सगळ्यांच्या प्रतीभेला प्रणाम कविता म्हणजे शब्दांचे मनोरे, एकावर एक रजलेले... कविता म्हणजे भावनांचे कारंजे, मनातल्या मनात फ़ुटणारे... कविता म्हणजे मोराचा फ़िसारा, कलाकुसरीचा रंगीत पसारा... कविता म्हणजे मनाचा कोंडमारा, फ़ुटणार्या धरणाचा दरारा...
|
सर्वांचेच मनःपूर्वक आभार .... मीनु,झाड, मृदा,श्यमलि,अर्चना,इंद्रधनुष्य ....... आणि हो अमेय .... सगळेच मस्त लिहीताय .... बापू, तुम्ही म्हणताय ते पटलं ... शेवटी ज्याला जे भावेल तेच खरं ...
|
मीनु टाकली गं इथे.. डायरी वाचली जरी कुणीही माझी डायरी मागे पुढे वाटू नये मी भावनांचे कधी बांधले होते मढे मारले होते मला मी जीवंत डायरीत होते ठेवले जे असावे डोळ्यात ते डायरीत होते सामावले डायरी तशी मलाही फटकून अशी वागते जे उरले माझ्यात नाही ते पुन्हा उगाच मागते होउनी तिचा कधी मी हळूवार तिजला कुरवाळतो भाळते ती मजवरी मग मी ही तिच्यावरी भाळतो
|
गुड मॉर्निंग .... आत्ता पायात असलेली सांजसावली मोठी मोठी होत, अंधारपावलांनी डोळ्यांकडे सरकू लागते अन मी सतर्क होतो ... त्या घनदाट तिमिरात बसून राहतो पहारा देत ... मागे एक दोनदा चुकून डोळा लागला असताना पांढरे ऍप्रन घातलेल्या चोरांनी माझी निष्पाप स्वप्नं चोरली अन डोळ्यांत ही जागरणं उरली .... तेव्हापासून ... रोज रात्री माझं एकुलतं एक स्वप्न बघत बसतो त्या स्वप्नाने रोज पहाटे ... सत्यात उतरेपर्यंत .... माझ्या गळ्यात हात टाकून .... " गुड मॉर्निंग डॅडी " म्हणेपर्यंत .....
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 7:37 am: |
| 
|
वैभव कविता करण्यात आपला हात कोणिहि धरु शकत नाहि.माझाहि एक प्रयत्न. स्वप्न आज मी एक स्वप्न पाहिल हळुवार अशा नात्यांच दिवसाबरोबर वाढत जाणा-या सख्या सोय-यांच्या प्रेमाच आज मी एक स्वप्न पाहिल मनामनातल्या स्पंदनांच मनात हळुच उमललेल्या भावनांच आज मी एक स्वप्न पाहिल स्व:तहात हरवलेल्या फुलराणिच स्व:तहाच स्व:तहासाठी नव जग शोधणा-या विचारांच आज मी एक स्वप्न पाहिल माझ्यामध्येच घुटमळ्णा-या मीपणाच बंधनाना झुगारणा-या बेलगाम पणाच आज मी एक स्वप्न पाहिले... प्रिति
|
Jyotip
| |
| Tuesday, June 13, 2006 - 7:40 am: |
| 
|
वैभव, देव,मीनु, mruda ..सग़ळेच सुंदर प्रिती प्रयत्न छानच
|
अंधाराचा समुद्र भवति मर्याद हा भरून राहिला आणि समोरच नौका छोटी नौकेमधला दिवा चमकला नौक ती कि काय कळेना झाडातील काजवा फडकला फसवित फसवित पुढे चालले तेजाचे ते निशाण मजला निशाण फसवी मी ही हटेना पाठलाग हा अखंड चाले आणि एकदा असा अचानक तो तेजाचा ध्वज पूर्ण दिसे मज अशी अनावर होऊन मी ही तेजोगम तो निरखून पाही विस्मयतेने अचंबित मी अशीच पाहि उभी ठाकुनी धूसर प्रतिमा माझीच होती तेजाच्या त्या ॐकारातून
|
होय गिरिराज. मीच ती अर्चना दोन वर्षापूर्वी येत असे ती. भेटुच. अर्चना.
|
Meenu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:18 pm: |
| 
|
गृहीत नसतेच मी तीथे वाटत असतं त्यांना मी आहे जीथे मी सहज धरु जाते सुर्य त्यांना फाजील आत्मविश्वास हिच्यात नसणार एवढं धैर्य मी होऊन येते शुभ्र शीतल चांदणं त्यांना आठवत असतं जेव्हा माझं झटक्यात तापणं मी होते निर्गुण निराकार जेव्हा मला ओळखायला ते घेतात माझ्या रुपाचा आधार तरी कितीदा सांगीतलय नका अशी चुक करु नका पुन्हा पुन्हा मला गृहीत धरु
|
Jo_s
| |
| Wednesday, June 14, 2006 - 12:29 am: |
| 
|
वैभव, मीनु, झाड, मृदा, श्यमलि, अर्चना, इंद्रधनुष्य, अमेय कवितेचा गुलमोहोर चांगला बहरलाय सगळेच मस्त लिहीत आहेत. छान सुधीर
|
Jayavi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:14 am: |
| 
|
अहा! गुलमोहराचा पिसारा छानच फ़ुललाय........ अगदी तृप्त होतंय मन
|
क्षणोक्षणी .... क्षणोक्षणी जाणवे तुला आभास कुणाचा? छळे जिवाला तरी हवासा त्रास कुणाचा? कपोल का स्पर्षिल्याविना होतात गुलाबी? दुरूनही रंगतो तुझ्याशी रास कुणाचा? पुन्हा पुन्हा मोगरा कसा गंधाळुन जातो? तुला मिळे हा ऋतू विनासायास कुणाचा? दिठी तुझी मोहरे मिठीविण, काय म्हणावे? मनोमनी लाभतो असा सहवास कुणाचा? कुणामुळे डोळ्यांत स्वप्न हे इंद्रधनुषी? तुझ्या नभी रिमझिमतो श्रावणमास कुणाचा? जरी तुझा श्वास कोंडतो आठवून त्याला तरी जपू पाहतेस वेडे फास कुणाचा?
|
Shyamli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:08 am: |
| 
|
जरी तुझा श्वास कोंडतो आठवून त्याला तरी जपू पाहतेस वेडे फास कुणाचा?>>>> सहिच....दुसरे शब्द नाहिच सुचत....
|
अहाहा... यापुढे शब्द संपले... वैभव...!!!
|
R_joshi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:42 am: |
| 
|
वैभव अप्रतिम...... दुसरे शब्दच सुचत नाही
|
माझी एक इंग्रजी कविता... मुक्त रुपांतरासाठी... Life melting with emotions; is not life enough Silver of the full moon; is not silver enough Live by the sun, as it moves in the blue clear sky It takes you through the day slow and steady bright and sunny setting quietly letting the other rise all the day late or early Shine the dust rainbow the water soften the mist go on... live by the sun !!
|
ओव्हर फ़्लो बघुनही न उमजणारे.. स्वप्नबिंदु ओघळुन पडतात गालावरुन. उठतो तेव्हा ओरखडा.. मनावर... येउ देत नाही मी माझाच हुंदका कानावर..!! जाणवुही देत नाही माझे अस्तित्व मनाला. नाहितर कुठेतरी पडेल ना ठिणगी.. सार काही पेटवायला.. त्यात कदाचित बळी जाइल माझ्या उत्क्रांतीचा..! म्हणुन विसरत नाही कर्त्यव्याचे माप.. ठेउन देते बाजुला.. बंडखोर मनाचा शाप..!! पण कसं सांगु.. उन्हातल.. इंद्रधनु खुणावल्याशिवाय राहत नाही.. तरी सुध्दा विचार चाललाय.. कस आवरायच खळबळत आयुष्य.. हे कोड सुटलं की ठरवेन म्हणते.. भावना, अस्ताव्यस्त पसरल्या की वाहवत जातात अन बांध घातला की overflow होतात..(अस का?)!!!
|
Shyamli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 6:54 am: |
| 
|
उन्हातल.. इंद्रधनु खुणावल्याशिवाय राहत नाही.. >>>> वाह....क्या बात है 
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 7:03 am: |
| 
|
म्हणुन विसरत नाही कर्त्यव्याचे माप.. ठेउन देते बाजुला.. बंडखोर मनाचा शाप..!! भावना, अस्ताव्यस्त पसरल्या की वाहवत जातात अन बांध घातला की overflow होतात..(अस का?)!!! बरोबर शब्दात पकडलस गं सगळं काही जे वाटत राहतं रोजच. वाचल्यावर असं वाटलं की हेच ते म्हणायच होतं मला ... अगदी अगदी
|
Lampan
| |
| Wednesday, June 14, 2006 - 7:19 am: |
| 
|
वा ... सही लिहिलयस
|