|
शूल तुला वाटले असावे शब्द फिरवतो आहे जणू दुटप्पी जगाचा कित्ता गिरवतो आहे तुला ठाऊक नाही तू एक सुकुमार फूल माझे नशीब काटेरी नखशिखांत मी शूल कळी खुडणार्या हाता सलायाला थांबलो मी आता तुझ्या पाकळ्यांना सलायाला लागलो मी तुझा दोष नाही वेडे फुलायाचा तुझा धर्म दिसे त्याला बोचणे हा असे माझा गुणधर्म पण खरे सांगू तुला ? जीव जपण्या फुलाचा काटासुध्दा कधी कधी काटा काढतो स्वतःचा
|
Meenu
| |
| Friday, June 16, 2006 - 3:02 am: |
| 
|
वा वैभव नेहमीप्रमाणेच छान ....
|
Naadamay
| |
| Friday, June 16, 2006 - 3:03 am: |
| 
|
सुरेख वैभव! देव, स्वरा,..... छान लिहिताय!
|
वा: ... तुषार,देव, वैभव नेहमीप्रमाणेच, सगळ्यांच्या कविता सुंदर आहेत! छे!... regularly येता आलं नाही की असा प्रॉब्लेम होतो! एकरकमी प्रतिक्रिया द्यायला लागते!
|
कळी खुडणार्या हाता सलायाला थांबलो मी आता तुझ्या पाकळ्यांना सलायाला लागलो मी vaibhav... kaay Chaan lihitos...!!!
|
Krishnag
| |
| Friday, June 16, 2006 - 11:51 pm: |
| 
|
पण खरे सांगू तुला ? जीव जपण्या फुलाचा काटासुध्दा कधी कधी काटा काढतो स्वतःचा >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> वैभव, केवळ अप्रतीम!
|
Aavli
| |
| Saturday, June 17, 2006 - 5:32 am: |
| 
|
सलशी जरी माझ्या पाकळ्या तरी मजला हवास तू......... हसरी खेळती अवखळ मी मजला रक्षक हवास तू........ निश्चित मी निद्रिस्त मी तुझ्याच जीवावर माझेही अस्तित्व तसे तुझ्याच असण्यावर......... अगदी झकास लिवतायसा वैभव..............................
|
आवली, मस्त! ही मी ग़ज़ल म्हणून लिहिलीय, पण जमली आहे का, ते लक्षात येत नहिये. I mean काही ठिकाणी घसरल्ये बहुतेक! जमेल तेवढं सांभाळलंय!... डोळ्यांतुन सांगत होतो तुजला गीत नवे, ओठांत थांबले शब्द जागले भाव नवे कधी मिटल्या डोळ्यांतून पाझरे भाव तुझा, ही भाषा नाही परकी, अन् ना शब्द नवे ती धैर्यदायिनी वीज तुझ्या स्पर्शामध्ये, जी देई माझ्या आकांक्षांना पंख नवे मी रोज ऐकतो गीत तुझे वेणूमधुनी, तरी होती रोजच ताल सूर अन् नाद नवे वठलेल्या व्रुक्षातळी उगवली वेल नवी... अन् निष्पर्णाला ग्रीष्मी फुटले पान नवे By the way, व्रुक्षा चा 'व्रु' कसा लिहायचा?!
|
Diiptie
| |
| Saturday, June 17, 2006 - 11:19 am: |
| 
|
अभय व्ही आर यु म्हणजे वृ आर मोठा,
|
वैभव, खरे सांगू का? तुझी शूल कविता प्रथम वाचनात कळली नाही. म्हणजे अजुनही पूर्ण्पणे कळली आहे असे मी म्हणणार नाही. तुझे सगळे शब्द सुरेख असतात त्यामुळे कविता वाचायला खूप छान वाटते. अर्थबोध झाला तर अजुन मजा येते. काही काही कडव्यात नायक तिचा पिता आहे असा खूप भास होतो, काही कडवी प्रियकराची साक्ष देतात, कदाचित प्रियकर देखिल काही विशिष्ठ काळानंतर किंवा भावनांच्या एका पातळीवर पिता होत असावा. तुषार जोशी, नागपूर
|
तुषार ...
तुला कविता पूर्णपणे कळली आहे ... खरंतर मी कधीच लिहीत नाही की काय म्हणायचं होतं वगैरे कारण कदाचित मला अभिप्रेत असणार्या अर्थापेक्षा देखील अधिक चांगला अर्थ वाचकाला मिळालेला असू शकतो पण ह्या बाबतीत अपवाद. कदाचित तू मला हवा असलेला अर्थच काढलेला असल्याने असेल पण मला लिहावसं वाटतंय की काय म्हणायचं आहे . एका कळीचं पूर्ण फुलात रुपांतर होताना त्याने पाहिलं आहे ... तिला protect केलं आहे ... हे समजून की कदाचित ती त्याची होईल ... पण जस जसं तिला तिच्या आवडीनिवडी कळू लागल्या आहेत ( हे ही त्याच्याचमुळे ) तसतसं अंतर वाढत चाललं आहे ... पण केवळ प्रियकराच्या भुमिकेत तो कधीच नव्हता त्यामुळे तो त्या parental भावनेचा आधार घेऊन तिचा मार्ग मोकळा करतोय .. अं ... सदमा मधला कमल हसन ? बाकी पुढे स्पष्ट व्हायला अडचण नसावी .. सर्वांचेच मनःपूर्वक आभार
|
Mruda
| |
| Sunday, June 18, 2006 - 12:08 am: |
| 
|
वैभवा सहीच रे.... बघ हे कसं वाटंतय..... आणि तुषार तू म्हणलं आहेस ते खरं आहे, सतत एक वात्सल्याचं अस्तर जाणवत रहातं ह्यात.. आणि मला वाटतं प्रेम असंच परीपक्व होतं..दोन्ही कडुन.... वाटलेच मला तू शब्द फ़िरवतो आहेस ह्या दुट्टपी जगाचा कित्ता गिरवतो आहेस तू हात सोडता माझा जग माझे थरथरले ह्या भरल्या जगात मी एकटीच की उरले बरे कळाली आता तुझ्या अंतरीची बोच ऐक रे प्रिया पण माझी विनंती एकच फ़ुलण्याचा धर्म माझा अन तुझा टोचण्याचा ' सलंते ' कां रे प्रेम कधी? लुटु आनंद चल जगण्याचा. . . .
|
Jo_s
| |
| Sunday, June 18, 2006 - 12:18 am: |
| 
|
पण खरे सांगू तुला ? जीव जपण्या फुलाचा काटासुध्दा कधी कधी काटा काढतो स्वतःचा वैभव छानच फ़ुलण्याचा धर्म माझा अन तुझा टोचण्याचा सलंते का रे प्रेम कधी लुटु आनंद चल जगण्याचा.… मृदा हे ही मस्त
|
Mavla
| |
| Sunday, June 18, 2006 - 2:14 am: |
| 
|
नमस्कार.. सहिरे सगळे सहिच कविता लिहित आहे सुन्दरच... मावळा.
|
Gondhali
| |
| Sunday, June 18, 2006 - 2:22 pm: |
| 
|
वैभव, कविता मस्त आहे.. तु नाशिकला एम सी एस कोर्सला होतास का रे के. टी. एच. एम. कौलेज ला?
|
Aparnas
| |
| Monday, June 19, 2006 - 4:58 am: |
| 
|
आभाळ दाटुनी येता, मन मोहरून जाते, अन मनात दरवळतो आठवणींचा मरवा झरझर झरती धारा, रान चिंब चिंब होते चराचरात फुलतो नववधूचा गोडवा भिजलेल्या अंधारातून ही साद कुठूनशी येते ढगाआडुनी हसतो, पुनवेचा चांदवा पाचूच्या शेल्यावरती इंद्रधनूची किनार खुलते मेंदीने केशरी सजतो स्पर्श रेशमी हळवा मनी दाटल्या आठवांची डोळ्यातून सर कोसळते तरी मनात भरूनी उरतो ओला श्रावण हिरवा
|
अपर्णा ... मस्त !!! लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरी आलेल्या स्त्रीचे भावविश्व वाटते हे .. आभाळ दाटुनी येता, मन मोहरून जाते, अन मनात दरवळतो आठवणींचा मारवा दाटून आलेलं आभाळ पाहून आपल्या प्रियतमाला आठवून तिच मन मोहरून आलय पण त्याच वेळी तो इथे नाहिये ह्याची आर्तता म्हणून मारवा पण तो कसा ? दु:खी नाही , तर तो दर्वळतोय , वा वा झरझर झरती धारा, रान चिंब चिंब होते चराचरात फुलतो नववधूचा गोडवा समोर झरणारया सरीनी रान चिम्ब होते आहे तसेच त्याच्या पाऊस बरसणं आठवून हिचं जे चराचर आहे (इथे चराचर म्हण्जे तिच मन अस अभिप्रेत आहे का?) त्या मध्ये केवळ त्याच्या सहवासाचा, नववधू असल्याची जाणीव करून देणारा गोडवा पसरतो आहे, फुलतो आहे भिजलेल्या अंधारातून ही साद कुठूनशी येते ढगाआडुनी हसतो, पुनवेचा चांदवा भिजलेल्या अन्धारातून त्या प्रणयाच्या रात्रीची साद येते आहे पुन्हा पुन्हा अन ढगाआडून पुर्णिमेचा चान्दवा खट्याळ हसतो आहे कदाचित तोच प्रियकर म्हणून पण आला आहे कवितेत किन्वा पौर्णिमेचा चन्द्र हा प्रणयासाठी उद्युक्त करणारा मानला गेला असल्याने असेल पण सुन्दर. पाचूच्या शेल्यावरती इंद्रधनूची किनार खुलते मेंदीने केशरी सजतो स्पर्श रेशमी हळवा हे बेस्ट कडवं. पाचूच्या शेल्यावर इन्द्रधनूची किनार. वाह आणि तोच केशरी रंग घेऊन मेन्दीतून त्याचा स्पर्श देहावर सजतो आहे वाह अप्रतिम मनी दाटल्या आठवांची डोळ्यातून सर कोसळते तरी मनात भरूनी उरतो ओला श्रावण हिरवा आणि हे सगळ आठवून डोळ्यांतूनही सरी कोसळतात पण.. पण तरीही ती उदास नाहिये कारण मनात त्याचा ओला श्रावण भरून राहिलाय सुन्दर paradox . कविता आवडली
|
Deemdu
| |
| Monday, June 19, 2006 - 5:48 am: |
| 
|
हम.......... मनाच्या कप्प्यात माहेरच्या आठवणी घेऊन नवजीवनाच्या दारावरच्या नववधुचं अंतरंग वाटलं मलातरी alternate कडव्यामध्ये नववधुचे present भाव आणि त्याला असणारी माहेराच्या आठवणीची जर अस काहीसं वाटतय मला
|
R_joshi
| |
| Monday, June 19, 2006 - 5:51 am: |
| 
|
वैभव, आवली, अर्पणा तुम्ही सगळेच फार छान लिहिता.
|
अपर्णा, तुझी कविता तर नितांत सुंदर आहेच पण वैभवचं रसाग्रहणही तेवढंच अप्रतिम.
|
|
|