|
Raina
| |
| Tuesday, June 06, 2006 - 11:04 am: |
| 
|
Wow ! Lot of episodes, but - अजूनपर्यंतं एकही नाजायंज बेटा वगैरे नाही ?? कसं व्हायाचं ? :-)
|
Apurv
| |
| Tuesday, June 06, 2006 - 2:33 pm: |
| 
|
क्या बात है! शेवटच्या दोन भागांमध्ये कोणीच बेशुद्ध नाही?
|
Mbhure
| |
| Tuesday, June 06, 2006 - 9:11 pm: |
| 
|
Episode x+1 दिवाणखन्यात सीता सोडुन घरातील सर्व मंडळी (कामधंदा नसल्याप्रमाणे) बसली आहेत. अर्थात, Center of Attraction देवकी माँ! ब. मा. : माँजी अब क्या करे? विशाखापट्टनमकर के खानदान पर ये कैसे काले बादल छा गये? कही सीता के दुर्भाग.... देवकी माँ हातानेच बडबड थांबवायला सांगतात. त्यामुले मं भा. ही आगीत ओतायचे तेल परत बुदल्यात ओतते. दे.मा: मैंने मेरे गुरु महाराज वेदांतस्वामी से इस पर बातचीत की. उनका कहना है की अगर इस घर में 19 कृतांत 19 का एकबार प्रवेश हो जाए तो इस खानदान पर कोई भी आँच नही आयेगी. प्रथमः ये कृतांत कौन? दे. माः (मुर्ख, असे मनात म्हटल्याप्रमाणे हसुन) तुम्हारा बेटा! इस घर का होनेवला चिराग. आश्चर्यचकीत झालेले सर्वांचे चेहर्यांचे फ्लॅश लाईट पडल्यासारखे क्लोज - अपस् (सिरीयल बघणार्यांना कसे ते कळले असेलच) .... सीता डोळे उघडते आणि स्वतःच्या बेडरुम मध्ये बघून दचते. सीः मुझे यहाँ कौन लाया? न. नाः मी. हम सब जब बांते कर रहे थे तो तुम्हे वहाँ न देखकर मैं इस कमरे में आयी. मुझे वो खत जमीन पे पडा हुआ मिला. किसीको बताने का वक्त नही था इसलिए मैं खुद तुम्हे ढुढने निकली. तुम एक सुनसान मकान के सामने पडी थी. सीताचा चहरा पांधरा फटक पडतो. सीः तुम वहाँ क्युँ आयी? मेरे कर्म में क्या लिखा है कौन जाने. डे. माः एक नन्हासा, मासुमसा बच्चा. देवकी माँ तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत असताना, नयनायिकेच्या चेहर्यावर दुष्ट आणि क्रुर भाव. (आणि कर्कश्य म्युझिक) [It is time to change villain/ vamp] .... दिवाणखान्यात फोन वाजतो. कैलाशनाथ तो उचलतात. समोरुन मं भा. येत असते. हळुहळु कै. ना. चा चेहरा काळजी + भितीयुक्त होत जातो. त्याचवेळी (ढॅन ढॅन, ढॅन ढॅन) background Music चेहर्याच्या क्लोज - अप बरोबर वाढत जाते. (एपिसोडे समाप्त)
|
अशक्य... सही...जबरी... ट्रेन जोरात चालू आहे. चालुद्या.
|
Meenu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 12:44 am: |
| 
|
चला मी आता पडद्या मागे काय चाललय ते लिहिणार आहे ... सीता वैतागुन तावातावानी director शी बोलतेय सीता: अरे काय तु मला प्रत्येक part मधे बेशुध्द पाडतोस. इतक्या कमी मानधनात प्रत्येक episode मधे बेशुध्द पडणं मला अजिबात परवडत नाही .... डोकं दुखायला लागलं इथे तिथे आपटुन .. director : हे पहा ही कथेची मागणी आहे आणी viewers ची पण त्याप्रमाणे आपल्याला बेशुध्द पडायलाच लागेल सीता: आणी ती बडी मा झालेली म्हातारी किती additions घेते shooting च्या मधे मधे वाट्टेल ते बोलते मला ... तुम्ही हवी तर दुसरी सीता शोधा ... बडी मा चा रोल करणारी म्हातारी .. : अरे कंटाळा येतो मला हिचं सारखं ते रडणं कुढणं ऐकुन ... director अहो असं कसं करुन चालेल आपली अगदी खरीखुरी कौटुंबिक कथा आहे रडणं कुढणं नसुन कस चालेल ... अरे रोज एक तर ती पांढरी फुलं मिळवायचा ताप आणी वर तुमची कटकट विठ्ठल: हे पहा प्रत्येकाला आपापल्या जागी जाऊन बेशुध्द पडायला सांगा कंबर गेली माझी या एकेकाला उचलुन ... आणी हो ही माझी औषधाची बिलं त्यची reimbursement द्या लवकर
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 07, 2006 - 1:56 am: |
| 
|
कामधंदा नसल्याप्रमाणे >> कामधंदा नसल्यामुळे म्हण... काम तर नसतेच... इतर धंदेच जास्त
|
Chinnu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 11:32 am: |
| 
|
भुषण तुम्हाला पण राहवले गेले नाहीच! सही चाललय लोकहो!
|
Mbhure
| |
| Wednesday, June 07, 2006 - 1:04 pm: |
| 
|
रात्री १० वा बात्म्यातील १०:२० ला वेदर रिपोर्ट झाल्यावर Jay Leno चाहू होईपर्यंत वेदीकाची जी सिरीयल लागते, त्या १० मिनीटाच्या अनुभवावरुन लिहीले आहे. आणि काम जवळ जवळ नसल्याने भरपुर वेळही आहे. त्या वेळेचा हा दुरुपयोग. Episode= x+2 मं भाः क्या हुआ? किसका फोन था? कैलाशनाथः (एक प्रचंड मोथा पॉज घेऊन) स्वमीजी का. अगर जल्द से जल्द हवन और शांती नही की तो २६.. ब. माः किस लिए? (काय मुर्ख प्रश्न आहे) ..... दे. माः आज से तीन दिन के बाद जो मुहरत है, उसी दिन हवन करने के लिए स्वामीजी ने कहा है.उसकी तय्यारी तो तुम्हे करनी पडेगी.(सीताकडे बघत) ब. मा. प्रश्नार्थक cum त्रासिक नजरेने दे मा (देवकी माँ) कडे बघतात. दे. माः अगर बहुने सच्चे लगन से और बडी भक्ती से ये सब किया तो उसका फल उसे जरुर मिलेगा. उसे कोई भी दुष्ट शक्ती उसे नुकसान मही पहुँचा पायेगी. न. ना आणि मं भा. एकमेकांकडे बघुन एक व्हिलनीश लुक देतात. (२ मिनीटे जरी कुठचीही सिरीयल बघितली असेल तर नक्की कसा लुक ते कळेल. फार श्रम घ्यावे लागत नाहीत.. मग तो नट असो, लेखक असो, दिग्दर्श असो नाहीतर प्रेक्षक) प्रथमः क्या मैं भी उसका हाथ अबटा सकता हुँ? (पुढील Explanation साठी ह्या खुळचट प्रश्नाची जरुरे होती) दे. माः नही. बेटी, तुम्हे ये सब अकेले करना होगा. ये तीन दिन तक किसीका तुम्हे छुना भी मना है. सीताः वि.प. कर खानदान की खुशी के लिए मैं मेरा पुरा जीवन दान पे लगाऊँगी. ....... ब. माः आपने बताया नही किस का फोन था? कै. नाः स्वामीजी का. वो देव और देवकी के बरे में कुछ बताना चाहते थे. अगर उनको समय मिला तो हवन के पहले वो खुद आनेवाले है; ताकी सब कुछ ठीक हो. ब. माः तो फिर ठीक. हमें चिंता का कोई कारन नही. कै. नाः hmmmmm लेकीन इस बार वो साथ में शुभ्रन को भी साथ ला रहे है ब. मा च्या चेहरा सर्कन उतरतो. ब. माः मगर अब क्यों? ये सब तो..... (मुर्ख, हे सगळ आताच सांगितल तर पाचव्या एपिसोडला काय दाखवणार? आणि अजुन काही लिहीले पण नाही... इति दिग्दर्शक) ..... गच्चीवर आणि Of Course दरवाजाकडे पाठकरुन मं भाः देखो( न. ना. ला) ये तो मैं जानती हुँ की तुम सुरज से प्यार नही करते हो; तो फिर इस घर में कदम रखने का क्या कारन है? वैसे सीता तो दुम्हारी सगी (ह्याचा अर्थ सुज्ञांच्या (अश्या सिरीयल बघणारे सुज्ञ?) लक्षात आलेच असेल..) बहन है. और तुम उसके खिलाफ न. नाः मैं तो इस घर से एक एक पल वाकीफ(?) हूँ. मैम तो ये भी जानती हूँ के आप ये सब क्युँ कर रही हो.(मला सांग ना इति दिग्दर्शक) बेहतर ये होगा की आप मेरे और सीता के बीच न आए. उसके साथ क्या करना है वो मै अकेल करुँगी. मेरा रस्ता काटने की भुल से भुल ना करना नही तो... " मंगल भाभीके कितने हाथ और कान है ये तुम्हे मालुम नही " असे म्हणत मं भाभी रागाने तिच्याकडे बघते आणी उपरण्यासारखी आपली वेणी गळ्याभोवती टाकत तिथुन जाण्यासाठी वळते आणि दरवाज्यात परत एकदा ढॅन ढॅन म्युझिक, मंगल भाभीचा आ वासलेला क्लोज अप (एपिसोडे समाप्त)
|
Maitreyee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 1:32 pm: |
| 
|
भूषण, रोजचा 'अभ्यास' कारणी लावत आहेस वाटते अगदी सर्व मंडळींचा अभिनय, क्लोज अप्स,खुळचट प्रश्न, म्युझिक सग्गळे अगदी डोळ्यापुढे आले, वेणी गळ्याभोवती
|
अरे, अजुन करवा चौथ कसा आला नाही?
|
Mbhure
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:37 pm: |
| 
|
ह्यात कसला आला आहे अभ्यास? दरवेळी मी बघतो ती शेवटची २ मिनीटे उरलेली असताना. काय करणार घरच्यांसाठी पहावे लागते. " काय घडले " ह्यात त्यांना इंटरेस्ट असतो आणि ते शवटच्या २ मिनीटांवर कळतेही. हे सहन करण्याचे कारण म्हणजे नंतरचा एक - दीड तास, Seinfeld संपेपर्यंत देसी चॅनेल लावायला बंदी आहे. आणि असे लिहायला फार अक्कल लागते असेही नाही. कोणाच्या भावना दुखावल्यास Sorry . ह्या वाक्याचा तसा हेतुही नव्हता. नही तो..
|
Apurv
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:04 pm: |
| 
|
तिसरा दिवस उजाडला, हवनाची तयारी सुरू झाली, पांढरा रंग सोडून सर्व रंगाची फुले गोळा केली आहेत. (पांढर्या रंगाच्या फूलांचा तुटवडा असल्याने दिग्दर्शकानी मनाई केली होती.) हवन कूंड तयार आहे, हवन सामुग्री, पाच प्रकारची फळे, आहूती साठी तुप, सर्व काही तयार आहे. सगळी मंदळी नटून थटून आली आहेत. पुरुष मंदळी भारीचे कुर्ते पायजमे घलून आहेत. तोच, ढन टन ढन music नयनिका jeans, t-shirt घालून आली. सगळे जन shocked न. रोको ये सब!! सित. (घाबरून) येह क्या कह रही हो! मं. (न. ने स्वत्:च्याच पायावर कुर्हाड मारल्याने खूश झाली) तुम्हारी हिम्मत कैसे हूई इस तरहा बात करनेकी!! न. मैं इन स्वामीजी, काल सायां वगैरे पे विश्वास नही रखती, मैं अंद्ध श्रद्धा निर्मुलन की कार्यकर्यिता हुं और मैं ये साबित करूंगी की ये स्वामीजी, ये सायां सब झूठ है! सुरज. (ऐरवी कुठेही न पचकणारा), हां, मैं भी इन सब बातों मैं विश्वास नही करता. ब.म. तूम चूप रहो सुरज, जबसे ये नयनिका घर मे आयी, तुम्हारे तो तेवर ही बदल गये. कैंआ. चली जओ यहांसे! हवन मे कोइ आपत्ती ना आने पाये. न. मैं अभी जाती हुं लेकीन बाद मे सबूतोंके साथ वापस आऊंगी. म.भ. (मनात) जरूर इसे कुछ पता है! दे.म. (मनात) अरे, येह लडकी तो सब किये पे पानी फेर देगी. इसे रोकना होगा. दे.म. विट्ठल, पकडो उसे और बांधके रखो, इसके उपर काले सायेका असर गीर गया हैं विट्ठल. मैं नही पकडता, सब जन को उठा उठा के मेरे कंबर का हाड मोडा है, तुम्हीच पकडो. म. भा. धावत नयनिकाला पकडायला जातात पण तुपाच्या भांड्यावरून त्यांचा पाय अडखळतो आणि त्या पडतात, सुरज नयनिकाला वाचविण्यासाठी, म.भा. आणि नयनिकाच्या मध्ये उडी मारतो, नयनिका म.भा. ला ढकलणार इतक्यात सुरज मध्ये येतो आणि त्याला धक्का लागून तो पडतो आणि त्याच्या खिशातून सिंदूर लागलेले पांढरे फुल पडते. नयनिका ह्याच संधी चा फायदा घेउन पळायचा प्रयत्न करते, पण दरवाजा 'pull' च्या ऐवजी ती 'push' करते आणि ती अड्कून बसते. कोणितरी 'pull' आणि 'push' चुकीच्या बाजूला लिहीले असते. घराम्ध्यी असे विचित्र दरवाजा म्हणून दिग्दर्शकावर फार वैतगते. पांढरे फुल परत दिसल्याने अपशकून होत, हवन रद्द होते. नयनिकाला एका रूम मध्ये कोंडले जाते. दे.मा स्वत:च्या रूम मध्ये असतात, दे.मा (स्वगत) हे फूल सुरज कडे कसे आले? सुरज च्य ह्य सायाशी काय संबंध? त्याचे तर लग्न पण नाही झले? नक्कीच काहीतरी गड्बड आहे. दरवाज्याची घंती वाजते, ब.मा. दरवाजा उघडतात, त्यांचा चेहरा एकदम भय्भयीत होतो! त्यांच्या हातातून थाळी खालती पडते, सगळेजण बाहेर धावत येतात. सगळ्यांच्या चेहर्यावर तेच भाव. कोण आहे दारवर? सुरज कडे फूल कसे आले? देखते रहिये कुछ अपने कुछ पराये
|
"शुभ्रन" दे. मा च्या तोंडातून कस बसा आवज येतो. "पाव लागु देवकी मा" शुभ्रन देवकी मा च्या पाया पडतो. ब. मा मै अभि आती हु करत लगबगीने आत शिरतात. सिता ( मनात ) ब मा अचानक अंदर कैसी चली गयी. ये कौन है शुभ्रन. इतक्यात दे. मा " सिता बेटी शुभ्रनसे मिलो. देव का छोटा भाई " सिता " घणी खम्मा देवरसा " शुभ्रन " खम्म घणी. माफ़ करना भाबीसा मै शादी पे न आ सका. " कैंआ " अरे उसे अंदर भी आने देंगे? आजाओ अंदर बेटा " शुभ्रन आत येतो सगळे नटून थटून सोफ़्यावर खुर्च्यांवर बसतात स्वामीजी : कै ना जी हवन की तैयारी वापस करनी पडेगी. हवन को सफ़ल करना जरुरी है. बहुरानी तुम फ़िक्र मत करो सब कुछ मंगलमय हो जायेग " स्वामीजी जातात. सगळे शुभ्रनच्या भोवती बसले आहेत. सिता " अरे देवरसा मै तो भुलही गयी कुछ खानेकेलिये लाती हु आपके लिये. और चाय भी " सिता आत निघून जाते. शुभ्रन " प्रथम कैसी लग रही है शादीशुदा जिंदगी " मं. भाबी " वो जणमजली जबसे घर्मा आयी है घर मे कुछ णा कुछ होये जा रहे है. और अपणे साथ एक बेहन को भी लेके आयी है. वो तो उससे भी जादा जणमजली है " शुभ्रन गप्प बसतो. दे मा " कुछ नाही होगा मंगला. शुभ्रन बेटा तुम कैसे हो. देव का कुछ पता " शुभ्रन " दे मा देव वैसेही है जैसे था. इस घरको अभिशाप लगा है. कांचन्भाबी अगर होती तो " शुभ्रन मान खाली घालतो. दे मा डोळे पुसतात. " हिमालय मे मै अनेक अनेक स्वामींजीसे मिली इसपर कोई उपाय मिलेगा क्या. एकही स्वामीजी बोले कृतांत आया तो सब ठीक हो जायेगा " शुभ्रन गप्प बसतो मं भाबी " दे मा लेकिन अगर कृतांत भी देव के जैसा निकला तो " ठॅण ठॅण म्युसीक वाजते. अचानक एक किंकाळी ऐकू येते. सगळे धावत वर जातात. सितेच्या बेडरुमचे दार लोॅक असते. दे मा " विट्ठल दरवाजा तोड दो " विट्ठल अगदीच थकलेला आहे बघून शुभ्रन आणि सुरज मिळून दरवाज्यावर धक्के देतात आणि दरवाजा उघडतो. सितेच्या रुमभर पांढरी फ़ुल पडलेली असतात आणि भिंतीवर लाल अक्षरात लिहिलेले असते पुनमकी रात. कुछ अपने कुछ पराये Background ला गाणे लागते. सिता निपचीत जमीनीवर पडलेली अस्ते. विट्ठल सुस्कारा सोडून तिला पलंगावर टाकतो. दे मा " आजकी रात मै यहाही बैठूंगी. तुम सब लोग जाओ. मंगला मेरा पुजा का सामान लेके आओ तुम लोग जाओ. वो ठीक हो जायेगी " सगळे निघून जातात रात्र पसरलेली आहे. चंद्र वर येतो. दे मा एक रिंगण आखून आत बसलेली आहे. चहुबाजूला मेणबत्त्या लावलेल्या आहेत. दे मा डोळे मिटुन काहीतरी पुटपुटत आहे. समोर फ़ुल्या फ़ुल्या आखून मधुनच भांजे म्हणत शकूनी कवड्या फ़ेकायचा तशा कवड्या फ़ेकत आहेत. तिकडे ब मा खिडकीबाहेर बघत आहेत. रडत आहेत. प्रथम आणि सुरज आणी कै ना सोफ़्यावर बसलेले आहेत. मट्ठ चेहर्याने. ये साये दुर के पास के कुछ अपने कुछ पराये गाण चालूच आहे. अचानक न. ना च्या रुमचे दार उघडते. नंआ पुर्ण पांढर्या साडीत आहे. ती जीना उतरून खाली येते. तिच्या हातात ओंजळीत लाल कुंकवात भरलेली पांढरी फ़ुले. तिकडे दे मा चा जप जोरात सुरु होतो. सिता कासाविस होण्याची acting करत आहे. न ना च्या समोर अचानक शुभ्रन येतो. न. ना भानावर येते आणि शुभ्रन कडे बघून किंचाळी फ़ोडते आणि त्याच्या पायाशी निपचीत पडते आणि तिकडे खडकन सिता उठून बसते. एपीसोड समाप्त
|
Himscool
| |
| Thursday, June 08, 2006 - 1:30 am: |
| 
|
ह्या सिरीयलचे कपड्यांचे कंत्राट शिंपी खाबू मानी आणि मनदीप भोसला ह्याना दिले गेले होते पण निर्माता आणि त्यांचे वाजल्यामुळे सध्या सगळी पात्रे स्वत: कडचे कपडे वापरत आहेत. ओरिजिनल ड्रेपरी सिता अत्यंत गरीब दिसेल अशी पटोला साडी. ब्लाऊज आणि साडीचा रंग कधीच एक सारखा नाही. केसांचा रोल करून त्यावर लाल चाफ्याच्या फुलांचा गजरा. साडी गरीब असली तरी एकदम श्रीमंत वाटली पाहिजे म्हणून गळ्यात घसघशीत मंगळसूत्र आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे नेकलेस.. (काही झाले तरी मेक अप न करता सगळे एपिसोड शूट करायचे...) प्रथम कायम जोकराचा ड्रेस... पण टोपी नाही. शर्ट आखूड बाह्यांचा तर चड्डी अत्यंत ढगळ (दादा कोंडके इश्टाईल) चेहर्याला अत्यंत भडक मेक अप. एका हातात रोलेक्सचे घड्याळ तर दुसर्या हातात अत्यंत नाजूक काम केलेले लोखंडाचे कडे. (ये कडा वि.प. खानदानका पुरखोसे चला आया है और जब किसी लडकेकी शादी होती है तो उसके पिताजी वो उसे दहेज मे देते है) डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा जाड भिंगाचा चष्मा. केसांचा चपचपीत तेल लावून भांग पाडलेला. नयनिका प्रत्येक वेळेस नवीन टी-शर्ट, त्यावर वेगवेगळी चित्रे.. ही चित्रे मायबोली वरुन घ्यावीत अशी सूचना शिंप्यानी केली होती, जीन्स, कुठे तरी फाटलेली किंवा छाप लावलेली. केस कायमच पिंजारलेले. डोळ्यात काजळ. पायात किमान चार इंचाचे बूट. शिंप्यानी फक्त तीनच पात्रांसाठी ड्रेपरी डिझाईन करून दिली आणि पळून गेले सध्या निर्माते नवीन शिंपी शोधत आहेत. इच्छुकांनी संपर्क साधू नये.
|
Maudee
| |
| Thursday, June 08, 2006 - 1:45 am: |
| 
|
अपुर्व, पकडापकडीचा scene मस्त रंगवला आहेस. hhpv    रचना "वो तो उससे भी जादा जणमजली है" hims , प्रथमचा इतका वाईट अवतार का केला रे??
|
लोक्स... देव बडी दादीचा जावई आहे तर शुभ्रन देवचा छोटा भाई असून सीताचा देवरसा कसा? जाऊ दे... नाहीतरी नातेसंबंधातलं confusion कायमच असतं. चालू द्या. अपूर्व, रचना... 
|
Himscool
| |
| Thursday, June 08, 2006 - 2:07 am: |
| 
|
माउडी तो हिरो आहे ना सिरियलचा...
|
Psg
| |
| Thursday, June 08, 2006 - 4:14 am: |
| 
|
व्वा! बेष्ट करमणूक झाली.. चालूदे..
|
Apurv
| |
| Thursday, June 08, 2006 - 10:13 am: |
| 
|
ही सुद्धा हिंदी serial सारखी कितीही वाहत गेली तरी अजून चालूच आहे, लोक कसे काय बघतात देवजाणे?
|
Meenu
| |
| Thursday, June 08, 2006 - 10:33 am: |
| 
|
न. ना ची किंकाळी ऐकुन पेंगत असलेले कै. ना, सुरज आणी प्रथम प्रचंड दचकतात .... आणी एकदम आवाजाच्या दिशेनी धावतात ... ................... सीताची बेडरुम सी: मै कहां हुं ? (शुध्दिवर आल्यावर असच विचारायची पध्दत आहे .... ) और दे. मा. आप ....? दे. मा. : उठो बेटी तुम्हारेही बेडरुममे है हम ? (गुढपणे हवेत बघत) ये आवाज सुनी तुमने ? आज जो भयंकर संकट आने वाला था वो टल गया ? सी. : (रिंगण, कवड्या, मेणबत्त्या वगैरे पसारा बघुन) अरे काय हा पसारा करुन बसलाय तुम्ही आता आवरणार कोण हे सगळं ज्यांच घर घेतलय shooting साठी ते बोंबलतील आता दे. मा. : अरे जणमजली ये क्या बोल रही है तु (हळु आवाजात अगं तुझे dialogue बोल हे काय बोलतियेस) तु नही जाणती कितने बडे संकटसे बचाया है तुझे ईस पसारेने सी. : (अचानक आठवण येऊन ) और वो आवाज ... वो आवाज किसकी थी ... न. ना. न. ना. न. ना. मेरी प्यारी बेहना एकदम दरवाजाकडे धावत ... मधल्या सगळ्या पसार्यावरुन घसरता घसरता वाचते आणी दाराशी पोचते. दार उघडुन बाहेर पळते दे. मा: (उठायचा प्रयत्न करते ... ) आई आई आई गं मुंग्या आल्या पायाला हळु हळु उठुन चालत दरवाजातुन बाहेर जाते (क्रमश )
|
|
|