Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 27, 2006 « Previous Next »

Moodi
Friday, May 26, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी वा!! सुरेख!! खरच तु, वैभव, निनावी, नादमय, सुमती, पूजा अन आणखीन जर कुणी राहिले असतील तर माफ करा, पण तुम्ही सर्व संगीताची एक सुरावट आहात.

एक सा आहे तर दुसरा रे बनुन त्याच्या सूरात सूर मिळवतो. व्वा!!
प्रेमाला उपमा नाही म्हणतात पण आम्ही रसिक म्हणतो की इथे मायबोलीकर कवींनाच उपमा नाही.


Sandu
Friday, May 26, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! छान आश्विनी! मस्तच

Poojas
Friday, May 26, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे..ऽऽऽ
दोन दिवस नव्हते.. तर कसं अधाशासारखं वाचून काढलं सगळं !!
कसलं सुरेख लिहिताय तुम्ही
श्यामली नादमय, अश्विनी, वैभव, गणेश,निनावी.. आणि चुक्कुन
कुणी राहीले असतील ते.. आता काय म्हणू मी..
'' अप्रतिम.. सुरेख.. just superb...!!! ''

महत्त्वाचं म्हणजे '' मूडी आणि अमेय''.. तुम्ही दोघं खूप छान
कौतुक करता.. पण.. मग कविता का नाही करत.. ?
आता सांगू नकात की कळा येत नाही म्हणून....


Poojas
Friday, May 26, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'' नकोच.. .. .."

नकोच आशा नको दिलासा
नको व्यथांचा रिता उमाळा..
नकोच वचने नको खुलासा
नको स्मृतींचा रुक्ष जिव्हाळा..

नकोच रुसवा नको बहाणा
नकोच फसवे शब्द लाघवी..
नकोच लटका राग शहाणा
नको बोलणे मृदु आर्जवी..

नकोच स्वप्ने नको कल्पना
नको अवास्तव वृथा अपेक्षा..
नकोच जखमा नको यातना
नकोच फुंकर नको प्रतिक्षा..

नकोच प्रीती नको वंचना
नकोच चिंतन जुन्या क्षणांचे..
नकोच नाती नको वल्गना
नकोच ओझे तुझ्या ऋणांचे..

नकोच कोणी नकोस 'तू' ही
नको नकोसा मलाच 'मी' ही..
तरी अखंडीत उरलो माझा
मीच एकटा विरक्त देही.. !!


Giriraj
Friday, May 26, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,सहीच रे 'निर्मिति!'
(तुला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत असं ठरवलं होतं खरं तर! :-))

Shyamli
Friday, May 26, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकोच कोणी....... एकटा विरक्त देही.. !!....
क्या बात है पूजा!!!
पण कधि जमणार असं विरक्त व्हायला?



Ameyadeshpande
Friday, May 26, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>'' मूडी आणि अमेय''.. तुम्ही दोघं खूप छान

पूजा... कौतुक केल्याचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद

बाकी तुझी कविता जरी प्रेमाच्या materialistic वेदना नको आहेत अशी असली तरी एवढ्या सार्‍या "नको" वरुन मला ते "परमेश्वर कसा आहे" सांगताना "न एती न एती" म्हणतात ना, तसं निरपेक्ष प्रेम कसं आहे हे सांगणारी ही होऊ शकते अशी वाटली... अगदीच उदाहरण म्हणजे जर ही कविता मीरा गातेय(शेवटचं कडवं सोडून) तर त्याचा अर्थ कसा होईल असा विचार मनात आला...


Ninavi
Friday, May 26, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा पूजा!! सुंदर.

मला सन्मीच्या एका फार पूर्वी वाचलेल्या चारोळीची आठवण झाली. ( खूप आवडली होती म्हणून अजून लक्षात आहे..)

नको पुन्हा ते मने गुंतणे, नको पुन्हा सोडवणे गाठी
ऊर फुटेस्तो नको धावणे फसव्या सुखस्वप्नांच्या पाठी
नको पुन्हा ते हक्क सांगणे अस्तित्वावर तुझ्या नि माझ्या
घाव जिव्हारी बसले त्यांच्या, जखमा अजुनी तश्याच ताज्या..

हल्ली बरेच दिवसांत काही लिहीलेलं नाही तिने.


Ashwini
Friday, May 26, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, यावरून मला एक माझी जुनी कविता आठवली..........पण परत कधीतरी. सध्या इतकच पुरे... :-)

पूजा, शेवट आवडला. संघमित्राची चारोळी पण खास आहे.


Ninavi
Friday, May 26, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> पण परत कधीतरी

अगं टाक टाक विषय निघालाय तोच. ( मी विडंबन नाही करणार.)

Ashwini
Friday, May 26, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, नाहीये आत्ता माझ्याकडे (नाहीतर टाकली असतीच.. :-) )
ती वही घरी आहे. मी आत्ता office मध्ये आहे ना (तेही विसरलेच होते..)
:-)

Ninavi
Friday, May 26, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> एक सा आहे तर दुसरा रे बनुन त्याच्या सूरात सूर मिळवतो. व्वा!!

मूडी, त्यालाच ' अरे ला कारे करणं' म्हणतात का गं?

विनोद पुरे, पण तुझ्या प्रतिक्रियापण खरंच वाचण्यासारख्या असतात हं.

Moodi
Friday, May 26, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी तसे नाही ग..

कविता करणे हे बर्‍याच लोकांना तसे सोपे वाटते, पण तसे नाहीये. तुम्ही सगळे रोमॅंटीक, अध्यात्मीक, विरह, अभंग, विनोदी, स्वातंत्र्य अन असे अनेक विषय इतक्या सहजतेने हाताळता की जसे कसलेल्या गायकाने खर्जातुन वरच्या पट्टीत सहजतेने सूर लावावा.



Mrinmayee
Friday, May 26, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ताईची कविता इथे post करतेय. कोणी कौतुक करो नकरो, पण आपल्यापुरती आपली कविता मनाला खूप काही देणारी असते.. ह्यावरून..

शब्दकळा माझी गुणी
नाही वारा नाही पाणी
नसे वत्सल निगराणी
तरी फुलते बहरते पानोपानी
न भेटता हुरहुरते मनोमनी
दरवळते माझ्यापुरती
ऋण तिचे मी फेडु कसे
शतजन्म अपुरे पडती
वारसा मराठीचा पुरातन
ऋणी रहावे हेची सगुण प्राक्तन

गौरी संजय देशपांडे




Vaibhav_joshi
Saturday, May 27, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी ... दोन लघू म्हणजे एक दीर्घ ऐकलयंस का ?
:-)
अश्विनि ... सुंदर आहे कविता ... प्रामाणिक आहे ....
मूडी ... तुझ्या प्रतिक्रियेची वाट पाहिले जाते आजकाल ...
:-)
मृण्मयी ... अगदी ... अगदी ...
पूजा ...
अं हं ... नकोच .. काही लिहायलाच नको ...
:-)


Shyamli
Saturday, May 27, 2006 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी...
ही छानच आहे...
पण तुझ्या कवीतेची वाट बघतोय आम्ही
काय लोक्स...बरोबर ना?


Meghdhara
Saturday, May 27, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव समुद्र अप्रतिम, वैभवच! पूजा व्वा..

मेघा


Ninavi
Saturday, May 27, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, ' कुणी कौतूक करो न करो' असं का म्हणतेस, छान आहे ही खरंच. आणि ' फुलते बहरते पानोपानी' हे तर गुलमोहोराचंच वर्णन वाटलं मला अगदी. खरोखरच काही ऋणं अशीच असतात.. ती फेडण्यापेक्षा आजन्म ऋणाईत रहाण्यात जास्त आनंद असतो.

वैभव, प्रतिप्रश्न विचारून शंकानिरसन करायचा हा प्रकार अभिनव आहे. पण उलटसुलट चर्चा झाली की सगळेच शिकतात ना त्यातून?

माझं निरीक्षण कदाचित चुकत असेल, पण आपण सगळे इथे कविता आवडली की वाहवा करतो आणि नाही आवडली की अनुल्लेख. पण का आवडली किंवा का नाही आवडली त्यात शिरत नाही सहसा. अश्याने कवी म्हणून आपली
growth कशी होणार?

मी माझ्याकडून सुरुवात करत्ये असं समज. आणि ती तुझ्या कवितेपासून कारण तू गैरसमज करून घेणार नाहीस याची खात्री आहे म्हणून.

हे सगळ्यांनाच
invitation आहे, माझ्याही कवितांबाबत शंका / सूचना उपस्थित करण्यासाठी.

Vaibhav_joshi
Saturday, May 27, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे निनावि ... मी तर सगळं गंमतीत घेत होतो ... छे छे .... गैरसमज कसला ... चांगलीच सुरूवात आहे ही ... त्याचा वापर चांगल्या पध्दतिने व्हायला हवा फक्त ...
ओके ... आपण तुझी शंका बघू या , हं ?

१) निरनिराळ्या हा शब्द जेव्हा तुम्ही लयीत वाचता तेव्हा निर्निराळ्या असाच येतो ... गालगागा हे मीटर आहे हे मान्य आहे ना ? समज इथे " माणसांच्या अवयवांना " असं लिहीलं असत तर ? म्हणून बघ बरं !!! दोन्ही versions म्हणताना एकही सेकंद गॅप पडत नाहिये

२) मात्रा मोजत , गणवृत्त सांभाळत , काटेकोरपणे पुढे जायला ही गज़ल नाहिये .. ही एक उत्स्फुर्त कविता आहे ... तसं पहायला जाशील तर
" ह्या जगी तुमच्याप्रमाणे ना स्फुरे कोणांस कविता " ह्या शेवटच्या ओळीतही " कविता " ह्या शब्दाशी अडखळल्यासरखं होतं ... पण म्हणून तिथे जर दुसरा शब्द मॅन्युफ़ॅक्चर करून टाकत बसलं तर ते तुला तरी पटेल का ? मला आठवतंय मागे तू झुळूकवर बोलल्याचं .. " कविता भिडली पाहिजे .. मग ती गज़ल आहे की कविता आहे ... मात्रा योग्य आहेत वा नाहियेत ... हे मी बघणार नाही ... " कदाचित तुझी प्रगती झाल्याने तुला ह्या गोष्टींचं महत्त्वही पटू लागलेलं असेल ... मी अजून तिथे पोचलो नाही ... सारंग म्हणतो त्याप्रमाणे काव्यात तंत्र हवंच पण मंत्र महत्त्वाचा ....
तू एकदाच तुझ्या मनाला विचार की तुला निर्मिती ही कविता in totality आवडली की नाही ... उत्तर सांगू नकोस , मला माहीत आहे ... हा फाजील आत्मविश्वास नाहिये ... ही ती कविता लिहून झाल्यानंतर आलेली अनुभूती आहे ... and you know me
:-)

समीक्षणाच्या बाबतीत मी जरासा confused आहे ... ते व्यक्तीसापेक्ष होत जातं पुढे .. आताच बघ ना आपण किती जागा ह्या बीबी वरची वाया घालवली ... दुसर्‍या कुणाच्या तरी चांगल्या निर्मितीकडे उगाच दुर्लक्ष होणार ... हो ना ?

समीक्षणासाठी वेगळा बीबी असेल तर मी एक नवीन कविता लगेच टाकायला तयार आहे


Mrinmayee
Saturday, May 27, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, तुमच्या अप्रतीम कवीता वाचत अस्ते. परिक्षण वगैरे करता येत नाही. सगळ्याच खूप भावतात. श्यामली, निनावी तुमच्या प्रोत्साहनाने थोडी हिम्मत करून माझी एक कविता इथे लिहितेय. न आवडल्यास प्रामाणिक पणे सांगा. सुधरवायला मदत होईल.
ही कविता १९८८ मधे लिहिली होती. रूपकवर सतीप्रकरणानंतर...
मी पेटलेय चहू बाजुंनी
ज्वाळा भडकताहेत
आकाशाला भिडताहेत...
मनावर वळ उठवणारे
मी उच्चारलेले गायत्री मंत्र
फक्त ओठ हलताहेत...
अग्निचौकटीत बंदिस्त होऊन
मी जळतेय
पतीचं शीर मांडीवर घेऊन
आता सगळं असह्य होतय
दाह पोचलाय त्याच्या परिसीमेवर
आणि हा निष्प्राण देह
सोबत करतोय
अनंताच्या पाऊलवाटेवर...
तो वाढता कोलाहल
तो जल्लोश माझ्यासाठी?
असेलही
मी सामान्य नाही आता..
देवता झालेय
अग्निदाह पचवून..
आता वेदनांच्या गर्तेतून
सुटकेचा एकच मार्ग
अखेरचा निश्वास
अन मग सारं शांत
संवेदनांच्या क्षितिजापल्याड
माझा जीवनसूर्य मावळताना
एक मलूल प्रकाश
फक्त वेदनेचा
सुरुवात तर नाही ना ही
एकदा विझून
परत उफाळणार्‍या
ज्वालांची?
मी आजही अबलाच?
नाही नक्कीच नाही.
हे तर माझं बलिदान
तुमच्यातले 'राजाराम'
जागवण्यासाठी!!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators