Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 15, 2006 « Previous Next »

Manasi
Wednesday, June 14, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वैभव अतिशय सुन्दर आहे क्षणोक्षणी

Manasi
Wednesday, June 14, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेच सगळेच छान लिहित आहेत. तशि मे इथे नविन आहे आनि मल रोज येणे जमत नाहि त्यामुळे खुप वाचायचे रह्ते. एक्दम २-३ दिवसन्चे साठते.
वैभव तुझी नश्वर अप्रतिम आहे. आणि दरबार सुद्धा सुन्दर.
खरेच तुझे लिहिणे वाचून आपण लिहिणे सोडावे असेच वाटते. तु जे कविता व्रुत्तातच असली पाहिजे असे म्हणत होतास ना ते सविस्तर सान्गशील का कधीतरि. मला त्या द्रुस्टिने प्रयत्न करायला आवडेल.
मीनु रुपान्तर छान होते आजचा दिवस......ऽ
अणि कवित सुद्धा
श्यामलीची हट्टि कविता गोड आहे....
म्रुदा अर्चना छान
तुमचे सगळ्यान्चे वाचून खरेच स्वत:ची काविता टाकायला चान्गले नाहि वाटत. काविता करण्याच्या बाबतीत मी फारच नवीन आहे. अगदि हल्लीच लिहायला लागले आहे (१-२ महिने). बघु जमते का.


Manasi
Wednesday, June 14, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मेघ

या मेघानो या गगनावर
गर्जत बरसा वसुन्धरेवर

धुन्द होउ दे त्रुषार्त धरती
भिजू दे पाने भिजू दे पक्षी
वर्षा आता त्रुणान्कुरावर

या मेघानो या गगनावर

लालगुलाबी रन्ग विखुरती
मेघान्ची आकाशी नक्षी
इन्द्रधनू खुलू दे क्षितिजावर

या मेघानो या गगनावर

खळाळती निर्झरही हसती
व्रुक्षलता हर्षाने न्हाती
रिमझिम हिरव्या मखमालीवर

या मेघानो या गगनावर

जलधारा करी मन्जुळ गायन
मयुर करी अद्वितीय नर्तन
पडो मोहिनी आसमन्तावर

या मेघानो या गगनावर


Ninavi
Wednesday, June 14, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, क्षणोक्षणी सुंदर आहे.

मानसी, चांगलं लिहीत्येस गं. लिहीत रहा.

लोपा, अप्रतिम आहे ओव्हरफ्लो.


Chinnu
Wednesday, June 14, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव शेवटचा पंच अगदी सही बसतो तुझा.
मानसी, मीनु, अर्चना, प्रीती, देवा छान! इंद्रा रे, लग्न झल्यानंतर कविता सुचायला लगल्या का! :-) छान आहे बरं.
लोपा, काय म्हणु? तु इतकं अचुक मनातलं लिहीतेस कि वाचत रहावसं वाटतं. खुप छान.
निनावी, थांबलीस का? येवु दे की!
गिरी फ़क्त डोकावायच नसतं इथे. कविता पण पोस्टाव्यात आपल्या!


Tusharvjoshi
Wednesday, June 14, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मीनू,

गृहित मधे गृहित धरण्याच्या कलेचे अचूक वर्णन केले आहेस. तुझ्या साध्या शैलीतली आणि एक छान कविता. मी सहज धरू जाते सूर्य (सूर्य बरं) ही ओळ विशेष आवडली.

वैभव,

ल ला ल ला ला, ल ला ल ला ला, ला ल ल ला ला
या पद्धतीने खुपच छान म्हणता येते आहे. तिसर्‍या कडव्यात गंधाळुन मुळे विरस होतोय आणि सहावे कडवे सुद्धा हलले आहे. रसिक म्हणून सांगितले राग नसावा, तुझ्या प्रतिभेला यात फेरफार करून ते नीट करता येईलही कदाचित.

पहिल्या पाच कडव्यांमधे कवितेचा वेगळाच रंग जाणवतो. असे वाटत राहते की जमलंय आणि पुढे आणि जमणार आहे, नातं रे. पण शेवटच्या कडव्यात नाटकीय कलाटणी वाटते. ईथे ती कुणाचा फास जपते आहे (मंगळसूत्र का?) आणि श्वास कुणाला आठवून कोंडतो आहे? यात वेगळाच अर्थ वाटला आणि कवितेचे शेवटचे कडवे असल्यामुळे कवितेचा सारांश या कडव्यावरून लावायचा का? असे ही वाटून गेले.

तू शब्दप्रभू आहेस, तुला कविता छान होती म्हणणे म्हणजे, सूर्याला...

लोपा,

भावना अस्ताव्यस्त पसरल्या की वाहवत जातात
अन बांध घातला की overflow होतात

या ओळींमधे की मुळे विरोध दाखवायचा प्रयत्न वाटतो. खरं म्हणजे दुसरी ओळ पहिली ला वाढवते आहे असे वाटते. म्हणजे अन बांध घातला तरी overflow होतात असे म्हणायचे आहे असे वाटते.

तुषार जोशी, नागपूर


Meenu
Wednesday, June 14, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली तुझ्या कवितेवरुन सुचलं म्हणुन लिहीतेय गं ... बघ जमलय का ...?

ठिणगी

असे किती स्वप्नबिंदुंचे ओरखडे अजुन
झेलेल तुझं मन .....?
खरय अगदि खरय तुझं ......
नाही येत हुंदका कानावर
पण जाणवतोच ना हुंदका आलेला
तरीही का म्हणायचं की नाहीच आलेला ..?
जाणवेल जेव्हा तुझे अस्तित्व तुला तेव्हा पडेल ठिणगी
पण केलस दुर्लक्ष म्हणुन आहे का ती उत्क्रान्ती तरी नक्कि ...?
बंडखोर मनाला तरी कसं म्हणु शाप ..?
तेच तर देतं नविन दिशा धुंडाळायला बळ अमाप
अरे हिच तर नव्हे ठिणगी ती
जिची तुला वाटत होती भिती ...??


Lopamudraa
Wednesday, June 14, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार.. छान सांगितलेय.. असच सांगत रहा...!!
मीनु... क्या बात है... अगदी जमलीय... ही पण बाजु..सही ठिणगी टाकली...!!
एक कविता fathers day निमीत्त


Lopamudraa
Wednesday, June 14, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक जन्म तरी...

बालपणाला बाय करुन निघाले जेव्हा..
पैजण पाउले अंगणी थबकली तेव्हा...
गहीवरल्या दाराला.. खिडकिचा आडोसा होता
डबडबत्या पापण्यातुन मायेचा कवडसा होता.
माझ्या लाडक्या लेकराला " जपा "
फ़क्त एव्हढच म्हणालात तेव्हा तुम्ही पप्पा..
पाठिवर हात थरथरत होता...
रडता रडता सुध्दा तुम्ही माझेच डोळे पुसत होता.

.सांगत होता तरीही
" आठवण नको काढुस,...
भुतकाळासाठी कधी नको रडुस,
स्वतंत्र व्यक्ती तु,... वेगळे तुझे " आकाश "
काळजी नको करुस.. आम्ही सुध्दा राहु इकडे झक्कास " !!

आठवत राहते पप्पा नेहमी तुमच्या सार्‍या गप्पा
करुन घेतलेली १ Aug च्या भाषणाची तयारी..!!
आणि पहिल्यांदा सायकल शिकवली तेव्हाची भरारी..
रागवायचे तेव्हा नजर तुमची करारी...!!

कसं विसरु सारं
थांबत नाही हे बरसतं पाणी खारं...
एकदा विचारेन म्हणते देवाला..
मुलीच्या हातात का समाजाने बापाचा " कणा"द्यावा..
त्यालाच का लेकराच्या ताटातुटीचा शाप द्यावा..

कशी होउ उतराई...
मनातुन काही जात नाही..
प्रयत्न मात्र नक्की करेन...
तुम्हाला अभीमान वाटेल असे काही करुन दाखवेन..

तेव्हा देवालासुध्दा वाटावे..
एक जन्म तरी मुलीचा बाप व्हावे...!!!



Chinnu
Wednesday, June 14, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thats so sweet लोपा!

Swara
Wednesday, June 14, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन आहे मंडळी. सांभाळून घ्या.

आठवण तुझी वार्‍याची चुकार झुळुक
काही कारण नसताना येते
आणि चापून चोपून बसवलेल आयुष्य
केसांच्या बटांसारख उधळून देते
हात सावरतात केस जरी
धावते मनातून सुखाची लहर
चेहेर्‍यावरती दिसतो जुना
तोच तुझ्या सहवासाचा बहर
एका क्षणासाठीच पण
मुक्त होते मी पुन्हा
एरवी करू धजत नाही
तोच आता करते गुन्हा
उगाच मग होते गोरीमोरी
आठवणींची तुझ्या वाटते मला चोरी...
वारा पडलेला असतो
जेव्हा मी भानावर येते
कळत नाही मलाच की
मन का अपराधी होते?
कोषामध्ये शिरताना
मी स्वत्:लाच बजावते
पुढच्या वेळी वार्‍याची झुळूक येईल
तेव्हा खिडकी बंद करून घ्यायची.


Meenu
Wednesday, June 14, 2006 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा स्वरा आणी लोपा सुंदरच ...

Shyamli
Thursday, June 15, 2006 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहरात स्वागत मानसी स्वरा

आम्ही पण शिकतोच आहोत ग..तेंव्हा लिहीत रहा बिनधास्त..

मीनु ठीणगी सही पडलिये..
वैशाली... अगदी ग!!!





Tusharvjoshi
Thursday, June 15, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लिहीत जा...

चालता चालता कधी वाटलं
याच्यापुढे पाय खचतील
बिकट बिकट प्रश्नांपुढे
आपले सगळे उपाय फसतील
तेव्हा मला लिहीत जा

मी तुला उत्तर लिहीन,
" अजिबात खचू नकोस,
निराशेच्या चक्रीवार्‍यात
मुळीसुध्दा फसू नकोस
स्वत:च एक दिवा होऊन
पुढे पुढे चालत रहा
पहाट होणारंच म्हणून
जिद्दीने तेवत रहा. "

माझे उत्तर तुझ्यासाठी
आशेचा मोहर ठरेल
तुझा मनपक्षी तेव्हा
आनंदाने गात फिरेल
आपला आनंद गगनात
मावेनासा वाटला तर
तेव्हा मला लिहीत जा

तुझं पत्र माझं उत्तर
सगलंच कसं ठरलेलं
सुख दु:ख उनसावलीत
जगणं जसं विणलेलं

सगळंच ठरलं असलं जरी
पुन्हा आठवण आलीच तर
तेव्हा मला लिहीत जा
माझं उत्तर येणारच
तुझं पत्र आल्यावर
तेव्हा मला लिहीत जा

तुषार जोशी, नागपूर


Tusharvjoshi
Thursday, June 15, 2006 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लिहीत जा

आठवणींच आभाळ
मनात दाटून येतं
तेव्हा लिहीत जा

एकटे एकटे आहोत
असं वाटून जातं
तेव्हा लिहीत जा

सगळं सगळं काही
सांगावसं वाटतं
तेव्हा लिहीत जा

मनातलं मनातच
ठेवावसं वाटतं
तेव्हा लिहीत जा

लिहीता लिहीता जगणं
खोल होत जाईल
शब्दांना, अर्थांना
डौल येत जाईल

काय लिहू कसं लिहू
काहीच कळत नाही
तेव्हा लिहीत जा

लिहायचंय म्हणून
लिहीलंच पाहिजे बाई
तेव्हा लिहीत जा

तुषार जोशी, नागपूर


Naadamay
Thursday, June 15, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उसनं अवसान आणून कित्येक लोक जगतात
काय माहीत कुठून इतकं उसनं मिळवतात!

मिळवलेलं उसनं कधी फेडत मात्र नसतात
मुदत संपता क्षणी पुन्हा छान उसनं हसतात

बघावं आशेने तर येतो अवसानघातच पदरी
अवसानाचं कर्ज दानात लुटत नाही मात्र कुणी

धीर देणाराही थोडा बिचकूनच देत असतो
धीर हा खरा इलाज नाही हे तोही जाणत असतो

आम्ही कायम रोखीतलेच आम्हाला उधार उद्याच
उद्या उगवत नाही आमचा, ना इतर कुणाचाच

समोरच उभे ठाकते आयुष्य, रोखीनेच चालते
भोगायचे ते आजच, आम्हा उधार मिळत नसते


Dhruv1
Thursday, June 15, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



श्वासांच्या
धावटिपीतुतनं
ऊसवत जाणारं
हे हृदय
कोमलतम
संवेदनांशी
जागतं रहातं
तेव्हा
पहार्‍याशी
जागणारे दोन डोळे
कुठल्या
ऊत्सुक क्षणांची
वाट पहातात?



हि चिरेबंदी
देहमग्नता
श्वास ऊश्वासाच्या
घडण्यातुन, पडझडीतुन
माझ्यावर ऊधळतेस
तेव्हा मी
फ़क्त गळत असतो
पानागणीक
तुझ्या वसंतोत्सवातला
एक क्षण होऊन



मी हा असा
कोसळण्यास
कायम ऊत्सुक
म्हणुन तु
गुरुत्वाकर्षणीय आकर्षणाची
जमीन होशील ?
की माझ्या पायाशी
निळशार आकाश
अंथरशील ?


जखमा ओल्याच असतात
खपल्यांच्या आत
ठसठसणार्‍या
पुर्ण जिवंत
नाहीच ऊगवत तिथं कधीच
एकसंघ गुळगुळीत त्वचेचा पट
आपणच फ़क्त
बांधत असतो पुल
जोजावणार्‍या वेदनांचा.....



Vaibhav_joshi
Thursday, June 15, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा ....
भावना अस्ताव्यस्त पसरल्या की वाहवत जातात
अन बांध घातला की ओव्हरफ्लो होतात ....

खळबळ अटळ आहे हे फार सुरेख आलंय लोपा ... मात्र मी एका वाक्यावर कालपासून बराच विचार करतो आहे ...
" हे कोडं सुटलं की ठरवेन म्हणते " हे वाक्यच नसतं तर?
मी ह्या वाक्याशिवाय कितीतरी वेळा ही कविता म्हणून बघितली आणि मला एखाद्या उंच उगमापासून खळखळत, स्वतःशी विचार करत निघालेल्या नदीचा फील येतोय ... असो.

मानसी .. छानच लिहीत्येस ... एक लय आहे त्या कवितेत .. लिहीत रहा ...

मीनु ... ठिणगी मधल्या शेवटच्या दोन ओळी अतिशय सही आल्या आहेत. मला लज्जा सिनेमातील
चिडलेल्या माधुरीचा क्लोज अप आठवला ..

लोपा ... एक जन्म तरी ...
काय लिहू ? u know how it is
:-)

स्वरा .... आठवण तुझी वार्‍याची झुळूक
ह्या वाक्यापासून कविता जी ग्रिप घेते ती शेवटचा पंच बसेपर्यंत कुठेही सुटत नाही ...
फार म्हणजे फार सुंदर कनेक्ट करत गेली आहे ही कविता ...
चापून चोपून बसवलेलं आयुष्य
एका क्षणासाठीच मुक्त होणं ... जशी उधळलेली बट .... वाह !!!

तुषार ... लिहीत जा चं पहिलं व्हर्जन मस्त आलंय ... surprisingly तुझी नेहेमीची सहज सोप्पी लिखाणशैली
त्यात नसूनही ( उदा.:- पुढचीच लिहीत जा ही कविता ) मला पहिली फार आवडली ..
वेगवेगळ्या emotions च्या झोक्यांवरून पुन्हा पुन्हा येत जा ... लिहीत जा ... मस्त आहे ते !!!

नादमय ... शेवटच्या दोन ओळी झकास ... ह्या कवितेची थीम चांगली असूनही मध्येच
मोमेंटम तुटल्यासारखा का वाटतो कळत नाहिये .... लक्षात आलं तर मेलवर लिहीतोच

ध्रुव ... निळी आणि हिरवी ... सेव्ह केलिये ... permenanat


Archanamandar
Thursday, June 15, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा वेडा बहरूनी गेला
आगमनाने ऋतुराजाच्या
कुणी सांगे पण त्याच्या कानी
नसे खास हा राजा ऋतुंचा

काय करावे त्यास कळेना
बहरूनी झडला चाफा वेडा
पुन्हा पुन्हा पण त्याच ऋतुचा
बहर यायचा नाही मिटला

अचंबित मग चाफा पुसतो
का यावा हा मजला परिमळ?
का या ऋतुच्या आगमनाने
मज अंगी हे गीत फुलावे?

मलाच पडला प्रश्न खरोखर
उत्तर द्यावे काय बरोबर?

निष्पर्णाच्या फांद्यांमधूनी
उत्तर माझे मलाच खुणवी

ऋतुराजाचा मान असे हा
ऋतुराजाचे भान असे हे
ज्याचे त्याला...
त्याच्या वेळी...

Lopamudraa
Thursday, June 15, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव... सांगत रहा...!! थॅंक्यु...!!
मी ही त्या ओळीला कंस करुन वाचुन बघेन..!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators