Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » विनोदी साहित्य » कुछ अपने कुछ पराये... नवसिरियल STY » Archive through June 06, 2006 « Previous Next »

Ninavi
Friday, June 02, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

xxxx xxxx xxxx xxxx

Rachana_barve
Friday, June 02, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोड्या वेळाने ( background ला music चालू आहे आणि कॅमेरा गरगर सितेच्या आणि कैलाश्नाथांच्या भोवती फ़िरत आहे. सितेच्या हातातल्या फ़ुलावर कॅमेरा concetrate करतो. हात थोडासा हलतो. मुठ घट्ट आवळली जाते. सिता डोळे किलकिले करते.
ओ मा म्हणत ती हाताने कोपर पकडते. त्या हातावर एक लालबुंद ओरखाडा उठलेला असतो. कोणत्यातरी हिंस्त्र श्वापदाने नख मारल्यासारखे. सितेचे लक्ष त्या पांढर्‍या फ़ुलाकडे जाते दचकून ती ते टाकून देते. तिचे लक्ष ती काळी आकृती उभी असते तिथे जाते. तिची उत्सुकता तिला शांत बसू देत नाही. एकदा बेशुद्ध कैलाशनाथांकडे बघून ती उठते आणि ती काळी आकृती तिला दिसली होती तिकडे हलकेच जाते. बाकी बाग सुरेख असते पण हा Area मात्र वटवाघूळ, उंदीर, घुबड ह्यांनी भरलेला असतो. वेडीवाकडी वाढलेली झाडे आणि अचानक झालेला काळोख. सिता दबक्या पावलाने ती काट्याकुट्याने भरलेली वाट चालू लागते. रस्त्यावरच्या प्रत्येक झाडावर फ़ुली मारलेली असते. सिता अंगाभोअवती पदर लपेटून घेते. तिच्या पावलांच्या खाली मोडणार्‍या काट्यांचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर इतके सोडून बाकी शांतता पसरेलेली असते.
अचानक ती एका बंद कुंपणापाशी येते. पुर्ण बंद, वरपर्यंत वाढलेली झाडं. तिथून पलीकडे जायला जागाच नाही आणि त्या कुंपणापलीकडे तिला परत ती काळी आकृती दिसते. ति तिला ये म्हणून खुणावते आणि पुढे जाऊ लागते. सिता कुंपण गदागदा हलवून बघते. कस जाता येइल ह्याची वाट शोधत रहाते. इतक्यात
" क्या कर रही हो इधर तुम बहू? "
सिता दचकून मागे वळून बघते.
" मंगला भाबी? कुछ नही कुछ नही "
" इस मकाण के इस हिस्से मे आना मना है "
" sorry भाबी मालूम नही था. लेकिन वहा पे क्या है "
मंगला भाबी भयानक हसते. खूपवेळ
" तु अपणा काम कर छोरी. रसोई वगरा संभाल. और अपणे पती को भी. नही तो "
आणि मंगला भाबी परत खदा खदा हसते. सिता घाबरते आणि मागच्या पावली पळत सुटते. जोरात. मागे अजूनही मंगला भाबींच्या हसण्याचा आवाज येत असतो. तिच्या हातावरच्या ओरखड्यातून परत रक्त यायला लागते. पण ती थांबत नाही.
आणि नुकत्याच शुद्धीवर आलेल्या कैलाश्नाथाजवळ येते. आणि विचारते
" ये क्या हो रहा है पिताजी इधर? क्या हो रहा है " आणि ती रडू लागते.
" कुछ नही बेटी कल प्रथम के साथ स्वामीजींके पास जाना सब कुछ ठीक हो जायेगा. " कैलाशनाथ तिच्याकडे बघत सांगतात. इतक्यात तिला खिडकीत वरच्या मजल्यावर मंगला भाबी तिच्याचकडे बघताना दिसतात.
" पिताजी मंगला भाबी यहा " असे काहीसे बडबडत ती परत वर बघते आणि जोरात किंचाळते आणि बेशुद्ध पडते


Asami
Friday, June 02, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक episode च्या शेवटी कोणी बेशुद्ध नसेल तर ते post रद्दबातल धरले जावे

Deepanjali
Friday, June 02, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी ,
तो परेश आठवला .


Dha
Saturday, June 03, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा ह्या serial शी related १ अनुभव-
मी अगदी पहिल्या episode पसुन serial पहतेय (वाचतेय),काल झोपण्यापुर्वी latest episode वाचला आणि स्वप्नात मी सतत किंचाळून बेशुध्द पडत होते.


Jo_s
Saturday, June 03, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सिरियलचं नाव "शुध्द बेशूध्द" ठेवायच का?

Asami
Saturday, June 03, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ आता फ़क्त शिल्पाची कमी आहे इथे

Maudee
Monday, June 05, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

epsidode start
मंगल भाभि वरून बघत होत्या. त्याना कळलं की सिता तिच्याकडे बघता बघता काहीतरी म्हणाली आणि बेशुध्ह पडली. "काय झालं या मुलीला आता.आणि माझ्याकडे बघून काय बडबडत होती ती?"
तेवढ्यात मागून कसलातरी आवाज झाला म्हणुन तिने मागे वळून बघितले. तर बडी दादी जवळ जवळ पळतच येत होती. आणि सिता, सिता म्हणुन पुटपुटत होती. मं भाभीला जरा अश्चर्यच वाटले. भाभीने त्याना थांबवले आणि काय झाले असे विचारले.
ब.दा. "सिताला काय झाले?"
मं भाभी "का बरं?"
ब.दा."माझ्या ख़ोलीत हा चाकू येऊन पडला अचानक. त्याला थोडसं रक्त लागलेलं आहे. आणि माझा आतला आवाज असं सांगतो आहे की ते सिताचं आहे. कुठे आहे ती."
मं भाभीने त्याना वरूनच दख़वल की ख़ाली सिता आणि कैलाश पडले आहेत.
त्या दोघिनिही वरूनच बघितले की विठ्ठल आणि बाकी काही नोकर त्या दोघानाही घरात घेऊन येत होते.

दादि ते बघतच होती तेव्हा तिला दिसले की दूर एक काळी आक्रुती उभी आहे. दादीला भिती वाटू लागली. भितीने त्यांचे दात वाजू लागले. मं भाभीने विचारले काय झाले.त्यानी तिला हातानीच दाख़वले. पण तिला काही तो साया दिसेना.
मं भाभी(मनात)"बुढीया सठीया गयि है शायद.इतनी बुढी हो गयी फ़िर भी उसे इतनी दूर का दिख़ रहा है. और मुझे नही दिख़ रहा है.
कही सिताने तो कुछ जादू नही चलाया दादी पर??"
ती असा विचार करतच होती तर तेवढ्यात दादि पडलीच ख़ाली चकर येऊन.
अनायसे doctor आलेच होते घरी. दादीलाही त्यांकडेच सोपवले.

doctor "सितावर हला झालेला आहे. कशानी झालाय हे नाहि सांगू शकत. पण तिच्या जख़मेत विष आहे असं मला वाटत आहे.तिला ताबडतोब hospital मध्ये हलवावं लागेल. "

सिताला hospital मध्ये घेऊन जाण्यात आलं. तिच्या बरोबर प्रथम आणि नयनिका होते.

ते गेले आणि तेवढ्यात विठ्ठल आला.त्याच्या हातात ते लाल झालेलं फ़ुल होतं. मगाशी ते सितापाशी होतं तो विसरुन गेलेला तेव्हा द्यायचं त्यानी ते फ़ुल रामेश्वर कडे दिलं. रामेशव्रनी ते फ़ुल बघितलं आणि त्यांची बोबडीच वळून गेली. आणि ते चक्कर येऊन पडले.

विठ्ठल ने ते फ़ुल दिले. त्याने पाहीले राम चक्कर येऊन पडलेले. पण त्याने काहीच केले नाही. तो हसत हसत तेथून निघून गेला. बडी मां ते बघत होत्या. त्याना कळले की हा विठ्ठल आपला नाही. काहीतरी भानगड आहे.
कोण आलं होतं विठ्ठलच्या रुपात??

episode समाप्त



Dha
Monday, June 05, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा maudi ! क्या बात है!

Mrdmahesh
Monday, June 05, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडे जोरात चाल्लंय.. चालूदेत.. :-)

Rupali_rahul
Monday, June 05, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी उद्यापासुन ती हाजमोलाची गोळि पण ठेव भडंग बरोबर
सगळे अगदी सहीच सुटलेत...


Maudee
Monday, June 05, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanx ढ, महेश.

रुपाली अगदी बरोबर. गजालीवर्‍च्या भडंगावरूनच मी भडंग ठेवले तिथे.
उद्या हाजमोलाची गोळी पण नक्की ठेवेन.


Apurv
Monday, June 05, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहील्यांदीच लिहीत आहे, कृपया न आवडल्यास क्षमा करा.


बडी मां विट्ठल्च्या मागे जाउ लागतात, तो एका दारा आड वळतो आणि नाहीसा
होतो, इतक्यात मागे kitchen मध्ये भांडे पडल्याचा आवाज येतो, त्या मागे वळून
बघतात तर विट्ठल असतो, आता बडी मां बेशुद्ध होउन पडतात.

विट्ठल बिचारा खूप वैतागतो, एवढ्या मोठ्या घरात, प्रत्येकाला त्याच्या रूम
मध्ये उचलून नेणे काही खायचे काम नाही. त्यामूळे सगळ्याना तो hall मध्येच
झोपवून ठेवतो,त्यांच्या डोक्याशी तो त्यांच्या नावाची पाटी ठेवतो,
बाकीच्या लोकांच्या नावाची एक एक पाटी करून तो त्यांच्यासाठीसुद्धा जागा
तयार करतो. मग एक मोठी पाटी लावतो, उगाचच इकडे तिकडे बेशुद्ध पडू नका
तुमच्या नावच्या पाटी खालीच बेशुद्ध पडा.

मंगला भाभी येतात, विट्ठल च्या पाट्या बघून impress होतात, स्वता:च्या नावाची पाटी
सितेच्या बाजुनी हलवून रामेश्वर आणि प्रथम च्या मध्ये ठेवतात. अचानक त्यांची नजर
शेवटच्या पाटी कडे जाते आणि त्यान्चे डोळे मोठे होतात, त्या पाटीवर लिहिले असते, फूल, आणि
तेच फूल तिकडे पडलेले असते.

न राहून त्या फूला कडे वळतात, भीत भीत त्या फूलाल हात लावतात, आता आपण बेशुद्ध
पडणार त्यामूळे स्वता:च्या जागेवर धावत जाणार तोच त्या कोणत्यातरी अदभूत बलाने ओढल्या
जातात आणि त्याच काळोख्या जागी पोहचतात जिकडे सिता गेली होती.


इकडे प्रथम ला सिते बरोबर सोडून नयनिक hospital मधून घरी येते,
नयनिका: अर्रे वा सगळे आधीच बेशुद्ध, चला सूरजला शोधूया
इतक्यात फोन वाजतो, नयनिका फोन घेते,
नयनिका: हेल्लो
आवाज्: सिता कैसी है?
नयनिका: आप कौन बात कर रहे हो?
आवाज: (मोठ्याने हसतो) तुम्हारी प्यारी बहेन कैसी है?
नयनिका: ये क्या मजाक है, नाम क्युं नही बताते?
आवाज्: खिडकीसे बाहर देखो
नयनिका मुझे कुछ नही दिखाइ दे रहा
आवाज अंधी हो क्या, ठीक से देखो
नयनिका परत बाहेर बघते, तिला मंगला भाभी आणि बाजुला काला साया दिसतो, ती किंचाळते
आणि तिच्या जागेवर जाउन बेशुद्ध पडते.

एपिसोड सम्पतो.


Chinnu
Monday, June 05, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय अफ़लातुन चाललय हे. सही! :-)

Jyotip
Tuesday, June 06, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच मस्त चालल आहे...कोणी तरी..प्रथमची बचपन की सहेली आणा ना..म्हणजे प्रथम आणी सीता गैरसमजात काही भाग जातील.....

Himscool
Tuesday, June 06, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिरियलचे नाव २ शुद्धी ठेवायला हवे...प्रत्येकाला जण किमान दोनदा तरी बेशुद्ध पाडून झालेले आहे..:-)

Shraddhak
Tuesday, June 06, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाच्या नावाच्या पाट्या, अज्ञात आवाजाचा फोन... अपूर्व!

Shraddhak
Tuesday, June 06, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या एपिसोडमध्ये नयनिका बरोबर तिच्या जागेवर बेशुद्ध पडली होती. पण आता गूढरीत्या ती त्याच खिडकीखाली बेशुद्ध पडली आहे; जिथून तिने मंगलाभाभी व काला साया पाहिलेला असतो.
विठ्ठल चरफ़डत नयनिकाला पण तिच्या नावाच्या पाटीखाली आणून ठेवतो. एवढ्या लोकांना उचलून आणून त्याची पाठ दुखायला लागली आहे.

विठ्ठल : आयाया... मेलो. चार मजली हवेलीच्या कुठल्याबी फ़्लोअरवर कुणीबी बेशुद्ध पडतंय आणि मी आपला उचलून आणतोय. अरे मला काही जीव हाय की न्हाई? आयडिया... माझ्या नावाची पाटी हायेच हिथं. आता मीच जाऊन पडतो तिथं बेशुद्ध झाल्यावाणी आन उठायचाच न्हाई.

तो आपल्या पाटीकडे जाऊ लागतो तेवढ्यात ' पोस्टमन ' अशी हाक ऐकू येते. विठ्ठल चरफ़डत पत्र घ्यायला जातो. तार असते. ती वाचत असताना त्याचा चेहरा आनंदाने उजळतो. तो बेशुद्ध पडलेल्यांच्या ग्रुपच्या मधोमध उभा राहून मोठ्याने म्हणतो....

विठठल : देवकी मां आ रही है.

सगळे बेशुद्ध ताडकन उठून बसतात. सीताही हॉस्पिटलमधून परत येत असते. तीही दरवाजातून धावत येते.
सीता : हे भगवान अब इस कहानीमे देवकी मां भी है? और अगर मां आ रही है तो देव उनके साथ क्यू नही आ रहा है?
बडी मा : जनमजली पूरी बात सुना कर. देवकी मां का नाम देवकी है... जैसे कृष्णभगवानकी मां का था. देवकी. और उन्होने सन्यास लिया है इसलिये हम उन्हे देवकी मा बुलाते है....
( देवाकडे वळून) हे भगवान... तेरा लाख लाख शुकर है. अब देवकी मा आ रही है. अब इस घर से मुसीबत टल जायेगी.
सीता : मुझे एक पल के लिये लगा जैसे देवसे मिल पाऊंगी मै अब और साये का रहस्य पता चल जायेगा मुझे.... पर अब क्या करू? अर्रे... ( एकदम आठवून) बडी दादी तो कोमासे बाहर आ गई थी कुछ देर के लिये... उन्ही से पूछती हू...
( पळत त्यांच्या खोलीत जाते. बडी दादी पुन्हा कोमात गेलेल्या आहेत.
सीता : मेलं थोडा वेळ थांबायला काय झालं होतं? मी सायाबद्दल विचारायला आले की गेलीच म्हातारी कोमात.
बडी दादी : पुन्हा आलीस का तू? तू काही मला सुखाने कोमात राहू द्यायची नाहीस. पण डायरेक्टरच्या योजनेनुसार मी तुला नाही सांगायचंय गं सायाचं रहस्य... आणि तुला कोण सांगेल ते रहस्य हे अजून ठरायचं आहे. तेव्हा जरा वाट पहा. Have patience!

दुसरा दिवस. घरभर फ़ुलांच्या माळा लावलेल्या आहेत. धूप जळत आहे. घरातले लोक ethnic wear घालून तयार होऊन बसले आहेत.

संथ चालीने देवकीमां प्रवेश करतात. एकदम अंधार होतो. आणि serial च्या title song चे शब्द ऐकू येतात.
" दीवारोंपर.... दिखते है साये.
कुछ है अपने, कुछ है पराये.
ये खामोशियां हवेली पे छाये.
यहां मेरा जी घबराये... जी घबराये.
सायेऽऽऽ.... अपने पराये...
अपने पराये.... "

देवकी मां करारी नजरेने पहिल्या मजल्याकडे बघतात.
देवकीमां : ओह, तुम? मेरे जाते ही तुमने यहां फिर आने की हिम्मत की? आखिर क्या चाहती हो तुम?
अज्ञात female आवाज : मै क्या चाहती हू, तुम्हे मालूम है देवकी... और अब तुम्हारे डराने धमकानेसे भी मै यहां से जानेवाली नही. साठ साल पहले तुमने निकाला था मुझे इस घर से.... अब नही जाऊंगी. मुझे जो चाहिये वो लिये बिना नही जाऊंगी.

एकदम प्रकाश पडतो. देवकीमां सोडून कुणीही तो आवाज ऐकलेला नाहीये सीता सोडून. ती देवकीमांच्या पाया पडायला जाते.
सीता : किस लडकीका है वो साया देवकी मा?

देवकी मा चमकतात.
देवकीमा : तो बडी दादीके अलावा तुम वो अकेली शख्स हो जो उसकी आवाज सुन सकती है.
सीता : कौन है वो?
देवकीमा : तुम्हारे पास तो जरा भी patience नही है सीता. अभी तो सिर्फ़ लडकी की आवाज सुनाई दी है... आगे की कहानी तो अबतक लिखी ही नही गई है.

....पुन्हा " दीवारोंपर.... " गाण्याचे सूर खूप लांबून आल्यासारखे ऐकू येतात. सीता पुन्हा भारल्यासारखी मुख्य दरवाजातून बाहेर पडू पाहते.

देवकीमा : Oh I see ... तो तुम भी अब ' देवकी व्हिला ' की तरफ़ जाने लगी हो.
सीता : क्यू नही जा सकती? वो भी तो हमारी हवेली का ही एक हिस्सा है ना?
देवकीमा : इस गलतफहमीमे ना रहना... देवकी व्हिला इस हवेलीका हिस्सा कभी भी नही था. इन्ही लोगो ने उसको हवेलीका हिस्सा बनाना चाहा और सायेकी मुसीबत मोल ली.... देवकी व्हिला का मालिक है देव... उसे भी इन लोगोंने..........
सीता : क्या किया? मार डाला???? बताईये ना देवकी मां... क्या दस साल पहले जब देव और चंदना बडी दादी से मिलने आये तब कुछ हादसा हुआ? क्या देव अब इस दुनियामे....
देवकी मा : बहोत सवाल एकसाथ पूछती हो तुम? दम लागत नाही का तुला? आत्ताच मी हिमालयातून आलेय. माझ्या रूममधला हीटर चालू करून ये. मी जरा विश्रांती घेईन म्हणते.

सीता हीटर चालू करायला जाते. तिथे कुणीतरी देवकी मांचा फोटो जमिनीवर फ़ेकून दिलेला असतो. व त्याच्या शेजारी एक कुंकवाने माखलेला पिवळा गुलाब ठेवलेला असतो. बाजूला एक चिठ्ठी पडलेली असते.

' आज बाजारात पांढरा गुलाब नाही मिळाला. तेव्हा पिवळा गुलाब गोड मानून घ्यावा. '
सीता ते बघते... आणि.....
खिडकीकडे बघून गूढ हास्य करते.

एपिसोड समाप्त.


Jyotip
Tuesday, June 06, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बाजारात पांढरा गुलाब नाही मिळाला. तेव्हा पिवळा गुलाब गोड मानून घ्यावा. '
श्र... सही आणी ते देव कि मा.. लई भरी


Maudee
Tuesday, June 06, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

episode start
नयनिका बेशुध्ह पडली होती. पण ती आता काहीतरी पुटपुटायला लागली होती. बेशुद्ध असतानाच. तिथेच बडी मां आणि मं भाभीचं काहीतरी गुफ़्तगू चालं होतं. त्यानी बघितल की नयनिका काहीतरी पुटपुटते आहे. जवळ जाऊन त्यानी ऐकण्याचा प्रयत्न केला.
न."सुरज सुरज...."
मं भाभी "देख़ा बडी मां वो सिता तो हमारे घर मे घूस ही चुकी है और इसकी तैयारी हो रही है. मै कहती थी न ये छोटे लोग होते ही ऐसे है. "
ब. मां "ह्म्म इसका कुछ करना पडेगा."
मं भाभी "जल्दीही कुछ करो बडी मां. नही तो ये सुरजपर जादू चलायेगी. कलही मैने देख़ था एक दुसरे को देख़के smile देते हुए."
ब.मा " smile ?? इसके हसती सुरत को रोती मे बदल दून्गी मै."
ब.मां (मनात)"पण तेवढ्यात त्याना आठवलं अरे आपण पण परवा रिहान रिहान करत होतो. हिच्याबरोबर पण आपण तेच करावं का जे आपल्या बरोबर झालय?"
(मोठ्याने) "ते जाऊदे ती नंतरची गोष्ट आहे. आधी ही शुध्हिवर तर येऊदे."
तेवढ्यात तिथे प्रथम आला. नयनिकाला बेशुध्ह पडलेलं बघून त्याला धक्काच बसला.
प्रथम"इसको क्या हुआ अभी. ये तो महमान है.कही इसने भी तो काला साया नहि देख़ा."
मं भाभी "हा प्रथम बेटा महमान है. और मेहमान घरवाले बननेसे पहले उन्हे उनके घर भेजा तो अछा होगा."
प्रथमला काहीच समजत नाही. पण बडी मांच अडवतात यावेळी. "नाही राहूदे तिला हवे तितके दिवस"

सिताने देवकी मांच्या आरामाची सर्व व्यवस्था केली. आणि ती आपल्या room मध्ये गेली.
तिथे गेल्यावर तिला त्या फोटोची आठवण झाली. तिला एकदम वाटले की हा फोटोच घेऊन जवा देवकी मांकडे आणि दादीला जे सांगायचं होतं ते त्यानाच विचारावं.
म्हणुन मग तिने तिची अलमारी उघडली.
तर तिथे तो फोटो नव्हताच. फोटोच्या जागी होतं एक फ़ुल लाल सिंदूरने माख़लेलं आणि एक पत्र.
तिने ते पत्र उघडले.
पत्राचा मजकूर असा होता.
"अगर ये फोटो चाहीये तो चुपचाप देवकी विल्ला मे आजाओ"

ते पत्र वाचल्यावर तिला समजेना की देवकी मां ला हे सर्व सांगाव की नाही. पण त्या तर विश्रान्ती घेत आहेत. शेवटी ती एकटीच देवकी विला कडे चालू लागली.

कोण वाट बघत होतं तिची तिथे??
episode समाप्त






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators