Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
तरिही

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » तरिही « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 06, 200620 06-06-06  2:40 am
Archive through June 15, 200620 06-15-06  5:57 am
Archive through June 17, 200620 06-17-06  4:23 am

Mrinmayee
Saturday, June 17, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून खूप खूप बरं वाटतं. आणखी लिहिण्याचा हुरूप येतो.
लिंबु, तुझी विनंती खूप प्रामाणिक आहे. पण शेवटी तुही म्हणतोच ना आईची शिकवण येते कामी. आता माझ्या आईला मी सतत दुसर्‍यासाठी झीजताना पाहिलंय. तेच संस्कार असावेत, दुसरं काय? तसंच हा BB आपल्यासगळ्यांचा. इथे मी आपल्या अनुभवातून बोलते. तू आपल्या. तेव्हा त्यात वाईट ते काय?
श्यामली, का वागातात लोक असं याचं उत्तर हेच..व्यक्ती तितक्या प्रकृती. तेव्हा सगळेच धोपटमार्गे सारखं अन सरळ नाही वागू शकत.
सुयोग, तुमच्या म्हणण्या प्रमाणे मी बराच विचार केला (तो करायला नको होता हे ही तितकंच खर.! ) म्हणूनच मी त्याने पार्टी द्यावी की न द्यावी, पैसा खर्च करावा की न करावा यावर भाष्य केलेलं नाही. ते त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याने काय करायचं हा त्याचा प्रश्ण. तो कुणाला त्याचं कारण द्यायला बांधिल नाही. म्हणूनच मी येव्हडच म्हणाले, आमचं timing चुकलं.
ज्या व्यक्तिनं त्याला सूट दिली $ १५० ची, ती व्यक्ती या सगळ्याचा कुठल्या दृष्टीकोनातून विचार करेल हे मला माहीती नाही. पण पुढे कधी कुणा इतरासाठी मला शब्द टाकावा लागला तर त्यावर ती किती विश्वास ठेवेल याची मला काळजी वाटली.
मिल्या, मन्:पूर्वक आभार. तुझ्या सारख्या लेखकाची पावती म्हणजे... अनुभवाचं म्हणशील तर हे BC प्रकरणातले काही अनुभव असे आहेत की ते न लिहिलेलेच बरे. आपल्यातल्या काही भारतीयांनीच लाजेनं खाली माना घालायला लावल्या आहेत.


Champak
Saturday, June 17, 2006 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या मुलाने पार्टी का दिली होती हे विचारु शकता का तुम्ही त्याला?

नाही तर, तो बिचारा लाजे गाजे जिंदगीतली एक च पार्टी देत असेल काही कारणाने अन तुम्ही मात्र तो वाईट आहे असे च समजौन चालणार!


Charu_ag
Sunday, June 18, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृन्मयी, अतिशय सुंदर लिहीलयस. लिहीत रहा तुझे अनुभव.

Lopamudraa
Sunday, June 18, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रिन्मयी छान लिहिलय सगळ..
अपराधीपणा मलाही वाटायचा.. आता लिंबुचे post वाचल्यावर कमी वाटतोय.


Jadhavad
Monday, June 19, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु टिम्बुम्रुण्मयी,
एक छोटासा छेद आपल्या विचारांना....पाहीजे तर एक उप्-शाखा म्हणा.

बाहेर कमविलेले USD, GBP, EUR हे भारतात कमविलेल्या INR पेक्षा कमी केव्हाही नाहीत. ज्याला प्रगती करावीशी वाटते त्याची कष्ट कुठेही करायची तयारी असते. मग त्या कष्टाचे महत्व 1 USD = 0.022/23 INR किंवा 1 GBP = 1.40/45 EUR म्हणवुन का कमी करवुन घ्यावा. न्युयॉर्क ला ५ डॉलर ला १ डझन चांगले केळी मिळतात, ह्याचा अर्थ देशावरच्या माणसाने ( 45*5 ) म्हणजे २२५ डझन केळी अस म्हणुन आपल्याकडे २५ ला मिळतात असा अन्वार्थ बिल्कुल घेवु नये.

जर कष्टाचे मोल जर भारतामधेच समधानाने मिळु लागले, तर मी का म्हणून changi to J.F.K वार्‍या घालु? तुलनात्मक नव्हे पण आर्थिक एवजी जर माझ्या कष्टाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे मला मोबदला मिळणार असेल तर का मी Dautche bank मध्ये खाते उघडावे? बँक ऑफ़ महाराष्ट्र चांगली ना.

आपण म्हंटल्याप्रमाणे "थोर विचारवंत" विचार मी सिंगापुर मध्ये अनुभवले आहेत. फ़रक एवढाच की ते चिनी भाषिकांचे होते. त्यांच्या मते यन्डुगन्डु फ़ार लकी.... तरुणपनी डॉलर मध्ये कमवायचे आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्याचे २७ पट करुन रुपयामधे जगायचे. मला नाही पटले. महाराष्ट्राचा मरहट्टा आहे चिगट.... एव्हढा नाही. आएफ़ेल टॉवर वर जावुन त्याची ३० युरोची प्रतिक्रुती मी स्व्:त आणलीये. २९" T.V. च्या स्क्रीन पेक्षा मोठी AIRBUS ३८० च मॉडेल मी ठेवलय. लिबर्टी चा एक सुबक भव्य statue आज नाशकात आहे. पण एक नक्कीच, हे सगळे पाय सगळे अंथरुन बघुनच पसरविले आहेत. आजही माझ्या कडे सावरकर चरित्र आणि राज शिवछत्रपती आहे.

चर्चा अपेक्षित.
अमित


Maitreyee
Monday, June 19, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आएफ़ेल टॉवर वर जावुन त्याची ३० युरोची प्रतिक्रुती मी स्व्:त आणलीये. २९" T.V. च्या स्क्रीन पेक्षा मोठी AIRBUS ३८० च मॉडेल मी ठेवलय. लिबर्टी चा एक सुबक भव्य statue आज नाशकात आहे. पण एक नक्कीच, हे सगळे पाय सगळे अंथरुन बघुनच पसरविले आहेत. आजही माझ्या कडे सावरकर चरित्र आणि राज शिवछत्रपती आहे.
>>>>या काही ओळींमधून काय सुचवायचय ते मला कळलं नाही!
असो. पण चर्चा वगैरे करायची असेल तर Views and comments मधे केली तर बरे.


Mrinmayee
Monday, June 19, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry अमित, मैत्रेयी म्हणते तसं मला पण खरंच कळला नाही तुझा रोख. तेव्हा वर एकदा परत खुलासा केला तर लोक काही लिहु शकतील.
आत्तापर्यंत माझं हे लिखाण तुम्ही आवर्जून वाचलत त्यबद्दल मनापासून आभार.
२८ जुलैला भारतातून परत आल्यावर आणखी अनुभव लिहीन.
सगळ्यांसाठी संत्रबर्फी आणीन.:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators