|
Jayavi
| |
| Monday, May 29, 2006 - 12:50 pm: |
| 
|
विजेता नाचती ही प्रश्नचिन्हे फ़ेर धरुनी का अशी श्वास अवघड, ऊरी धडधड बावरी मी का अशी जीवनाच्या हर सवाला सहज उत्तर मी दिले लाभले जे हसत खेळत आजवरी स्वीकारीले आज मग का मी निरुत्तर आज मी का पांगळी का सुचेना मार्ग काही आज का मी वेगळी नियती ना अपराजिता माघार ना मी घेतली खेळ रडीचा जाहला तेव्हाच नियती जिंकली हार कधीही मानली ना आसवे गाळून मी सावरोनी घाव उरीचे बाजी हर जिंकेन मी रडविले मज हर घडी तू नाही परी मी अंकिता ताठ आहे ताठ राहीन मी विजेता मी विजेता
|
Naadamay
| |
| Tuesday, May 30, 2006 - 12:45 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी! सखी, जयावि छान!
|
सुमती ... जयावि .. मस्त ... नादमय ... सुंदर कविता सखी .... खूप आवडली ... निनावी , मूडी , मृण्मयी .... जयावी ... तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार ... असा कोणा एकाच्या कवितेचा स्वतंत्र बीबी असणे कितपत योग्य आहे ? असे आधी झाले आहे का ? मला कल्पना नाही आधी असे झाले आहे का ... असले तर त्याचे काय निकष आहेत ... असो पण निनावीच्या सूचनेने एक चांगला पर्याय मात्र दिसला मला समोर ... आपण असे करू शकू का की एक बीबी अश्या कवितांसाठी उघडायचा जिथे त्या कवितांवर चर्चा व्हावी असं कवीला वाटतं ... तिथे पोस्ट करताना प्रत्येकाला कल्पना असेल की ह्या कवितांच विश्लेषण होईल , शंका उपस्थित केल्या जातील , टीका होईल , चर्चा होईल ह्यावर सर्वांच मत मला जाणून घ्यायला आवडेल
|
मानसपूजन ... झाडलोट करुनी देहाचा परिसर केला स्वच्छ असे हृदयमंदिरी प्रवेश व्हावा आसन केले सिध्द असे आनंदाश्रू चरण क्षाळिती गंगाजल हे मानुन घ्यावे तद्नंतर मी मोह जाळितो आपण त्यासी धूप म्हणावे डोळ्यांच्या अक्षयपात्रातुन भक्तीला मी मांडियले ऐहिक तुलसीपत्र करोनी नैवेद्यावर ठेवियले समर्पणाचा दीप उजळला सूर्यचंद्रही करती हेवा मानसपूजन स्वीकारुनी तो कृपाहस्त माथ्यावर ठेवा प्रसाद म्हणुनी उच्चारती आशिर्वचने ते नेत्र जणू " पदस्पर्शे माझ्या झाली तव काया पावनक्षेत्र जणू "
|
Rmd
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:04 am: |
| 
|
वैभव्: अप्रतिम! तुझ्या पुस्तकाची आता जास्त आतुरतेने वाट पहात आहे.
|
Zaad
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:05 am: |
| 
|
सखी, कविता खूपच छान. माझ्या एका मित्राची पण अशीच अवस्था झाली होती, तेव्हा त्याच्यासाठी एक कविता लिहीली. खरं तर इथे टाकणार नव्हतो, पण तुझी कविता वाचून राहवलं नाही...... आधी वितळून ये आणि जरा हरवून ये मग असा बहरून ये... अचानक पाऊस म्हणून आठी नको यायला हवी वेळेप्रमाणेच कधीकधी अवेळही पाळायला हवी कागद पेन हवेत कशाला पावसातही यावेळी सरींप्रामाणेच बरसतील तुझ्याही मनात ओळी घनता विरघळून ये आणि जरा हरवून ये मग असा बहरून ये... का हवा दरवेळी पाऊसच पडायला का हवं कातरवेळी कुणीतरी आठवायला एखाद्या वेळी नं कवितेनंच फक्त असायला हवं कधी कधी मित्रा मोहोळच डसायला हवं आग भिणवून ये आणि जरा हरवून ये मग असा बहरून ये... ---------------------------------------------------- वैभव, तुझी कल्पना ग्रेट आहे, माझे पूर्ण अनुमोदन!
|
Giriraj
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:08 am: |
| 
|
आहा.. सखी! खूपच दिवसांनी चक्कर टाकलीस! वैभव,तू रंगिबेरंगी मध्ये जागा घेऊ शकतोस की!तिथेच सर्व कविता एकत्र ठेव..
|
ते झालं रे गिर्या ... मी म्हणतोय की सगळ्यांचाच एक असा बीबी जिथे healthy criticism, discussion होईल
|
Giriraj
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:26 am: |
| 
|
इथेही करता येईल तेच.. पूर्वी एक BB होता ज्यात कुणाला आपल्याच काहिश्या अपुर्या वाटणार्या किंवा मनासारख्या न उतरलेल्या कवितेबद्दल प्रतिक्रिया अपेक्षित असतिल तिथे टाकत असत... 'आहे मनोहर तरी... 'असे नाव होते त्या BB चे...
|
Sakhii
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:56 am: |
| 
|
सर्वांचे मनःपुर्वक आभार!! अनेक दिवसांनी, खरतर वर्षांनी म्हणायला हवं, मायबोली वर परतले आणि प्रत्येकाच्या निर्मीतीचा आनन्द मनापासुन घेता आला... श्यामलीची पहिली कविता, लोपमुद्राची तू, निनावीची राधा, रुतु हिरवा चि पर्देशातल्या मुलासाठीची कविता ते नादमयची जग आता बदललय, जयावीची विजेता, वैभव आणि झाड सारेच एकहुन एक.... सर्वांना माझ्या शुभेछा!
|
Giriraj
| |
| Tuesday, May 30, 2006 - 3:05 am: |
| 
|
मीही एक मृगजळ.. मृगजळाच्या प्रदेशातून परत येतांना अंगभर हसू मिरवत आणतो मी तुझं… आणि आश्चर्य वाटत राहतं माझ्या कल्पनांना चैतन्य देणाऱ्या या मृगजळाचं... माझ्या हाकेला तुझी उत्तरं मीच दिली आहेत तिथे... आणि तुला आश्चर्य वाटेल इतकी ती तुझीच आहेत... लखकन चमकलेली वीज कुठे संपते आणि कुठे पाण्यात शिरते नाहीच कळत.. तशीच तू आणि तुझे भास, आणि मग मीही एक मृगजळ… गिरीराज
|
Himscool
| |
| Tuesday, May 30, 2006 - 4:48 am: |
| 
|
वैभव नेहमी प्रमाणे ग्रेट... झाड सुरेख कविता... वैभव तुझ्या कल्पनेला माझेही अनुमोदन
|
Zaad
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:03 am: |
| 
|
kavita awadali khoop giri!!
|
Mruda
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:20 am: |
| 
|
Zaad....kavita mastach jamali ahe.... "Wele pramane kadhi kadhi , Awelhi palayala hawi..." Chan .... Ani Giriraj..." Ani mag mihi ek mrugajal " he kiti khara ahe.... Vaibhav....tujhya kavitela mala "Abhanga"ch mhanawasa watalay...tyat kiti aartata ahe....!
|
Milindaa
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:30 am: |
| 
|
'आहे मनोहर तरी... 'असे नाव होते त्या BB चे... <<< हो, तसा बीबी होता, सुरुवातीला सर्वांनी तेथे जाऊन खूप खूप (विधायक ??) बडबड केली आणि कालौघात तो बीबी वाळीत पडला, त्याच्याकडे कोणीही बघितले नाही आणि नेहमी जे होते तेच झाले (म्हणजे मॉड्स नी साफसफाई केली ) तेव्हा, असा बीबी उघडणे सोपे आहे, पण तो वापरात राहिला पाहिजे, हे जमणार असेल तरच हे करण्याला अर्थ आहे (असे मला वाटते).
|
Mruda
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:45 am: |
| 
|
अथांग रगींबेरगीं शंख आणि शिंपले चित्तवेधक ओच्यात साठवतांना नजर रेतिवर अचानक. . . . एक सुखद गारवा स्पर्शुन गेला पायांना अन् नजर उचलली गेली समोरच्या अथांगतेत भान सपूंन गेलं. ओच्यातलं छोटं विश्व कधी सुटलं कळंलच नाही. . आनंद उसळंला मन म्हणालं, तू माझ्या ओच्यात ये नाही? . . . . मग मला तरी सामावून घे अन् बघता बघता सारंच हरंवलं. . मी कोण? तू कोण? तू? की फ़क्त मी. . की फ़क्त तूच. . फ़क्त तूच. . . . मृदा
|
जयु, ये हुई ना बात!! 'विजेता' विजेताच ठरली ग, सुंदर वैभव, मानसपुजा खासच. अरे आशी मानस पुजा केल्यावर तर देव प्रसन्न होणारच GR8
|
Arun
| |
| Tuesday, May 30, 2006 - 7:11 am: |
| 
|
पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्या .............. नवीन काय ??? कालचाच सुर्य आज, कालचाच वारा सर्व काही कालचेच, मीच आज वेगळा नेहमीचेच सखे सोयरे, नेहमीचेच सवंगडी नेहमीच्याच गप्प टप्पा, नेहमीचीच वीडीकाडी काय आज नवे नवे, प्रश्न मनात दाटतात कालच्याच जुन्या मी चा, प्रश्न देखील जुना जुना नवीन काय? नवीन काय? शोध कधी संपणार? शोध हा संपल्यावर, मी नवीन काय शोधणार?
|
पाहिले काल आरशात मी दिसले मजला चेहरे दोन चेहरे माझे एक दुजाला विचारति प्रश्न आहेस कोण एक बोले मी समुद्र वेडा सत्य तरी मी अथांग खोल दुजा बोलला झरा असे मी मीही सत्य हे वाहणे फोल अरे असे मी मुग्ध पौर्णिमा प्रणयसाक्षी मी लज्जित पोर मी असे ती दग्ध अमावस दृश्य मजला ते कंपित दोर जन्मतो सूर्य उदरी माझ्या मी पूर्व माता प्रत्यान्हीची मी पश्चिमा मी मित्रप्रिया शमवते आग मध्यान्हीची हसति चेहरे एकदुजाला प्रसवति चिंतेचे लोण असति चेहरे माझे मजला कळे तरी ना मी आहे कोण
|
अरुण सुस्वागतम .. प्रयत्न छान आहे रे ... झाड ... गिर्या ... आवडल्या कविता .. मृदा ... तू तर चारोळीच्याही पुढे गेलीस ..
देवा ... मस्त रे ...
|
|
|