Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 13, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 13, 2006 « Previous Next »

Chinnu
Monday, June 12, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, अतीशय उत्तम! गझल वेड लावणारी आहे अगदी. तुषार, निनावी, अमेय, मीनु तुम्हाला दिलेला दिलेला प्रतिसाद वाहुन गेला. निनावी कविता तुटक वाटली ग. पण अमेयचा आशावाद आवडला. अर्चना गुलमोहोर छानच. झाडा खुप छान.
मीनु, मृदा छान. अभय तुझं स्वागत आहे इथे!
श्यामली कविता cute आहे ग! :-)


Meenu
Monday, June 12, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ... तो वाचुन नविन काही लिहायला उत्साह येतो ....

सर्वांचे अनुवाद छान पण वैभवचा पटला १०० %

एक अगदि छोटीशी कविता ... झुळुकही म्हणल तरी चालेल कदाचित ..

नातं

नातं ............
उर्फाट्या नियमांवर चालणारं खातं ,
देणार्‍याची वाढत जाते शिल्लक
घेणारा होत जातो कफल्लक


Pkarandikar50
Monday, June 12, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,
मला वाटते की कवितेच्या पहिल्या दोन ओळी कवीच्या जन्माबद्दल बोलत नाहीत. शेवटच्या दोन ओळी मत्र त्याच्या मृत्युबद्दल आहेत, पहिल्या दोन ओळींचा मला भावलेला अर्थ असा की कवि जेंव्हा काही लिहीतो तेंव्हा तो स्वत्:बद्दल, स्वत्:चे, अत्ममग्न असे काही लिहीत नाहि. 'मी तो भारवाही' अशी त्याची भूमिका त्याला मांडावयाची असवी. अथवा दुसरा अर्थ असाही असू शकतो की तो जेंव्हा काही लिहीतो तेंव्हा त्याचा अर्थ ज्याचा त्याने लावून घ्यावा, त्याचे स्वत्:चे असे interpretation त्याला वाचकांवर लादायचे नाही, म्हणून कदाचित तो म्हणत असावा की मी तिथे असणारच नाही. शेवटच्या दोन ओळींचा रोख मृत्युकडेच असावा.
बापू.


Ameyadeshpande
Monday, June 12, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ये हुई ना बात वैभव!!! :-)

मीनू :-)
छे... असं थोडंच असतं...

काय म्हणता...?
शिल्ल्लक कफ़ल्लक हे हिशेब नात्यावरचे?
छे छे छे छे...
आहो हे फ़क्त शोभतात खात्यावरचे...
कळणारही नाही कदाचित... पण देण्याघेण्या नात्याचंच होऊन जातं खातं...
अन निरपेक्षतेच्या खात्यातूनच जन्मा येतं नातं...


Pkarandikar50
Monday, June 12, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवि त्याचा मृत्यु सुचवताना When I return असे म्हणतो, तेही मला अर्थपूर्ण वाटते. तो जेथून आला तिथेच परतणार आहे असे त्याला म्हणायचे आहे का? तो कोठून आला? का आला? त्याला कोणी पाठवले? ह्या प्रश्नांची उत्तरे सापडली तर त्याच्या काव्य-लेखनाचे प्रयोजन काय ते लक्षांत येऊ शकेल, असे मला वाटते. त्यामुळे त्याला प्रतिभेचे देणे देऊन 'कोणी तरी'पाठवले आहे, त्याच्या ईथे येण्यामागे आणि कविता लिहीण्यामागे काही तरी निश्चित प्रयोजन आहे असे तो सूचित करत असावा. त्यामुळे तो म्हणत असावा की "मी हे लिहून गेलोय खरा, पण त्यांत माझे असे काहीच नाही, मी त्यांत नाहीच." ही अशा प्रकारची self-effacing भूमिका तो पहिल्या दोन ओळीत सुचवतो असे मला वाटले. असो. शेवटी, ज्याला जे भावेल, ते त्याने घ्यावे, हेच योग्य, नाही का?
बापू.


Meenu
Tuesday, June 13, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अमेय छान लिहीलस ...

Ameyadeshpande
Tuesday, June 13, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, का ते सांगता येणार नाही मला पण ह्या ओळीत "मृत्यू" पेक्षा जास्त कवीची कविता घडतानाची अवस्था उमलतेय त्यातून अस वाटतयं. त्या "I" चा पहिल्या-शेवटच्या आणि दुसर्‍या-तिसर्‍या ओळीतला अर्थ उलट आहे असं वाटतं... एक जो भारून जाऊन जाणिवा शब्दात साकारण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा जो त्याच कलाकृतीकडे त्रयस्थपणे पहाणारा... कुणीतरी वेगळाच आहे असा... आणि हा प्रवास प्रत्येक कवितेबाबत घडून येणारा... तुम्ही ते काळ्या ठिपक्यांचं visual dececption पाहिलयं का? जिथे पाहू तिथे ते नाहियेत असे भासू लागतात... मधूनच त्या " I" चं तसं philosophical deception झाल्यासारखं ही वाटतं... पहिल्या-शेवटच्या आणि दुसर्‍या-तिसर्‍या ओळीतला तो "I" मधूनच खाली डोकं वर पाय होऊ पाहतो... पण ह्याचा संबंध भौतिकतेशी जोडावा असं वाटत नाहीये मात्र.(असं मला वाटतयं ते बरोबर असेल असं म्हणणं नाहीये)

Tusharvjoshi
Tuesday, June 13, 2006 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When I am writing
I am not here
And when I return
I am gone

जेव्हा कविता साकार होतेय तेव्हा हा कोणी वेगळाच आहे. हा रोजचा मी नव्हे. मला आवडले ते ही जाणिव की जेव्हा मी लिहितो तो मी वेगळाच असतो, आणि लिखाण झाल्यावर जेव्हा साधा मी परत येऊन त्या लिखाणाकडे पाहतो तेव्हा तो प्रतिभायुक्त मी गेलेला असतो. कधी कधी असे वाटते की इतक लिहिणं कसं जमतं याला.

मला समझलेला हा एक अर्थ

तुषार जोशी, नागपूर


Archanamandar
Tuesday, June 13, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव क्या बात है खरच सुरेख अणि समर्पक रुपांतर केलस अगदि.

हो मला पटतय तुझं म्हणणं. पण कवीने हे फक्त एका कवितेबद्दल लिहिलेल नहिये. हा अनुभव त्याचा प्रत्येक लिखाणामागचा आहे...

नक्किच मी काही वाचण्यात आलं कि इथे शेअर करेन...

अर्चना.


Pkarandikar50
Tuesday, June 13, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tushar,
Your interpretation is quite logical and plausible.
Great fun to break heads and split hair over four simple lines.
One must find out the author and the context.
बापू

Jayavi
Tuesday, June 13, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सुरेख लिहिताय तुम्ही सगळे! कोणाकोणाचं कौतुक करावं आता?
अर्चना, अशा सुरेख ओळींचं रसग्रहण तू सुरु केलंस........त्यामुळे किती छान छान वाचायला मिळालं! तुझे आभारच मानायला हवेत.:-)


Aaftaab
Tuesday, June 13, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Another interesting line ...

"Today is the tomorrow I was afraid of yesterday"

Devdattag
Tuesday, June 13, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक.. खरंच गुलमोहरावरच एक रसग्रहण बीबी सुरू करता येईल का?

Meenu
Tuesday, June 13, 2006 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चला बघु या हे जमतय का ..

आज तोच आहे
उद्याचा दिवस
ज्याची भिती काल
मला होती छळत


Shyamli
Tuesday, June 13, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्यालाही उद्याची आस
भिववीतो काल तो उदास

माझाही एक प्रयत्न


Lopamudraa
Tuesday, June 13, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसग्रहण सुंदर...!!! वा...मीनु... नात्यात होत ह अस.!!!
अमेय छान स्पष्टीकरण दिलेय रे...!!!(खात्यवर..).


Giriraj
Tuesday, June 13, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कमाल झाली आता माणुसघाणा होण्याची
माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही
.....

>>>>>> vaibhav!!!!!!!!!!!!!

Giriraj
Tuesday, June 13, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

archanaa,navyaa rupaat!

gulamohar series punhaa vachataMnaa punhaa aavaDalii!:-)

Neelu_n
Tuesday, June 13, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>ही कमाल झाली आता माणुसघाणा होण्याची
माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही

असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही

वैभव, तुझ्या गझलेला दाद द्यायला शब्दच अपुरे आहेत. :-)

श्यामली 'हट्टी' आताच वाचली. खुप सुंदर आहे.:-)

>>अद्वैतालाही द्वैताचे इथे चपखल फाटे
विनायक छान जमलिय कविता.

मीनु, तुषार, देवदत्त तुमच्या पण कविता छान आहेत.



Mruda
Tuesday, June 13, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाही एक प्रयत्न. .

तेच महिने, तेच आठवडे
आठवड्याचे दिवसही सात. .
वेचत जगु प्रत्येक क्षण
कशाला उद्याची बात. . ?

मृदा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators