|
तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार. माउडी, असं लाजवू नकोस गं! लिंबु, अगदी बरोबर बोललात. काही वेळा कामात फारसा choice नसतो. निमूटपणे करावच लागतं. हे काम करत असताना मी युनिवरसिटीत एका lab मधे पण काम करत होते. म्हणून जरा ओढाताण व्हायची. पण बाकी BCs तर बिचारे PhD, masters करत होते. त्यांना तर परीक्षा, TAship, RAship हे सगळं सांभाळून हा उद्योग करावा लागायचा. बरेच जणांना खरंच वाटतं की परदेशी गेलेले लोक अगदी मालदार. अहो शिकायला आलेल्यांकडे कसला डोंबलाचा पैसा? तीच स्थिती इथे post-doc करणार्यांची. शेवटी स्वार्थ असतो बराचसा परदेशी राहण्यात हे तर नाकबूल करून चालणार नाही. पण त्यामागे अफाट कष्ट असतात हे देखिल तितकच खरं!
|
>>>>>> शेवटी स्वार्थ असतो बराचसा परदेशी राहण्यात हे तर नाकबूल करून चालणार नाही. मला पटत नाही की याला स्वार्थ म्हणावा! राजस्थानातुन महाराष्ट्रात आलेला मारवाडी असो की गुजराथ सोडुन आलेला गुज्जु की युपीचे पूरभैय्ये की बिहारी की तमाम यन्डुगुन्डु साऊथ इन्डियन, ते महाराष्ट्रात येतात, इथे पैसे कमावुन आपल्या राज्यात पाठवतात, जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यान्ना त्यान्चे कोणीही "स्वार्थी" म्हणत नाही! तमाम केरळी आणि पश्चिम किनारपट्टीवरील मुस्लिम आखाती देशात पैसे कमवायला जातात त्यान्ना त्यान्चे कोणी स्वार्थी म्हणत नाही पण इथे महाराष्ट्रातलेच काही "थोर विचारवन्त" परदेशात जाउन पैसा कमावणे म्हणजे स्वार्थ अन असा कमावणारे ते सर्व देशद्रोही असा राग आळवत असतात! आय हेट इट. शिन्च्यान्नो मग देशात तुम्ही जे चिन्चोके कमावता ते काय निस्वार्था करता का? की काही न कमवीताच चिन्चोके खाऊन जगता? माझ्या पुरते म्हणशील तर परदेशात किन्वा दुरदुरच्या प्रान्तात धाडसाने जाऊन आपली उपजिविका करणार्यान्बद्दल मला नितान्त आदर हे!
|
Gs1
| |
| Friday, June 16, 2006 - 4:14 am: |
| 
|
थोर विचारवंत... म्हंजे आपले सुमार केरकर का रे भाऊ ?
|
जीयस, अगदी बरोब्बर रे भो! तो तसल्या "थोर विचारवन्तान्चा" सद्ध्याचा मेरुमणी, त्याचे काही शिष्य हितगुजवरही डोकावुन जातात अधुन मधुन!
|
Soha
| |
| Friday, June 16, 2006 - 4:56 am: |
| 
|
मला अनेक दिवस एक शंका आहे की परदेशात पी.एच्डी/ पोस्ट डॉक करायला जर इतके कष्ट पडतात तर लोक जातात तरी कशाला? काटकसर करूनच जर रहायचे तर आपला देशातच का राहून पोस्ट डॉक का करत नाहीत? का तिथून पी.एच. डी. झाल्यावर खरचच खूप चांगल्या जॉब ऑफर मिळतात? माझा कुणाला दुखवण्याचा उद्देश नाही. पण हा प्रश्न मला खूप दिवस पडला आहे.
|
Raina
| |
| Friday, June 16, 2006 - 5:23 am: |
| 
|
जातातंच कशाला म्हणजे काय ? कधी सुवर्ण संधी म्हणुन, कधी ज्ञानाचा खरंच कस लागतो म्हणुन. माझ्या घनिष्ठ ओळखीच्या एकांचा असा अनुभव आहे (त्यांची रसायनशास्त्रात अमेरिकेतुन डाॅक्टरेट आहे- विषय कुठला ते विचारु नका- मला Chemistry चे फक्त spelling माहीती आहे. ) तर ते म्हणतात की तिकडे खरोखरच संशोधन पुढिल टप्प्या पर्यंत नेल्याशिवाय PhD देत नाहीत. PhDदेशात केली तरि अपार कष्ट तिथेही चुकलेले नाहीत. किंबहुना PG/PhD करणे कुठेही फार सोप्पे नाही / नसावे. आणि व्यंकटेश माडगुळरांच्या बनगरवाडी तुन ही "माणसे जगायला बाहेर "पडलीचं होती. तसे कदाचित "शिकायला "ही बाहेर पडत असतील.
|
रैना, बरोबर लिहिलस! शिवाय दुसरा एक दृष्टिकोन असाही की साहित्य, कला-काव्य, तत्वज्ञान, स्वदेशी इतिहास, आयुर्वेद, भाषा याप्रकारच्या देशान्तर्गत विषयाशी सम्बन्धित पीएचडी देशातच केल्या जातात, करणे योग्य व सोपे, तर आधुनिक भौतिक प्रगतीच्या कोणत्याही शाखेच्या विषयाचे सन्शोधन, ज्या प्रदेशात या विषयान्चे मुलभूत सन्शोधन झाल हे अशा परदेशात करतात कारण त्या त्या विषयान्चे अद्ययावत ज्ञान सन्दर्भ तिथे सहज उपलब्ध होऊ शकतात! त्याशिवाय, सन्शोधन करताना मिळणार्या सोईसुविधा तुलनेत परदेशात अधिक चान्गल्या प्रकारे प्रोत्साहित करणार्या स्वरुपात मिळतात जरी INR च्या तुलनेत ते आकडे कमी वाटत असले. त्याशिवाय देशात पीएचडी केल्यावर मिळू शकणार्या सन्धी आणि मोबदला या तुलनेत परदेशात राहुन Phd करुन तिकडेच भरीव मोबदल्याचा जॉब मिळवणे हे एक प्रमुख आकर्षण असतेच! एक आनन्दीबाई गोपाळ जोशी अन्दाजे १२० वर्षान्पुर्वी डॉक्टर बनण्यास परदेशात गेली... तेव्हा तर जातातच का इथपासुन जाऊन धर्म विटाळला, बुडाला इथपर्यन्त अनेक प्रश्ण विचारले जात होते! त्या तुलनेत सोहा तुमचा प्रश्ण अगदीच निरुपद्रवी हे! सहज एक सन्दर्भ आठवला, मी परदेशी जाणार्यान्च कौतुक करतो कारण १८५७ च्या बन्डाचे की वासुदेव बळवन्त फडकेन्शी सम्बन्धित असेच कोणते तरी खटले चालविण्याकरता पुण्यातील काही पेठी इन्ग्लन्डचे दरवाजे खटखटवुन आले होते! (कुणाला नेमका सन्दर्भ माहीत असल्यास द्या बरे... केवढी ही माझी विस्मृती, शेम ऑन इट) असे जाण्यास प्रचन्ड हिम्मत, धैर्य, जिद्द व कष्ट सहन करण्याची अपार मानसिक आणि शारिरिक ताकद लागते, ते येरागबाळ्याचे किन्वा आरक्षणातून मिळणार्या सन्धिसारखे नाही हे! त्यामुळेच, परदेशी जाणारे तेव्हाचे लोक काय किन्वा आत्ताचे तुलनेने कमी कष्टातले (प्रवास, रहाणे खाणेच्या सोई या अर्थाने) लोक काय, मला सर्वान्प्रती आदरच वाटतो! 
|
लिंबु, तुझ्या आदराला पात्र झालो, खरंच बरं वाटलं. स्वार्थीपणाचं शल्य काकणभर का होईना कमी झालं. माझ्या द्रुष्टिनं हा स्वार्थिपणा देखिल व्यक्तिसापेक्षा आहे. काही वेळा तुमचं सगळंच गणगोत तुमच्या बरोबर परदेशी असतं. तुमच्या immigration status च्या हजार भानगडी नसतात. मनात येईल तेव्हा मात्रुभुमीच्या भेटीइतका पैसा जवळ असतो.. तेव्हा तुम्ही फक्त आपल्यासाठी जगताहात हा विचार नाही मनात येणार. पण आता सगळ्यांचीच परिस्थिती अशी नसते. काहींचे म्हातारे आई वडील मायदेशी असतात. त्यातले काही आजारी तर काही जोडीदार गमाऊन एकटे. काहींची देशात राहिलेली भावंड एकटे ती जबाबदारी पेलू शकत नाहीत. (आपण इथून फक्त पैसा फेकून काही सगळ्याच गोष्टी नाही विकत घेऊ शकत त्यांच्यासाठी)! बरं जात रहावं भेटीला तर विसाच्या नाना कटकटी! हे असं सगळं असताना देखील इथल्या पैश्याचा अन सुखसोईंचा मोह सुटत नाही. तेव्हा स्वार्थी वाटणं स्वत:बद्दल हे साहजीक नाही का? रैना, तुझं म्हणणं पटतय बघ. शेवटी भारतातही तुम्ही आपल्या गावचं कॉलेज सोडून शहराच्या कॉलेजात जाण्याची धडपड करता,का तर चांगली संधी. तोच विचार परदेशी उच्च शिक्षण घेणारे पण करतात. त्या शिक्षणाचा फायदा आपल्या मायदेशालाही व्हावा (आर्थिक किवा ईतर रुपात) असा प्रयत्न करणारे लोकही आहेत. शेवटी काय, माणूस विचार करतो, आपणच आपला मार्ग काढायचा कष्ट तर कुठेही करायचेच, तर आपला जास्त फायदा होईल अश्या ठिकाणी का न करा?
|
Moodi
| |
| Friday, June 16, 2006 - 9:19 am: |
| 
|
मृण्मयी तुझे विचार बरेचसे अनुपमासारखेच आहेत हे बघुन खुप आनंद झाला. तुला माणसांची खरच कदर आहे( तो विचार कायम राहू दे अन अनुपमा नागपुरचीच आहे, तू पमा तर नाहीस? ) 
|
Thanks मूडी! मी होते पमा कोणे एकेकाळी, पण झक्कींनाही तीच ID हवी होती...
|
Rimzim
| |
| Friday, June 16, 2006 - 10:36 am: |
| 
|
रैना, माझा अनुभव सांगते. ईथे पी एच डी केल्यावर जेंव्हा आम्ही परत देशात जॉब मिळाला तर परत जावु असा विचार केला. त्यानंतर तिकडुन असे उत्तर मिळायला लागले की तुम्ही ज्या फिल्ड मधे आहे ती त्या लेव्हल ला ईथे (देशात) डेव्हलप व्हायला अजुन बरीच वर्ष लागतील. त्या वरुन आपण कल्पना करु शकतो कि ईथे यु एस मधे बर्याच advance लेव्हल वर काम सुरु असते. तुमच्या साठी बराच स्कोप असतो इथे proff and students relations खुप वेगळे वाटले. तुम्हाला जर काही नवीन करायचे असेल तर त्यांची खुप मदत मिळु शकते. नवीन प्रोजेक्ट मिळवणे सोपे जाते. शिकत असतानाच थोडे फार पैसे वाचवणे शक्य होते. नवीन विषयात काम करायला वाव असतो. technology advanced असल्यामुळे त्याची मदत होते. तुम्ही ज्या विषयात काम करता त्या पेक्शा वेगळ्या विषयाचे काहि classes घ्यावे वाटले तर घेवु शकता. suppose if u r working on maths ani tumhalaa dance cha ekhada class ghyava vatala tar that is poss बाहेर पडायच्या अधि बरेच वेळ चांगला job मिळतो. काम करण्याचे समाधान मिळते. ( आता देशात मिळत नाहि असे मी म्हटले नाहि ) अर्थात या सगळ्या सोबत काही वेळा स्कॉलरशिप नसेल तर काहि लोक बाहेर स्कुल किचन मधे काम करतात. तिथे भांडी घासायचे पण काम करतात. अनेक लहान मोठी कामे करणारी पण असतात.पण या सगळ्याचे फळ त्याना आज ना उद्या मिळ्तेच. पि एच डी बद्दलच सांगायचे तर जेव्हा आम्ही student होतोत. त्या वेळी मझ्या नवर्याचे कित्तेक मित्र MS करुन नोकरी ला लागले होते. छान कमवत होते कधी कधी वाटायचे ति लोकं सेटल झाली आपण अजुन शिकतोच आहे. पण नोकरी लागायची वेळ आली तेव्हा जे लोकं ४ / ५ वर्ष काम करुन कमवायला लागली त्या पेक्शा जास्त पैसे तुम्हाला starting salary मिळातो.त्यामुळे तु विचारलेस त्या प्रमाणे सोपे नसले तरि चांगले आहे.
|
Rimzim
| |
| Friday, June 16, 2006 - 10:39 am: |
| 
|
MN khup chan lihile ahes
|
धन्यवाद रिमझिम! आज आणखी एक किस्सा लिहावा म्हणते BC असतानाचा. भारतीय मुलं मुली तर खूप होती चेपीन मधे. त्यांना कधी काही problem आला अपार्टमेंट मधे तर मला आवर्ज़ून मदत करावी असं वाटायचं. त्यातली बरीचशी मुलं पहिल्यांदाच घरापासून इतकी दूर आलेली. काहींना आर्थिक विवंचना ( TA/RAship /tution waiver न मिळाल्यानं) तर काही जण घराच्या ओढीनं खंतावलेले. असाच एक मुलगा माझ्या बिल्डिंग मधे रहायचा. health & safty inspection ला त्याच्या घरात गेल्यावर त्याच्या खोलीत आई-वडील, बहीण सगळ्यांचे फोटो दिसायचे. आपल्या घराबद्दल पण सांगायचा अधुन मधून. त्याचे आई वडील सर्वसाधारण परिस्थितितले होते. याच्या शिक्षणासाठी बरंच कर्जही झालं होतं. बहीणीचं लग्न व्हायचं होतं. आणि हा घरी पैसे पाठवतो हे देखील मला त्याच्याकडून कळलं होतं. एकदा तो माझ्या घरी आला. अगदी रडकुंडीला आलेला. त्याच्या हातून घराची किल्ली हरवली होती. असं काही झाल्यास जवळपास $ १५० भरावे लागत दंड म्हणून! कारण हा राहत होता ३ बेडरूमच्या अपार्टमेंटमधे. तिथे मुख्य दाराची कोअर की अन बाकी बेडरूमच्या दाराची कुलपं बदलावी लागत. त्याला बसवून सगळं सांगायला लावलं. तो वीकएंडला मित्रांबरोबर बीचला गेला असता पोहोताना ती हरवली असं त्याचं म्हणणं. "बरं मग मी काय करावं?"मी विचारलं. "मला ऑफिसात बोलवलय. आता हा फाईन भरावा लागणार. मी नाही कधीच इतका पैसा देउ शकणार. जेमतेम $ ५० उरतात माझे दर महिन्याला माझ्यासाठी. इतका पैसा कुठून आणु?' "बरं, मी बोलते डायरेक्टरशी. बघू ती काय म्हणते. पण मला तुझी ही सगळी परिस्थिती सांगावी लागेल. कबूल?" "अगदी". त्याच्या चेहेर्यावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटला. बरं वटलं. मलाही वाटत होतं, बघू याला हे माफ करवता आलं तर! त्याच दिवशी डायरेक्टरची अपॉइंटमेंट मिळाली. तिला हे सगळं सांगितलं. सगळं ऐकून तिने एकच प्रश्ण विचारला, "मंजुषा, तुझा विश्वास आहे त्याच्या बोलण्यावर? तो नक्की भरू शकणार नाही हा पैसा"? "हो, मी सांगू शकते किती कठीण असेल त्याची परिस्थिती!" "ठीक आहे तर! त्याचा फाईन माफ झाला समज"! मला खूप आनंद झाला. लागलीच त्याला फोन करून मी सांगीतलं. अन त्याचे परत परत आभार मानण्याचे सोपस्कार पार पडल्यावर जरा ऑकवर्ड होतच फोन खाली ठेवला. त्याच वीकएंडला संध्याकाळी मी घराबाहेर उभी होते. campus residences ची डायरेक्टर जात होती. तिला थांबवून मी परत thanks म्हंटलं. आणी नेमकं नको ते द्रुश्य बघावं लागलं. हाच मुलगा आपल्या मित्राच्या कारमधून ढिगभर दारूच्या बाटल्या, करी क्लब नावाच्या महागड्या रेस्टोरेंटचं १५-२० लोकांना पुरेल इतकं जेवण अन snacks वगैरे घेऊन बाहेर पडला. रस्त्यावरच्या एका मुलाला हाक मारून सांगितलं, "आना रातको. पार्टी दे रहा हु". यावर कार चालवणारा मुलगा हळूच उत्तरला, "अबे ज्यादा लोगोको मत बुला. वैसेही तुने बहोत खर्चा किया इसपर. और लाना पडेगा." डायरेकटर बाईंनी याचं लागलीच भाषांतर मागितलं. अन मी मनात म्हणंत राहीले' 'त्या दर महिन्यात उरवलेल्या ५० मधून तू अणलंही असशील हे सगळं, पण माझीच इथे येण्याची वेळ चुकलीरे गड्या'!
|
Moodi
| |
| Friday, June 16, 2006 - 3:44 pm: |
| 
|
कठिण आहे मृण्मयी मग. अगं पुढे खरच तशी वाईट परिस्थिती आली तर त्याच्यावर किंवा इतर कुणी भारतीय मुलावर विश्वास तरी ठेवतील का? वास्तवीक परदेशात आल्यावर आपण आपले लोक शोधत रहातो मग माणुसकी दाखवुन मदत जरी केली तरी पुढे अशा लोकांवर वर विश्वास कसा बसायचा? का होते असे? 
|
Shreeya
| |
| Friday, June 16, 2006 - 4:15 pm: |
| 
|
मृण्मयी, नेहेमीसारखच सुंदर अन विचार करायला लावणारे! खरेच कधी कधी कोणावर अन किती विश्वास ठेवावा कळेनासे होते बघ! पण "याला जीवन ऐसे नाव..."
|
म्रिण्मयी, हव तर माझ्यावर कृपा कर पण तुझ्या मनातून ते "स्वार्थी निस्वार्थी" पणाचे शल्या समुळ काढुन टाक! मनाच्या कोपर्यातही त्याचा मागमुस ठेवु नकोस! हव तर माझी विनन्ती समज! च्यामारी इकडे काय की तिकडे काय हजारो कोटीन्ची माया दोन नम्बरने मिळवणारे असतात त्यान्ना नाही पडत असल्या विवन्चना स्वार्थीपणाच्या, तुम्ही तर प्रामाणिक पणे कष्ट करुन पैसे कमाविता, तुम्हाला कशाला हवीत ही शल्ये? लक्षात ठेव, जग हे दुतोन्डी सापासारख असत! ते दोन्ही बाजुन्नी बोलत! त्याच्या बोलण्यावर किती विसम्बायच हे ज्याच त्यान ठरवाव! इयत्ता दुसरी तिसरीत असताना आईने शिकवलेले हे वाक्य आजवरच्या आयुष्यात मी असन्ख्य वेळेस अनुभवले आहे! तेव्हा शल्य वगैरे हळवे पणा सोड, तुम्ही भरपुर पैसे कमवा, पाहिजे तसे खर्च करा! एनि वे, त्या गोष्टीतल्या त्या १५० डोलरकरता काकुळतीस येणार्या मुलाची गोष्ट वाचुन दोन गोष्टी मनात आल्या! १. एकतर तो खोटे बोलला आणि त्याने तुला फसविले! (तशी शक्यता कमी वाटते) २. "'त्या दर महिन्यात उरवलेल्या ५० मधून तू अणलंही असशील हे सगळं" तुझ्या या वाक्याप्रमाणे त्याने खरच जमविलेल्या पैशातून आणल असेल तर मग माझ्या आईने सान्गितलेला दुसरा धडाही मला खराच मानावा लागेल! धडा असा की एकवेळ गरीबी सरळ सरळ भोगावी, पण चुकुनही तिच प्रदर्शन मान्डू नये, त्याबद्दल चकार वाच्यता कुणाजवळ करु नये! प्युवर कोब्रा इस्टाइल पेठी सल्ला हे हा माझ्या आईचा! कारण एकदा का तुम्ही स्वतःला गरीब म्हणुन जाहीर करुन घेतले की जगाची तुमच्या कडे बघण्याची नजर बदलते! आणि ठराविक गोष्टीन्च्या पलिकडचा कसला उपभोग घेण्यास जगाच्या द्रुष्टीने तुम्ही अपात्र ठरता....! यावर मी अधिक भाष्य करणार नाहि! पण या विवेचनाचा सम्बन्ध देशातल्या जातवार राजकारणाशी फार जवळचा हे बायदिवे म्रिणमयी, मी इथे या तुझ्या बीबी वर येवुन काहीबाही बोलतो, चालेल ना तुला? 
|
Shyamli
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:31 am: |
| 
|
खरच का वागतात लोक असे...
मृण्मयी...लिखाण रंगत चाललय दिवसेंदिवस....पुढच्या भागाची वाट बघत असतो ग आम्ही...
|
Suyog
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:37 am: |
| 
|
तुम्हि हा विचार करित नाहि कि त्याने जर पार्टी दिली नाही तर त्याला कमी पणा वाटत असेल. "सातच्या आत घरात" पाहिला का तुम्ही, त्यात दाखविले आहे, परवडत नसले तरि कधितरी असल्या गोश्टिसाठी खर्च करावा लागतो आणि दुर्देवाने वेळ चुकली.
|
Cool
| |
| Saturday, June 17, 2006 - 2:47 am: |
| 
|
LT: मी इथे या तुझ्या बीबी वर येवुन काहीबाही बोलतो, चालेल ना तुला? >>> पुराणिक बुवांनी पुराण सांगत रहावं, असं बेंबट्याचे काका म्हणाले होते नाही का, दिव घे बरं, बाकी स्वार्था बद्दलचं पटलं.
|
Milya
| |
| Saturday, June 17, 2006 - 4:23 am: |
| 
|
मृण्मयी छान लिहिते आहेस... एक एक अनुभव वाचुन एकदम थक्क व्हायला झाले
|
|
|