|
Meenu
| |
| Monday, June 05, 2006 - 12:05 am: |
| 
|
अरे वा ईकडे पावसाचा छान effect दिसतोय..
|
Sakhii
| |
| Monday, June 05, 2006 - 12:46 am: |
| 
|
वैभव...खूपच छान!! स्वरूप, क्षिप्रा....सुन्दर कविता...लिहित रहा!
|
Jyotip
| |
| Monday, June 05, 2006 - 12:54 am: |
| 
|
स्वरुप, क्षिप्रा मस्त.... आणि सग़ळ्यांची आभारी आहे
|
व्वा क्षिप्रा! वाळवंटातही पावसाचा प्रत्यय आला, तुझी कविता वाचुन -चिंगी
|
Zaad
| |
| Monday, June 05, 2006 - 2:39 am: |
| 
|
आंघोळीला नाही नाही म्हणणार्या लहान मुलाप्रमाणे शब्द कागदावर उतरायला नको नको म्हणतात तेव्हा मी आईप्रमाणे मिनतवार्या करू लागतो. आई जशी मुलाला खाऊ चॉकलेट किंवा अजून कसलं आमिष दाखवते, तसं मी शब्दांना प्रसिद्धीचं आमिष दाखवतो किंवा आई जशी मुलाला 'घाणेरडा-घाणेरडा' म्हणून चिडवते तसं मी स्वत:ला स्वत्:च्या सिद्धहस्ततेविषयी डिवचत राहतो किंवा कधी (अंतिम उपाय म्हणून) आई डोळ्यांत पाणी आणून थंडपणे मुलाकडे पाहत राहते तेव्हा मूल निमूटपणे न्हाणीघरात जातंच जातं तसंच मीही डोळे मिटून घेतो क्षणभर... मूल रडू आरडू लागलं तरी आई आंघोळ घालतेच आणि नंतर त्या रुसलेल्या पण सजलेल्या रुपड्याला विजयी समाधानाने काजळतीट करण्यात मग्न होते तसा मी कवितेखाली माझी सही कोरण्यात दंग होतो! परंतु कधी आंघोळीला नाही नाही म्हणणार्या लहान मुलाप्रमाणे शब्द कागदावर उतरायला नको नको म्हणतात तेव्हा वडिलांच्या शांत-कोरड्या-आळशी-समजूतदार आवाजात मी इतकंच म्हणतो, "राहू दे करील तो नंतर!!!"
|
वाह ... झाड मस्त आहे ही ... क्षिप्रा ... पुनरागमन जोरात आहे ....
|
Jayavi
| |
| Monday, June 05, 2006 - 2:47 am: |
| 
|
क्षिप्रा,खूपच सुरेख! चिंब भिजवलंस अगदी! झाड, मस्त रे!
|
Jayavi
| |
| Monday, June 05, 2006 - 2:51 am: |
| 
|
प्रीत प्रीत हुरहुर प्रीत काहूर हरखली प्रीती प्रीत आठव, प्रीत आर्जव मोहरली प्रीती प्रीत हसरी प्रीत दुखरी बहरली प्रीती प्रीत वेदना प्रीत सांत्वना रुजली ही प्रीती प्रीत कातळ प्रीत वादळ शहारली प्रीती प्रीत अपेक्षा प्रीत उपेक्षा शहारली प्रीती प्रीत मृगजळ प्रीत हळहळ कळली ना प्रीती
|
सुवर्णमध्य तुझी झेप सुर्याकडे आणि मला ओढ सावलीची... तुझे डोळे... उंच कड्यावर मला ओढ माझ्या हिरव्या डोंगरमाथ्याची.. तुला हवे सारे आकाश.. कवेत मला माझी धरती माझ्या पुरती... झेप घ्यावी तीथुन क्षणांपुरती.., पंख असावे आकाशी आणि पाय जमिनीवरती मग एक सुवर्णमध्य काढला आपण... बांधले घरटे झाडावरती.... तिथुन तु गाठतोस रोज नवे आकाश, वाट पाहते मी तुझी जेवणासाठी दुपारी.. वेळेवर येत नाहिस आता तरी मी काही फ़ार मनावर घेत नाही.. घर आवरणे,फ़रशी पुसणे,भांडी घासणे.. मी कुठे कमी पडत नाही..! साग्रसंगीत जेवण, संसाराची ठेवण आता मी सुबक ठेवते... तुझ्यासाठी घरटे सजवुन दाणापाणी हवे ते आणुन देते... तु केव्हाही येउ शकतो, रिकामे घरटे पाहुन परतु शकतो.. म्हणुन मी वाट बघत बसते.. काल तुझा मोबाईल विसरलास.. मी देण्यासाठी... तुझ्यामागे झेपावण्याचा प्रयत्न केला भरारी तर दुर.. मला उडणे सुध्दा जमले नाही..!! झेप घेणे उंचीकडे सवय राहीली नाही मनातल्या मनात सराव करुनही उडायला जमले नाही, practical difficulties वेगळ्या असतात.. कळणार नाही तुला म्हणायचास ना तु.. किती खर आहे.. उडण्याचे स्वप्न बघुन उडता येत नाही पण... पंख आहेत हे विसरुन जगताही येत नाही...!!!
|
जया.. प्रीत कातळ प्रीत वादळ... छान आहे ग...!!!
|
Jayavi
| |
| Monday, June 05, 2006 - 3:29 am: |
| 
|
लोपा......... Terrific!......... Ultimate! किती सुरेख लिहीलं आहेस!पंख आहेत हे विसरुन जगताही येत नाही...... जबरदस्त! कौतुकाला शब्द अपुरे पडताहेत गं!
|
Meenu
| |
| Monday, June 05, 2006 - 3:47 am: |
| 
|
लोपा सुंदर ..... फार सुंदर मांडल आहेस .. zaad मस्तच ...
|
जयावी ... शेवटचं कडवं खास आहे .... लोपा ... सुंदर ... हमखास !!! एरवी छान गायचीच ती ... पण त्या निशःब्द संध्याकाळी गुलजारचं " मेरा कुछ सामान " फार सुंदर गायली ती ... आमच्यामधल्या एकनएक क्षणांला दोन ने भागत एक एक शब्द जिवंत केला तिने ... शेवटी ... " मैं भी वहीं सो जाऊंगी " म्हणून नजर फिरवली अन गाणं थांबलं .... तुम्ही अनुभवलंय कुणाला डोळ्यांनी गाताना ? भूतकाळाला भविष्यकाळाने भागताना ? नकाच प्रयत्न करू ... फक्त शांतता पाझरते अन बाकी शून्य उरते ... हमखास !!!
|
Smi_dod
| |
| Monday, June 05, 2006 - 3:50 am: |
| 
|
वा...लोपा मस्त.. छान लिहितेस तु...
|
वैभव, लोपा, झाड, जयावी एकाहुन एक तुम्ही..
|
Shriramb
| |
| Monday, June 05, 2006 - 4:01 am: |
| 
|
वर्षती बेभान धारा, मोर नाचू लागले उमलल्या जास्वंद जाई, रान बहरू लागले मेघ काळे गर्जती अन् वीज गोरी पेटते तू तिथे अन् मी इथे मेघमाला काळभोरी अंबराला ग्रासते कोणती बेनाम हुरहुर अंतराला त्रासते मेघ होती मोकळे पण, हृदय कैसे हो रिते? तू तिथे अन् मी इथे चिंब भिजल्या मन्मथाला गार वारा छेडतो साजणी तुझिया सयेचे थेंब नयनी आणतो ये अता ये वायुवेगे, बिलग मजला चारुते तू तिथे अन् मी इथे ~ श्रीराम
|
Princess
| |
| Monday, June 05, 2006 - 4:34 am: |
| 
|
लोपा, कित्ती छान लिहिलेस. खरच, कौतुक कसे करावे तेच समजत नाहीये
|
Zaad
| |
| Monday, June 05, 2006 - 4:42 am: |
| 
|
वैभव,अप्रतिम आहे कविता. कालच 'मेरा कुछ सामान' ऐकलं....
|
Zaad
| |
| Monday, June 05, 2006 - 4:50 am: |
| 
|
वैभव,कालच मित्राशी वाद घातला... गाणं नुसत्या डोळ्यांनी गाता येतं यावर... वेल, गाणं वेगळं होतं. एका गाण्याचं चित्रिकरण कसं असावं यावर चर्चा चालू होती. आणि आज तुझी ही कविता!! काय मस्त योगायोग आहे!!!
|
Maudee
| |
| Monday, June 05, 2006 - 4:51 am: |
| 
|
झाड, लोपा, वैभव आणि सर्वच अप्रतीम!!!
|
|
|