Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » तरिही » Archive through June 15, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Tuesday, June 06, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खवलेला नारळ मिळतो महेश. पण आता दर वेळा तो घरात असेलच याची खात्री नाही. रात्री २ वाजता जिन्यावर नारळ फोडण्याचा सूज्ञपणा अंगी असेल तर शेजारी त्रास भोगतीलच ना!
नंतर भेटल्यावर त्यांनी " sorry " पण म्हंटलं. तो नारळ फोडून, खवणल्यावर त्याला वाटायला हे mixer पण लावणार होते येव्हड्या रात्री!:-)
गाणी-बजावणी, TV , मोटारीचा कर्कश्य स्टीरीओ हे सगळं तर चालूच असायचं. पण roommates मधे भांडणं व्हायची ती त्यातला एकजण रात्री मोठ्यानं फोन वर बोलतोय म्हणून!


Dineshvs
Tuesday, June 06, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा काय मस्त, जबाबदारी आहे हि.

Shyamli
Tuesday, June 06, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही...
काय मजेशीर... आहे हा प्रकार...
मज्जा आली ग...


Chinnu
Tuesday, June 06, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाई ग. काय काय दिव्य केलयस मृन्मयी.. Caretaker/Co-ordinator ची जबाबदारी फारच कठिण असतेय.

Mrinmayee
Tuesday, June 06, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, अगं वेगळया अपार्टमेंटमधे कुणाबरोबर शेअर न करता राहण्याचा तोच एक मार्ग होता. लीगली मला पैसा मीळवता येत नव्हता(याचा अर्थ मी गैरमार्गाने मिळ्वला असा नाही हो:-). तेव्हा युनिवर्सिटी रीन्युमरेशनसारखं काही द्यायला भाड्याचे पैसे कमी करते. $९०० चं घर ३००त मिळतं.
माझ्याजागी कोणी दुसरी असती तरी तिने हेच केलं असतं. ६ वर्ष नाही ग काढवत दुसर्‍या अनोळखी कुटुंबाबरोबर!
मात्र रात्री ३-३.३०ला जर lock-out उघडून द्यायला जायचं असेल तर मी पोलिसांना फोन करत असे. ते एस्कॉर्ट करायचे. कारण मुख्यत: हिवाळ्यात बाहेर सामसूम असते. तेव्हा दार उघडून मागणारा स्टुडंट कसा आहे ते काय माहिती?
अनिरुध्दचा जीव वर खाली व्हायचा. पण निशादला झोपेत एकटं ठेवून तो कसा येणार? मी त्याला असंही म्हणू शकत नव्हते "ही घे master key अन उघड दरवाजा. कारण ती वापरायला पण बरोबर अथॉरिटी लागते.
उन्हाळ्यात फारसा प्रश्ण नसायचा. ह्या नारळ्फोड्यांसारखे बरेच निशाचर बाहेर गप्पा करत उभे असायचे. पण का कुणास ठाउक, चायनीज BC मुलिंना देशी मुलांची जरा भिती वाटायची.


Jadhavad
Wednesday, June 07, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी,
परदेशात असतांना तुला जे जाणवल, ते १००% खरे. एक देसीच दुसर्‍या देसीला मदत करयल काचकुच करतो. पण बाकिच्या देशाचे खरच मना पासुन मदत करतात. आणि त्यात शेजारचा महाभाग जर घाटावरचा देशस्थ असेल तर कल्पना न केलेली बरी.

अमित


Mrinmayee
Thursday, June 08, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं तर तारिख विसरण्यासारखा दिवस नव्हता तो! तरी आज काही केल्या ते details आठवत नाहीत. पण तो वार होता शनीवारचा. एरवी समस्त चेपिनकर रात्री उशीरापर्यंत मजा करून दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ताणून द्यायचे. पण ती सकाळ मात्र खूपच वेगळी निघाली.
सधारण १०च्या सुमारास अचानक बार बी क्यू चा वास यायला लागला. दिवस spring चे तेव्हा खिडक्या उघड्याच होत्या. मला अश्चर्य वाटलं इतक्या सकाळी कोण उरकानं हे सगळं करतंय म्हणून! येव्हडा विचार सुरु असतानाच शेजारच्या बिल्डिंग मधून फ़ायर अलार्म ठणठणायला लागला. निशादला काखोटिला मारून मी अन आनिरुद्ध खाली उतरलो काय झालं ते बघायला.
बाहेर आलो तर समोरचं द्रुष्य बघून हात पाय गार झाले माझे. " G " बिल्डिंगच्या ३ बेडरूमच्या घराला आग लागलेली! ज्वाळा सगळीकडे भडकलेल्या. नुसता हल्कल्लोळ! बाहेर फक्त एक पोलिसांची गाडी उभी. ते जमेल तसं लोकांना मागे ढकलत होते. २ मुली जोरजोरात किंचाळून " our friend is still in the apartment" हे सांगत होत्या. काही लोक ९११ ला कॉल करत होते.
ईथे आपली building co-ordinator(BC) म्हणून काही जाबाबदारी आहे हे समजायला २ मिनिटं लागली. त्यानंतर मी अन G building चा office च्या दिशेनं धावत सुटलो. मास्टर की घेऊन बिल्डिंग मधल्या बाकिच्यांची घरं उघडून त्यांना कमित कमी बाहेर निघा सांगणं आवश्यक होतं. तोवर बाकी BCs , campus recidences ची asst director सगळे गोळा झाले होते.
आग लागल्या पासून सातव्या मिनितात आगीचे बंब येऊ लागले. पाण्याचा वर्शाव ज्वाळा शांतं करण्याचा प्रयत्न करत होत्या. फक्त ७-८ मिनिटा.त आग जवळपास पूर्ण घरात पसरू लागली होती. आत कोण कोण आहे हे कळायला मार्ग नव्हता.
शेवटी त्या ओरडणार्‍या मुलींना बाजुला घेऊन paramedic नी कसं बसं शांत केल. त्यांच्या म्हणण्यानुसार घरात तेव्हा फ़क्त १ मुलगी होती. दोघी बाहेरगावी होत्या. एक जण कामाला गेलेली अन ह्या दोघी बाजारातून येत होत्या.
बर्‍याच गोंधळानंतर बेशुद्ध पडायच्या बेतात असलेली एक मुलगी एका झाडाखाली दिसली. तिला पाहिल्यावर ह्या दोघिंनी तिच्या कडे धाव घेतली. तेव्हा कळलं, हीच ती घरात असलेली मुलगी. फायर अलार्म झाला तेव्हा ह्या मुलींच्या अपार्टमेंटच्या खाली राहणारी मुलं धावत वर गेली. आग लागली होती स्वयंपाक घरात ह्या मुलिनं पाण्याऐवजी तेल असलेल्या भांड्याखालची आच सुरु केल्यामुळे! मुलांनी हिला खेचून बाहेर काढली. (ती भितीनं गारठून एका जागी उभी होती नशीबानं स्वयंपाकघराच्या बाहेर!)
सुदैवानं मनुष्य हानी झाली नाही. सगळ्या BCS ना नंतर त्या घरात नेलं. इतकं भयानक वाटलं आतलं सगळं बघून! त्या दिवशी कळलं की इथल्या पुठ्ठ्याच्या घरांना लागलेली आग १० मिनिटात काय काय भस्मसात करू शकते.
त्यानंतर residents साठी fire safty चे वर्ग सुरु केले. आम्हाला प्रत्येक घरी जाऊन लोकांना सगळं समजलय का ते बघण्याची कामगिरी दिली.
ह्यातून एक चांगली गोष्ट ही की आळशितले आळशी लोक पण फायर अलार्म वाजल्यावर निमूटपणे building च्या बाहेर येऊ लागले, काही दिवस तरी!


Ninavi
Thursday, June 08, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! धीराची गं बाई तू.

Mrinmayee
Thursday, June 08, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, अगं फक्त माझ्या धिरानं काय होतय? एरवी एकमेकांशी भंडणारे सगळे BCs त्या दिवशी रात्री पर्यंत एकत्र काम करत होते.
मी फक्त त्या मुलिला घरी नेऊन coffee पाजली अन कपडे दिले घालायला. तिच्या अंगावर त्या मुलांनी दिलेले त्यांचे कपडे होते. ती नशिबानंच वाचली. आंघोळ करताना मधेच बाहेर आली अन घाबरून नुसती स्टोव वरच्या आगीकडे बघत उभी!
अश्या निश्काळजीपणाचा record होता तीचा. पण आपल्याला बघवत नाही ना कोणी असं अपराध्यासारखं अंग चोरून उभं राहिलेलं!


Dineshvs
Thursday, June 08, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण कितीहि काहि म्हणो. ऐन प्रसंगात काहि जणांची बुद्धी झपाट्याने काम करते तर काहि त्या मुलीसारखे थिजुन जातात. दोन्हीहि नैसर्गिकच आहे.

Zelam
Thursday, June 08, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hats off to you मृण्मयी.

Chinnu
Thursday, June 08, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच धीराची ग तु मृण्मयी!! प्रसंगावधान राखणे सर्वांना नाही जमत.

Mrinmayee
Thursday, June 08, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या कौतुकानं जरा कानकोंड्यासारखं होतय. खोटी खोटी मॉडेस्टी म्हणून नाही पण मनापासून सांगतेय, त्या आगीत नुकसान झालेल्यांना सावरायला सगळ्यांनीच खूप खूप मदत केली. माझा खारीचा वाटा!
हे आगीतलं अपार्टमेंट पहील्या मजल्यावर. त्यामुळे आग विझवताना शेजारच्या घरातून जावं लागलं फायर मार्शल्सला. तेव्हा तिथे नुकसान. खाली ग्राऊंड फ़्लोअरला राहणार्‍यांच्या घरात वरून पाणीच पाणी. त्यातल्या २ जणांचं computer, backup केलेला थीसिसचा डेटा हे गेलं. काही भारतीय मुलं होती. त्यांच्या पासपोर्ट आणि इतर I -२० सारख्या महत्वाच्या पेपर्सचं पाण्यानं नुकसान. फार वाईट अवस्था होती.
म्हणूनच आज आपल्या लोकांना, जे अश्या घरांमधे राहतात त्यांना सांगावसं वाटतं कळकळीनं..बेपर्वा होऊन नका स्वयंपाक करू. अन कधीही झालेला फायर अलार्म "हं नेहमीच वाजत असतो, दर वेळा काय जायचं बाहेर" किव्वा "बाहेर फार थंडी आहे, झोपमोड होतेय" या असल्या कारणांनी दुर्लक्षित करू नका. खूप किमती आहे हो आयुश्य अश्या तर्‍हेनं फुकट घालवायला!


Shreeya
Thursday, June 08, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, १००% खरे!
पण असे अनुभव आपल्याला खूप काही शिकवुन जातात.
मला तुझे कौतुक वाटते की प्रत्येक प्रसंगातुन तु काहीतरी विचार करायला लावतेस.(मेल चेक कर तुझी.)


Shyamli
Sunday, June 11, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे काय काय करावं लागलं गं तुला..
मानना पडेगा....


Amayach
Sunday, June 11, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayee छान लिहीतेस!! keep writing .

Raina
Thursday, June 15, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayee,
तुझं लेखन खरंच खुप आवडले !

Limbutimbu
Thursday, June 15, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रिणमयी, हे म्हन्जे भन्नाटच काम हे की!
पण काय हे ना, आवडो की नावडो, कराव तर लागतच!
तू आपली स्वतला अन पोराला अन नवर्‍याला साम्भाळुन रहा ग बाई!
बाकी इकडच्या लोकान्ना एनआरायचा पैसा दिसतो फक्त, त्यामागचे कष्ट जिद्द अन धोके उचलायची तयारी दिसत नाही! वाईट त्याच वाटत!


Moodi
Thursday, June 15, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी हेच प्रसंगावधान कायम राहू दे.

Maudee
Thursday, June 15, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, बापरे!!!
काय काय केलं आहेस तू??
मानाचा मुजरा तुला





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators