training दे म्हणावं त्या मदनाला थोडं कुणालाही, कधीही करतो घायाळ त्याचं मारलय काय आम्ही घोडं ....? ... chaan aahe kavitaa.. kahichyaa kaahii naahiye..!!!!
|
Jyotip
| |
| Friday, June 16, 2006 - 5:22 am: |
| 
|
मीनु उत्तम.... देवाची चांगलीच काढलीयेस.. 
|
मानवास, आयला हे तुमचं बरं आहे आमचं कुणी ऐकत नाही हेच खरं आहे वाटलं होतं मला की जग थोडं चेंज करू अगदी पृथ्वीवरल्यासारखी खाती रिअरेंज करू म्हंटल त्याच त्याच आयुष्याला तुम्ही झाला असाल बोर म्हंटलं आपणच थोडी मजा आणू लावू थोडा आणिक जोर आदित्य आणि वरूणाची अदलाबदल केलीय जरा लक्ष्मी आणि विद्येलाही वागायची वेगळी ठेवलीये तर्हा विश्वकर्म्याच्या जागी आहे मदन आणि मदनाचे टेंपररी आहे सदन अजूनही आहे बरीच यादी ऐकता ओली होइल गादी आत्ता तुमची रजा घेतो काय होइल त्याची मजा घेतो दिवे घ्या सर्वांनी
|
Jyotip
| |
| Friday, June 16, 2006 - 5:57 am: |
| 
|
आयला देवा सहि रे........ 
|
Meenu
| |
| Friday, June 16, 2006 - 6:34 am: |
| 
|
बस का देवा म्हणजे सुधारणा करायची नाही ते नाही वर excuses..?
|
Shyamli
| |
| Friday, June 16, 2006 - 6:46 am: |
| 
|
वा सवाल जबाब चाल्लाय का देवाचा आणि भक्तांचा... सही रे देवा... 
|
Jo_s
| |
| Friday, June 16, 2006 - 6:56 am: |
| 
|
देवा मिनूस तरी म्हणायच. दोघांच्या क्विता मस्त
|
Meenu
| |
| Friday, June 16, 2006 - 9:32 am: |
| 
|
किती दिवस झाले छळत होता हा प्रश्न राजकारणी कशी काय बुवा देउ शकतात, सगळ्याच चुकांची समर्थनं .......? देवा तुम्हीच त्यांचे गुरु आज उलगडा झाला सुधारणेचा एकमेव मार्गही खुंटला 
|
Gurudasb
| |
| Sunday, June 18, 2006 - 11:42 am: |
| 
|
वसुंधरा हुईलगोळ [ पुणे ] यांची हि कविता [ विडंबन ] मला आवडलं . केव्हातरी बटाटे उकडून माय गेली चिरले झकास कांदे परतून फ़्राय केली सांगितले तरी मी मिसळू नकोस पाणी चुकवून ध्यान माझे उपडी करी तपेली कळले मला न कैसी विटली करी जराशी कळले मलाच तेव्हा फ़सवून माय गेली उरले घरात काही नव्हतेच भोजनाचे आणून ब्रेड खाल्ला मिसळून साय जेली स्मरला असा प्रसंग माझ्याच जीवनाचा स्वप्नात माय माझी भरवून घास गेली
|
Antya
| |
| Monday, June 19, 2006 - 12:13 pm: |
| 
|
काही सुचत नाही लिहायला तरीही लिहायलाच लागेल ज्ञानपीठ नसल तरी थालिपीठ ख़ावच लगेल !
|
Aavli
| |
| Wednesday, June 21, 2006 - 1:57 am: |
| 
|
अनंता तुझ्या लेखणीचा चेव तु इथेच उतरव........ लिहितोयस तर लिहि.. नाही मिळालं तरी चालेल ज्ञानपीठ.!! एक दिवस द्रुष्ट न लागण्या.. आईच लावीलं कौतुकाने तीट..!!!
|
Devdattag
| |
| Wednesday, June 21, 2006 - 4:48 am: |
| 
|
आजच सकाळी आमची त्या भगवंताशी भेट झालीये त्यांना म्हंटल सर्विस तुमची आता अंडरवेट झालीये तशा रोज सकाळी आम्ही ठेवतो येणार्यांवर नजरा दिसण्यात कुठे कमी पडतो हा कळत नाही माजरा चेहर्यासाठी सॅलरी आता ग्रॉसवरून नेट झालिये करून एकदा धीर आम्ही गेलो होतो थोए जवळ काका ऐकली हाक अन मग पडलो येउन भोवळ माहित आहे गाडी थोडी जास्त्च लेट झालिये आम्ही कुठे म्हणतो आम्हा पाहिजे आहे माधूरी मागणे आमचे एकच आमची कहाणी नसावी अधूरी तशी आमची जिंदगी एकदम राईसप्लेट झालिये आपण बाजी मारण्याचा अगदी मनात बांधलाय चंग नेट वरनच मैत्री केलिये दिसणार नाही आपला रंग आता तरी तुम्ही द्या यश नीट फ़िल्डिंग सेट झालिये
|
Princess
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:07 am: |
| 
|
वाह देवा.... सुरेख... देवानेच देवावर कविता केलीय. देव नक्की प्रसन्न होणार तुला प्रिन्सेस
|
Meenu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:17 am: |
| 
|
अरेरे देवावर पण ही वेळ यावी ... ठिक आहे रे तुला अ. उ. आ. ...
|
Shyamli
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:20 am: |
| 
|
आता तरी तुम्ही द्या यश नीट फ़िल्डिंग सेट झालिये>>> हो का अरे वा...... अ. उ. आ.
|