अरे आता तरी इथे उभा होता ना सामोरा गर्व झाला दर्शनाचा अन झाला पाठमोरा ?
|
कसा लबाड हा भक्त तुला पुरते गोवले नाव तुझे आता देवा श्वासा श्वासांत ओवले
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 3:33 pm: |
| 
|
शांत शांत नीळाईही मज कृश्णरुपी भासे झाले जग शांत शांत मनी राधीका का वसे? श्यामली!!! नमस्कार गुरुजी!!!
|
नको सांगूस कुणाला कसा भेटलास मला मी ही बोलणार नाही श्वास आनंदे थांबला
|
नमस्कार श्यामली अशी तुझ्या संगतीत यावी पहाट सोनेरी आणि तिथेच सरावी एका जीवनाची फेरी
|
अश्या सात रात्री मला देई दर्शन तू देवा सप्ताहच भागवताचा प्राण सुटूनी सरावा
|
सोनसळी पहाटेत तुझ्यासवे रे नहावे उगवावा दिन तेथे जीणे कृतार्थ की व्हावे वैभव, श्यामली झकास!!!!!
|
कसे तुला पाहुनिया वाटे नको काही काही पुन्हा निघून जाशी तू पुन्हा तीच लाही लाही
|
नमस्कार मृण्मयी कशासाठी भक्तासांगे खेळतोस छुपाछुपी कसे शोधावे तुला मी ? प्रभूराया बहुरूपी
|
कोण कुणाला भेटले प्रश्न निरर्थक आहे तुला ऐच्छिक असावे मला आवश्यक आहे
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 3:54 pm: |
| 
|
देई दर्शन देवा प्राण आले हो कंठाशी ऊगा का करता वीठ्ठला थट्टा या पामराची श्यामली!!! मृण्मयी....वाह
|
देव हृदयात राही असे ऐकलेले मी ही पण शाईत कधी तू कधी लेखणीमध्येही ?
|
नमस्कार वैभव, कुठे लपाछूपी वत्सा जरी रुपेही अनेक शोध हृदयामधे त्या माझे अस्तित्व तिथेच
|
कसा सूक्ष्मरुपे देवा माझ्या लेखणीत येशी कसा विराट होवुनी शाईमधून वाहशी
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:02 pm: |
| 
|
ईथे तीथे मी शोधले परी सापडेना मला गुढ अंतरी लागला शोध तुझा रे विठ्ठला श्यामली!!!
|
आज फळाला आली रे माझी सारीच पुण्याई आज भेटून गेलासी उरली ना आस काही
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 4:05 pm: |
| 
|
दारी तुळस मंजीरी घरी चंदनी देव्हारा देवा तुझ्या सेवेसाठी मांडीला रे हा पसारा श्यामली!!!
|
तुझिया हृदयी मम अंश उरे चराचरातही तुझी लेखणी निव्वळ मूर्ती रेखी वज्रदेही
|
मला ठाऊक नाही रे नाही श्लोक ना आरती शब्दसुमनांनी पूजा कवितेचा टिळा माथी
|
देवा असा सदोदित मला आशिर्वाद द्यावा शब्द तुम्ही उच्चारावा पामराने तो लिहावा
|