Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 02, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » विनोदी साहित्य » कुछ अपने कुछ पराये... नवसिरियल STY » Archive through June 02, 2006 « Previous Next »

Rachana_barve
Thursday, June 01, 2006 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deeps उपेन कधी Add झाला? movie बघून की त्या आधीच? कारण एकूणच तो srgmp मध्ये जरा मला माठ वाटला होता पण ऍक्सेंट जबरी आहे हं :-O

Arch
Thursday, June 01, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deeps त्या उपेनच्या बोलण्यात defect आहे ग. असो. तुला ह्या serial च costume designer केल आहे न. ते लिही बर आधी.

Deepanjali
Thursday, June 01, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Location सीताची बेडरूम .
सीता ला चक्कर येत आहे .
पण चक्कर येताना ती ' काला साया ... प्रथम ....... काला साया ' असे शब्द बडबडत आहे .
आणि मग ती चक्कर येउन बेशुध्द पडते .
प्रथम : दरवाजा खोलो सीता , ये क्या बचपना है ?
बडी मा : देख लिये नयी बहु के तेवर , कहते है बहु घर कि लक्ष्मी होती है , लेकिन ये मनहूस तो जब से आयी है काला जादू कर दिया है इस घर कि शांति पर .
अब देख क्या रहे हो , तोड दो दरवाजा .. कलमूही ने कही खुदको मार दिया तो इल्झाम आयेगा हमारे सर और इसकी काली आत्मा भटकती रहेगी इस हवेली पर ..... उस काले साये कि तरह ....
प्रथम : बडी मा !!!!! खबरदार जो किसीने उस काले सायेका नाम सीता के सामने लिया ... आज आपके उम्र का लिहाज करता हूं लेकिन याद रखना उस काले साये का राज अगर सामने आया तो .....
( प्रथम पुन्हा सीतेला हाक मारतो पण ती दार उघडत नाही म्हणून शेवटी दार तोडून आत जातो . पाठोपाठ बडी मा येते , सीता शुध्दीवर येत आहे ..)
सीता : काला साया .... प्रथम ... काला साया
बडी मा : सुना प्रथम , पानी सर से उपर जा रहा है , सीता का इलाज करना ही होगा !!!
तुम ठिक कहते हो प्रथम इसे ले जाओ स्वामीजी के पास , क्या तुम जानते हो ऐसे बाबा को जो इस कलमुही को काले सायेका नाम तक भुला दे ???
प्रथम : आज सभी कि जबान पे सिर्फ़ एक ही नाम है ,' अजमेरी बाबा '
बडी मा : लेकिन क्यूं ?
प्रथम : मुझे कब्ज और acidity कि प्रोब्लेम थी बहुत doctors को दिखाया बैदजी के चूरण भी try किये .. कुछ असर नही हुआ !
Then I called ' अजमेरी बाबा ' And he solved my problem with in 72 hours.. and look at me , Today I'm not buying laxatives any more!!
बडी मा : ठिक कहते हो बेटा , तुम्हारी पेट कि तरह इसका दिमाग भी एक ही आदमी साफ़ कर सकता है ' अजमेरी बाअबा '
कुछ साल पहले उनकी तेजोमय photo देखी थी ' झी टी व्ही UK' पे ...
जरा फ़िर एक बार photo तो दिखा उस महात्मा कि .
प्रथम : ये देखो बडी मा .. हमेशा साथ रखता हू ... इनका बस photo देखके कब्ज acidity जैसे राक्षस दूर भागते है ( बडी मा photo पाहाते , त्यात झी टी व्ही वरच्या अजमेरी बाबांचा photo नसून दाढी वाढलेल्या John Abraham चा photo असतो .. आणि ते पाहून बडी मा ला चक्कर येउ लागते !!
इथे background music:' सुभानल्लाह सुभानल्लाह ...)
बडी मा : ये क्या बेटा ... ये अजमेरी बाबा नही हो सकते ये तो रिहान अली खान ....... बहुत साल पहले ' कश्मीर ' मे हम दोनो ..........)
असे म्हणून बडी मा चक्कर येउन पडते आणि बेशुध्द असताना ' रिहान .. रिहान ... जिंदा है ? असे बडबडत रहाते .)
आणि मग पुन्हा background ला ' सुभानल्लाह सुभालल्लाह गाण्याचे सूर .
Episode समाप्त .




Deepanjali
Thursday, June 01, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजमेरी बाबांची किर्ती माहित असलेल्या कोणी तरी next episode लिहिला तर अधिक चांगले
कोणी UK-US zee t.v. viewers असले तर रंगवा जरा ते character
:-)

Raina
Thursday, June 01, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा नारायणा, भय इथले संपत नाही
सीरीयल चे नाव बदलून आता किन्काळी ठेवायला हरकत नसावी.

चालु द्या! पु ल. असते तर त्यांनी क-सीरीयल वर एक फर्मास न-नाट्य लिहीलं असतं. :-)


Devdattag
Friday, June 02, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या इथे गाणं वगैरे टाका काहि..
काले साये जैसा मेरा अनोखा बालम है
क्या बताएं अब तो बेहोशी का आलम है


Himscool
Friday, June 02, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो हा नक्की कुठल्या प्रकारचा सोप आहे... मला आधी डेली वाटला होता पण आता मला तो Hourly सोप आहे असे वाटते आहे... पण वाचायला मजा येत आहे... K sirials पण फिक्क्या पडतील ह्याच्या पुढे...

Maudee
Friday, June 02, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली बडी मां john बरोबर

असामी - किंकाळ्यांवर किंकाळ्या....


Shraddhak
Friday, June 02, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, बडी दादीला पण किंचाळू द्यायचंस ना... बिचारीचा आवाज तरी परत आला असता.

DJ अजमेरी बाबा...

Maudee
Friday, June 02, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


episode start
प्रथम - "बडी मां!! उठीये बडी मां.कौन है ये रिहान अली.उठिये बडी मां उठिये."
पण बडी मां काही उठेना.ती आपली बडबडत राहीली "रिहान, रिहान, रिहान"
प्रथम (मनात) "आता हे काय नविनच प्रकरण. हा रिहान कोण?? आणि त्याचा बडी मांशी काय समंदं?आणि ही बडबडत्येय का? सितेसारख़ी शांतपणे पड म्हणाव. कोणी ऐकलं हे तर ख़ानदानकी ईज्जत का क्या होगा?"
बडी मांचं अजून चालूच आहे "रिहान रिहान"
प्रथम (मनात)"दोघी दोघी पडल्यात ईथे. काय करावं. जाऊदे पडूदे. आपण एक चहा घेऊन यावं नाहीतरी सारख़्या सारख़्या किंकाळ्या मुळे ख़ाण्यापिण्याकडे दुर्लक्षच झालय"

पण त्याचं लक्ष नव्हत की सिता शुद्धीवर येत आहे. तिने हे सगळं ऐकलेलं. काय करावं तिला कळत नव्हतं ख़र तर.पण अचानकपणे प्रथम तिथून उठून गेला.
सिता(मनात)"हा असा अचानक पणे का उठून गेला? आणि याच्या या काळ्या dress चं काय.प्रथमच तर घाबरवत नसेल मला.पण तो असं का करेल.ज्याच्यावर मी एवढे प्राणापलिकडे प्रेम केलं तो असं करू शकेल?आणि हा रिहान कोण आहे.बडी मां आणि त्यान्चा समंद काय?अरे काय चाललय काय या घरात? आधीच तो देव गायब.त्यात आता हा रिहान"
तेवढ्यात तिचं बडी मां कडे लक्ष गेलं (मनात)"हिच ती बाई जि मला वेड लागलय असं सिध्ह करण्याच्या प्रयत्नात आहे.." असं म्हणुन ती बडि मां कडे हळू हळू चालू लागली.(इथे थोडसं music जणू काही सिता आता बडी मांला काहीतरी करणार आहे)

मं भाभीना कुणीतरी त्यान्च्या रूम मध्ये आणून ठेवलं. त्यी शुद्धिवर आली तेव्हा जवळच रामेश्वर उभे होते. "मुज़े इधर किसणे लाया? और वो वो....कहा है??"
रामेश्वर"कौन वो मंगल? किस की बात कर रही हो तुम?"
मं भाभी "वही जो सिता के हाथ मे था"
रीमेश्वर"किस चीज की बात कर रही हो तुम मंगल? तुम अभी सो जाओ.तुम्हे आराम की जरूरत है"
असं म्हणुन त्यानी तिला बळेबळेच झोपायला लावलं
रामेश्वर(मनात)"आता हे काहीतरी नविनच.सिताच्या हातात काय असेल? मला बघायलाच हवं "म्हणुन ते ख़ोलीतून बाहेर पडले.

सिता हळु हळु बडी मां जवळ आली. आणि तिने हात त्यान्च्या डोक्यावर ठेवला.
episode समाप्त


Psg
Friday, June 02, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एपिसोड स्टार्ट्:
सीता ब माँ च्या कपाळावर हात ठेवते. त्यांना शुध्दीत आणायला त्यांच्या कपाळावर ती पाणी मारते. पण त्या काही शुध्दीत येत नाहीत. (झोप्ल्या की काय रेहानची स्वप्न बघत?) म्हणून ती आपल्या पैठणीनी त्यांच कपाळ पुसायला लागते, पण ती already ओली असते, निकाचेही कपाळ आधी पुसले आहे ना!!! मग ती त्यांच्याच पदरानी त्यांचे कपाळ पुसायला लागते. तर त्यातून ब माँ नी मगाशी लपवलेले ते फ़ेमस पांढरे फूल पडते!
अरे वा! बरं सापडले हे फूल. आता ब दा. ला जाऊन विचारते की काय प्रकार आहे हा असं म्हणत सीता खोलीच्या बाहेर पडते.
तो रामेश्वर समोर!!
सीता बेटी कैसी हो अब? तुम्हारा चीखना बंद हो गया?
खम्मा घणी. हाँ अब ठीक हूँ. ब दा को देखने जा रही हूँ.
सीता नमस्कार करायला वाकते तेव्हा तिनी हातात धरलेल ते फूल रामेश्वरना दिसत.
ये तुम्हारी हात में क्या है? दिखाओ तो.
कुछ नही, कुछ भी तो नही.
नही कैसे बहु, कुछ है तुम्हारे हात में दिखाओ मुझे.
सीता अगतिक होते आणि ते फूल त्यांना दाखवते. रामेश्वरना त्याचा importance लगेच कळतो. ते चिडून म्हण्तात
ये फूल तुम्हे कहाँसे मिला? दो मुझे वो. कल आयी हुई लडकी, तुम्हारी ये मजाल की बडी दादीकी चीजोंको हात लगाती हो!!
सीता ताबडतो अश्रूंमधे!!
तिला रडताना पाहून ते थोडे वरमतात आणि म्हणतात
अभी अभी तोही शादी हुई है तुम्हारी. तुम इस सब में क्यूँ पड रही हो? अभी तो तुम्हारे हसने हसाने के दिन है. तुम ऐसा करो प्रथम के साथ कही घूम फिर आओ. लेकिन पेहेले हमारे family गुरुजी है, उनके आशीर्वाद लेने केलिये जाना. उनके आशीर्वाद से सब ठीक होगा.
सीता जाते बिचारी.
रामेश्वर मग ब दा. च्या खोलीकडे कूच करतात. हातत ते फूल असतेच. नादात ते त्या फूलाचा वास घेतात.
आणि मग व्हायचे ते होतेच! रामेश्वरही बेशुध्द होऊन पडतात!

सीता त्यांच्या मागावर असतेच. ते पडल्याबरोबर ते फूल ती त्यांच्या हातातून घेते आणि ब दाकडे येते. तिला पाहिल्याबरोबर ब दा खुश होतात आणि पुन्हा एकदा त्या कपाटाकडे निर्देश करतात. सीता ती पेटी उघडते.

इकडे दादी तिला वेगळच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. पण सीताच लक्षच नसत! दादी हातवारे करत असतात आणि सीता frantically त्या पेटीत महत्वाचे काही आहे का हे शोधत असते!

एपिसोड समाप्त


Shraddhak
Friday, June 02, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचं मी लिहितेय. थोड्या वेळातच.

Arun
Friday, June 02, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सगळे लोकं अशक्य आहात. डेली सोप्स लिहिणार्‍या लोकांच्या पोटावर पाय देणार आहात एक दिवस ................ :-)

Meenu
Friday, June 02, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे एखदा एपिसोड लिहावा म्हणलं तर सोडतच नाहियेत .... जाउ दे शनिवार, रविवार मधे टाकते एखादा

Shraddhak
Friday, June 02, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीता त्या पेटीत अजून काहीतरी असेल म्हणून शोधतेच आहे. बडी दादींना हे शेवटी असह्य होते.

बडी दादी : ( मोठ्याने) अरी जनमजली, मै कुछ इशारोंसे कह रही हू उसकी तरफ़ भी ध्यान दोगी या फिर ढूंढती ही रहोगी? एक तो मुझे गहरा सदमा लगा है और मै अपनी आवाज खो चुकी हू. मुझे तो तू चैन से चुप रहने भी नही देती.

सीता : सॉरी बडी दादी, मेरा ध्यान ही नही गया आपकी तरफ़. मै तो उस संदूकमे पडे नक्षत्र विवाह जेवर series वाले हार को देख रही थी. शायद बरसोंसे उसी संदूक मे पडा है. आप तो पहनती नही होगी. तो....
बडी दादी : एऽऽऽ.... हाराला हात लावायचं काम नाही. प्रथमचे बडे दादा पहिल्यांदाच business tour वर गेले होते तेव्हा त्यांनी प्रेमानी माझ्यासाठी आणला होता. तो हार जसाच्या तसा ठेव आणि मी काय हातवारे करतेय त्याकडे लक्ष दे.
सीता : ओके, ओके...

बडी दादी जे सांगू पाहतायत ते सीता समजून घ्यायचा प्रयत्न करतेय. बडी दादी पुन्हा पुन्हा अलमारीकडे बोट दाखवतायत. सीता गोंधळून अलमारीकडे बघते. तिथे तिला एक अल्बम दिसतो. त्या अल्बममध्ये एकच फोटो असतो. एक अतिशय देखणा माणूस आणि त्याच्यासोबत तितकीच देखणी अशी मुलगी. सीता तो फोटो हातात घेते.

सीता : ( मनाशी) इसे तो यहा पहले कभी नही देखा. क्या यही है देव? और इसके साथ ये लडकी कौन है?
( बडी दादीजवळ जाऊन फोटो दाखवत) बडी दादी, बताईये. क्या ये है देव? क्या इसे पता है साये का रहस्य. बताईये ना... बताईये ना बडी दादी....
एकदम दचकून मागे सरकते. बडी दादी हलत देखील नाहीयेत.
सीता : ( पुन्हा किंचाळत) बडी मा, मंगला भाभी, प्रथम, सूरज, पिताजी, नयनिका, विठ्ठल काका जलदी आओ. देखो बडी दादीको क्या हो गया? जल्दी आओ... जल्दी....

सगळे धावत येतात. प्रथम बडी दादीकडे एक दृष्टिक्षेप टाकून ओरडतो.

प्रथम : जल्दी डॉक्टर चाचाको बुलावा भेजो.

डॉक्टर येऊन बडी दादीला तपासतायत.
डॉक्टर : ये अब कोमामे चली गई है. अब तो सिर्फ़ भगवानपे भरोसा है. भगवान ने चाहा तो ये ठीक हो जायेंगी. मै रोज आकर इनकी तबियत देख जाऊंगा. वैसे मेरी regular visiting fees है ५०००/- per day .
प्रथम : आप जितना चाहो पैसा लेलो डॉक्टर... पर मेरी बडी दादीको बचालो.
डॉक्टर : अरे बुद्धु, वो मेरे हाथ मे थोडी है? मै तो बस रोज आके उन्हे देख जाऊंगा और तुम्हे बताउंगा की वो कोमामे है की चल बसी? तब तुम्हे भी decide करने मे help मिलेगी की उनकी सेहत के लिये प्रार्थना करनी है या नही?
रामेश्वर : ये point तो ठीक है.

डॉक्टर व बाकीचे सगळे हळूहळू तिथून जातात. तिथे प्रथम, सीता, आणि कोमात गेलेली बडी दादी एवढेच उरतात. प्रथम दादीकडे बघून अश्रू ढाळत आहे.

सीता : ( प्रथमच्या खांद्यावर हात ठेवत) धीरज रखो प्रथम. अगर भगवान ने चाहा तो दादी ठीक हो जायेगी. मै हू तुम्हारे साथ... मै रोज उनकी सेहत के लिये भगवान की पूजा करुंगी, व्रत रखूंगी.
प्रथम : तुम कितनी अच्छी हो सीता... न जाने तुम्हारे खिलाफ़ ये किसकी साजिश है की ये काला साया सिर्फ़ तुम्हे ही दिखता है?
सीता : एक बात पूछू प्रथम, सच सच जवाब दोगे?
प्रथम : हां पूछो...
सीता : ( फोटो दाखवत) ये कौन है प्रथम?
प्रथम : सच सच...
सीता : ओफ़्फ़ो मजाक छोडो प्रथम...
प्रथम : अरे तुम्ही ने तो कहा था की सच सच जवाब देना...
सीता : यहां बडी दादी कोमामे है और तुम्हे मजाक सूझ रहा है.
प्रथम : अच्छा बाबा... चलो छोडो. फिरसे दिखाओ फोटो.
सीता फोटो दाखवते.
प्रथम : ये तुम्हे कहासे मिला? किसने दिया ये तुम्हे?
सीता : बडी दादीने... कोमामे जाने से पहले. शायद वो ये तस्वीर मुझे देकर ही कोमा मे जाना चाहती थी.
प्रथम : क्या उसने तुम्हे नही बताया की ये है कौन?
सीता : नही....
प्रथम : ये देव है...
सीता : क्याऽऽऽऽऽ? और उसके साथ ये लडकी कौन है?
प्रथम : वैष्णवी.... देवकी दूसरी पत्नी...
सीता : मुझे एक बात बताओ... देव का इस घर से आखिर नाता क्या है? क्या लगता है देव इस खानदानका?
प्रथम : देव की शादी हुई थी बडी दादी की इकलौती बेटी से... चंदनासे.
सीता : तो चंदना कहा है? और देव ने दूसरी शादी क्यों की? अभी देव और चंदना का जिक्र इस घर मे क्यूं नही होता? बताओ.
प्रथम : ये बाते तो मै खुद नही जानता सीता... ये बाते मै खुद नही जानता.... दस साल पहले एक तूफ़ानी रात मे मैने चंदना और देव को आखरी बार इस घर मे बडी दादी से मिलने आते देखा था.... उसके बाद की कहानी तो बडी दादी के अलावा कोई नही जानता.....

प्रथम तिथून निघून जातो. सीता हताशपणे अश्रू ढाळत बडी दादीच्या चेहर्‍याकडे पाहते.
सीता : आखिर ये कैसे राज़ अपने सीने मे दफ़न करने चुप हो गई है आप? मेरा ऐसा क्या कसूर था की मुझे इतनी बडी सजा दी जा रही है? साये के खौफ़ मे डर डर के जीने की सजा.... क्यूं दी जा रही है ये सज़ा? बताईये नं बडी दादी...
बडी दादी : सीता तुझ्या खोलीत जाऊन रड जा. मला कोमा enjoy करू दे. सायाच्या night round ची वेळ झालीच आहे नाहीतरी. तू परत किंचाळशीलच. चल जा आत्ता...

पुन्हा डोळे मिटून घेतात.
सीता : ( मनाशीच) देव और चंदना आखिर है कहां? और देव ने दूसरी शादी क्यों की? और अपनी बेटी की सौतनकी फोटो बडी दादीने संभालके क्यू रखी है??????????

एपिसोड समाप्त.


Shraddhak
Friday, June 02, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मीनू लिहायचं असेल ना तर आधी मेसेज टाकून ठेव ' पुढचा एपिसोड मी टाकतेय ' असा. म्हणजे मग अधे मधे कुणी लिहिणार नाही.

Maudee
Friday, June 02, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


episode start
रामेश्वर उठले. त्याना आपण इथे कसे आलो हे आठवेना. मग थोड्याच वेळात त्यांच्या सगळ लक्षात आलं. पण त्याना सिता आणि ते फ़ुल कुठेही दिसेना.(मनात)"सिता ते फ़ुल घेऊन गेली काय??आता कोणाकोणाला दाख़वत फ़िरेल ते फ़ुल कोण जाणे. अरे,पण ती तर इथून गेली होती.मग दुसर्‍या कुणाच्या हातात पडलय का ते फ़ुल."
तेवढ्यात समोरून कैलाशनाथ येताना दिसले.
कैलाश"राम, मी तुझ्याकडेच येत होतो.पण तू इथे काय करतो आहेस."
राम (मनात)"हे घडलेलं सर्व सांगाव का याला?"(मोठ्याने) मी पण तुलाच भेटायला येत होतो."
कै "अरे चल मग बहेरच बसू आपण"असे म्हणुन त्यानी विठ्ठलला काहीतरी ख़ायला घेऊन यायला सांगितले बाहेर.
राम (मनात)"याला म्हटलय ख़र तुला भेटायला येत होतो म्हणुन पण याला ख़रच सांगाव का?"

नयनिकाला काय झाले याचा विचार सुरज करत होता. पण direct तिला कसे जाऊन भेटायचे? म्हणुन मग तो सिता कडे आला.तर सिता एक फोटो हातात घेऊन बसली होती.
सुरज "भाभी अंदर आऊ"
सिता "आओ आओ. कैसे हो.ईस चक्कर मे तुमसे बात ही नही हुई."
सु "मै ठिक हु भाभी. पर आप कैसी है"
बोलता बोलता सुरजचे तिच्या हातातल्या फोटोकडे लक्ष गेले.
सु(मनात) "हा कोण माणुस आहे आणि ही मुलगी कोण. याला कुठेतरी पाहील्यासारख़े वाटत आहे. जाऊदे ना आधी नयनिकाचा विचार करायला हवा"
सिता "मै भी ठिक हू. सोच रही मुझमे ऐसी क्या ख़ोट है के मेरे आनेसे ईस घर मे कुछ अजीब घटनायें घट रही है."असं म्हणता म्हणता तो फोटो तिने तिच्या अलमारीत ठेवून दीला.
सु "ऐसे क्यू सोच रही है आप भाभी. आप दोनोने तो ईस घर की शान बढायी है"
सिता "दोनो???"
सु "मेरा मतलब है आप और आपकी बहन. कितनी अच्छी है वो."
सिता "हां पर वो तो दो चर दिनमे जायेंगी ही वापस."
सु (मनात)"कशाला तिच्या जाण्याच्या गोष्टी करताय"(मोठ्याने)"हां पर तब तक तो वो इस घर की महमान है न?? कहा है वो"
सिता "पता नही. होगी यही कही"
आता पुढे काय बोलावे हे सुरजला समजेना.सहज काहीतरी विचारायचं म्हणुन त्याने म्हटलं "वो किसकी तसवीर थी भाभी"
सिता (दचकून)"तुमने देख़ी वो." (मग शांतपणे) "नही किसीकी नही. जाओ जरा देख़ो तो नयनिका कहा है. इस गडबडमे उसके तरफ़ ध्यान ही नही है मेरा. तुम उसके साथ रहोगे? फ़िर मुझे चिंता नही होगी."
सु (मनात)"आयुष्यात पहील्यांदा एवढी चांगली गोष्ट केली मी भाभी कडे येऊन."(मोठ्याने)"हां जरूर" असे म्हणुन आंदाने तिथून बाहेर पडला.

बाहेर रामेश्वर आणि कैलाश येऊन बसले होते.
विठ्ठलने भडंग आणि चहा आणून ठेवला. दोघानाही कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हते. त्यामुळे दोघेही जण खात असल्याची action करत बसले होते.
राम "मला तुला काही सांगायचं होतं"
कै "अरे मग बोल की."
राम "कसं सांगू. सकाळी सिताला भेटलो तेव्हा तिच्या हातात ....... "
तेवढ्यात तिकडून प्रथम येताना दिसला. त्यांच्याकडेच येत असावा. त्यामुळे विषय परत थांबला.
प्रथम "पाय लागू" (दोघानाही आळिपाळीने)
प्र "मुझे कुछ कहना था"
तो काही बोलणार तर त्याना एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली
episode समाप्त


Meenu
Friday, June 02, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीता तुझ्या खोलीत जाऊन रड जा. मला कोमा enjoy करू दे. सायाच्या night round ची वेळ झालीच आहे नाहीतरी. तू परत किंचाळशीलच. चल जा आत्ता... >>>>>

Asami
Friday, June 02, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीता आपल्याच तंद्रीत तीच्या खोलीतून बाहेर निघते. तीच्या हातात पांढरे फ़ुल आहे आणी ती मधेच थांबून त्याचा मनसोक्तपणे वास घेते. पण आश्चर्य म्हणजे ती त्या वासाने बेशुद्ध पडता नाही. फ़क्त " खम्मा घणी , खम्मा घणी " असे काहीसे पुटपुटत ती बाहेरच्या बागेमधे निघून जते.

ते द्रुष्या पाहून रामेश्वर अवाक झाले आहेत. ही कशी नाही बेशुद्ध पडली त्या फ़ुलाच्या वासाने ?
हा काय प्रकार आहे ? त्यांच्या कपाळावरची शीर तडातडा उडू लागते. त्यांना दरदरून घाम फुटतो.
" हे भगवान , ऐसे कैसे हो सकता है ?" असे म्हणून ते एकदम बेशुद्ध होतात.

सीता, फूल, रामेश्वर हा प्रकार पाहणारे कैलाशनाथ आणी प्रथम ह्यांची एकदम गडबड उडते. तेव्हढ्यात घड्याळात सहाचे ठोके पडतात. त्या आवाजाने प्रथम भानावर येतो.
" अरे भाइसा को क्या हो गया येह अचानक ?"
" बेटा तुम इनका खयाल रखो, जल्दीसे doctor को फ़ोन लगाओ. मै सीता बेटी का खयाल रखता हू. "
एकदम उठून बागेकड जायला निघतात.
" पर पिताजी सीता को क्या हुआ है ? वो तो अब ठीक है "
" नही " बोलताना अडखळतात. " हां वैसे तो अब ठीक है. पर छे बजे है और वोह बागकि तरफ़ गयी है. और देव भि तो "
प्रथमकडे दुर्लक्ष करून बागेकडे धावत जातात. प्रथम त्यांच्या पाठी जाण्यासाठी वळतो पण अचानक थांबतो.
" भाइसा " पुटपुटत परत फ़िरतो.
" विठ्ठलकाका, जल्दी से doctor को फ़ोन लगायिये " ओरडून सांगतो. आणि रामेश्वरला उचलून मंगलाभाभीच्या
खोलीत घेउन जातो. रामेश्वरला बिछान्यावर थेवत असताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर जाते. बाहेर दिसणारे द्रुष्य पाहून तो घाइघाईत वळतो आणि कशालातरी अडखळून खाली पडतो. खाली पडताना त्याचे डोके आपटते आणि तो बेशुद्ध होतो.

इथे कैलाशनाथ धावतच बागेमधे शिरतात आणि सीतेला शोधू लगतात. त्यांआ सीता कुठेच दिसत नाही.
अचानक हवेलीच्या भिंतीजवळ कोणीतरी उभे आहे असा भास त्यांना होतो. ते आवंढा गिळून त्या दिशेला बघतात.
तिथे एक काळी आक्रुती उभी असते. ती त्यांना खूणेने जमिनीकडे बघायला सांगते पण गुलाबांच्या ताटव्यामुळे त्यांना काही दिसत नाही.
काय आहे ते बघायला ते वळसा घालून आक्रुती दिसली तिथे जातात. ते तिथे पोहोचतात तेंव्हा तिथे कोणीच नसते.
त्यांचे लक्ष ती अक्रुती दाखवत होती त्या जागेकडे जाते. तिथे जमिनीवर सीता निपचित पडलेली असते आणी तिच्या हातत पांढरे फूल असते. लाल कुंकवाने माखलेले.

can't resist next ...

ते पाहून कैलाशनाथ एकदम छतीवर हात ठेवतात आणि बेशुद्ध होतात.

Maitreyee
Friday, June 02, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)आता या सिरियल चे नाव बदला , 'कुछ खामोष कुछ बेहोष' असे ठेवा:-O




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators