Meenu
| |
| Thursday, June 08, 2006 - 7:28 am: |
| 
|
जुगार प्रत्येक नातं म्हणजे एक जुगार तुही करुन बघ थोडा विचार प्रत्येकच नात्यात असतं प्लसमधे कुणी आणी कुणी मायनसमधे मायनसमधे जर असशील तर थोडासा धीर धर दुसर्याला होऊ नये त्रास म्हणुन प्रयत्नही कर थकुन नाही चालायचं पळुनही नाही जायचं प्लस नाही गाठलं तरी शुन्यावर नक्की पोचायचं प्लसमधे असशील तर इतकच करायचं ओंजळ भरभरुन प्रेम तु वाटायचं तुझा मनमोकळा संवाद आणी मनापासुन दाद एवढं पुरेसं ठरेल वाटतं दुसर्याला द्यायला हात बरोबरीही मिळेल कधी कधी पहायला हे नातं असेल सहज सोपं टिकवायला प्रत्येकच नातं मनापासुन जपायचं नाही कधी उतायचं आणी नाही मातायचं
|
Manasi
| |
| Thursday, June 08, 2006 - 9:06 am: |
| 
|
हे बंध रेशमाचे स्मरते हुरहूर ती चाहूल प्रथम प्रीतीची न जाणे जुळले कधी हे बंध रेशमाचे गुन्तता अलगद मने पडली गाठ जन्माची सुटता सुटे ना ऐसे हे बंध रेशमाचे विहरत्या पाख़राना छाया जशी तरुची देती तसा विसावा हे बंध रेशमाचे भंगले आचानक सूर द्र्ष्ट लागली कुणाची आज तुटल्या तारा जणु हे बंध रेशमाचे उरला फ़क्त दुरावा लोपली ओढ भेटिची निश:ब्द करोनी गेले हे बंध रेशमाचे आठवता प्रेमगाथा कळ येते वेदनेची जाहले बोचरे कैसे हे बंध रेशमाचे कळेल तुजला कधी हि आग अंतरिची दाहक असो तरिही हे बंध रेशमाचे
|
Meenu
| |
| Thursday, June 08, 2006 - 9:41 am: |
| 
|
कोपरा माझ्या मनाचा तो कोपरा जो दिला होता मी तुला रहायला आज सहज आठवण आली म्हणुन गेले होते पहायला ही .. हीच ती भिंत तुझ्या शब्दांनी भेदली आणी ती भिंत ..... ती धारदार नजरेनी चिरली ईतकी वादळं येऊन गेली पडझडही बरीच झाली डॉक्टरांची नोटिसही आहे दारावर लागली काढा म्हणतात हा कोपरा झटकन कापुन नाहितर पडझड ही टाकेल मनच व्यापुन बघु या काय जमतय ते .... ठरत नाहिये अजुन काय करावं ते ....
|
बापु....काही कारणामुळे मी इथे प्रतिक्रीया देणे बंद केले होते,सगळ्यांच्या कविता नुसत्याच वाचुन आनंद घेत होतो, पण आज तुम्ही परत मजबुर केलेत.. अतीशय सुरेख कविता...
|
Himscool
| |
| Thursday, June 08, 2006 - 11:39 am: |
| 
|
बापू, वैभव, नादमय, मीनू, मानसी सुरेख कविता वैभव तुझ्या क्रेडीट कार्डला क्रेडीट लिमिट नाहीच आहे आणि एक्स्पायरी डेट तर मुळीच नाही आहे.
|
Meenu
| |
| Thursday, June 08, 2006 - 1:06 pm: |
| 
|
ती " हो हो हे बघ .... हाताची ही ओंजळ , तुझ्या चेहर्याभोवती ठेवुन , आणि तुझ्या नजरेला नजर देऊन , सांगते अगदि ss मनापासुन .......... खरच खरच रे मी सुखात आहे फार ... तुझी आठवण काढायला वेळही होत नाही यार .... आणि काय रे असं वेगळ घडलं असतं ? भिजलो असतो पहिल्या पावसात , काढल्या असत्या पावसाच्या आठवणी , पावसात फिरलो असतो समुद्राकठी घेऊन हात हातात ते तर आजही घडतं !!! सांग ना असं वेगळ काय घडलं असतं ? अरे !! हे काय आत्ता मी घड्याळ बघतेय !! उशीर होतोय चल आता निघते ...." गळण्याधी मुखवटा झटकन वळले आणि या चेहरा नसलेल्या गर्दीत मिसळले कळलं रे आज मला , अवघड असतं बोलणं खोटं नजर देऊन नजरेला . गेली ती गर्दीत झटकन मिसळुन खोटही बोलली आज , नजरेला माझ्या नजर देऊन ही पण अभिनय करायला लागली खंत इतकीच ती ' ती ' मात्र हरवली
|
Jyotip
| |
| Friday, June 09, 2006 - 12:23 am: |
| 
|
मीनु..क्या बात है...सगळ्याच कविता सुंदर...
|
Smi_dod
| |
| Friday, June 09, 2006 - 12:27 am: |
| 
|
मीनु!!!! वा...मस्तच लिहितेस.. आणि अगदी सहज ग आवडली तुझी शैली लिखाणाची!
|
मीनू, मानसी अप्रतीम कविता आहेत. थोडक्यात आणि सोप्या शब्दात बरच काही व्यक्त करतात ह्या कविता
|
मी, गुलमोहोर... आमच्या बागेतल्या गुलमोहोराला हिवाळ्यातच पालवी फुटली; डावीकडची एक फांदी अचानकच बहरून आली ! लालकेशरी पिवळ्या फुलांनी लगडून जडावून गेली. भर दुपारच्या कडक उन्हाच्या वेडी प्रेमातच पडली आणि सकाळचा गारठा सहन न होऊन दोन फुलं गळून गेली. मग ती वेडी हळवी फांदी हिरमुसुन रडत बसली आणि कोपऱ्यातली मंद अबोली केशरीसं फिकट हसली. मुसमुसत फांदी म्हणाली मी का नाही सदाफुली? ती कशी सदा असते सुखावलेली तशी मी का नाही फुललेली? रस्त्यापल्याडचा वड अनुभवी खरखरला... "अगं, प्रत्येकाचा वेगळा काळ असतो आपला. मी नेहेमी हिरवा असतो तरीसुद्धा भकास दिसतो पारंब्यांच्या चरबट आयाळींनी लगडलेला बारा महिने उभा असतो वर्षातून एकदाच पुजला जातो सावित्रीच्या कृपेनं... जखडून जातो त्यादिवशी पांढऱ्या धाग्यांच्या वेटोळ्यानं त्यातसुद्धा सुख असतं प्रेमाचं बंधन असतं तुझ्या फुलांचा रंग कसा केशरी भगवा उग्र दिसतो अगं वेडे रडू नकोस त्यातलीसुद्धा गंमत सांगतो तुझ्याकडे पाहताना वैशाख वणवा मऊ भासतो.
|
मीनू अप्रतीम. सहज सुंदर
|
वा वा मीनु. ख़रच छानच लिहितेस. माझी कविता टाकल्यावर पाहिल्यावर वाटलं हा तुझाच बी बी आहे. गंमत केली ग. लिहित रहा. अर्चना.
|
Naadamay
| |
| Friday, June 09, 2006 - 1:08 am: |
| 
|
वा, अर्चना, समयोचित आणि सुंदर! मीनू, छान आहेत कविता.
|
मीनु ... सुंदर .... अर्चना ... छान ...
|
वेस कोरडी ... वेस कोरडी डोळ्यांची आणि काळजात धारा त्यात पाचोळा उडवी उरी आठवांचा वारा कधीमधी भेट त्याची दोन चार क्षण वेडे हाती गवसेना माझ्या त्याची प्रीत जणू पारा त्याच्याविण दिस वाटे रेंगाळतो क्षणोक्षणी रात्रभर वेड लावी चंद्रतार्यांचा डोलारा कळेना त्या साजणाला माझ्या मनाची काहिली मन भिजे आत आत जीव झाला राख सारा
|
Maudee
| |
| Friday, June 09, 2006 - 3:28 am: |
| 
|
अर्चना गुलमोहर अप्रतीम मीनू तुझ्या सगळ्याच कविता उच्च आहेत.
|
Puru
| |
| Friday, June 09, 2006 - 5:39 am: |
| 
|
मीनु: प्लुस, मायनस, कोपरा, भिंत, नोटीस्; असं वाटतय, की र्हदय\ relationship म्हणजे maths किंवा apt. complex आहे आणि हो, दोन्हीमधे complex मात्र common आहे दिवे घेशिलच ..seriously कविता खुपच छान आहेत. खास करुन शेवटची 'ती' खुपच भावली! गुलमोहोर पण खुपच छान! Vaibhav, as usual..too good!
|
Meenu
| |
| Friday, June 09, 2006 - 5:53 am: |
| 
|
खि खि खि खि पुरु .... 
|
मीनु नेहमीप्रमाणेच उच्च.. अर्चना गुलमोहर खुपच छान...
|
Manasi
| |
| Friday, June 09, 2006 - 8:59 am: |
| 
|
वा अर्चना कल्पना फ़ारच छान आहे. आणखी कव्यमय भाषेत हवी होती असे वाटले. रागवू नको सहज मनात आले ते सान्गितले. वैभव छान लिहितोस तू.
|