|
Ruchita
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:22 am: |
| 
|
येथील सर्वच कवितांना मनापासून दाद मला दिलेल्या दादेबद्दल सर्वांना धन्यवाद.. नादमय ईथे पण कविता..व्वा.. सगळ्यान्च्या कविता खुपच सुरेख...वाचुन डोळ्यांचे अगदि पारणे फिटतेय बरं का
|
Smi_dod
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:25 am: |
| 
|
श्यामली!!!.... सही... फारच आर्त ग..
|
Krishnag
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:36 am: |
| 
|
सर्वच कविता सुरेख!! श्यामली, ओठातले शब्द छान उमटलेत!! 
|
श्यामली ... आतापर्यंतची ही तुझी बेश्ट ... मस्त जमलीय ... सगळ्यांच्याच कविता सुंदर अहेत .... विषय बदलू या जरा ?
|
निर्मिती .... बैसले कुंभार दोन्ही, छंद दोघां निर्मिण्याचा माणसे घडवी कृपाळू,काव्य घडवी भक्त त्याचा ईश्वराने कालवाया घेतली हातात माती जिंकण्या देवास वेडा भक्त घेइ शब्द हाती कालवी मातीस कैसे भक्त भांबावून पाही भावना मिसळायच्या ऐश्या अता कोण्या उपायी निरनिराळ्या अवयवांना जेथ तेथे रेखलेले घेउनी स्फूर्ती प्रभूची शब्द ह्याने गुंफलेले आणखी वृत्ते अलंकारास घेइ सोबतीला नाटकी भलतेच केले आपुल्या त्या निर्मितीला जाहली निर्माण दोन्ही गाडगी एकाच वेळी काय हे सौंदर्य देवा, भक्त लावी हात भाळी गर्व हरता बोलला मग "घालतो साष्टांग त्राता" ह्या जगी तुमच्याप्रमाणे ना स्फुरे कोणास कविता
|
वैभव.. महान रे बघ हरलो बोलतो रे "घालतो साष्टांग आता" मायबोली तुझ्याप्रमाणे ना स्फुरे कोणास कविता
|
Meenu
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:25 am: |
| 
|
वैभव मस्त रे हे एकदम रे मस्त जमलयं
|
Maudee
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:26 am: |
| 
|
सुरेख़,......सगळ्याच कविता सुरेख़. चन्द्र,पैसा,तु नसताना,तुझ्या नसण्याविषयी,...सगळ्याच सुरेख़..... फ़ार महान कवी / कवियत्री आहत बुवा तुम्ही लोक.....
|
Maudee
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:29 am: |
| 
|
"निर्मिती" पण ख़ूप सुन्दर......
|
Shyamli
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:33 am: |
| 
|
वैभव.........म हा न धन्यवाद... चीनू.... वैशाली,रुप,योगि,ज्योती,रुचीता,स्मि,क्रिश आणि वैभव.. जरा रडक आहे बाळं घ्या सांभाळुन
|
वैभव... सष्टांग नमस्कार रे बाबा...!!! मस्त... श्यामली, रडक का असेना.. बाळ सगळ्यांना आवडतात...
|
Rmd
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:03 am: |
| 
|
वैभव्: फारच छान! आणि इतक्या लगेच request ऐकल्याबद्दल Thanks
|
Naadamay
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:46 am: |
| 
|
वैभव, साष्टांग नमस्कार तुला
|
वैभव, महान कविता. श्यामली, 'राहिले ओठावरी' सुंदर च ग.. धन्य तुम्हा लोकांची
|
श्यामलि.. छान आहे गं.. एकदम "राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे" आठवलं
|
Kashi
| |
| Thursday, May 25, 2006 - 5:56 am: |
| 
|
vaibhav far chan kavita!!! ithayla saglya kavita vachate nehami..pan dad dayla etke sundar shabdach..sapdat nahi..
|
Naadamay
| |
| Thursday, May 25, 2006 - 6:19 am: |
| 
|
तू कधीच आकाश बघितलं नाहीयेस? निळंभोर निरभ्र विशाल शांत प्रसन्न मायेचं पांघरूण सर्वांवर घालणारं सूर्य चंद्र सर्वांनाच सामावून घेणारं? आणि तरीही म्हणतोस मी दिसलो नाही? पाणी तर तुझ्या अगदी किती आसपास डोळ्यातून पाझरणारा गंगेचा प्रवास नद्या झरे सागर पाऊस दंव प्रपात तहान, अर्घ्य, जन्म, मृत्यू लागते सर्वात आणि तरीही म्हणतोस मी दिसलो नाही? दिसला सूर्य उगवतीचा, मावळतीचा? किंवा आग ओकणार्या प्रखर माध्याह्नीचा निरांजनात ज्योत किंवा रानात वणवा चूल, यज्ञ, दिवा किंवा मशालीतला? आणि तरीही म्हणतोस मी दिसलो नाही? शेतं,फुलं,फळं,रानं पिकवणारी पृथ्वी रांगा.. चाला..धावायला आधार होई पृथ्वी ताठ उभे राहून पाठ टेकायला पृथ्वी न बोलूनी भार तुझा सोसत जाई पृथ्वी आणि तरीही म्हणतोस मी दिसलो नाही? पाव्यात नादावुनी माळरानी घुमणारी वाळवंटात तप्त आणि थंड हिमालयी आत तुझ्या श्वासातून सहज शिरणारी हवा तरी अनुभवलीयेस ना तू नक्की? आणि तरीही म्हणतोस मी दिसलो नाही? नाही रे मी चतुर्भुज नाही मी पंचमुखी मी तर तत्त्वरूप बाकी रूपकाच्या गोष्टी गोष्टीतले तत्व मात्र सत्त्व माझेच ठायी न दिसलो कुठे तरी तुझ्या आत प्राण मी पुन्हा म्हणू नकोस मी कधी दिसलो नाही....
|
खास मस्त रे एकदम
|
पेसच रे एकदम.. ...
|
Shyamli
| |
| Thursday, May 25, 2006 - 6:45 am: |
| 
|
केवळ नादमय 
|
|
|