Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 19, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 19, 2006 « Previous Next »

Shyamli
Monday, June 19, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा सुरेख कविता.... .. .. ..

Aparnas
Monday, June 19, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, दीम्डु, R_joshi, सुमती, श्यामली धन्यवाद!
वैभव, तू रसग्रहण इतकं मस्त केलं आहेस....खूपच आवडलं :-) धन्स रे...


Ganesh_kulkarni
Monday, June 19, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Vaibhav_joshi
पण खरे सांगू तुला ?
जीव जपण्या फुलाचा
काटासुध्दा कधी कधी
काटा काढतो स्वतःचा
I like your poem Very much.
KHUP CHAAN KAVITA


Sumati_wankhede
Monday, June 19, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओढ

तशी नात्याची तू नाहीसच कुणी
'रक्ताच्या नात्या'ची म्हणतेय मी..
पण.... आपलेपणाच्या रेशीमगाठींनी
तू बांधून टाकलं आहेस सभोवती.
मेंदीचा घट्ट रंग चढावा.... हातावर;
तसा तुझ्या प्रेमाचा रंग चढतो.... मनावर.

कधीमधी सोडतेस तू गतकाळाचं गाठोडं;
सांडवतेस आठवणींची हिरे माणकं
अन त्यातले क्षण न क्षण वेचताना
गर्भश्रीमंत होऊन जाते मी.

अखंड वाहणारा मायेचा झरा...
आतड्यातून दाटून येणारा जिव्हाळा...
जुन्या गोधडीची ऊब देणारी तू....
'काय करू नि काय नको' अशी तगमग;
'पोहे करू... की साजूक तुपातला शिरा,
बघ किती सारी लोणची....
हे घेतेस की हे... हे ही घे...'
तुझ्या लवलवत्या देहाची प्रांजळ लगबग.

मला भूक नसते पोटाची,
पण हवा असतो ओलावा;
तडे गेलेल्या भिंतींना जसा
प्रेमळ मातीचा गिलावा.

का येते तुझ्याकडे....
खरंच सांगते... कशासाठी...

जुने जपलेले शंखशिंपले
ओच्यात गोळा करण्यासाठी
मी येते तुझ्या नदीकाठी...
यावं वाटतं पुनः पुन्हा
तू जपलेलं माझं बालपण
डोळे भरून पाहण्यासाठी.



Vaibhav_joshi
Monday, June 19, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला भूक नसते पोटाची,
पण हवा असतो ओलावा;
तडे गेलेल्या भिंतींना जसा
प्रेमळ मातीचा गिलावा.

वाह !!!


Devdattag
Monday, June 19, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटे तुला उगा रे
मी तुला शोधतो आहे
होते इथेच आधी
अस्तित्व मी माझेच शोधतो आहे

आठव आहे मला जरसा
मी मुक्त जाहलो होतो
आळवले मीच मजला
तुझे सुक्त जाहलो होतो

ओघळलो होतो जरासा
माझ्याच गालावरूनी
होउनी नाव पुन्हा त्या
ओघळातून गेलो तरूनी

आता मला तसा मी
पूर्ण जोखला आहे
तेजवे मला दिव्य जी
मी तीच मेखला आहे


Ninavi
Monday, June 19, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा, कविता छान आहे.
वैभव, मला पण दीमडूसारखंच वाटलं. आठवणी माहेरच्या असाव्यात.
अपर्णा, तुला काय अभिप्रेत आहे सांग गं.


Vaibhav_joshi
Monday, June 19, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीमडु, निनावि .... असेल की ... तसंही असेल ... एखादं पेंटिंग बघताना किंवा ढगांकडे बघताना प्रत्येकाला वेगवेगळे आकार नाही का जाणवत?
एक कविता वेगवेगळ्या वाचकाला वेगवेगळ्या गावाला नाही का घेऊन जात?
एक काम कराल का प्लीज ? तुमचा point of view पण एक एक ओळ घेऊन Detail लिहाल का ? मला उत्सुकता वाटतेय


Abhay_bhave
Monday, June 19, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा, कविता सुंदर. फार काही कळत नाही मला, पण भावली. विशेषत: वैभवच्या रसग्रहणामुळे, आणि दिमडू व निनावीच्या मतांमुळे आमच्यासारख्यांना जरा अधिक कळली.

सुमती आणि देवदत्तजी, मान गये!



Vaibhu
Monday, June 19, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकळत सारे घडले

नकळत सारे घडले नकळत सारे घडले,
नाते आम्हा दोघाचे अचानक कसे जुळले

अचानक आलीस जीवनात भरण्यास तु रंग
क्षणात करुन टाकलेस तुझ्या रंगात मला दंग
होतो मी समजत जगात स्वतला वेगळे
दाखविलेस तु जगाचे रुप हे आगळे
असे हे नकळत सारे घडले नकळत सारे घडले

स्वप्न दाखवलीस मला तु आकाशाची
हवी होतीस तु मला सोबती जीवनाची
तुझ्याशिवाय मजकडे होते जगी या सगळे
पण, तुझे अनमोल मन मात्र दुसर्याकडेकसे वळले
असे हे नकळत सारे घडले नकळत सारे घडले

प्रकाशाची जाणीव करुन अंधार मात्र केलास तु
तुझ्याशी एकरुप होउन धोका मात्र दिलास तु
वैभवच्या जीवनात आगळीक कसे हे घडले
स्वप्नातील जीवन स्वप्नातच कसे राहिले
असे हे नकळत सारे घडले नकळत सारे घडले
नाते आम्हा क्षणात कसे हे दुरावले



Mmkarpe
Monday, June 19, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साकडे...


तुजविण आहे झाले
भकास हे घरटे
ये परतुनी पाखरा
पुन्हा घराकडे...

तुज निजविले, जोजविले
का लाड पुरविले थोडे
या घरट्यातच गिरविलेस तू
गगनाला भिडण्याचे धडे
विसर का पडला याचा
पाहता झगमगाट चहुकडे
ये परतुनी पाखरा
पुन्हा घराकडे...

आंधारल्या दिशा
अंधारले आकाश
मज सुचेना काही
शोधु कुठे प्रकाश?
या डोळ्यातली आच
गहाण तुजकडे
ये परतुनी पाखरा
पुन्हा घराकडे...

नाही भरवसा उद्याचा
उरले श्वास तोकडे
वेळ झाली पोहचविन्याची
स्मशानात लाकडे
आईची वेडी माया
घालते तुज साकडे
ये परतुनी पाखरा
पुन्हा घराकडे...








Ninavi
Monday, June 19, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं.. चांगली कल्पना आहे..
मला असं छान रसग्रहण करता येईल का ते माहीत नाही, पण प्रयत्न करते.
उद्देश हा की वैभवने म्हटल्याप्रमाणे एक कविता दहा जणांना शंभर गावांना कशी घेऊन जाते त्यातली गंमत सगळ्यांबरोबर शेअर करावी.

आणि हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. कविता वाचकाला आवडो वा न आवडो, पण तिचा इतका खोलवर विचार केला जातोय हे कुठल्याही कवीसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असते.


>>आभाळ दाटुनी येता, मन मोहरून जाते,
>>अन मनात दरवळतो आठवणींचा मरवा
मारवा हा खास संधीकालची हुरहूर व्यक्त करणारा राग. ही नववधू आहे. माहेर पूर्ण सुटलेलं नाही, आणि आपल्या संसारात रमायला नुकती सुरुवात झालेली आहे. त्य अर्थी हा सन्धिकालच. दुसरं म्हणजे श्रावण भाद्रपदात सासुरवाशिणींना माहेरी पाठवायची पद्धत आहे आपल्याकडे पूर्वापार. त्यामुळे तिच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ नाही झाला तरच नवल.. ज्याचा षड्ज गाठला जात नाही सहज... मारव्यासारखाच.. दरवळणे ही प्रतिमा त्याला आणखी गडद करते..

झरझर झरती धारा, रान चिंब चिंब होते
चराचरात फुलतो नववधूचा गोडवा
ही त्याच्या प्रेमाच्या वर्षावात फुलणारी ती.. पावसाने फुलणार्‍या चराचरासारखीच..

भिजलेल्या अंधारातून ही साद कुठूनशी येते
ढगाआडुनी हसतो, पुनवेचा चांदवा

पाचूच्या शेल्यावरती इंद्रधनूची किनार खुलते
मेंदीने केशरी सजतो स्पर्श रेशमी हळवा
ह्या ओळी खरंच सर्वांत सुंदर आहेत आणि मलाही तोच अर्थ जाणवतो तेव्हा द्विरुक्ती करत नाही.

मनी दाटल्या आठवांची डोळ्यातून सर कोसळते
तरी मनात भरूनी उरतो ओला श्रावण हिरवा
ही पुन्हा नववधूच्या मनाची हळवी ओढाताण.. माहेरच्या आठवणींनी होणारी जिवाची तगमग.. आणि त्याच वेळी अंगोपांगी बहर फुलवणार्‍या नवतीचीही ओढ.. आणि ही ओढ बाकी सगळ्याला पुरून उरते तेव्हाच ना ती माहेर मागे ठेवून आपल्या घरी रमायला लागते?

Vaibhav_joshi
Monday, June 19, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी ... अप्रतिम ... मला कल्पना होतीच की तू लगेच लिहीशील म्हणून उत्सुकतेने वाट बघत होतो
:-)
रसग्रहण पण कविता असू शकते? आजच कळलं

हाच आणि हाच अर्थ बरोबर आहे , वाटतोय ... बाकी खरं खोटं अपर्णाला ठाऊक ... पण मला निवडायचा झाला तर आता मी हा अर्थ निवडेन ..

मनःपूर्वक आभार.. निनावी आणि दीम्डू.


Antya
Monday, June 19, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पान्ढरे कोकेन राहुलचे
लालसर ओठ राख़ीचे
आमीरची निळी नर्मदा
मोदीन्चा भगवा सर्वदा
राजचा उध्दट भगवा
उध्दवचा राजस केशरी

हीरवी भगवी, भगवी हीरवी
रन्ग बदलते बेस्ट बेकरी
अतिरेक्यान्चा रन्ग खाकी
पोलीसान्चा ओशट ख़ाकी
डाव्यान्ची लालसर डोकी
बच्चनचा आन्ध्ळा ब्लॅक
एश्वर्याचा वाईल्ड लीलॅक

रोज रंगीत व्रुत्त (बातमी: मला टाईप करता आलेले नाही)
रोज रंगीत न्यूज
काळ्या बुबुळावर वाढली
आणिक थोडी दुख़री सूज!


Kedarjoshi
Monday, June 19, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा, अप्रतिम.
निनावी, सुरेख.


Dineshvs
Monday, June 19, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, निनावि, तुम्ही दोघानीहि अपर्णाच्या कवितेवर छान लिहिले आहे, फक्त मला एक शब्द खटकला.
तुम्ही दोघानीहि मारवा लिहिलेय. हा एक सांध्यकालिन राग आहे, हुरहुर लावणारा आहे हे खरे, पण मुळ कवितेत मरवा आहे.
हि एक सुगंधी वनस्पति आहे, याला हिरवाच तुरा येतो आणि त्याला खुप छान सुगंध येतो. तो तुरा सुकला तरी त्याचा वास राहतोच. आठवणींचा मरवा, हे जास्त समर्पक वाटतेय. अपर्णा बरोबर आहे का ?


Ninavi
Monday, June 19, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, खरंच की. मरवा. मरवा आणि दवणा पण असतो ना एक?
हो, तसाही अर्थ छान आहे. धन्यवाद, दिनेशदा.
अपर्णा, बोल गं बाई.
:-)

Ameyadeshpande
Monday, June 19, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ कवितेइतंकच उत्कट वाटतंय वैभव आणि निनावी चे शब्द वाचताना...
हो दिनेश बरोबर... ह्यावरून इंदीरा संतांच्या "पुस्तकातली खूण" कवितेत मरव्याबद्दलच्या काही ओळी आठवल्या.

असेच काही द्यावे घ्यावे... दिला एकदा ताजा मरवा...
देता घेता त्यात मिसळला... गंध मनातील त्याहून हिरवा...


Dineshvs
Monday, June 19, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो निनावि, मरवा, दवणा, पाचु आणि सबजा या सगळ्या सुगंधी वनस्पति.

आई मी कुठे जाऊ, या सिनेमातली एक लावणी,

हिरव्या रंगाची हौस माझी पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा
हिरवी साडी, हिरवी चोळी
काळं काजळ, काळ्या डोळी
काळ्या केसात माळीन मरवा

लावणी शांता शेळकेंची आहे, आशाने गायलीय, ऊषा मंगेशकरचे संगीत आहे.
पण या शब्दाचा निर्णय अपर्णाच्या हाती आहे, हे मला मान्य आहे.


Ninavi
Monday, June 19, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तेही आहे की..
शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators