टिप टिप थेंब.. तुषार.. ओवती केसांवर मोत्याची माळ.. पारदर्शी माणिकमोती.. येता जाता भेटुन जाती शिडकावे सुखद स्पर्शाचे... तुझी आठवण करुन देती...!!!
|
Princess
| |
| Friday, May 26, 2006 - 4:35 am: |
| 
|
वैशु, क्या बात है भई!!! बहोत अच्छे
|
Abhijat
| |
| Friday, May 26, 2006 - 7:13 am: |
| 
|
साजण ध्यानीमनीहि नसताना तो अवचित येथे आला ग! तापलेल्या तनूस माझ्या विझविण्या तो आला ग! तृषार्त ऐश्या मनस माझ्या शान्तवून तो गेला ग! मोहरल्या माझ्या शरीरि हिरवी शिरशिरी आली ग! नकोस शिणवू डोके अपुले सोडविण्या हा उखणा ग! मोहरलेली धरती मी अन पाउस माझ्या साजण ग!
|
Poojas
| |
| Friday, May 26, 2006 - 1:43 pm: |
| 
|
सगळेच.. .. .. उत्तम लिहिताय. लोपा.. सुरेख गं.. अशीच लिहीत रहा छान छान. फक्त आमचं कौतुक करत बसू नकोस.. '' माझी माती लांब सयी'' .. .. .. केवळ अप्रतिम
|
>>>लोपा.. सुरेख गं मला वाटलं हे वरच्याच कवितेचा भाग आहे
|
Shyamli
| |
| Friday, May 26, 2006 - 2:06 pm: |
| 
|
मीनु वैशालि छानच.... .. .. .. 
|
नभी दाटलेले मेघ माझी ओंजळ उकली पुन्हा यायचे आमीष वारा दावितो वाकुली मेघा
|
नको तुझी ही मिजास मीही दाखविला तोरा भेट तुझी पत्थराशी मला छेडतील धारा. मेघा
|
Jo_s
| |
| Saturday, May 27, 2006 - 12:22 am: |
| 
|
उर भरुन येता मेघ लागतील झरू सारं प्रसन्न होईल हे क्षण किती कसे धरू सुधीर
|
Smi_dod
| |
| Saturday, May 27, 2006 - 12:42 am: |
| 
|
मोठे अंतर चालुन आले खाचखळगे, दर्याखोर्या कधीचे पार केले मागे वळुन बघताना जाणवते.. एवढे कसे पार झाले एवढी जीजीविषा, कुठुन आली? आता मात्र सगळ्यांच्या पार झाले ओळखीचे प्रदेश दुर राहीले
|
कधी जगायाची भिती कधी मरायाची भिती तुला भेटायला देवा सांग झुरायाचे किती ?
|
एक दर्शन लाभण्या काय कठीण परिक्षा एका श्वासाचे अंतर ती ही वाटे घोर शिक्षा
|
उन्ह जगण्याचे डोई अन डोळ्यांत पाऊस कशी काढायची वाट नाही तुझा मागमूस
|
एक झुळूक सुगंधी मज स्पर्शुनिया गेली काय तूच घातलेली साद होती अलबेली ?
|
आज पावसाच्या रुपे प्रभू अंगणात आला डोळे भरून पाहता जीव थोडा थोडा झाला
|
बघ तुझिया दिशेने आता निघाले हे पाय आता तूच द्यावयाचा पायपिटीला ह्या न्याय
|
गाभार्यात एक रूप आणि मनात निराळे कधी स्नानासाठी गंगा कधी भक्तीचे उमाळे
|
किती शांत रात आहे स्तब्धताच जिथे तिथे तुझी पावले वाजली आता मी ही नाही इथे
|
अशी वीज लकाकली जणू तूच हासलासी नभापासून धरती तूच तूच भासलासी
|
आता अंधार होईल उद्या पुन्हा उजाडेल पुन्हा तुझ्या दर्शनाची आस खुळी पछाडेल
|