Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 03, 200620 05-03-06  2:41 am
Archive through May 05, 200619 05-05-06  3:00 am
Archive through May 06, 200620 05-06-06  1:34 am
Archive through May 08, 200620 05-08-06  8:54 am
Archive through May 09, 200620 05-09-06  10:25 pm
Archive through May 11, 200620 05-11-06  6:58 am
Archive through May 15, 200620 05-15-06  3:01 am
Archive through May 16, 200620 05-16-06  9:46 am
Archive through May 17, 200620 05-17-06  6:53 am
Archive through May 18, 200620 05-18-06  6:36 am
Archive through May 19, 200620 05-19-06  12:10 pm
Archive through May 21, 200620 05-21-06  2:15 am
Archive through May 22, 200620 05-22-06  4:53 am
Archive through May 22, 200620 05-22-06  10:49 am
Archive through May 23, 200620 05-23-06  10:14 am
Archive through May 24, 200620 05-24-06  12:12 am
Archive through May 24, 200620 05-24-06  7:05 am
Archive through May 25, 200620 05-25-06  2:20 am
Archive through May 25, 200620 05-25-06  6:45 am
Archive through May 26, 200620 05-26-06  11:03 am
Archive through May 27, 200620 05-27-06  12:28 pm
Archive through May 29, 200620 05-29-06  5:51 am

Naadamay
Monday, May 29, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, हार्दिक अभिनंदन!
कविताही अगदी खासच आहे


Kalpak
Monday, May 29, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदा छान, अश्या चारोळ्या झुळूक मधे असतात.

Naadamay
Monday, May 29, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जग आता बदलतंय..

हल्ली माझ्यासारखीलाही
हळदीकुंकवाला अगत्याने बोलावतात
हळदीकुंकू देत नाहीत पण
डाळ पन्हं मात्र देतात
झालंच तर वाणसुद्धा!
मी आपली हसत खेळत
इतर सवाष्णींमधे रमत
मनाशीच कुजबुजते, जाऊ दे!
हल्ली साधी टिकली तरी
कुठे लावताहेत बायका
जग आता बदलतंय..

लग्नकारणांनाही जाते मी
जावंच लागतं, घरात कर्ती मी
अक्षत पडते पेढा येतो
मागून अत्तर गुलाबही येतो
मला कुंकू लावायला येतात
आणि शेजारच्याच काकू अडवतात
"अहो, नको, त्यांना नाही लावायचं"
मी पुन्हा मनातच म्हणते
बोलावताहेत काय कमी आहे
शेजारी बसू देताहेत काय कमी आहे
जग आता बदलतंय..

परवाच मी लेकीचं लग्न लावून दिलं
कुंकवाच्या पश्चात कुंकू दिलं
देवक मात्र दीरांना ठेवू दिलं
इच्छा असूनही मला सर्वांनीच नाकारलं
पत्रिकेत शेवटी नाव मात्र घातलं
फोटोंमधेही मला स्थान दिलं
कन्यादान या हातांनी नाही झालं
पण खरं दान मीच केलं
जग आता बदलतंय....

खूप वाटतं बंड करावं
बंधनांना झुगारून द्यावं
आलवण,वपन सोडून दिलं तसं
लपणं, बुजणंही सोडून द्यावं
कुंकू पुसलं म्हणजे का वैधव्य?
कर्तृत्वाने घर चालवलं तेही वैधव्य?
दोन भूमिका समर्थपणे पेलल्या तेही वैधव्य?
आजची कोणतीही स्त्री हे करतेच
मग कसं हरवेल माझं सौभाग्य?
कुंकू गजरा मेंदी हे तर मात्र निमित्त
मी वेगळी नाही एवढंच माझं म्हणणं!





Himscool
Monday, May 29, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व कवींचे आणि कवयित्रींचे मनापासून कौतुक... दोन दिवस मायबोली वर आलो नाही की अशीच प्रतिक्रिया देणे भाग पडते...
सगळ्यांच्याच कविता सुरेख असतात...
प्रत्येक कवितेला स्वतंत्र अभिप्राय देण्याची इच्छा असूनही ते जमत नाही...काय करणार 'नाविलाज को क्या इलाज'
हिमांशु



Mruda
Monday, May 29, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरवर हासत झुरणे क्षणक्षण
अखंड अविरत तुटणे कणकण
अशी जागच्या जागी वणवण
.... तुझी आठवण
Classic....! Pratyekane ekda tari ghetalela ha anubhav kiti chapkhalpane mandalay.....Abhinandan...Vaibhav!

Ani ho....Thanks Jayavi ani Kalpak....

Shyamli
Monday, May 29, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा............. .. ..

नादमय खासच..
मृदा...स्वागत


Poojas
Monday, May 29, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय.. खूप सुरेख.. स्त्रीचं दु:ख शब्दात मांडणारे कित्येक जण वाचले.. पण तू मनाचा ठाव घ्यावा असं लिहितोस रे.. .. ..तुला हे सुचावं यातच तुझं यश..

मृदा.. छान. गुलमोहोर वर तुझं स्वागत

वैभव.. आठवणीत राहण्याजोगी कविता.. अप्रतिम.
तुझं शब्द वैभव ही असंच वृध्धिंगत होवो.. आणि आम्हाला तुझं पुस्तक वाचण्याचा योग लवकरात लवकर येवो.. ..


Chingutai
Monday, May 29, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय,
साधी आणि सुरेख! नेमके भाव टिपलेस..मस्त जमलीय.

-चिंगी






Neela
Monday, May 29, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,

Sorry for the late response. I have accessed my webpage after a long time and could see your comments this morning. It would be my pleasure to assist you in the matter you asked. You can send me email on
neelambarij@hotmail.com

Sakhii
Monday, May 29, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


क्वचित कधी उसंत मिळली तर...
डोळ्यातली आसवं शोधतना
हाताला लागतात केवळ
मिठाचे खरखरीत खडे....

मग आठवतात,
जुन्या हळव्या कविता, आसवांत भिजलेल्या....

सरत्या काळाबरोबर
कसे निगरगट्ट होत गेलो आपण....
कवितही हरवली अन आसवंही आटली....

आताशा जर वाटलंच कधी लिहावं
तर सुचत नाहीत शब्द, रीत्याच राहतात जागा
अन दाटलीच जर आसवं, तर असह्या होतात,
मिठाच्या खड्यांतील चुरचुरणार्या भेगा...

तेवढ्यात संपते उसंत
अन व्यवहारीपण येतं उफ़ाळुन...
अरे देवा... अजुन थोडी उसंत दे,
मला पुन्हा एकदा पहायचंय रडुन.....


Ninavi
Monday, May 29, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय, सुंदर.
सखी, अप्रतीम.

वैभव, जियो. सगळ्याच प्रतिमा सुंदर आहेत.. ' जागच्या जागी वणवण' तर अगदी केवळ!!

मी तुला एक सुचवू का? तुझ्या सगळ्याच कविता पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या असतात. इथे शोधून शोधून वाचाव्या लागतात. तुझं पुस्तक येईल तेव्हा येईल, पण तोवर तिथे पद्य मधे तुझा एक बीबी उघडून तिथे सगळ्या एकत्र ठेवल्या तर?

इथल्या सगळ्यांचं आणि मॉड्सचं मत जाणून घ्यायला आवडेल मला या बाबतीत.


Jayavi
Monday, May 29, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तुम भी जियो यार.......काय मस्त सुचवलं आहेस. माझा पूर्ण पाठिंबा आहे :-)

नादमय, अप्रतिम कविता............ मला माझ्या आईचीच आठवण आली रे! एक पुरुष असून सुद्धा तू स्त्रीमनाच्या भावना इतक्या कशा छान उतरवू शकलास..... great !

सखी,खूप सुरेख!


Mrinmayee
Monday, May 29, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय, खूप भावपूर्ण कविता. फार फार खरी! जया, सखी सुंदरच!

Moodi
Monday, May 29, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी तुला अनुमोदन. वैभव खरच विचार कर. गुलमोहर नाव घे त्या कवितासंग्रहाला( अर्थात दुसरे पण चालेल). भर उन्हात लालबुंद डवरलेला गुलमोहर रस्त्याच्या दोन्ही बाजूने जयविजय सारखा पहारा करतो ना ते दृष्य पण अती मोहक असते. म्हणुन गुलमोहर नाव आवडले.

बाकी तुमचा समिक्षणाचा विचार सध्या राहू द्या. जुननंतर बघा मॉडना विचारुन त्या विषयी. आम्ही वाचक तर कायम आसुसलेले असतो तुमच्या कवितांसाठी. त्यात या कवितांच्या अनेक अंगांची माहिती कळली तर दुधात साखर.

पेंढ्या तू मग सिंहगड रोडच्या बीबीवर काय लिहीलेस त्या रात्री?

सखी, जयावी, नादमय निव्वळ अप्रतीम. नादमय अनेक स्त्रीयांचे मुक दुख या कवितेतुन प्रकट झालय.

वैभव आठवणींचे सुवर्णकण खरच खुपच सोनेरी आहेत.

जयावी विजेता अतिशय सुंदर.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators