|
Meenu
| |
| Monday, June 05, 2006 - 4:59 am: |
| 
|
वैभव अप्रतीम रे ...
|
वैभव, वैशालि.. खासच आहेत जयावि, श्रीराम छान आहेत
|
Kashi
| |
| Monday, June 05, 2006 - 5:49 am: |
| 
|
lopa...kay bhannat kavita aahe..farach sundar..thet manala bhidte
|
Naadamay
| |
| Monday, June 05, 2006 - 6:53 am: |
| 
|
झाड, लोपा, जया, श्रीराम, वैभव सर्वच छान! -------------------------------- सांग सख्या तुज काय हवे काय नसे आता तुजकडे मी तन मन अर्पण केले मी माझे सर्वस्व तुला दिले सामावून तुझ्यातच गेले मीच न राहिले, काय माझे! एकरूप झाले तर मग का नाही ती मला हुरहूर आहे जर मी संतुष्ट तर तू का असा झालास अधीर काय तरी आता तू शोधिसी काय कामना पुरली नाही का वणवण असा फिरसी बघ जरा मी तुझी सावली प्रेम आपुले युगायुगांचे तुझे हृदय घरटे माझे जाणलेस जर मला खरे समाधानही हो ईल तुझे
|
Chinnu
| |
| Monday, June 05, 2006 - 7:37 am: |
| 
|
वा वा वा, सर्वच छान लिहत आहेत. क्षिप्रा तुझा पावुस वेड लावुन गेला ग. लोपा व्यथा खुप व्यवस्थित मांडली आहेस. वैभवा, कोण रे ती? झाड, नादमय, श्रिराम, जया मस्त.
|
Shyamli
| |
| Monday, June 05, 2006 - 8:03 am: |
| 
|
आणि नंतर त्या रुसलेल्या पण सजलेल्या रुपड्याला विजयी समाधानाने काजळतीट करण्यात मग्न होते>>> झाड...किति गोड लिहिलय हे... आवडल.....
|
Shyamli
| |
| Monday, June 05, 2006 - 8:05 am: |
| 
|
प्रीत मृगजळ...प्रीत हळहळ...कळली ना प्रीती जया अगदि अगदि... झेप घेणे उंचीकडे सवय राहीली नाही...मनातल्या मनात सराव करुनही उडायला जमले नाही,.... क्या बात है वैशाली भूतकाळाला भविष्यकाळाने भागताना ?>>> कसं सुचत या माणसाला.... तू तिथे अन् मी इथे>>>... छान नादमय.... सहिच
|
Lampan
| |
| Monday, June 05, 2006 - 8:18 am: |
| 
|
मस्त आहेत सगळ्यांच्या कविता ... थक्क करणारी प्रतिभा ;-)
|
धन्यवाद मंडळी!!! " राहु दे करील तोनंतर " झाड अगदी...!!! तु तीथे मी इथे...श्री.. " डोळ्यांनी गातांना " वैभव..मस्त.. मलाही चिनु सारखाच प्रश्न पडलाय..!! " जाणलेस जर मला खरे... " नादमय... सुंदर!!!
|
Zaad
| |
| Monday, June 05, 2006 - 8:45 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी! लोपा, जयवी, नादमय खूपच छान!!
|
Mruda
| |
| Monday, June 05, 2006 - 8:53 am: |
| 
|
कुणा-कुणाची नावं लिहू..? सगळ्यांनीच फ़ार मस्त लिहीलं आहे..... आनंद सगळीच गडबड, सारखीच धडपड आनंद शोधायचा तरी केव्हा..? फ़ुटतात काळाला दु:खांचेच कोंब आनंद पेरायचा कसा तेव्हा..? सारखं दु:खच भोगत राहीलं तर आनंद उपभोगायचा केव्हा..? अंतर विश्वात विचारांच काहूर आनंद उमजेल कसा तेव्हा..? मनाची बंद कवाडं उघडून आकाशी झेपावू जेव्हा आनंद रुजेल, आनंद फ़ुलेल आनंद घ्यायला शिकू तेव्हा.... आनंदच व्हायला शिकू तेव्हा.... +++++++++++++++++++++++++++++
|
Ninavi
| |
| Monday, June 05, 2006 - 9:09 am: |
| 
|
व्वा!! सुंदर. क्षिप्रा, श्रीराम, पावसाळा सुरू झाला हे तुमच्यामुळे कळलं. लोपा, मस्त. मस्त. जया, मृदा, वैभव, नादमय, खास. झाड, अप्रतीम. फारच आवडली. सुंदर.
|
फ़ुटतात काळाला दुख्:चे कोंब... आनंद पेरायचा केव्हा...!!!!! काय लिहु...!!!प्रश्न ही छान आणि उत्तरही... निनावि... thank you!!!
|
क्षिप्रा झकासच! झाड अरे तुझ्या बरोबर बाकीच्यांना ही आंघोळ घालतोस की लोपा... शेवटचं वाक्य खरंच मस्तय खूप... "हमखास" खास आहे नेहमीसारखीच जोशीसाहेब
|
Dineshvs
| |
| Monday, June 05, 2006 - 12:43 pm: |
| 
|
लोपा, कुणीतरी जमिनीवर असतं म्हणुनच आकाशाला अर्थ असतो. हो ना ?
|
Chinnu
| |
| Monday, June 05, 2006 - 4:16 pm: |
| 
|
वाह दिनेश, काय बोललात. भिडुन गेलन मनाला अगदी!
|
Zaad
| |
| Tuesday, June 06, 2006 - 1:22 am: |
| 
|
Ninavi, thanx!! Ameya.... !!
|
Meenu
| |
| Tuesday, June 06, 2006 - 4:56 am: |
| 
|
काय कसं काय ? मी अगदी मजेत आहे दोन वेळा पोटभर खायला आहे कपाट भरुन कपडा ल्यायला आहे मी अगदी मजेत आहे मालकिचं घरं आहे डोक्यावर छप्पर आहे मी अगदी मजेत आहे सज्जनसा नवरा आहे मुलगा छान हसरा आहे मी अगदी मजेत आहे ओठांना कृत्रिम का असेना रंग आहे भकासपणा लपवायला काजळाची रेघ आहे मी अगदी मजेत आहे मी अगदी मजेत आहे
|
Jayavi
| |
| Tuesday, June 06, 2006 - 4:58 am: |
| 
|
मनापासून आभार हो मंडळी जेष्ठ कवितांनी चांगलाच दरवळलाय एकसे एक सुरेख कविता आहेत सगळ्यांच्या!
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 5:12 am: |
| 
|
''हल्ली ...'' हल्ली तुझं माझ्याशी पूर्वीसारखं पटत नाही.. खोल मनात दाटून येतं पण.. शब्द ओठी फुटत नाही.. भेट होते स्तब्ध मुकी भाव मात्र उमटत नाही.. तुझ्या गप्प राहण्यामागचं कोडं काही सुटत नाही.. निसटलेल्या क्षणांमधलं वादळ पुन्हा उठत नाही.. आठवणींची झुळुकसुद्धा श्वासामध्ये भेटत नाही.. पुन्हा पुन्हा पारायणं तरी पापणी मिटत नाही.. सरलं सारं.. कळतय तरी वाट पाहून विटत नाही.. तुझं नक्षत्रांचं देणं काही केल्या फिटत नाही.. निदान या जन्मीतरी.. फिटेल असं वाटत नाही...!! पूजा...
|
|
|