घेऊन पुन्हा दारात उभा!
डोळे वर उचलून तुझ्याकडे पाहण्याचीही माझी पात्रता नाहीये रे...
हे पचलेलं नाही मला. म्हणजे जो चराचरात आहे हे जाणवलंय ( पकडीत आलं नाही तरीही), तो ओशाळं हास्य घेऊन दारात उभा वाटतो?? पाळीव पिलासारखा????
>>> परंपरेचा अनाठायी दुराग्रह विसरून खर्‍या भक्तीभावाने येणार्‍या भक्तासाठी पांडुरंग विटेवर उभा राहून वाट पाहत आहे...
असं तुम्हीच म्हणताय ना? ह्या कल्पनेशी
>>> त्याला मूर्त रुप देण्याची माझी सनातन भूक मला टाळता येत नाही....आणि 'भगवंत'ही आपल्या याच भक्तीसाठी भुकेला असतो!!!
हे विसंगत वाटत नाही का?

राग मानू नका, मी खरंच हे समजून घ्यायचा प्रयत्न करत्ये. आणि तुम्ही पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलंत त्यामुळे पुढे विचारायचा धीर वाढला, इतकंच.


Ameyadeshpande
Wednesday, June 21, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>तर, दूरवर सोडून दिलेल्या एखाद्या पाळीव पिलासारखा तू
ओठांवरती एक ओशाळं हास्य घेऊन पुन्हा दारात उभा!
डोळे वर उचलून तुझ्याकडे पाहण्याचीही माझी पात्रता नाहीये रे...

ह्यात चिरंतन शक्ती पेक्षा झाड तुझ्या मनातलाच कुणीतरी आहे, काहीतरी आहे ज्याच्या पासून तू पळू पाहत होतास...थोडसं माहितीये पण गवसत नाहिये असं... आणि नंतर तुला ते किती चुकीचं होतं ह्याची जाणीव झालिये असा अर्थ वाटतो.

पण कवितेतल्या ओळी वाचायला छान वाटतात...
मला उगाच
ही आठवली वाचता वाचता, दोघांमधे आत खूप काहीतरी आहे पण सांगितलं तरी ते तितकं कळत नाहिये असं वाटतयं.

Dhruv1
Thursday, June 22, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



पाण्यासारखी पारदर्शी
अन प्रतिबिंबासमान भासमान
हि देहमग्नता
विलगते अन
खोलवर खळबळत
पालानांचे आलेख खोलत
परावर्तीत होते
ऊराऊरातुन
सरळसोट मुळांसारखी
तेव्हा मी आकाश होऊन वाकतो
व तु ?
शिरशिरतेस शिशिरपर्णी स्पर्शांतुन
अनाद्य शांततेसारखी
माझ्याच आतुन


Dhruv1
Thursday, June 22, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



जेव्हा कुठल्याही
जाणीवांचे प्रदेश
रहाणार नाहीत अनोळखी.
कुठलेही नसतील जेव्हा
पथदर्शी नकाशे
व अनोळखी भुगर्भ
तेव्हा मात्र
मी तुझ्यासाठी अनभीज्ञ ठेवलेली
जमीन सिद्ध करेल
व आकांशाचे आभाळ पांघरेल
तेव्हा तुझ्याकडे
संवेदनांचाही दुष्काळ नसेल ना?
शंका नाहीत सखी.....
भितीही नाही.......
पण पावसाळ्याची सुरुवात
मला ऊन्हाळ्यांपासुनच करावी लागते,
म्हणुन....


Devdattag
Thursday, June 22, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शिरशिरतेस शिशिरपर्णी स्पर्शांतुन
अनाद्य शांततेसारखी
माझ्याच आतुन
ध्रुव.. समजवून सांग.. ही उपमा का??

Dhruv1
Thursday, June 22, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कविता अशी आहे....

जेव्हा तु जवळ येतेस....व सर्व देहभान विसरुन माझ्यात सामावु पहाते....तेव्हा तुझं देहभान हळु हळु पाण्यात काही विरघळावं तसं विरघळत जातं...आपण एक होत जातो....व अशी वेळ येते...कि जेव्हा मी तुझ्यात प्रतीबिंबीत होतो तेव्हा तुझ्या देहातील थरथर हळु हळु शांत होत जाते, माझ्यात विरत जाते.....आपण दोन आहोत की एक असा काहीच फ़रक नाही ऊरत अशा क्षणांनंतर.....म्हणुन तसं म्हंटलय....

ते थोड corelate कराव लागेल... जसं एखाद्या तळ्याकाठी बसल्यावर सृष्टीसौंदर्य पहाताना देहभान विसरुन जाणे व आपल्याच आतली शांती अनुभवने याच्याशी....

असो...काहीच नसेल तर शब्दखेळ समज.... :-)


Vaibhav_joshi
Thursday, June 22, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अदलाबदल ...

रोज रात्री मी शोध घेत बसतो
पाठ टेकताच निजेच्या कुशीत जाणार्‍या
त्या सगळ्या रात्री गेल्या कुठे ?
रात्रभर वेड्यासारखं शोधल्यानंतर ...
उजाडताना लक्षात येतं ...
माझ्या शांत निद्रिस्त रात्रींना
डोळ्यांत भरून घेऊन
तू निघून गेली आहेस कधीच
आणि सध्या मी जागतोय
ती एकेक रात्र तुझी आहे ...
खास तुझी ...
कुशीत तर घ्यायचं ...
पण झोपू द्यायचं नाही


Manasi
Thursday, June 22, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, बापू धन्यवाद.
वैभव छान वाटली कल्पना अदलाबदल मधील.


Ninavi
Thursday, June 22, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुंदर.

ध्रूव, पालान आणि अनाद्य या शब्दांचा अर्थ काय? जाणीवा आणि संवेदनांमध्ये नकी काय फरक आहे? म्हणजे stimuli आणि experience अश्या अर्थी आहे का?


Dhruv1
Thursday, June 22, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पालान पाण्याचे लोट जे प्रवाहाखालुन वाहातात.

अनाद्य निशब्द


Dhruv1
Thursday, June 22, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाणीव...
कशाचं तरी आकलण होण्याची शक्ती या अर्थी.

संवेदना
कोणा दुसर्‍याचं दुःख तरलतेनं अनुभवता येणं....


Swaroop
Thursday, June 22, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे अश्रु पुसले आहेत
तुझं हसु टिपलं आहे...
तुझ्याकडुन हरतानाही
तुला मी जिंकल आहे...
एकेक क्षण आठवताना
चुकुन पापणी ओली होते...
त्या रेशीमक्षणांची मग
सुरेल अशी साथ होते...
परत मैफल सजु लागते
स्वप्नरंगी रंगताना...
अन दचकुन जाग येते
पाहुन स्वप्नं भंगताना...
आता हे दचकणं सुद्धा
सरावाचं झालय...
तुझ माझं नातं आता
दुराव्याचं झालय...


Meenu
Thursday, June 22, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकांशाचे >> याचाही अर्थ सांगशील का ध्रृव.... आकांक्षा म्हणायचं आहे का ...?

तुझी लिहायची style खुप छान वाटते मला. वाचायला मजा येते ... आणी मोठ्यांदा म्हणुन पाहिलं तर एखादे fluent स्वगत वाटतं. तरिही पहील्या कवितेचा तु अर्थ सांगीतल्यावरही तो अर्थ कवितेशी relate करता आला नाही मला तरी.

दुसरी सुंदरच उतरलिये ... अतिशय छान ..


Meenu
Thursday, June 22, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वरूप छान .... .!!!

Meenu
Thursday, June 22, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोली

बाहेरुन सुंदरच दिसत असतात
तशा सर्वच गोष्टी , सुंदर नजरेला
पण अंतरंगात डोकावल्यावरही ,
ज्याच सौंदर्य अबाधीत राहिलं
असं काहीच दिसत नाहिये
तेव्हापासुन मी खोलात
शिरणं सोडुन दिलय ..........


Abhay_bhave
Thursday, June 22, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा: मिनू. पण अर्धी-अर्धी का वाटत्ये कविता? I mean काहीतरा सघन फील येत असतानाच थांबते!

मध्ये नव्हतो, तर खूपच कविता आलेल्या दिसतात! सार्‍याच छान आहेत. "वैभवची कविता छान आहे " या वाक्यासाठी काहीतरी शॉर्टफॉर्म काढूया का रे?
:-)

एक कविता पाठवतोय.

काल एक मी फूल पाहिले
हासत अलगद फुलताना
जसे फुलावे हास्य कुणाच्या
गाली, स्वप्नी झुलताना

दरवळला मग सुगंध गगनी
न्हाली धरा सुगंधाने
विश्व जाहले स्तंभित क्षणभर
इवल्याश्या त्या दानाने

फूल कालचे नाही आता
उरे आजचे उद्या कुठे?...
परी तयाचा गंध चिरंतन
घेणार्‍याच्या मनामधे


Meenu
Thursday, June 22, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वर्तमान समरसुन जगण्यासाठीच ,
गेलेल्या क्षणांचा गुलाम होऊन जगणं
थांबवल आहे मी आता ....
तुझ्या आठवणीत रात्र रात्र जागणं
थांबवल आहे मी आता ....
आता फक्त स्वप्नांवर ताबा
मिळवला की झालं
पाऊस नाही कोसळला की झालं


Zaad
Thursday, June 22, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी,
त्या ओळींच्या आधीची ओळ जर पुन्हा वाचलीस तर तुझ्या लक्षात येईल..
"फानयली मी तुझा नाद सोडून दिला..."
म्हणजे कधी कधी असंही होतं ना... की देव बिव ही केवळ एक कल्पना आहे, इतके टोकाचे विचार माणूस करतो. पण असं असलं तरी, त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा कसल्या तरी आंतरिक प्रेरणेमुळे म्हणा, माणूस देवाला किंवा तत्सम एखाद्या शक्तीला मनातून काढून नाही टाकू शकत. तर त्याच्यावरचे हे संस्कार एखाद्या खूप लळा लागलेल्या पाळीव पिलाप्रमाणे आहेत असं मला वाटतं. म्हणजे मालकाने पिलाला सोडायचं ठरवलं तरी पिलू परत परत येतच राहतं ना तशी देव ही गोष्ट आपल्या मनाला चिकटलेली असते असं मला वाटतं.(इथे गुलाम स्वत्:ला मालक म्हणवून घेतोय!!! :-) ) म्हणजे देव ओशाळं हास्य घेऊन परत आलेला नसतो, तर आपल्या मनातलं देवाचं स्थान कितीही नाकारलं तरी ते आपण स्विकारतच राहतो. वास्तविक ते विचार करून स्विकारावं किंवा नाकारावं अशी परिस्थितीच नसते. आपण ते स्विकारतोच बस्स!
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकूण माणूस ह्या प्राण्याने ईश्वराकडे कुठल्या कुठल्या दृष्टीने पाहिलंय हे मांडायाचा मी प्रयत्न केलाय. त्यामुळे ह्या ओळी विसंगत वाटू शकतात.
आता दुसर्‍या, विसंगतीच्या मुद्याविषयी..
तर तिथे भगवंत आपल्या "याच " भक्तीसाठी भुकेला असतो- या ऐवजी ते भगवंत आपल्या "खर्‍या" भक्तीसाठी भुकेला असतो- असं पाहिजे होतं. चुकलं ते. त्याबद्दल क्षमस्व!

अमेय,
माझे वरील मुद्दे वाचले तर तुझ्या अजून लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. पण तू म्हणतो तसं मात्र मला नक्कीच नव्हतं म्हणायचं.


Meenu
Thursday, June 22, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिवशी त्या
ओंगळवाण्या दिसणार्‍या आळीला
कोशात शिरताना मी पाहिलं तेव्हा
बर झालं मी नाही मारलं तिला
आणी नाही ते पानही खुडुन टाकलं
आज त्याच कोशातुन
शुभ्र फुलपाखरु ईद्रधनुषी किनार लेवुन
अलगद बाहेर आलं
माझ्याभोवती एक गिरकी घेऊन
फुलांच्या शोधात निघुन गेलं





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators