Ninavi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:50 am: |
| 
|
बघ अमेय, आता लहान म्हटलं तर आवडणार नाही तुला. त्या ' छोटासा प्रयत्न' वर टिचकी मार बघू. 
|
R-Joshi,Hem,Ninavi,Ameya भारावून गेलोय! बापू
|
ते सगळच निळं करून टाकलयं कूलनी म्हणून समजलं नाही पटकन
|
Chinnu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 11:27 am: |
| 
|
वैभवा झाड एकदम सच्ची कविता! बापु अतिशय उत्तम. कुल तुमचे असेच प्रयत्न उत्तरोत्तर वाचण्यास मिळावे!
|
मनःपूर्वक आभार दोस्तांनो .... गिरी ... सावकाश वाच ... काय घाई आहे ? कविता नीट वाचणेच महत्त्वाचे , हो ना ? निनावी ... चांगल्या कवितांची वाट पहायला लावून दमवण्यापेक्षा हे बरं ... नाही का ? बापू .... लक्षात आलं नसेल तुमच्या कदाचित .... लिहून गेला आहात तुम्ही लिहीता लिहीता किती सहजरित्या एक नितांत सुंदर कविता जणू आरंभापासून पूर्ततेपर्यंत फक्त एक क्षण सरला होता लक्षात आलं नसेल तुमच्या कदाचित .... तो एक क्षण कित्येक दिवस पुरेल आता पुन्हा पुन्हा वाचूनही थोडंसं उरेल आता अन अश्याच आणखी काही क्षणांसाठी मन क्षणोक्षणी झुरेल आता लक्षात आलं नसेल तुमच्या कदाचित .... ही एका खुल्या दिलाची दुसर्याला दाद आहे भावनेने भावनेला दिलेला प्रतिसाद आहे कवितेत माणूस शोधतो मी अजुनी माणसे वाचण्याचा खुळा नाद आहे
|
Chinnu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 10:16 pm: |
| 
|
वाह वैभवा. मान गये दोस्त!! क्या बात है!!
|
तो एक क्षण कित्येक दिवस पुरेल आता पुन्हा पुन्हा वाचूनही थोडंसं उरेल आता वैभव... अगदी मनातलं बोललास बापूंच्या कवितेबद्दल!
|
Meenu
| |
| Thursday, June 08, 2006 - 12:14 am: |
| 
|
वैभव अगदी सुंदर प्रतिक्रिया वैभव, तुझ्या प्रतिक्रियेलाही आज दाद द्यावी वाटले यातच तुझ्या प्रतिभेचे यश आहे साठले काव्याच्या प्रांतात तुम्ही दोघांनीही आज नवे शिखर गाठले..
|
Ninavi
| |
| Thursday, June 08, 2006 - 12:21 am: |
| 
|
क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष वैभव, मस्त रे. 
|
Jayavi
| |
| Thursday, June 08, 2006 - 12:48 am: |
| 
|
बापू, अ प्र ति म! बाकी काही शब्दच सुचत नाहियेत. वैभव, आता तुला काय प्रतिक्रिया द्यायची रे...... केवळ अशक्य आहेस तू! बापूच्या कवितेला दिलेली दाद...... मान गये उस्ताद! गिरी म्हणतो ते अगदी खरं आहे. तुझी एकेक कविता आत उतरेपर्यंत तुझ्या २-३ कविता आलेल्या असतात. निनावी...... आम्ही तर बाबा शरणागती स्विकारली बाई
|
क्रेडिट कार्ड .... अगदी खरं सांगायचं तर एके दिवशी मला ... माझ्या नवनव्या कवितांची तुम्ही केलेली प्रतीक्षा परत करायचीय ... प्रदर्शनाच्या हॉलवर तासनतास खोळंबून पायाला लागलेली रग परत करायचीय ... पण तरीही मला पाहताच ओळख नसूनही इतक्या प्रेमाने आलेलं ते हसू परत करायचंय ... त्या सुवासिनींच्या चेहेर्यांवरचं कौतूक अन त्या आड दडलेली रात्रीच्या स्वैपाकाची काळजी परत करायचीय ... त्या निष्पाप जीवांच्या डोळ्यांतून भरभरून वाहणारा कंटाळा परत करायचाय ... कार्यक्रम संपवून येताना मनभर जाणवत राहिलेला अदृष्य ऋणानुबंध परत करायचाय .. पण माझ्यासारख्या कफल्लक माणसाला हे कर्ज फेडणं जमणार नाहिये .. कधीच .. ह्या कवितांच्या रुपाने मी फक्त मिनिमम ड्यू अमाउंट भरतोय .... क्रेडिट कार्ड एक्स्पायर होवू नये म्हणून ... पावती देताय ना ?
|
Naadamay
| |
| Thursday, June 08, 2006 - 4:11 am: |
| 
|
वैभव, का परत करायचंय? असू देत की!
|
Naadamay
| |
| Thursday, June 08, 2006 - 4:15 am: |
| 
|
कोण तू अन का आलास तू माझ्या आयुष्यात नव्हती मला गरज तुझी मी होते सुखात तू येऊन फक्त निर्माण केलास एक भास सुखाच्या नव्या व्याख्येने जुनं केलंस भकास आता अशी गत झाल्ये मी उंबरठ्याची धनी जुनं सोडून बसले नवं भेटतच नाही माझे सगे सोयरे पाठ फिरवून वळले तुझ्या ध्यासाने मी त्यांना सहजीच विसरले जन्माच्या नात्यांपुढे मला तुझी पडली भूल तू दिसत नाहीसच, मी शोधत्ये मला अजून हात तुझा धरून वाटलं होईन मी सुखी पण सुख क्षणैक असतं हेच शिकले मी आता वाटतं सुख कधी नव्हतं नशीबात उंबरठाच सुख, हे गोंदवायचं मनात!
|
Jyotip
| |
| Thursday, June 08, 2006 - 4:42 am: |
| 
|
वैभव..मस्त लिहील आहेस उंबरठाच सुख, हे गोंदवायचं मनात! नादमय...सहि
|
Cool
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:19 am: |
| 
|
वैभव, बापुंच्या कवितेवरील प्रतिक्रिया मस्त क्रेडीट कार्ड कविता सुरेख
|
Meenu
| |
| Thursday, June 08, 2006 - 6:58 am: |
| 
|
धार कुठुन रे घेतोस करुन तु शब्दांना धार ? एकही जात नाही बघ केल्याविण मर्मावर वार ... प्यादही नाही जात परत रिकाम्या हातानी अलवार माझ्या भावनांवर करतं वार त्वेषानी भावनांचाही माझ्या वंश अश्वत्थामा खोल हळवी जखम नाही मृत्यु नाही मलम
|
Jiten
| |
| Thursday, June 08, 2006 - 7:01 am: |
| 
|
farach chaan aahe kavita... mast ,,,
|
वाह !!! मीनु मस्तच ... नादमय ... सुरेख !!!
|
Jyotip
| |
| Thursday, June 08, 2006 - 7:19 am: |
| 
|
मीनु शेवट अगदि great.........
|
मीनु जबरदस्त.. ग!!! वैभव, बापु...मस्त..!!!नादमय... छान..!!
|