Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 6:35 am: |
| 
|
episode start इतकी सुंदर पेटी बघून सिता हरख़ून गेली.तिच्या गरीब माहेरी इतकी सुंदर वस्तु बघणं दुरापास्तच होतं. पण त्याहीपेक्षा या घरात आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतय,आपल्यावर विश्वास ठेवतय याचाच तिला अधिक आनंद होत होता. इकडे बडी मां नयनिकाचा विचार करत होत्या.ती का आली असेल माझ्याकडे.तिला काही सांगायचं आहे का सितेबद्दल मला. ही मंगल पण जिथे तिथे टपकते. विचार करून करून उत्तर सापडेना तेव्हा तिने नयनिकालाच बोलवणे पाठवले. आणि सिताने पेटी उघडली.तर त्या पेटीत ते मगाससारख़च पांढरं फ़ुल. तिला धक्काच बसला.फ़ुलाच्या एकूण स्थितीवरून ते फ़ुल बरेच वर्षापासून तिथे आहे असं वाटत होतं. "पण दादीने ते फ़ुल पेटीत का ठेवले. आणि त्याबद्दल ती मला का सांगत आहे. माझा काय समंद आहे या सर्व गोष्टींशी??ख़रच लग्नापुर्वी मी किती सुख़ी होते." आणि तिला लग्ना आधीच्या एक एक गोष्टी आठवू लागल्या.ती भानावर आली तेव्हा दादी तिच्याकडे अगदी मायेने बघत होत्या.तीनेही दादीकडे बघून स्मितहास्य केलं. सिताला फ़ुलं ख़ूप आवडायची पुर्वीपासूनच.आज सकाळी पहील्यान्दाच ती फ़ुलामुळे इतकी घाबरली होती.पण हे फ़ुल दादीने स्वतः दिल्यामुळे ती निर्धास्त झाली होती.सवयीप्रमाणे ति ते फ़ुल हुंगण्यासाठी नाकाजवळ नेत होती. दादीने प्रयत्न केला तिला आडवण्याचा पण ती ते करू शकली नाही.आणि सिता चक्कर येऊन पडली. episode समाप्त
|
psg फ़क्त एक सूचना गं. बडी दादी प्रथमची पणजी आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये लिहिलंय मी तसं. बाकी तू आणि माऊडी चालू द्या. 
|
Psg
| |
| Thursday, June 01, 2006 - 7:13 am: |
| 
|
माऊ, कुठलं गं पांढरं फ़ूल? मला संदर्भ लागला नाही श्र, अरे देवा! असे झाले का? पण आता एडिट नाही करत. लक्षात ठेवीन next time साठी!
|
Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 7:19 am: |
| 
|
अग ते नाही का सांडलेल्या सिंदूर वर ठेवलेले असते तेच
|
Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 8:04 am: |
| 
|
episode start नयनिकाला बडी मांने बोलावल्यामुळे तीला आश्चर्य आणि आनंद दोन्हीही वाटले.तिला आता बडी मांशी जवळीक साधता येणार होती.जेणेकरून सुरजसाठी त्यानी तिचाच विचार करावा.पण सिता....तिने सगळा घोळ घातला आहे.... की मला निघून जा असं सांगायला बोलावलं आहे.....आता मात्र ती थोडीशी घाबरली. दादीची ख़ोली - इकडे सिता पडली पण दादीला काहीच करता येईना.तेवढ्यात कोणीतरी आल्याचा भास झाला."आता ही मंगल नसावी" दादीने मनातल्या मनात प्रार्थना केली. कोण होतं तिथे? इकडे नयनिका बडी मां कडे जायला निघाली.वाटेत तिला सुरज भेटला.त्याने तिच्याकडे बघून एक छानसे स्मितहास्य केले.ती मनोमन सुख़ावली.आणि पुढे चालू लागली. मं भाभी हे पहात आहे याकडे त्या दोघांचेही लक्ष नव्हते. (मं भाभीच्या चेहर्यावर एक छद्मी हास्य.) अचानकपणे नयनिका बडी मांच्या ख़ोलीकडे जात असलेली बघून मं भाभी सरसावली.तिने तिचा पाठलाग चालू केला. बडी मा. "ये नयनिका, तुझीच वाट बघत होते मी. काय सांगायचं होतं तुला मगाशी" नयनिका जरा हबकली.(मनात)"अरे हीला कसं कळलं"फ़क्त हसते. बडी मा. "सिताची तब्येत ठिक आहे का आता?" नयनिका (मनात)"च्यायला आता आले का वांदे! सुरजच्या नादात ताईकडे लक्ष कुठेय माझं"(मोठ्याने)"हो हो ठिक आहे आता." तेवढ्यात दाराबाहेर उभे राहून ऐकत असलेल्या मं भाभीचा cell वाजला.बडी मांला कळले कोणीतरी बाहेर उभं राहून चोरून ऐकतय ते. दादीची ख़ोली - दादी कोण समोर येतय याची वाट बघते आहे.आणि एकदाची ती व्यक्ती आत आली.आणि तिच्या चेहर्यावर एक धक्का... दादी - "देव!!!!तुम कब आये" (इथे अजून देवचा चेहरा दाख़वलेला नाहिये) episode समाप्त
|
अगं माऊडी दादीची वाचा गेलेली नं? देवला पाहून आली लगेच परत? जरा अजून दळण दळलं असतं ना त्या देवची entry लांबवून! :-P
|
Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 8:16 am: |
| 
|
देवच समोर आल्यावर मग काय आणि देव आता फ़क्त दादीलाच तर दिसलाय....बाकीच्याना भेटायच्या आधी बरच दळण दळता येईल. शिवाय हा देव ख़रा की तोतया याचंही नविन दळण दळता येईल
|
मी टाकला गं पुढचा एपिसोड... देवची entry delay केली जरा. :-P _______________________________________________ बडी दादीच्या रूमच्या दरवाज्यात प्रथमचे वडील कैलाशनाथ उभे आहेत. कैलाशनाथ : दादी... दादी आप कुछ बोली... दादी? आपकी आवाज वापस आ गई??????? भगवान का लाख लाख शुकर है. दादी : ( खोल आवाजात) देव... तू आलास देव? कैलाशनाथ : दादी अगं देव नाही.. मी आहे कैलाशनाथ... चष्मा देऊ का तुझा तुला? दादी : तुम देव नही हो? कैलाशनाथ : मै तुम्हारा पोता हूं दादी... कैलाशनाथ... दादी : मग मला काय नुसताच भास झाला? hmmm ... उगीच excitement मध्ये बोलायलाच लागले की मी! ( खोल आवाजात) तुम... तुम कैलाशनाथ हो? देव कहां है फिर? कैलाशनाथ : देव यहां कैसे आयेगा दादी? वो तो.... त्यांची नजर शुद्धीवर येत असलेल्या सीतेकडे जाते. ते वाक्य अर्धवट सोडतात. सीता : ( उभी राहत) खम्मा घणी पिताजी.... कैलाशनाथ : जीती रह सीता बेटे. अब कैसा लग रहा है? सीता : ( डायरेक्ट मुद्द्यावर येत) ये देव कौन है पिताजी? दादी उनकी राह क्यू देख रही है? इकडे अपेक्षाभंगामुळे दादीची वाचा पुन्हा गेली आहे. त्या कैलाशनाथकडे पाहून निकराने नाही नाही अशी मान हलवतात. कैलाशनाथ : तुझे देव के बारे मे बताने का समय अभी नही आया है सीता बेटे. धीरज रख. तुझे सब पता चल जायेगा. बस कुछ दिन इंतजार कर. सीता : वो साया मुझे दिन रात डराता है पिताजी... और उस साये का रहस्य दादी को पता है.... और और... ( घुटमळते कारण देवबद्दलची बातमी तिने चोरून ऐकलेली असते.) कैलाशनाथ : और किसीको पता नही... हेच म्हणायचंय ना तुला बेटा? अगं दादी पुन्हा बोलू लागली की सांगेल किंवा तिची वाचा नाहीच परत आली तर तू तिला लिहा वाचायला का नाही शिकवत? म्हणजे ती लिहूनतरी तो राज सांगू शकेल. सीता : That's a good idea, Pitaji . तिथून जाते. तिथे घर का पुराना और विश्वासू नौकर विठ्ठल येतो. कैलाशनाथ : विठ्ठल जरा दादीजवळ बस. मी बाहेर जाऊन येतो. कैलाशनाथ तडक तिथून निघून मंगलाभाभीच्या नवर्याकडे म्हणजे रामेश्वरकडे जातो. कैलाशनाथ : बडे भाईसा, उस सायेकी वजहसे हमारे घर मे देखो कैसी मुसीबत आन खडी हुई है? रामेश्वर : क्या हुआ कैलाश? तू बहुत घबराया हुआ लगता है. कैलाश : अरे दादीला भास झाला देव परत आला म्हणून... आणि ती नवी सून सीता मला विचारत होती देव कोण म्हणून? आता काय सांगू मी तिला? की देव.... रामेश्वर : श्श... चूप. भिंतींना कान असतात. एकूण गंभीर सिच्युएशन आहे तर... सीताला काही दिवस माहेरी पाठवून द्या. किंवा प्रथमला सांग तिला घेऊन कुठेतरी फ़िरून ये म्हणून! दादी पूर्ण बरी होईतोवर सीता परत येता कामा नये. नयनिका हे ऐकते दरवाजाआडून. नयनिका : ( मनाशी) अरेच्च्या हे काय? ताईला इथून घालवायचा प्लॅन करत आहेत. ती गेली फ़िरायला म्हणजे मला घरी जावे लागेल मग कसला सूरज, कसले सेटिंग, न् कसली जायदाद.... मुझे कुछ करना होगा. नयन धावत धावत सीताच्या रूमकडे जाऊ लागते. तेवढ्यात तिच्या समोर कुणीतरी येते. ती दचकते. एपिसोड समाप्त.
|
Asami
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:19 am: |
| 
|
तीचे लक्श त्याच्या चेहर्याकडे जाते आणि ती किंचाळून बेशुद्ध पडते. तीची किंचाळी ऐकून सीता धावत धावत तिथे पोहोचते. नयनिकेला बेशुद्ध पडलेले पाहून ती एकदम सैरभैर होउन जाते. " येह क्या हुआ तुम्हे ? होश मे आओ निका. निका , निका. होश मे आओ. अजी सुनते हो , जरा इधर आयीये " प्रथमला हाक मारत ती नयनिकेचे डोके उचलून मांडीवर घेते. तीची हाक ऐकून प्रथम तिथे पोहोचतो. बेशुद्धा नयनिकेला पाहून तो हैराण झालेला आहे. " अरे इसे क्या हुआ ?" " पता नही. मझे सिर्फ़ किसी की चीख सुनाई दी और मै भागकर यहां आ गयी. आप कुछ किजीये please" " तुम घबराओ नही. मैन अभी doctor uncle को फ़ोन लगता हूं " म्हणून निघून जातो. सीता पैठणीच्या पदराने नयनिकेला वारा घालू लागते. मधेच थांबून तीच्या चेहर्यावर आलेला घाम पुसते. " मेरी प्यारी बहना. येह क्या हो गया तुम्हे ?" तीचे डोळे पाण्याने भरून येतात. पण ती न थांबता पदराने नयनिकेला वारा घालत राहते. डोळ्यातले पाणी गळून नयनिकेच्या चेहर्यावर पडते. सीता लगेच ते थेंब पदराने पुसून घेते. अचानक तीला कोणाची तरी चाहूल लागते. प्रथम आल म्हणुन हायसे वाटून ती मागे वळून पाहते आणी समोर आलेल्या व्यक्तीला पाहून जोरात किंचाळते आणी बेशुद्ध पडते. तीची किंचाळी ऐकून खालच्या मजल्यावर बसलेली मंगलाभाभी वैतागते. " येह क्या माजरा है ? कलसे जब देखो तब इस घर मे कोई चीखता रहता है. " आवाजाचा शोध घेत वरच्या मजल्यावर जाऊन पोहोचते. बेशुद्ध पडलेल्या सीता आणी नयनिकेला पाहून तीच्या कपाळावर आठ्या उमटतात. "क्या अजीब बहने है ! दोनोने जीना हराम कर रखा है. जबसे आयी है तबसे येह बेहोशी का drama लगा रखा है. एक कम थी तो अब दुसरीने जल्वा दिखाना शुरू कर दिया " पुटपुटतच ती खाली पडलेल्या सीतेला पायाने ढोसते. त्या धक्याने सीतेची बंद मूठ उघडते आणि त्यातून काहीतरी जमिनीवर पडते. ती पडलेली वस्तू पाहून मंगलाभाभीचा चेहरा भीतीने वेडावाकडा होतो आणि ती जोरात किंचाळून बेशुद्ध पडते. एपिसोड समाप्त
|
Rmd
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:27 am: |
| 
|
लै खास रे आसाम्या! अचानक इकडे दौरा?
|
Asami
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:31 am: |
| 
|
मला JK ची आठवण आली ग
|
Maitreyee
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:33 am: |
| 
|
असाम्याने लिहिलेला एपिसोड पाहून मी पण किन्चाळले आणि बेशुद्ध झाले आहे
|
Asami
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:42 pm: |
| 
|
अशीच पडून राहा मग तू. उद्याच्या episode मधे john abraham येणार आहे तुझा. तो आणेल तुझ्या नाकाला चप्पल
|
Lalu
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:59 pm: |
| 
|
>>john abraham येणार आहे तुझा john abraham MT चा?? हे वाक्य वाचून DJ किंचाळून बेशुद्ध पडेल! *पुन्हा.. "क्या अजीब बहनें है" म्हणेल कोणीतरी!
|
कशाला कशाला जॉन चं नाव पुरे आहे की जॉन कशाला येणारे? प्रथम च्या पणजोबा चा रोल करणार आहे का? मग बडी दादीच्या रोलसाठी मारामार्या होतील इथे
|
तिन तिन किंचाळ्या ऐकून प्रथम, सुरज आणि ब. मा धावत येतात. प्रथम : उठो सिते क्या हुवा तुमको ये क्यु बार बार चिल्लाकर बेहोष हुवे जा रही हो? सुरज (मनात) : उठो प्रिये नयनीके. ( उघड ) प्रथमभैय्या भाभी के बहेन को क्या हुवा है? ब मा : दोनोको कौन्से कलमुहोंकी चिंता पडी है. उधर मं. भाभी भि पडी है गिरकर उसको पहेले अंदर लेके जाओ. मं. भाभिला सुरज आत नेतो. ब. मा सितेच्या हातातले पडलेले पांढरे फ़ुल बघून दचकते. प्रथमचे लक्ष नाही बघून ती ते झटकन उचलून पदरात बांधते. प्रथम चिंतातुर होऊन सितेकडे बघत आहे. सिता अर्धवट उठत : मै कहा हु? ब. मा इधरच हो तुम. जबसे आयि हो तमाशे हो रहे है घरमे. सालोसाल कुछ नही हुवा. प्रथम तुम इसको लेके पहेले अपने स्वामीजी के पास जाओ. बहोत हो चुका. सिता शरमेने मान खाली घालते. निकाकडे बघून परत किंचाळते. प्रथम वैतागून : अब क्या हुवा? सिता : वो निका. ब मा : तुम्हारीच बहेन है. इसको भि तुम्हारे जैसेही ड्रामे करनेकी आदत होगी. प्रथम : मा? क्यु ताने दे रही हो दोनोंको? ब मा फ़णकारून निघून जाते. सिता : मुझे माफ़ करदो प्रथम. मै मायके मे थी तब कब्भीच बेहोष होके गिरी नही थी. निका भि नही लेकिन वो काला साया मेरा पिछा कर रहा है. बार बार. सिता चेहरा भयभित करायचा प्रयत्न करते. निका उठते अचानक आणि धावत खाली निघून जाते. अचानक निका ला काय झाल अशा अचंब्यात सिता प्रथमकडे बघते. प्रथम : सिता निका को छोडो हम कलही स्वामीजीके पास जायेंगे. उधर कुछ ना कुछ शांती करवाके आयेंगे. सिता मान डोलावते. प्रथम उठून निघून जातो. प्रथमच तिचे लक्ष प्रथमच्या कपड्यांकडे जाते त्याने पुर्ण काळा पेहेराव केलेला असतो आणि तो काला साया सेम टु सेम त्याच्यासारखाच वाटत असतो तिला आठवते. सिता जोरात परत एकदा किंचाळी फ़ोडते आणि धावत आपल्या बेडरुम मध्ये जाऊन दार लाऊन घेते
|
Asami
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:35 pm: |
| 
|
दोनो बहेने !!! खि खि खि लालू MT तुम्हे आम खानेसे मतलब है या गुठलीया गिननेसे TRP rating वाढवायचेव आहे न serial चे ? समस्त लुगडे brigade साठी एक एक जण move करू आपण इथे , हा जोह्न, अश्विनीचा उपेन, ललूचा आमीर खान
|
Dha
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:13 pm: |
| 
|
आता सिता व्यवस्थित bedroom मधे जाउन निवांतपणे बेशुध्द पडली वाटतं.
|
Ashwini
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:44 pm: |
| 
|
>>>अश्विनीचा उपेन Excuse me... उपेन कोण? अश्विनीचा डेरेक असं म्हणायचं होतं का तुला? का तुझी red sox निष्ठा तुला त्याचं नाव लिहीण्यापासून परावृत्त करते आहे? 
|
ए काय चाल्लय काय ??????? John आणि उपेन साठी माझे copyrights माहित नाही असा कोण आहे इथे ? असामी , तुला भर चौकात उभे करून टकलावर tattoo काढून घेण्याची शिक्षा ठोठावत आहे ..
|