Maudee
| |
| Monday, June 05, 2006 - 1:39 am: |
| 
|
M.F.Husain झाला की हो गजानन तुमचा.
|
गजानन, व्वा. तुमची mrs मायबोली वर येते का हो? ए. भा. प्र.
|
सुधीर..मस्तच रे! मावळा, कुठेही पडो!! तुझा पाऊस अगदी झक्कास बरं... गजानना... -चिंगी
|
ही कविता म्हणता येणार नाहि अन विनोदी नाहिये.. म्हणून विडंबनात पण टाकता येणार नाहि म्हणून इथे टाकतोय.. वैभवची माफी मागून... मूळ कविता: अन मिठीत मोगरा एक रात मांडण्यात.. पण खुशीत.. मोगरा एक रात सांडण्यात.. पण खुशीत.. मोगरा दार बंद.. पार बंद.. सुटूनी चालला अनंत श्वास मारतात गंध पण खुशीत मोगरा पात्र पात्र तेजवित.. चालति तिचेच हात पार अंध सारीपाट पण खुशीत मोगरा दोन घास हिच भ्रांत.. तेच रूप आरशांत रोज भुक्त होइ मात पण खुशीत मोगरा रोज भाबडी प्रभात.. जख्मेवर होइ रात मागणेच मंदिरात अन अन खुशीत मोगरा
|
अताच हळवा दूर निरोप मिळाला मरगळ थकवा कुठल्याकुठे पळाला कसे जमते ग हृदय ओतूनी लिहिणे दूर असूनही जवळपास वावरणे तुषार जोशी, नागपूर
|
Jayavi
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:58 am: |
| 
|
क्या बात है तुषार.......! किती वाट बघायला लावतोस रे!
|
मस्त तुशार छान आहे...!!!.. .. .. .. .. . ..
|
Shyamli
| |
| Tuesday, June 06, 2006 - 6:24 am: |
| 
|
देवा आता कळली रे... मेल न वाचताच.... छानच... तुशार हल्ली नसतोस फारसा...का म्हणे?
|
Jo_s
| |
| Friday, June 09, 2006 - 12:19 am: |
| 
|
Chingutai प्रतीसादा साठी धंन्य्वाद..... सुधीर
|
Mavla
| |
| Friday, June 09, 2006 - 1:44 pm: |
| 
|
शतजन्म शत जन्मांची वेदना ही जल धारात बुजेल काय? जन्म जन्म जळतो मी ती ज्वाला आज विझेल काय? मी तर मरणारच पन तिज गर्भात रुजेल काय? चितेवर जळन्या आधी तिज मिठित निजेल काय? हाच विश्वास खरा माझा नंतर श्वास असेल काय? हाच जन्म अखेरचा पुन्हा जन्म असेल काय? नेहमीच येतो पाउस विजेसम ती यील काय? उरि तिजला झेलतान शत जन्म त्रुप्त होतिल काय??? मावळा.
|
Champak
| |
| Saturday, June 10, 2006 - 9:06 am: |
| 
|
अरे..... हि इकडे कुठे?
|
'का रे अस केलस? ' डोळ्यात पाणी आणून म्हणालीस.. ..मी देखिल गहिवरलो भिंतिवरच्या फ्रेममधून
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 14, 2006 - 8:48 am: |
| 
|
ऑं भ्रमरा?? तू कधीपासून?? की मलाच माहित नव्हतं?? छान आहे.. चालू देत...
|
लिहित जा कविता, सगळांनी म्हटल्याप्रमाणे कविता सदरात टाकतो आहे, तुषार
|
अरे ही कवित कवितेच्या bb वर हवी...!!!
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 11:49 pm: |
| 
|
तुशार छान लिहीलस पण इकडे नको कवितेवर हलव
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 12:11 pm: |
| 
|
ही कविता लिहीताना कुणच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा परमेश्वराचा अपमान करण्याचा हेतु नाही ... तरीही इथल्या नियमात बसत नसेल तर mod तुम्ही हे post उडवलेत तरी चालेल ... परमेश्वरास, बसं आता नाही ऐकुन घेणार अजिबात टिका मानवाच्या अंदाधुंदि कारभारावर सर्वप्रथम तुझ्या कारभारात सुधारणा कर ........... खोदकाम आणी बांधकाम विभागात नाही म्हणतात coordination...... वरुण आणी आदित्यातही कधी ते असत नाही म्हणुनच ना कुठे पुर कुठे उन्हानी लाही लाही सरस्वती आणी लक्षुंम्बाईंचा कायम छत्तिसाचा आकडा, अंड आधी कि कोंबडं असला हा सवाल फाकडा मदनाच्या बाणाचा नेहमीच चुकतो नेम त्याच्या हातात धनुष्यबाण ज्याला साधत नाही aim मला सांग तिकडे तो अर्जुन काय करतोय ....? एवढा मोठा धनुर्धर काय तिकडे पाणी भरतोय ....? training दे म्हणावं त्या मदनाला थोडं कुणालाही, कधीही करतो घायाळ त्याचं मारलय काय आम्ही घोडं ....? तुझा भोंगळ कारभार आम्ही नाही चालवुन घेणार नाही केलीस सुधारणा तर सरळ संपावर जाणार सृष्टिचा निर्माता म्हणुन नको मारु फार फुशारकी एक दिवस तरी तुझी सृष्टि आमच्याशिवाय चालव की ....
|
बरं झालं इथे परमेश्वरास लिहिलस देवास नाही.. नाहि तर काहि चहाटळांनी विचारलं असतं मला.. किती भोंगळ कारभार करतोस म्हणून.. छान लिहिलयस..
|
अरे तो तुझाच डुप्लिकेट आयडी आहे .... किती भोंगळ कारभार करतोस रे परमेश्वरा ... छान शब्द पण नीट लिहीता येत नाही
मीनु ... छान लिहीलंयस ...
|
Shyamli
| |
| Friday, June 16, 2006 - 5:14 am: |
| 
|
अरे देवासच होत आधी आत्ता बदललय मीनुनी... हो की नाही ग मीनु... मजा आली मस्तय 
|