|
Meenu
| |
| Tuesday, June 06, 2006 - 5:15 am: |
| 
|
पुजा सुंदर गं ...
|
पूजा क्या बात है. .. .. .. .. .. .. !!! मीनु अगदी अगदी.. !!!
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 8:21 am: |
| 
|
'' नव्हते कधी...'' नव्हते कधी तुझी मी, की मी तुझी न झाले.. जे अंतरात होते.. ओठावरी न आले.. नि:शब्द भावनांनी हितगुज साधले पण.. शब्दातले उसासे.. अश्रूत चिंब न्हाले.. भेटायचे बहाणे सारेच व्यर्थ होते.. नजरेतले इशारे..सांगून अर्थ गेले.. उमगून अर्थ सार्या अव्यक्त आर्जवांचे.. संकेत भावनांचे.. शब्दाविना समजले.. तरीही अबोल सार्या संवेदना परंतु.. माझ्या तुझ्या सुखाचे.. अजूनीच रिक्त प्याले.. जाणून या व्यथेला, देताच तू दुजोरा.. माझ्यातल्या मला मी.. विसरुन आज गेले..!! पूजा.. .. ..
|
Ninavi
| |
| Tuesday, June 06, 2006 - 9:26 am: |
| 
|
मीनू, काय झालं गं एकदम? पूजा, खास आहेत दोन्ही. 
|
Mmkarpe
| |
| Tuesday, June 06, 2006 - 11:28 am: |
| 
|
आई अन ईश्वर चुकुन ठेचाळता दुःख उफाळता कळवळतो आपण आपल्याही नकळत सर्वप्रथम त्यांनाच आठवतो आपण ऊत्स्फुर्तपणे निघतो स्वर अगं! आई गं! हे! ईश्वर! पाहिलंत! एकच आहेत ना! आई अन ईश्वर!
|
Chinnu
| |
| Tuesday, June 06, 2006 - 11:52 am: |
| 
|
good thinking कर्पे! पुजा सहियेत ग. मीनु, अतिशय सुंदर!!
|
झाड ....... झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहुन गेले वरवर भासे शांत शांतसे मुळांत वादळ राहुन गेले किती दिशांनी किती वादळे झाडाला उखडाया येती जपण्यासाठी पाती पाती शोधित गेले ओली माती खोलखोलवर पत्थर सारे झरे कधीचे आटुन गेले झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहुन गेले अजुन पुरेसे नाही जून उरले कुठले ऋतू अजून फांदी फांदी आतुरलेली अंगोपांगी यावे फुलुन श्रावण दुरुनी टाळुन गेला ऊन भेटुनी जाळुन गेले झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहुन गेले झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहुन गेले ......
|
कदाचित लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित, मी माळलेला जाईचा गजरा घेऊन गेलास तू, 'त्या' दिवशीचा, करंडक म्हणून, पण त्याला रातराणीचा गन्ध येत होता. लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित, डोंगरमाथ्यावर चिम्ब गवतांतून अनवाणी पायांनी आपण भटकलो, तळव्यांवर रेंगाळलेल्या हिरवाईला गुलाबी छटेचं अस्फुट अस्तर होतं. लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित, निरोप अखेरचा घेऊन तडक निघालास, वळणावर थबकून थोडं,मागे पाहिलंस, कोपर्यावरच्या स्थितप्रज्ञ अमलतासाचं एक फूल हताश, हलकेच गळलं होतं. बापू
|
Meenu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 1:33 am: |
| 
|
वा बापु सुंदर अगदि नेमकं
|
Giriraj
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:05 am: |
| 
|
आहा! वैभव!!!!!!!!!! बापू,कालच्या कार्यक्रमाईतकीच सुंदर कविता!
|
Giriraj
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:16 am: |
| 
|
वैभव,तू जितक्या वेगाने लिहितोस तितकं वाचतांनाही जीव दमतो.. आणि तुझ्या काही कविता अनुभवायच्याच राहून जातात.... हमखास आज वाचली!पण अजून कितितरी राहून गेल्यात.. तुझ्या तोंडूनच ऐकायच्या आहेत आता सगळ्या... सलाऽऽम यार! (ते एकदा बसायचं राहून जातय बघ कधीपासून!)
|
Naadamay
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:30 am: |
| 
|
वैभव, मीनू, पूजा, बापू कवितांचा `अगदी' पाऊस!
|
Zaad
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:31 am: |
| 
|
Vaibhav, apratim aahe kavita! BaapU, khoopach sundar!!
|
Cool
| |
| Wednesday, June 07, 2006 - 3:04 am: |
| 
|
बापु कविता आवडली म्हणुन आपला हा छोटासा प्रयत्न
|
Meenu, Giriraj, Naadmay,Zaad, Cool काही तासातच आलेल्या ह्या तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया आणि वाहवा! आपण तर सर्द होऊन गेलो यार!! बापू.
|
Vaibhav, झाड अगदी सच्ची कविता! बापू
|
R_joshi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 4:44 am: |
| 
|
पूजा, कर्पे, वैभव, बापू फारच छान कविता लिहिल्या आहेत.
|
Hems
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:36 am: |
| 
|
वैभव, अप्रतिम आहे " झाड... " ! बापू, मस्त!
|
Ninavi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:40 am: |
| 
|
वैभव, झाड अप्रतीम आहे. बापू, कदाचित खास. आपल्याला काय चांगल्या कविता वाचताना दमायला नाही बाबा होत. शर्यत लावू हवंतर, लिहीणारे आधी दमतात की आम्ही वाचणारे आधी दमतो. 
|
झाड सहीच आहे... बापू बर्याच दिवसांनी ? "कदाचित" मधे अगदी हवं ते उतरल्या सारखं वाटलं! कूल "छोटासा प्रयत्न" आहे कुठे?
|
|
|