Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » विनोदी साहित्य » कुछ अपने कुछ पराये... नवसिरियल STY » Archive through June 09, 2006 « Previous Next »

Mbhure
Thursday, June 08, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीता धावत जीन्याकडे पळते….

पण तेथे कुणीही नसते. ती भांबावलेल्या स्थितीत असतानाच कोणीतरी तिला ढकलते. ती जीन्यावरुन गडगडत खाली पडते. ती बेशुध्द होण्याआधी वर बघते. तिथे नवनायिका उभी असते. तिच्या चेहर्‍यावर विकृत हास्य.

कै. ना., ब. मा., प्रथम वगैरे धावत येतात. " क्या हुआ? " [दिसत नाही, डोळे आहेत की बटाटे]
न. नाः (चेहर्‍यावरील भाव बदलत) दिऽऽदीऽऽऽ, देखो ना क्या हुआ?
मं भाः (तिच्याकडे संशयाने बघत) तुम यहाँ?
न नाः मैं यहाँ…
म. भाः मुझे कुछ नही सुनना है [हे नहमी असे कोणाचेही का ऐकुन घेत नाहीत्; कारण सर्व तेथेच संपेल(मुर्ख)]
त्याचवेळी बडी दिदीना(पणजी) घेऊन दे. मा. जिन्याच्या वरच्या अंगाला उभ्या दिसता. सर्व एकदम आश्चर्यचकीत… [अरे, सीता पडलीये तिला उचला कुणीतरी]
.....
हॉस्पिटलमध्ये काचेच्या खोलीत असंख्या नळ्या लावून सीता.
प्रः सीता को ये क्या हो गया?
ब. माः देखा उसके जीवन की डोर कमजोर होते ही ब. दि. ठीक हो गयी. अब तो मेरेपर भरोसा करो बेटे. ये सब जो हो रहा था वो उसके कारणही...
इतक्यात डॉक्टर [असा माणुस जोटुथ्पेSतच्या जाहिरातीत अगदी फिट्ट बसेल, पण डो वाटणार नाही]येतात.
प्रः डॉ उसकी तबियत
डॉः वो अब खतरेसे बाहर है.
प्रः शुकर है भगवान का
इतक्यात दे. मा आणि शुभ्रम येतात.
दे. माः कैसी है बहु.[एकदा झाला हा प्रश्न. किती पाणी घालणार सिरीयल मध्ये]
डॉः वो ठीक है लेकीन...
शुः लेकिन क्या...
डॉः अब वो माँ नही बन सकती [चला आता लफडी चालू, जायज - नाजायजचे खेळ सुरु]
सर्वांचे फ्लॅशसारखे क्लोज अप्स.
....
दिवणखान्या [कामधंदा सोडुन] सर्व चिंतातुर चेहर्‍याने बसलेले. अर्थात, एक स्वामीजी सोडुन.
कैः अब क्या करे?
ब दिः धीरज रखो बेटा. वेदांत तुमही ईसका इलाज बताओ. (कै. घाबरुन दिग्दर्शकाकडे बघतात. त्यांना वाटते नविन पात्र. पण धीरज म्हणजे Patience हे लक्षात आल्यावर हायसे होतात)
वे. स्वाः एक उपाय है. इस खानदान को गर वारीस चाहिए तो आज से चार दिन के अंदर, पुरणमासी के पहले, इस घर में एक जायज गर्भ जम्न लेना चाहिए.
ब. माः लेकीन ये कैसा मुमकीन है?[ ह्या बाईला प्रश्नाशिवाय काही डायलॉगच नाहीत] सुरजभी नये बिझिनेस के सिलसिलें में सिंगापुर गया है.[भारतातील इकॉनॉमी बूम होत असताना हा सिंगापुरला का मरायला गेला आणि तो ही आत्ताच]
वे. स्वाः है! अगर शुभ्रम की शादी न. न. से की जाए तो...
दे. मा., ज्या इतकावेळ डोळे मिटुन बसलेल्या असतात, त्या खाड्कन डोळे उघडतात.
तेव्हढ्यात फोन वाजतो. न. ना. धावत जाऊन फोन उचलते. प्रश्नार्थक आणि विस्फारलेल्या डोळ्याने ब. मा कडे बघते.
ढॅन्… ढॅन ढॅन्… ढॅन
न. ना चा क्लोज अप
(एपिसोड समाप्त)


वि. सुः [..] हे सुज्ञ प्रक्षकांचे विचार आहेत. गाडीयोग़्य रुळावर आणुन ठेवली आहे; म्हणजे "एकाचे तंगडे, दुसर्‍याच्या गळ्यात" आणि जायज - नाजायज अवलाद... वगैरे आता सुरु.. ज्या भावनांचे वर्णन केले आहे, ते फक्त कागदावर, पात्रांना चेहर्‍यावर दाखवायला बंदी आहे आणि त्यांचा कुवती पलिकडचे आहे.



Rachana_barve
Thursday, June 08, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अस झाल का? असो पण मग तो सितेचा कोण लागेल? असो, जाउदेतच.. :-)
पुढचा भाग

ब मा : " अरे करमजली किसला फ़ोन है बतायेगी भी? "
न. का : वो Dr का फ़ोन था. सिता दिदी कोमा मे चली गयी है "

इथे ब मा आणि ब दा च्या चेहर्‍यावर ३ ३ दा कॅमेरा पुढे मागे होतो.

ब दा : " अरे बहुरानी को क्या हो गया तुम्हे. इससे तो अच्छा मै ही मर जाती "

ब मा : " ब दा ऐसे मत कहीये. अगर आपका साया हमारे उपर नही रहेगा तो हम क्या करेंगे. बुजुर्ग लोगोंका आशिर्वाद होनाही चाहीये इस घरपे "

प्रथम : " नि का सिता कब होश मे आयेगी? dr ने क्या कहा? "
नि. का : " पता नही dr ने कहा है अब सिर्फ़ भगवान की पुजा करो. अब दवा नही दुवा की जरुरत है "
आणि ती रडत धावत देवघरात जाते. आणि देवघराचे दार लोटून एक कृर हास्य तिच्या चेहर्‍यावर येते.
ब मा : " शुभ्रन अभि तुही बचा सकता है हमे. निका के साथ शादी तो तुमको करनीही पडेगी "
शुभ्रन " नही ब मा ये नही हो सकता. मै नही शादी कर सकता. किसिके साथ भी. क्युकी मुझे भी देव कि तरह " शुभ्रन मान खाली घालतो.
ब मा आणि कै ना, प्रथम सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात.
वे. स्वा : " तो फ़िर एकही उपाय है. प्रथम की दुसरी शादी करो. नयी बहू लेके आओ. तभी इस घरको वंशज मिलेग "
ढण ढण म्युझीक.
ब मा : " लेकीन किसके साथ? "
म भा : मै वही कबसे बोले जा रही थी. मेरे दुर के मौसा की लडकी है. उसिके साथ प्रथम की शादी बणाओ. बडी शुभ कदमोंकी है. वो जणमजली के जैसी नही "
प्रथम " नही ये शादी नही हो सकती. मै सिर्फ़ सिता का हु सिता का रहूंगा. " प्रथम वरती बेडरुम मध्ये निघून जातो
म भ : " उसे मणानेका काम मेरे पर छोडो. तुम लोग शादी की तैय्यरी करो "
इतक्यात बाहेर काला साया चालत चालत देवकी व्हिला कडे जायला लागतो. देवकी व्हीलाचा काट्याकुट्याने भरलेला कोळ्याच्या जाळीने माखलेला दरवाजा तो हलकेच लोटतो. कर्र्र्र असा आवाज येतो. काला साया आत जातो. आत सितेचा एक भला मोठा फ़ोटो कांचनच्या भल्या मोठ्या फ़ोटोशेजारी टांगलेला असतो. काला साया आपला हात वर करतो. त्याची नख ८ इंच लांब असतात पण पुर्ण काळ कापड हातावर असत. तो सितेचा फ़ोटो हाताने जमीनीवर फ़ेकतो आणि तो फ़ुटतो. पाठीमागे कुछ अपने कुछ पराये ये अनदेखे साये अस गाण चालू असत.
सितेच्या फ़ुटलेल्या फ़ोटोवर कॅमेरा concentrate करतो. इतक्यात देवकी व्हीलाचा दरवाजा परत उघडला जात असतो. कर्र्र्र आवाज येतो आणि अर्धवट उघडलेल्या दरवाज्यात उभ्या असलेल्या आकृतीने घातलेल्या ४ इंच उंच टाचांच्या सॅंडल्स वर आणि त्या व्यक्तीने घातलेल्या गुलाबी भरजरी साडीच्या काठावर कॅमेरा थांबतो.

एपिसोड समाप्त



Apurv
Thursday, June 08, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रचना! .... ... good progress! keep going :-)

Ninavi
Thursday, June 08, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> ज्या भावनांचे वर्णन केले आहे, ते फक्त कागदावर, पात्रांना चेहर्‍यावर दाखवायला बंदी आहे आणि त्यांचा कुवती पलिकडचे आहे.


Rachana_barve
Thursday, June 08, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए ते जणमजली करमजली कसले सही शब्द आहेत ना :-O

Apurv
Thursday, June 08, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हळू हळू camera वर जातो आणि सितेचा चेहरा दिसतो.

का.सा. आखीर मे आही गयी तुम, बहोत तकलिफ़ हुई तुम्हे लाने मे यहां, पर कोई बात नही, अभी सिर्फ़ कांचन की कमी है!

सितेच्या चेहर्यावर भाव शुन्य (तसे पण तिला अभिनय फारस करता येत नाही, त्यामुळे तिच्यासाठी खूप सोप्पे होते. )

ती स्वत्:च्या फोटो कडे बघते आणि जाऊन एका खूर्चीवर बसते. का.सा. लांब नखे तिच्या केसातून फिरवतो आणि मोठ्याने हसतो.

इकडे hospital मध्ये सिता अजूनही कोमा मध्ये आहे. प्रथम तिच्या शेजारी बसला आहे.

प्रथम्: ये क्या होगया तुम्हे सिता, यहां घरवाले मेरी दुसरी शादी की साजिश कर रहे है, लेकीन ये मैं हरगिस होने नही दूंगा.

नयनिका सगळे दाराआडून ऐकत असते, प्रथम चे सितेवरचे एवढे प्रेम बघून रडू लागते.

नयनिका: (स्वगत) ये मुझे क्या हो गया है समझ नही आ रहा, जरूर ये काले साये का कुछ असर है, पता नही सुरज कब आयेगा? मेरे दीदी का क्या होगा? सब मेरी गलती है, मैं आई थी उसके साथ उसका खयाल रखने के लिये और ये सब क्या हो गया? (रडणे चालूच असते)

घरी मं. भा. प्रथम च्या दुसर्‍या लग्नाचे कारस्थान रचत असतात. दोन दिवस झाले विट्ठल कुठे तरी गायब आहे.

आज सगळे जण कामला गेले आहेत, नाहीतर मोठी हवेली सोडून त्यांना वन रूम किचन मध्ये रहायची पाळी येइल.

ब.मा. बेड रूम मध्ये बसून गहन विचारात पडल्या आहेत. इतक्यात फोन ची रिंग वाजते.

ब.मा. धावत फोन कडे जातात, थोड्या धस्तावतात, कोणाचा फोन असेल? अरे बापरे! आता पुन्हा नविन काय? फोनची रिंग चालुच आहे, घाबरत घाबरत त्या फोन उचलतात

ब.मा. हेल्लो

फोन्: नमस्कार, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हुं कौन बनेगा करोड्पती द्वितिय से! क्या मैं ब.मा. से बात कर सकता हुं?

background मध्ये जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या

ब.मा: ये क्या बेहुदा मजाक है?

अमिताभ: ये मजाक नही, ये असलियत है, आपके प्रिय नौकर विट्ठल ग़ंगाराम पाटिल ने phone a friend के लिये आपका नाम चूना है. और वो अब आपसे एक सवाल पुछेंगे जिसका सही जवाब देनेपर वो बन जायेंग हकदार एक करोड के.

विट्ठल्: नमस्ते मेमसाब

ब.मा. मेल्या, कुछ बता के भी नही गया, तुम्हे पता है यहां कितनी परेशानी है और तुम वहा गेम खेल रहे हो.

विट्ठल्: माफ किजिये मालकीन लेकीन अब मैं वहा काम नही कर सकता, और यहा वक्त बित रहा है, जल्दी से मुझे अगले सवाल का जवाब दिजिये,

सवाल है
कौनस फूल है जिसको देखकर आदमी बहूत डर जाता है, और जिसे सुंगनेसे बेहोश हो जाता है.
A सफेत ग़ुलाब B सफेत ज़ास्वंद
C सफेत सदाफूली D इनमेसे कोई नही

ब.मा. अरे ये कैसा सवाल है, हम तो इन सभी फूलोंसे बेहोश होते है!

अमिताभ: और आपका वक्त खतम

फोन कट होतो.

ब.मा फोन ठेऊन रूम कडे जायला निघतात इतक्यात दारावरची घंटी वाजते, त्या दार उघडतात, बघून एकदम घाबरतात,

विट्ठल तुम!! तुम यहां तो फीर वो कौन था?

ब.मा चक्कर येउन पडतात.

एपिसोड समाप्त.




Maitreyee
Thursday, June 08, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता रात्री ची वेळ..प्रथम ची खोली..
प्रथम हताश बसला आहे. खिडकीपाशी उभे राहून जमेल तसा उदास दिसण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तेवढ्यात नयनिका येते.. शिफ़ॉन ची साडी, उघड्या पाठीचा ब्लाऊज मोकळे केस, पापण्यांची फ़डफ़ड आदीकरोन सर्व शस्त्रासह सज्ज!
निका : प्रथम,
प्रथम : 'जिजु' चे एकदम 'प्रथम' झाल्याने चमकून, नयन, तुम यहां? इस वक्त?
निका : हां मै! तुम्हारी उदासी मुझसे छिपी नही है, तुम अपना दर्द मुझसे बाट सकते हो प्रथम, अब दी की गैरमौजूदगीमे तुम्हारा खयाल रखना मेरी जिम्मेदारी हुई ना!(अग लब्बाडे!)
प्रथम : देखो न नयन ये क्या हो गया! सीता उधर अस्पताल मे और ये घरवाले मुझसे घर का चिराग मांग रहे है! क्या जवाब दूंगा मै इनको! आखिर क्यू नही समजह्ते ये लोग!! क्यू! क्यू!! (अश्रू)
निका : मुझे भी दी की बहोत याद आ रही है (अजून बदाबद अश्रू, पण हे खोटे आहेत हे चाणाक्ष प्रेक्षक ओळखू शकतात :-O)
दोघे अश्रू ढाळत एकमेकाला सावरायच्या हेतूने(?) एकमेकाला थोपटतात. तेवढ्यात घूं घूं किन्वा सूं सूं वारा येतो. मग काय करणार निकाचा पदर जागा सोडतो! कारण पिन अप नसतो ना केलेला नेमका :-O
तेवढ्यात बाहेर वीज चमकते! कडकडकड!! आणि मग अपरिहार्यपणे नयन प्रथम ला मिठी मारते!(यात काय घाबरण्यासारखं आहे का? पण छे! ही वेळ अशीच असते कायम)
मग दिग्दर्शक ट्रॉली गरागरा फ़िरवून वेगवेगळ्य ऍन्गल ने कॅमेरा प्रथम, नयन वर फ़िरवतात.
मग डायरेक्ट सकाळ, चिमण्यांची चिवचिव!! नयन प्रथमच्या शेजरी ढाराढूर! अचानक झटका बसल्यासारखी उठून पुन्हा अश्रूपात करते! ' ये मुझसे क्या हो गया'
प्रथम पण 'ये मैने क्या किया'
(अरे वा इतका वेळ काही कळत च नव्हतं वाटतं!)
निका : ये गलत है, जिजू अब आपको यहासे चले जाना चाहिये (अरे वा, फ़िरसे जिजू?? इसका कुछ करना पडेगा..)
प्रथम : खाली मान घालून निघतो पण तेवढ्यात आठवतं,'लेकिन ये मेरा कमरा है'
oops!

मग घाईघाईने नयनिका उठून लपत छपत तिच्या खोलीकडे जाते.
एक दाराच्या आडून एक वेणी आणि बांगड्यावाला हात दिसतो फ़क्त आणि ते दार बन्द होते! बॅकग्राउंडला स्वामीच्या बोलण्याचा घुमणारा आवाज वारिस वारिस
..इस खानदान को गर वारीस चाहिए तो आज से चार दिन के अंदर, पुरणमासी के पहले, इस घर में एक जायज गर्भ जम्न लेना चाहिए.

किसने देखा? आखिर किसको पता चला है इस तूफ़ानी रात का राज?..


Rachana_barve
Thursday, June 08, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग आई ग.. ही शोभत नाही केकता कपुरची सीरीयल. फ़ारच फ़ास्ट आहे :-O
अपुर्व विट्ठलचा पिच्छा सोडत नाहीये


Meenu
Friday, June 09, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसला सही चाललाय हा छापखाना ............

Himscool
Friday, June 09, 2006 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सिरियलचा वाचायचा टी. आर. पी. सगळ्यात जास्त असावा बहुतेक!!

Shraddhak
Friday, June 09, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ एक महिना उलटून गेला आहे. हॉलमध्ये बसून बडी मा काहीतरी वाचत आहेत. विठ्ठल फ़र्निचरवर फ़डके मारत आहे. नयनिका स्वतःशीच काहीतरी गुणगुणत बसली आहे. बडी मा एक सुस्कारा सोडून हातातले मासिक बाजूला ठेवतात.

बडी मा : मासिक वाचून झालं. यावेळेसचे जोक्स बरे होते जरा. सारखं त्या सायाच्या करामतींनी वैतागलेल्या मनाला जरा रिलिफ़. हुश्श.... बेटा नयन.

नयनिका वर बघते.
नयनिका : जी बडी मा....
बडी मा : सीता बेटी की कोई खबर? कोमासे बाहर आई या करमजली अभी भी hospital मे enjoy कर रही है? hospital का हर दिनका दस हजार चार्ज बेचारे प्रथम को भरना पड रहा है.

तेवढ्यात फोन वाजतो. नयनिका फोन घेते आणि तिचा चेहरा आनंदाने उजळतो.

नयनिका : बडी मा, खुशी मनाईये, बडी मा... सीता कोमासे बाहर आ गई है और hospital से भी. प्रथम उसको लेके सीधे घर आ रहा है.
बडी मा : hmmmm ... एक महिना तो सीता और साये के बगैर आराम से कट गया. अब बला आ रही है वापस. ठीक है. उसका स्वागत करते है.

सीता दारात उभी आहे. बडी मा तिला ओवाळतायत. सगळे हॉलमध्ये जमले आहेत.
बडी मा : नयनिका बेटा, आता तू पण ओवाळ सीतेला.
नयनिका ताट घेते. तिला चक्कर यायला लागते. तिच्या हातातले ताट निसटते. ती खाली कोसळते. कुंकू सगळीकडे उडते, निरांजन विझते.
बडी दादी : जल्दी... कोई फोन लगाओ डॉक्टर को.

डॉक्टर नयनिकाला तपासत आहेत. सर्वजण चिंतातुर चेहर्‍याने सभोवार उभे आहेत.
डॉ : अरे ये तो खुशी की बात है. नयनिका बेटी मां बनने वाली है.
सीता : क्याऽऽऽऽऽ???????? जनमजली, ये क्या किया तूने? यहांपे मै तुझे कितने भरोसे के साथ लाई थी और तूने मेरी नाक कटवा दी... मर.. तू कही जाके.. मर जा...
मंगला भाभी : देख्खा.... दोणो बहणोंका कमाल. एक को शादी करके भी बच्चे णा होवे और एक इतणी फ़ास्ट निकली के....
बडी मा : नयनिका, अभी के अभी अपना सामान लो और इस घर से दफ़ा हो जाओ. चली जाओ.

नयनिका काही न बोलता अश्रू ढाळत आहे. सीता तिला मारायला हात उगारते. तो हात वरच्यावर पकडतो प्रथम.....

प्रथम : नयन कही नही जायेगी... यही रहेगी... क्यूंकी उसकी कोख मे इस खानदान का चिराग है. वो बच्चा मेरा है.

असे म्हणून सांडलेल्या कुंकवाची चिमूट घेऊन तो नयनिकेच्या भांगात भरतो.

अब ये मेरी पत्नी है और इसे कोई कुछ नही कहेगा.
देवकी मा : भगवान तेरा लाख लाख शुकर है. अब इस घर का चिराग जल्द ही आ जायेगा. और इस घर से मुसीबत हमेशा हमेशा के लिये टल जायेगी. जश्न की तैयारी करो. आज हवेली मे जश्न होगा.

जश्नचा सीन... सगळे नटून थटून ( नयनिका जरा जास्तच नटून) जमले आहेत. तेवढ्यात लालभडक रंगाचा लहंगा घालून सीता येते आणि dance आणि गाणं एकदम सुरु करते.

घरपेऽऽ..... मेरे घरपे....
मेरे घरपे छाया.... साया... छाया

घरपे छाया काला साया
घरपे छाया काला साया
मैने अपना प्रथम गवाया

कितनी खुश थी मै हवेली मे आके
मला भोवली कुणाची पूर्वीची पापे
किसका छल है ये, किसकी है माया
कि मैने अपना प्रथम गवाया....

( अश्रूभरल्या डोळ्यांनी नयनिकाकडे पाहून)

नयनिका... नयना... मेरी प्यारी बहना
खुश रहो सदा, याद रखो मेरा कहना
तेरा प्यार सदा रहे, सब अपनोंपे छाया

....मैने तो अपना प्रथम गवाया

सीतेचा नाच थांबतो. विठ्ठल तिची भरलेली बॅग आणून देतो. ती जड पावलाने सगळ्यांकडे पाहत वळून जायला निघते. एकाएकी प्रथम तिच्याकडे धावत...

प्रथम : सीताऽऽऽ.... रूक जाओ सीता. मत जाओ. अपने प्रथम को छोड के मत जाओ.

नयनिका चमकते. पण लगेच सावरून घेत ती सीतेजवळ जाते.
नयनिका : ( छद्मी स्वरात) हां रुक जाओ ना दीदी... तुम्हे किसीने घर से थोडी निकाला है. ये हवेली इतनी बडी है कि हम दोनो आराम से यहा एक दूसरे का मुंह देखे बिना रह सकते है... और वैसे.... बाहर गेट के पास साया भी तो खडा है.

सीता चमकून बाहेर पाहते. साया तिथेच असतो. पण तो आज संथ चालीने देवकी व्हिलाकडे जायला वळतो आणि खांदे पाडून दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखा चालत जाऊन नाहीसा होतो.

इकडे सूरज बेशुद्ध होऊन कोसळतो.

एपिसोड समाप्त.


Maudee
Friday, June 09, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow !! तू पण मस्त लिहितेस की गाणी श्रध्हा

Jyotip
Friday, June 09, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कितनी खुश थी मै हवेली मे आके
मला भोवली कुणाची पूर्वीची पापे
श्र....

Meenu
Friday, June 09, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र great आहेस गं तु ...

Jo_s
Friday, June 09, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु.लं. नी खिल्ली पुस्तकाच्या प्रस्तावनेत साधारण असं लिहीलं होतं,"अतिश्योक्ती ही विनोद निर्मीती साठी वापरली जाते. पण यापुस्तकातील व्यक्तीचित्रे ही त्या व्यक्तींची अतिशयोक्ती नसून त्या व्यक्तीच या व्यक्तीचित्रां ची अतिशयोक्ती आहेत असे समजावे"

या सिरीयल बद्दल मला असच म्हणावसं वाटतं. ऍक्च्युअल सिरीयल्स याच्याहून

आत्ता पर्यंतचे एपीसोड पाठवून द्या एखाद्या निर्मात्याकडे. आणि पुढे काही वर्ष चालवतायेईल. मायबोलीचा सगळा खर्च निघेल.


Psg
Friday, June 09, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, सात फेरे चा overdose झालाय का तुला? :-)
काय गाणं आहे! सही


Maitreyee
Friday, June 09, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, श्र.. केवढा ड्रामा स्किप केलास गं, नयन चा प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवलास की तू! भरपूर ताणाअचा विचार होता माझा :-)
बाकी ते गाणं सहीच!

मैने तो अपना प्रथम गवाया


Soultrip
Friday, June 09, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक बा.बो. शंका: - STY म्हंजे काय गं ताई?

Shraddhak
Friday, June 09, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी अगं पुढे ताणता येईल ना बरंच. आता नयनिकामुळे सीता घर वगैरे सोडून जाते असं दाखवायचं. मग ती परत हवेलीत येते / नाही येत वगैरे गोष्टी आल्या. वि प करांना सायापासून वाचवण्याची जबाबदारी निभावण्यासाठी सीता परत येणारच! आणि आवश्यक climax म्हणजे सीतेच्या हवाली आपले मूल करून नयनिकाचे मरण पावणे...... मग यामुळे प्रथम आणि सीता पुन्हा एक होतात की नाही वर दळण! अजून बराच मसाला आहे आणि मेन मसाला साया आहेच ना अजून!

Maudee
Friday, June 09, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


episode start
सिताने सायाला जाताना बघितले.
मग क्रमा क्रमाने प्रथम, दे. मां यांकडे बघितलं.
सि "प्रथम, नही मै अब नही रुक सकती. कोई मुझे रोक नही सकता. तुमने मेरे साथ बेवफ़ाई की है. मै ये सह नही सकती."
ती निघणार तेवढ्यात तिला तिचे आई बाबा दारातून आत येताना दिसतात.

सुरुवातीला जश्नची तयारी बघून ते ख़ुश होतात."सिता बेटी"
लगेच पाया पडणे वगैरे कर्यक्रम उरकतात.
कै. "हमारे बडे सौभाग श्रीनिवास्जी की ईस शुभघडी पे आप और भाभीजी पधारें."
श्री "मै तो इसिमे ख़ुश हु की मेरी लाडली यहां ख़ुश है. लेकीन ये जश्न कैसा हो रहा है? हम तो नयनिका को लेने आये थे. बहुत दिन रही बहन के ससुराल"
कै. "हां वो तो है. पहले आप मु मिठा की जीये. ईस घर को वारीस मिलने वाला है उस ख़ुशी मे ये जश्न." अस म्हणता म्हणता त्यान्च्या तोंडात पेढा कोंबतात.
सिताची आई यशोदा "सिता बेटि. अरे तुम यहां क्यु ख़डी हो ऐसे घुमना नही चाहीये तुम्हे...."
तेवढ्यात मं भाभी "नही नही भाभीजी सिता बेटी नही. आपकी छोटी बेटी."इथे एक छद्मी हास्य.
यशोदाभाभी आणि श्रिनिवास जागच्या जागी ख़िळून रहातत. थोड्या वेळातच यशोदाभाभी एकदम नयनिकाला मारायलाच धावतात.
य."अरे करमजली, क्या इस लिये आयी थी तुम यहां. ये सब कुछ करना था तो अपना घर नही था." असं म्हणुन ४-५ रट्टे लगावते तिला.
ब. मां "नही नही इसे मत मारीये. येही हमारे घर को संकट से बचानेवाली है. ये प्रथमके बच्चे को जन्म देकर हम पर उपकार्ही कर रही है."
मं भाभी "पर है तो नाजायज ही ना. शादीसे पेहले बच्चा"
य. आणि श्रि "प्रथम ??????'
य. "अरे जनमजली. बहन के घर मे विष घोल दिया ना तुने. तुझे और कोई नही मिला था जो बहन के सुहाग पे डाका डाला."
असं म्हणुन तिला फ़रपटत घेऊन जाऊ लागते.
कै "कहां ले जा रही है आप इसे?"
श्री "घर"
कै "नही नही वो यही रहेगी. उसके पास हमारा वारिस है"
श्री "नही मै इसे ले जा रहा हु. सिताने यहां रहना है या नही वो उसका decision होगा."
ब. मां "पर प्रथमने इसके मांग मे सिंदूर भर दिया है, अब ये हमारी है"
श्री "पर हमने अब तक इसका कन्यादान नही किया"
अस म्हणुन ते तिला घेऊन जातात आणि मं भाभी सोडूण सगळे हताशपणे बघत बसतात.

सिताला काय करावे तेच सुचेना.
तेवढ्यात तिथे एक माणुस बसलेला आहे. जश्न साठी त्याला बोलावण्यात आलेलं ख़ुराणा uncle .
ख़ु. "सिता बेटी तू है तो मेरी बच्ची जैसी. तुम्हारे इस दुविधा मे मै तुमसे क्या कहु. पता नही मुझे ये कहना चाहीये या नही. यहा रहना है या नही ये तुम्हारी मर्जी.
पर मेरा एक offer है. मैने अभी तुम्हारा dance देख़ा. और तुम गाती भी अच्छी हो. क्या तुम मेरे movie मे काम करोगी??"

सिताने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले. तिला हे अनपेक्षित होतं (आणि प्रेक्षकानाही.)

तिने एकदा घरात सगळ्यांकडे बघितले आणि ख़ुराणा uncle ला होकार दिला आण आपल्या ख़ोलीत निघून गेली.सर्व जण फ़क्त बघत बसले.


episode समाप्त





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators