Chinnu
| |
| Thursday, May 25, 2006 - 11:48 am: |
| 
|
वैभवा खुप सुंदर competition लावलीस देवाबरोबर! नादमय वेड्या जीवाला दिलासा दिलात. श्यामली तुझ्या झुळुका छान असतात ग. काही रडकं बाळ नाहिये ते!
|
नादमय, केवळ अप्रतीम! वैभव, तुझ्या कवितेबद्दल नव्यानं काय लिहु? मायबोलिकर खरच भाग्यवान! तुझ्या कविता वाचायला मिळतात!
|
Dineshvs
| |
| Thursday, May 25, 2006 - 9:28 pm: |
| 
|
नादमय, खरेच छान आहे.
|
nadamay... kharach chaan aahe.. .. !!!
|
Maudee
| |
| Friday, May 26, 2006 - 1:22 am: |
| 
|
माझी तुम्हा सर्वच कवि आणि कवयत्रीना suggestion आहे. तुमच्या पैकी काही जण हे करत असतील तर छानच.... तुम्ही तुमच्या या कविता जपून ठेवून त्याचा कविता संग्रह तयार करू शकता....तुमच्या सर्वच कवित सुन्दर आहेत....शिवाय त्यान्ची साधी मांडणी ज्यातून आशय अगदी स्पष्ट व्यक्त होतो.... आणि त्या काळजात हात घालतात वाचणाराच्या..... या शिवाय मह्त्वाच म्हणजे या सर्व कविता वाचणार्याला आपल्या वाटतात...जणू काही कवि / कवियत्रीने त्याच्याच आयुष्यातल्या एख़ाद्या प्रसंगावर कविता केली आहे.
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 1:27 am: |
| 
|
नादमय, कल्पना मस्त आहे, पण कविता लांबली का जरा? वैभव, निर्मिती छान, पण ' निर्निराळ्या'?? श्यामली, बाळ छाने. गणेश, तुमचं मायबोलीवर स्वागत. 
|
निनावी .. धन्यवाद .. निर्निराळ्या नव्हे निरनिराळ्या .. बाय द वे .. म्हणणं काय आहे ? स्पष्ट कराल का ?
|
माज़ी २री कविता मी लोड कर्तो आहे.
|
Meenu
| |
| Friday, May 26, 2006 - 3:46 am: |
| 
|
मला कळालिच नाहि हि कविता....
|
Naadamay
| |
| Friday, May 26, 2006 - 4:12 am: |
| 
|
निनावी, अग, होणारं बाळ किती वजनाचं आणि किती उंचीचं असेल ते आपल्या हातात थोडंच असतं असो. धन्यवाद.
|
R_joshi
| |
| Friday, May 26, 2006 - 4:24 am: |
| 
|
काव्यधारेतील मित्रपरिवार कसा आहे? नविन कोणी काही लिहिलय का? मला कोठे वाचायला मिळेल?
|
बहुतेक हाच कवितांचा बीबी आहे ... इथे कविता नवीन आहेत ... तुम्ही पण नवीन आहात का ?
अर्काईव्ह बघा प्लीज
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 9:48 am: |
| 
|
नादमय, वैभव, चुभूद्याघ्या, पण ' निर्मिती' लयीत वाचताना ( गालगागा आहे ना?) तो शब्द ' निर्निराळ्या' असा वाचावा लागतोय असं वाटतंय मला. तसच ' मिसळायच्या, अवयवांना आणि भलतेच' मधे. अशी लहानसहान सूट मोठेमोठे कवीही घेताना दिसतात वृत्तबद्ध लिहीताना, पण तुझ्या कवितांमधे शोधूनही नाही सापडलेले मला कधी असे compromises. म्हणून मजा वाटली इतकंच. ( अरे अरे, चूक काढता काढता मी तुला पुन्हा compliment च दिली का? )
|
निनावी काकू तुझ्या pc वर देवनागरी च्या खिडकीत आपोआप दात विचकावलेले smileys येतात का default ? "तू नसताना" स्वत:तच खूप खोल खोल घेऊन जाते वाचताना... सुंदर आहे... भावली एकदम... आणि "निर्मिती" वैभव ला कुं भारानी स्पेशल घाटातून काढलयं (ते इंग्रजी मधे Him लिहितात म्हणून इकडे जरा 'कु' bold मधे बरका)
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 10:12 am: |
| 
|
>>> निनावी काकू तुझ्या pc वर देवनागरी च्या खिडकीत आपोआप दात विचकावलेले smileys येतात का default ? नाही ना! ते कष्ट मलाच घ्यावे लागतात. मी मॉडना विनंती केली होती. पण त्यांना नाही जमलं!! अभिप्रायासाठी धन्यवाद देणार होते, पण ' काकू' का म्हटलंस? आता नाही देत जा! 
|
Ashwini
| |
| Friday, May 26, 2006 - 10:17 am: |
| 
|
आजची सुरूवात मी करू का? छे, पुन्हा कवितांच व्यसन लागलं... मन कासावीस मनात तू, श्वासात तू रोमरोमात फक्त तू अस्वस्थ मी, व्याकुळ मी अन् सर्वस्वी अनभिज्ञ तू मन आता कासावीस मन झाले सैरावैरा वादळ माझ्या मनात पण तुजवर पोचत नाही वारा मी तुझा ध्यास घेतलाय आणि सोडून दिलय जगणं सारं जग मला सांगतय बरं नाही हे वागणं तुझं तरी वागणं ठीक आहे का? प्रत्यक्षात कधीच नाही यायचं आणि खोल मनात माझ्या मात्र अष्टौप्रहर राहायचं आता अशक्य झालय मनातल्या तुझ्यासकट जगणं एकतर सामोरा ये अथवा सोडून दे माझ्या मनात राहाणं
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 10:19 am: |
| 
|
>>>> एकतर सामोरा ये अथवा सोडून दे माझ्या मनात राहाणं व्वा! 
|
भलतीच व्यसनी झालीयेस की अश्विनी तू तो पण तिकडे हेच म्हणत असला तर? >>>पण ' काकू' का म्हटलंस? मानानी मोठ्या लोकांना मानानी वागवावं ना
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 10:32 am: |
| 
|
अश्विनी, तुझ्या कवितेचं विडंबन इथे टाकलंय.
|
Shyamli
| |
| Friday, May 26, 2006 - 11:03 am: |
| 
|
अश्विनी परत एकदा तीच प्रतिक्रिया.. एकेक ओळ..मनाचा ठाव घेणारी..... माधुरी,देवा धन्यवाद तुम्हाला
नीनावी,आणि वैभव तुम्ही दोघांनी छान म्हणलत म्हणल्यावर जरा मुठभर मास चढल अंगावर
(गुरु माणसांनी कौतुक केलय wow )
|