कधीतरी सरणार माझ्या कवितांचा ठेवा मग सार्या जीवनाचे काय करायाचे देवा ?
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:17 pm: |
| 
|
नाही जरुरी सुमने काय कर्तव्य धुपाचे सावळ्या या देवा माझ्या शब्दही आज साज वाटे श्यामली!!!
|
वैभव, काय अप्रतीम लिहितोयस म्हणून सांगू! कमित कमी स्वत:च्या नावाचा एक BB रंगीबेरंगीत उघडून तिथे तरी टाक हे सगळं. निनावी म्हणते तसं परत परत वाचता येतील! श्यामली खूप छान लिहिते आहेस. आणखी होऊन जाउ दे.
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:21 pm: |
| 
|
नाही सरत हा ठेवा जसा आईचा हात देवा देव देताच राहील घेरे भरभरुन वैभवा श्यामली
|
क्या बात है श्यामली!
|
धन्यवाद मृण्मयी , श्यामलि ... असा मायेचा वर्षाव माझे डोळे पाणावले आहे सार्यांत लपले त्याचे रूप जाणवले
|
तुम्ही दोघीसुध्दा खूपच छान लिहीताय .... असाल थोडा वेळ तर लिहा आणखी
|
अशी झलक देऊनी कसा अदृश्य झालासी काही स्नेहीतांच्या रुपे खुणा ठेवुनी गेलासी
|
आज माझ्या सोबतीला शब्द जागतोय त्याचा माझ्या गात्रांत राहून वंश सांगतोय त्याचा
|
मिटताच हे लोचन तुझे रूप उभे राही भावांचीच फुले देवा पूजा सफल रे होई
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:35 pm: |
| 
|
आईची माया कधी आटेल का बाळा माझी देतीच ओंजळ का रे पाणी तुझ्या डोळा श्यामली!!! मृण्मयी,वैभव...आज पहिल्यांदाच वेगळ्या विषयावर लिहितिये काहितरी..... जमतय का? 
|
नाममात्र हे अस्तित्व नावपुरते हे नाव नाममात्र शब्द माझे तूचि भरलास भाव
|
मला आणखी आणखी लीन व्हावयाचे आहे सारी ऐहिके अर्पून दीन व्हावयाचे आहे
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:42 pm: |
| 
|
आहाहा वैभव..... काय भाव आहेत रे....
|
ह्याच बोटांनी रे बाळा तुला भरविले घास आज थरथरे हात तरी वात्सल्याचा ध्यास
|
श्यामलि ... छानच लिहीते आहेस .. प्रामाणिक आहे ... वाडवडिलांच्या रुपे मला भासतोस थोर कधी बालकाच्या रुपे तुझे दर्शन विभोर
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:47 pm: |
| 
|
सारी ऐहिके अर्पुन वाटे दीन व्हावे देवा हा देह तोडतो रे तुझ्या माझ्यातला दुवा श्यामली!!!
|
असे एकांती बैसता तुझा ध्यास दुणावतो तुझ्या द्वारकेचा कृष्णा मला भास खुणावतो
|
वैभव, आज अगदी भक्तिरसात...! असंच लिहित रहा!
|
बघ जाहलो आता मी सार्या जगाला पारखा मनावरती निळाई देह जाहला द्वारका
|