Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 12, 2006 « Previous Next »

Abhay_bhave
Saturday, June 10, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, वैभव, नादमय, बापू, वैभव, सगळ्यांना thanks!नवीन कविताही सुरेख आहेत सार्‍यांच्या.

Tusharvjoshi
Saturday, June 10, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शक्ती

फुलपाखराला पाहून
मनात म्हणालो
चल आज तुला सोडून देतो
तुला इजा न करता
स्वतःच्या मोठेपणाने
धन्य होतो

जग नियत्रक शक्ती
आपली अशिच
मजा घेते
तीही कदाचित
म्हणत असेल
चल आज तुला सोडून देते

तुषार जोशी, नागपूर


Pkarandikar50
Saturday, June 10, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ninavi,

'निरोप' बद्दल वैभव म्हणतो ते अगदी खरं आहे. मोजक्या शब्दांत तू किती नेटकेपणाने भाव उतरवला आहेस.बहोत खूब.
बापू.


Ninavi
Sunday, June 11, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, वैभव, बापू.

अमेय, अरे, मूळ कवितेपेक्षा तुझीच जास्त छान झाल्ये की.


नादमय

Shyamli
Sunday, June 11, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हट्टी....कविता

ह्या कवितेन जरा तरी
शहाण्यासारखं वागावं
वेळ काळ न बघता
कधीही काय सुचावं...?


विरहात ठीके.....पण
'तो' असतानापण याव?
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन
काय तुझ्याकडे बघावं?

भलतीच बया विचित्र
केंव्हाही काय सुचते...?
नको नको म्हणल तरी
मनात दंगा करते

नाहीच लीहीणार म्हणलं मी
तर हट्टालाच पेटावं
आपले आपले शब्द घेऊन
गुमान ओळीत जाऊन बसावं

आता तरी लीही ना
म्हणुन लाडीकस विनवावं
आणि बर बाई म्हणुन मीही
मग जरा तीचं ऐकावं...

श्यामली!!!



Dineshvs
Sunday, June 11, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे श्यामली, कवितेची कविता.

Vaibhav_joshi
Sunday, June 11, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नश्वर ....

मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

आभास कुणा परक्याचा प्रतिबिंब होवुनी भेटे
हा कोण म्हणावे माझा ? तितकासा परिचय नाही

का उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होते ?
स्वप्नांचा अन सत्याचा अगदीच समन्वय नाही

ही कमाल झाली आता माणुसघाणा होण्याची
माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही

विरहाची वर्षे सरली, ते मीलन दूर न आता
मृत्यूला खात्री आहे मजलाही संशय नाही

एका जन्माच्या पाठी दुसर्‍या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही


Ninavi
Sunday, June 11, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो, वैभव!!!
सगळेच शेर सुंदर आहेत.
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही..
अप्रतीम.


Ameyadeshpande
Sunday, June 11, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही

खरंच - अ प्र ती म...


Dineshvs
Sunday, June 11, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर आहे कविता वैभव. आणि बर्‍याच दिवसानी मला ती अर्काईव्ज न ऊघडता वाचता आली.

Ashwini
Sunday, June 11, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, अप्रतीम हा शब्द फिका पडावा असे लिहीतोस तू. आणि दुसरा कुठलाच शब्द त्याच्या जवळपासही पोचू शकत नाही....

Pkarandikar50
Sunday, June 11, 2006 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,

नश्वर सुन्दर आहे गझल!
बापू


Pkarandikar50
Sunday, June 11, 2006 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ninavi, Ameya

दोन्ही 'निरोप' छान आहेत. शेवटच्या कडव्यामुळे आशयाचं परीमाण बदलतं. निनाविने एक अत्यन्त परिपक्व आणि तटस्थ ममतेचा मूड पकडलय, तर अमेय क्षणार्धात त्या कवितेला एकदम विरक्तीकडे आणि अन्ताकडे घेऊन जातो. पण ओरिजिनल कवितेचं महत्व आणि श्रेष्ठत्व काही वेगळंच!
बापू


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली हट्टी कविता छान ...........
वैभव म्या पामराने काय दाद द्यावी ' नश्वर ' ला ...
तुझं लिहीणं वाचुन कधीतरी मी नक्कि लिहीणं सोडणारस वाटतं
मी असं म्हणु का ...

मज कवितेचा माझ्या कळलेला आशय नाही
लिहीते हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही ...

पुलंच्या भाषेत म्हणजे एखाद्यासमोर आपण म्हणजे अगदीच ह्या आहोत असं वाटतं न्युनगंडच म्हणतात ना त्याला ... तसलच कायसस वाटतं बघ तुझ्या कविता वाचुन


Jo_s
Monday, June 12, 2006 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो
आज पु.लं. ची पुण्यतिथी. आपण सारे त्यांना आदरांजली वाहू

पु.ल. पुम्ही जाताना
साठवण इथेच सोडून गेला
आणी तुमच्या आठवणीने
प्रत्येक डोळा पाणावला

सुधीर



Jo_s
Monday, June 12, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
क वि ता सुंदार्च.
वैभव, सहीच आहेत शेर




Archanamandar
Monday, June 12, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे मानसी रागवेन कशाला. अभिप्राय हे मनापासून असतात आणि ते कवितेचा उल्लेख केल्याचा पुरावा असतात. अगं माझ्या गुलमोहोरावरच खूप कविता आहेत आणि सगळ्या का कुणास ठाऊक पण अश्याच जरा छंदाला हटकून आहेत. यापुढे जरा लयीत बसायचा प्रयत्न करेन.

निनावी स्वागताबद्दल धन्यवाद! सगळ्यानाच मनापासून धन्यवाद अभिप्रायाबद्दल.

अर्चना.


Devdattag
Monday, June 12, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, अमेय निरोप अप्रतिम..
श्यामलि लडिवाळ कविता छान आहे..
अभय स्वागत...
वैभव नश्वर उत्तमच...


Jyotip
Monday, June 12, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलि..सुंदर..
वैभव तुझी स्तुती करायला शब्द्च नाहीत
निनावी, अमेय उत्तम


Devdattag
Monday, June 12, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


परिचय..

माझे दिसणे हाच माझ्या असण्याचा प्रत्यय होता
मीही असावे मग माझ्या जगण्याचा आशय होता

ओवल्या मी अनेक माला कुसुमांची गणती नाही
हरएक हार मग माझा परी हार पराड्गंमय होता

जमविल्या कित्येक काड्या बनवले घरटे नाही
त्या घरास बांधण्यास माझ्या वार्‍याचा व्यत्यय होता

जुळविल्या सार्‍या तारा उमटला षड्जही नाही
सतारीस रोज माझ्या गवसणीचाच आश्रय होता

कोसळले ऋतु किती ते गगनाला ठिगळे नाही
माझा रे माझ्यावर नाही देवावर संशय होता

मी कोण कुणासही माझ्या असण्याचा रोषही नाही
राहे कुणी फकीर वेडा हा माझा परिचय होता





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators