|
best MruNamayii!!!... .. .. .. .. ..
|
Ninavi
| |
| Saturday, May 27, 2006 - 7:02 pm: |
| 
|
मृण्मयी, कविता अप्रतिम. वैभव, कवितेबाबतचे सगळे मुद्दे बिनशर्त मान्य. मंत्र तुला साधलाय हे यापूर्वी माझ्यासकट अनेकांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगून झालंय म्हणून थोडी तांत्रिक शंका विचारायचं धाडस केलं. ते ही मला हे वृत्त वगैरे प्रकरण आत्ता आत्ताच समजायला लागलंय म्हणून. माझी प्रगती झाल्ये म्हणून नव्हे, ती होण्यासाठीच. सविस्तर explain केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्या निमित्ताने इथे इतरांनाही ' हे गालगागा काय आहे, कसलं वृत्तं?' असा प्रश्न पडून त्याची अधिक माहिती मिळवावीशी वाटली तर आपण दोघांनीही जिंकली. हो ना? तू सारंगचा विषय काढलास, तो वाद तू कितपत follow केला होतास मला माहीत नाही, पण त्याने त्याच्या कवितांबाबतच्या शंका उडवून लावताना इतरांवर टीका करायचं धोरण अवलंबलं होतं असं लक्षात आलं म्हणून ते प्रकरण वाढत गेलं होतं. तो वाद जसा जाहीरपणे झाला तसा जाहीरपणे मिटलाही होता. वादाच्या भरात बोललेल्या अधिक उण्या शब्दांबद्दल मी त्याची जाहीर माफीही मागितली होती, आणि त्यानेही अतिशय खिलाडूपणे ती स्वीकारली होती. आम्ही चांगले मित्र झालोय आता. असे सोबती इथे भेटतात म्हणून तर व्यसन लागतं मायबोलीचं. पण ते असो. परवा युवराजने सहज बोलता बोलता आमंत्रण दिलं म्हणून मुलुंडच्या बीबीवर गेले होते. कवितेतले बरेच जाणकार, दर्दी लोक असतात तिथे. आणि अतिशय उद्बोधक चर्चा करतात. कवितांबाबत, आणि त्याहीपेक्षा कवितेच्या बीबी बाबत. मग तीच चर्चा इथे का करीत नाहीत कोण जाणे. त्यातले बाकी हास्यास्पद आणि अपमानास्पद भाग वगळल्यावर मला खड्यांतून तांदूळ शोधावा तसा हा एक विचारणीय मुद्दा सापडला. की इथे नुसती वाहवा होते, साधक बाधक चर्चा होत नाही. मग म्हटलं आपणच पुढाकार घ्यावा. वाहून जाणार्या बीबीवर किंवा आपापसांत मेलवर गॉसिपिंग करणं सोपं असेल, इथे प्रसंगी वाईटपणा घेऊनही उघड बोलणं मी तरी जास्त पसंत करीन. पण तेही असो. मग, कधी टाकतोयस ती नवीन कविता? 
|
Pendhya
| |
| Saturday, May 27, 2006 - 7:38 pm: |
| 
|
समीक्षणासाठी वेगळा बीबी असेल तर मी एक नवीन कविता लगेच टाकायला तयार आहे >>>>>> मला, वैभव चं मत पटतं. " काव्यधारा " ह्या श्रॄंखलेतच, " काव्य लेखन - एक चर्चा " , किंवा, " कविता लेखन - एक समीक्षण " अशा नावाचा एक बीबी काढायला काहीच हरकत नाही, जेथे, मायबोलीवरचे समस्त कवि, ह्यावर चर्चा करु शकतील. आणी ह्यातून काव्य लेखनाची देवाणघेवाण करु शकतील. असे केल्याने, निनवी ने म्हंटल्या प्रमाणे, कविंची आणी कवितेची वाढ होण्यात, हे नक्कीच ऊपयुक्त ठरु शकेल. तसेच, नव - कविंना, ईथल्या मान्यवर कविंनी दिलेल्या माहितीचा, नक्कीच लाभ घेता येईल. नाही मूडी, माझा, कवि होण्याचा आणी तुला आणी ईतरांना त्रास देण्याचा प्रयत्न नाहिये. म्हणजे, माझ्यात काव्य करण्याची क्षमता पण नाही आणी ते ज्ञान ही नाही. आणी श्यामले, मूडी, निनावी, मी ईथे चुकुन आलेलो नाही. मी ईथे नियमीत वाचन करीत असतो, पण मला खरच ( कवितेला साजेशी ) , प्रतिक्रिया देता येत नाही. बीबीवरची जागा घेतल्याने क्षमस्व!
|
अतिशय उद्बोधक चर्चा करतात. कवितांबाबत, आणि त्याहीपेक्षा कवितेच्या बीबी बाबत. ??????? कवितेच्या बाबतीत ठीक आहे ... बीबी बाबत ? मग काय उपयोग ? निनावि ... तुला एक सांगू का ? मायबोलीच्या वेबपेज चं स्ट्रक्चर .. म्हणजे जिथे एकाच कवितेच्या खाली दुसरी कविता किंवा प्रतिक्रिया काहीही असू शकतं तिथे असं समीक्षण अवघड आहे ... स्वतंत्र बीबी जरी उघडला तरी काय ? इथे कविता टाकायची आणि तिकडे त्यावर चर्चा करायची .. ते user friendly नाही होणार असं वाटतं मला ... म्हणजे सद्यस्थितीत इथेच एकच पर्याय आहे तो म्हणजे कविता इथे लिहायची ... जर त्या कवितेत तितकी ताकद असेल तर लोक आवर्जून वाचतात , प्रतिक्रिया देतात ( च ) ... जर प्रभावी नसेल ती कविता तर अनुल्लेख होतो ... which is enough critisism/punishment for any artist असं नाही वाटत तुला ? हां आता बरेच जण कामात व्यग्र असल्याने वगैरे प्रतिक्रिया देवू शकत नाहीत ... शंका उपस्थित करू शकत नाहीत ... पण मग ते मेलवर होतंच ना ? जोवर ह्याला चांगला पर्याय मिळत नाही तोवर असंच चालणार असं मला वाटतंय .. कुणी जर Admin शी संपर्क साधून काही करू शकत असेल तरच .. मला विशेष माहिती नाही .... असो .. शिक्षण आणि प्रगतीचंच म्हणत असशील तर त्या वृताला काय म्हणायचं हे माहीत नसलं तरीही त्यात लिहीलेलं कानाला चांगल लागतं हे साध्या वाचकालाही कळतं तर कवींना का नाही कळणार ? त्यांना त्या लयीत नवीन लिहायला का नाही सुचणार ? तुझ्या छंदबध्द चारोळ्यांशी जुगलबंदी करत करत , तुझ्या कविता वाचत वाचत मी नाही शिकलो ? ( मी नवीन काही बदल होइपर्यंत ह्या विषयाला सुट्टी दिलेली आहे )
|
Shyamli
| |
| Sunday, May 28, 2006 - 6:54 am: |
| 
|
मृण्मयी... खरच खुप संवेदनाशिल विषय आहे हा.. तु प्रत्येक वेळेला वेगळा विषय हाताळतियेस... अजुन काही भरपुर वेगळं वाचायला मिळणार म्हणजे आम्हाला पेंढ्या निनावी.....,वैभव मोठ्या माणसांमधे लहान मुलांनी बोलु नये म्हणतात
|
Jayavi
| |
| Sunday, May 28, 2006 - 10:33 am: |
| 
|
आई गं! दोन दिवस इथे यायला मिळालं नाही तर सगळं overflow होऊन गेलं . अगदी आधाशासारखं वाचून काढलं. काय एकसे बढकर एक कविता आहेत.........मज्जा येतेय! चलने दो
|
Ninavi
| |
| Sunday, May 28, 2006 - 9:22 pm: |
| 
|
पेंढ्या वैभव, बरोबर आहे तू म्हणतोयस ते. अगदी पटलं मला. ( माझ्याकडून तू शिकलास हे नव्हे.) माझ्याकडून पण सुट्टी या विषयाला. मी वादाच्या भरात मी तुला दुखावलं असेल तर सॉरी. चला आता नसते वाद न घालता पुन्हा कवितांकडे वळू या. 
|
Dineshvs
| |
| Sunday, May 28, 2006 - 9:32 pm: |
| 
|
मृणमयी, सती आवडली. पण अजुनहि हे प्रकार होताहेत, अगदी मुंबईत देखील सती मंदिरे नव्याने होताहेत. निनावि, मुद्दा पटला, पण ईथे सहसा टिका करणे टाळले जाते हे खरेय. जर तु सुरवात करणार असशील, तर चांगली गोष्ट आहे हि.
|
Naadamay
| |
| Monday, May 29, 2006 - 12:29 am: |
| 
|
मृण्मयी, सती खूपच छान आहे
|
उखाणा लहानपणी... कुठल्यातरी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात आजीसोबत जायचे तेव्हा... एखाद्या बाईने केलेली मस्करी... ' नाव घे नवर्याचं ' ... ऐकताच मी ' नसलेल्या ' नवर्याच्या जाणिवेनं स्वतःशीच लाजू लाजू व्हायचे अन कावरीबावरी होऊन दडायचे आजीच्या पाठीशी. मग आजीच मागून ओढत म्हणायची, 'अग, विचारतात तर घे उखाणा.. आफ़्रिका, अमेरिका मी आहे कुमारिका मला नाव विचारू नका'. मी मात्र अधिकच संकोचत खोल खोल दडून बसायचे तेव्हा. आता.... ' हक्काचा नवरा ' असतानाही कुठल्यातरी हळदी कुंकुवाच्या समारंभात एखाद्या बाईने मस्करी केली तरी... ' नाव घे नवर्याचं ' आग्रहानं म्हटलं तरी... फुलून येत नाही मन, नाही उठत शहारा नाही नजर झुकत खाली, नाही चेहरा लाजरा आतून... आतून... आठवत राहतो आजीचा उखाणा अधूनमधून... हळदी कुंकू टाळण्याचा... शोधत राहते बहाणा.
|
दोस्तांनो .... मायबोलीवरच्या वर्षभराच्या प्रवासात लाभलेल्या अपार कौतुकाने मला जो आत्मविश्वास मिळाला त्यामुळे मी काल पहिल्यांदा "शब्दवैभव" काव्यसंमेलनामध्ये माझी कविता सादर करण्यास लायक ठरलो . येथील सर्व स्नेहीतांच्या ऋणातून मी उतराई होवु इच्छित नाही पण आभार म्हणून मी काल सादर केलेली कविता मायबोली चरणी अर्पण करतोय ... तुझी आठवण .... शुभ्रफुलांची नभात पखरण सागरातले अमृतमंथन धरतीवर रंगांची उधळण .... तुझी आठवण मेघांभवती सुवर्णकंकण सरी सरीतून सुरेल नर्तन थेंब नवे पण जुनाच श्रावण .... तुझी आठवण डोळ्यांना स्वप्नांचे तोरण हृदयावर हृदयाचे गोंदण माझ्या कवितांसाठी कोंदण .... तुझी आठवण वरवर हासत झुरणे क्षणक्षण अखंड अविरत तुटणे कणकण अशी जागच्या जागी वणवण .... तुझी आठवण पाण्यावरचा दिवा चिरंतन पुनःपुन्हा आयुष्य समर्पण सरते जेथे माझे मी पण ... तुझी आठवण .... तुझी आठवण
|
Shyamli
| |
| Monday, May 29, 2006 - 1:18 am: |
| 
|
अखंड अविरत तुटणे कणकण अशी जागच्या जागी वणवण>>>>> अभिनंदन.....
|
Meenu
| |
| Monday, May 29, 2006 - 1:19 am: |
| 
|
वैभव कविता सुंदरच पण कालचा कार्यक्रम कसा झाला ते पण लिही ना... .......
|
अश्विनी पुजा, सुंदर.. काय चाललय काय तुमचं यार सुंदर, अप्रतिम, लाजवाब, आजुन काय लिहु???? आणी वैभव ने तर कळस च केलाय. ‘माझ्या कवितां साठी कोंदण तुझी आठवण!! क्या बात है!!!!!!
|
Jyotip
| |
| Monday, May 29, 2006 - 2:35 am: |
| 
|
सरते जेथे माझे मी पण ... तुझी आठवण वैभव अप्रतिम..
|
Rmd
| |
| Monday, May 29, 2006 - 2:41 am: |
| 
|
वैभव्: कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत... केवळ अप्रतिम!
|
Jayavi
| |
| Monday, May 29, 2006 - 3:31 am: |
| 
|
वैभवा, तुझं काव्यवैभव शब्दातीत आहे रे! 'थेंब नवे पण जुनाच श्रावण','मेघांभोवती सुवर्णकंकण'........ अरे प्रत्येक ओळ अन् ओळ खास आहे रे! keep it up !
|
व्वा! 'थेंब नवे पण जुनाच श्रावण...' खासच!!जबरी!! -चिंगी
|
Mruda
| |
| Monday, May 29, 2006 - 5:01 am: |
| 
|
Hi..... मी इथे नविन आहे. तुम्हा सर्वांशी मैत्री करायची इच्छा आहे. माझी एक चारोळी इथे देते आहे. चारोळी मला माहिती नव्हंतं असंही असतं जिणं ओठांवर हसू गोंदवून स्वत्:चे अश्रू पिणं
|
Jayavi
| |
| Monday, May 29, 2006 - 5:51 am: |
| 
|
वा मृदा, आगमनातच षट् कार! मस्त आहे तुझी चारोळी. तुझं स्वागत आहे या आपल्या मायबोलीवर
|
|
|