|
शब्दवैभव सहीच.. श्यामली म्हणली तसे सखी मंद पण आठवले. `तेरे खुशबू` तर ग्रेटच आहे. माझी सर्वात आवडती नज्म!!
|
Deemdu
| |
| Friday, June 02, 2006 - 2:58 am: |
| 
|
वैभव मखमलीच्या पायघड्यांवरुन मी जाते उतरून मनाच्या कोपर्यात जिथे कोणालाही पोहोचण शक्य नसत तिथे भरुन राहीलेली असते फक्त एक जाणिव सखी ......... असं काहीसं वाटलं बडे मेतकुटासाठी तु आपल्या निनावी ला अस करतेस????? शेम शेम, निनावी मला पाठवुन दे ग आता ते घरच मेतकुट
|
Naadamay
| |
| Friday, June 02, 2006 - 4:11 am: |
| 
|
सूर्य उगवे अंधारातून उठायला हवे फुले, दागिने, वधुवसने... सजायला हवे खेळवयाला दूर मागुती सोडायला हवे पाऊस आला ग्रीष्मानंतर भिजायला हवे लाभे अमृत व्याकुळ मना सेवायला हवे गुण सख्याचे नाव सख्याचे पुजायला हवे साजण आला दारी सखये निघायला हवे........
|
Soultrip
| |
| Friday, June 02, 2006 - 5:03 am: |
| 
|
Boss आला cubicle मधे, .. थोडं काम करायला हवे!!! --- दिवा घे रे
|
Jyotip
| |
| Friday, June 02, 2006 - 5:42 am: |
| 
|
सगळे म्हणतात, विसरण सोप असत प्रयत्न केला तर.. तो दिवस जेव्हा आपली पहिली भेट झाली ती भेट जिने हे स्मरणीय क्षण दिले, तो क्षण जेव्हा आपली नजर नजर झाली तु बघितल्यावर माझी नजर झुकली खरच विसरता येईल प्रयत्न केला तर्… तो दिवस जेव्हा तु माझा हात हातात घेतला होतास ती विश्वासाचि पकड जिने जगण्याला नवा अर्थ दिला ते जगण जे स्वप्नमय दुनियेत घेऊन जायच ति स्वप्न आपल्या नव्या घरकुलाची.. खरच विसरता येईल प्रयत्न केला तर्… तो दिवस जेव्हा आपण आपल्या घरात प्रवेश केला होता आपल घर प्रेमाच्या माणसानी भरलेल, ती आपली माणस मायेने जवळ घेणारी चुकल काही तरी दरवेळी सावरणारी खरच विसरता येईल प्रयत्न केला तर्… तो दिवस जेव्हा तु गेलास, सगळी बंधन तोडुन ती बंधन जी सात जन्मान साठी बांधली होती सात जन्मातल हा जन्म कितवा पहीला का शेवटचा पुन्हा विचार पुढचा कुठला जन्म असेल का आपल्या भेटिचा खरच विसरता येईल प्रयत्न केला तर्… छंदच जडलाय हा विसरण्याचा प्रयत्न करायचा आणी त्या बहाण्याने रोज तुला नव्याने आठवायच…
|
Meenu
| |
| Friday, June 02, 2006 - 6:53 am: |
| 
|
शब्दवैभव सहीच.. >>> कांदु शब्दवैभव नाही वै भ व लिही शंभर वेळा .... दिवे
|
Chinnu
| |
| Friday, June 02, 2006 - 9:36 am: |
| 
|
वैभवा, आपकी नज्म सुभानल्लाह! अपनेको आवड्या बरकां.. मावळा पुजा छान. अमेयचा प्रश्न वाजवीच आहे! दीमडु तुझ्या ओळी पण सही! नादमय, सोलट्रिप ज्योती, nice one लिहीत रहा.. वैभवा नी लोपा अभिनंदन.. निनावी, मलापण पाठव ग मेतकुट!
|
Ninavi
| |
| Friday, June 02, 2006 - 9:36 am: |
| 
|
वैभव, सुंदर आहे नज़्म तुझी. सर्वांसवे बोलूनही जातेच काही राहुनी.. सुंदर! जगण्यास तीही मोकळी, मरण्यास मीही मोकळा.. व्वा!! ' ती आजही स्मरते मला' हे ऐकायच्या इच्छेपासून सुरू होऊन ' आता तुला स्मरणार ना' या हळव्या समजूतदारपणापर्यंतचा विचारांचा प्रवास मनोरम आहे. आणि नज़्मची पार्श्वभूमी सांगितलीस ते पण बरं झालं. पूजा, ज्योती, नादमय, Keep it up. मावळा, ' ठेचला' पाशी मीही अडखळले होते. दीम्डू, चिन्नू, 
|
वैभव... पुस्तकाबद्दल अभिनंदन...!!!चिनु धन्यवाद, आणि वैभवची कविता.... best नेहमीप्रमाणेच...
|
वैभव नज्म मधे जे एक गोष्टस्वरूप असतं म्हणाला होतास ते अगदीच खरं आहे... आणि मराठीमधे अशी वाचायला मिळणे खूप विरळाच... तुझं आणि तुझ्या ह्या नवीन प्रयत्नाच्या सुंदर सफ़लतेबद्दल कौतुक करावं तितकं कमीच... उत्स्फ़ूर्त तर वाटतेच आणि मनातलं सगळं घेऊन उतरलीये असं वाटेल इतकी उत्कट आहे... जगजीतची एक माझी आवडती नज्म मला आठवली ह्यावरून "बात निकलेगी तो फ़िर दूर तलक जाएगी..." मीनू, गुरूजींवर कसला राग... आणि नसलेला राग पूजावर कुठून काढू? असलं तर तिच्या कवितांबद्दल प्रेमच... दीमडू, काकू रागावेल उगाच चिडवू नको...
|
Mavla
| |
| Friday, June 02, 2006 - 1:10 pm: |
| 
|
maaudi, ninaavi देव देव म्हनुन, आपन ज्या ज्या गोष्टींना आपण, या निर्गुण, निराकार स्रुष्टित शोधला..... त्याच स्रुष्टिने जेंव्हा आपल्याच मानवी रुपात मानवी कल्याणा साठि जन्म घेतला तेन्व्हा, आपणच(समाजाने) त्या जिवाला समजुन न घेता मारुन टाकलं........ अस माझ मत आहे. जस.. महात्मांन्ना गोळी घालनारा, सॉक्रटिस ला विष देनारा..., येशुचा जीव घेनारा...., असे अनेक जीव ठेचुन काढनारे माज़ेच(समाजातील कुनाचे तरी) हात होते... अस मला संगायच होतं, म्हनुन मी अस लिहिल.... निर्गुणात शोधला जो, सजिव ठेचला होता...
|
देवा मी कोण आणी वेडा सुंदर रे. मी वाचलेच नव्हते. सही लिहील्या आहेस. 
|
Mruda
| |
| Saturday, June 03, 2006 - 1:16 am: |
| 
|
वैभव फ़ारच सुंदर....! आर्त आहे खूप.....
|
Mruda
| |
| Saturday, June 03, 2006 - 1:26 am: |
| 
|
ज्योती तुझी पण कविता आवडली गं.... कोण म्हणंत काळ सगळ्यावर औषध असतो..? जखम भरली तरीही सल तसाच रहातो.... ! खरंय ना....?
|
Naadamay
| |
| Saturday, June 03, 2006 - 1:45 am: |
| 
|
वैभव, ज्योती, मावळा, पूजा... सर्वच छान!
|
Jayavi
| |
| Saturday, June 03, 2006 - 4:38 am: |
| 
|
मावळा मस्तच! वैभव, खूप छान माहिती दिलीस. शेवटची आर्तता अगदी काटा फ़ुलवून गेली रे. नादमय, ज्योती, सुरेख!
|
Swaroop
| |
| Saturday, June 03, 2006 - 2:33 pm: |
| 
|
श्रावणसरी झरु लागल्या, भिजला रानोमाळ बघताबघता रंग बदलुनी भरले आभाळ धारांशी या संगम होता दरवळला मृदगंध पाउसफुलांच्या वर्षावाने झाला आसमंत हा धुंद पावसाशी लपंडाव हा खेळत होते उन प्रीतपाखरे विहरत होती, आळवित प्रेमधुन इन्द्रधनुही पाहात होते होउनिया दंग पृथ्वीवर उतरलेले आसमानी हे रंग पानावरती थेंब थांबता बनले त्याचे मोती मनामध्येही दाटुन आली तुझी नि माझी प्रीती चिंब भिजुनही तृषार्त आहे हा चातक तुझ्याचसाठी मनापासुनी बरस एकदा... सखे तू माझ्यासाठी मनापासुनी बरस एकदा... सखे तू माझ्यासाठी
|
Kshipra
| |
| Sunday, June 04, 2006 - 2:11 am: |
| 
|
रानातला पाऊस भारावुनी कसा हा आला उधाण वारा धुंदीत ह्या कुणाच्या आल्या नहात धारा झंकार थेंब आले थेंबात विश्व डोले छंदात रंगुनीया गंधात रंग ओले दाटून गोड आला पानातुनी शहारा झेलीत वीज वेडी मस्तीत येऊनीया ही धून पावसाची आली धरेवरी ह्या ओल्यावल्या घनांनी केला जरा इशारा चिंबून झाड गेले झिम्माड अंग झाले संगात जीवघेण्या झिंगून रान बोले पाऊस आसमंती गेला भरून सारा
|
निसर्ग कविता..., वा... वा माझा विकपोंइट... अजुन लिहा ग!!! छान आहे क्षिप्रा...!!!
|
Dineshvs
| |
| Sunday, June 04, 2006 - 1:43 pm: |
| 
|
वा क्षिप्रा, बर्याच दिवसानी. आज अंबोली, बेळगाव, कोल्हापुर, सावंतवाडी ईथला पाऊस अनुभवुन आलोय. पण असा तुझ्यासारखा शब्दात पकडता नाही येणार मला.
|
|
|