|
Naadamay
| |
| Wednesday, May 24, 2006 - 7:05 am: |
| 
|
नाहीच मला कळत कळा या कशा कशा सहज येती तुला पुन्हा पुन्हा मन पाहे लुटण्या वैभव तुझ्या या काव्यवैभवा
|
माधुरी.. दा विंची कोड का गं... दिवे घे.. वैभव मस्तय.. नादमय, सुमति, रूपा...... सगळेच छान
|
Moodi
| |
| Wednesday, May 24, 2006 - 7:17 am: |
| 
|
हा वैभव एखाद्या निष्णात, कसलेल्या गायकाने सूराची लकेर कशी उस्फुर्तपणे छेडावी तशा सहजपणे एवढया छान कविता कशा करतो देव जाणे.
|
पुजा, अग मला ही कळत नाहियेत ते आकडे कसे आले ते. मी तो शब्द inverted comma मधे लिहिला होता देवा, कुठलिही कोड language नाहीये बर का ही
|
Sania
| |
| Wednesday, May 24, 2006 - 7:58 am: |
| 
|
नादमय, निनावी आणि सुमती, खरच खूप छान लिहिलं आहे सगळ्यांनी बरयाच दिवसांनी खूप छान वाचलं काहीतरी
|
Jayavi
| |
| Wednesday, May 24, 2006 - 8:42 am: |
| 
|
इथले सगळे कवी अतिशय उच्च काव्यनिर्मिती करताहेत........सही! मूडी,पूजा.......तुम्ही दोघी सुद्धा किती सुंदर कौतुक करताहात. अगं तुमच्या प्रतिसादांना वाचून बघा एकदा. मूडे (ह्याला गधडे पण मस्त rhyme होतं ना )......... u r too good!
|
Ninavi
| |
| Wednesday, May 24, 2006 - 9:28 am: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स. सगळेच मस्त जमून राहिलेत की इथे. त्यात आपले माझे दोन आणे. नादमय, 'यंत्र व्हायचं तंत्र साधून जगतो कसातरी...'? घाव बराच खोल झालेला दिसतोय! वैभव, मस्त आहे ना ही लय? पण ज्याला जमेल त्याला. पूजा, ते निखळणार्या तार्याचं रुपक मलाही नाही कळलं नीटसं. पण तुझी शब्दांवर छान पकड आहे. सुधीर, चांगली आठवण करून दिलीत. त्यावरून.. अजिंक्य.. आपला वर्तमान आपल्या हाती खुशाल अंधारात लोटत ज्यांनी रचले मातृभूच्या दैदिप्यमान इतिहासाचे पोवाडे आणि तिच्या उज्ज्वल भवितव्याची मंगल उषासूक्ते.. कारागृहाच्या निर्मम भिंती भेदून फुटले ज्यांच्या प्रतिभेचे धुमारे.. आणि रक्त, अश्रू, घामाने जे करू शकले त्या कोंबांची मशागत.. त्यांनाच आहे अधिकार देशावर प्रेम केलं म्हणायचा.. आम्ही काय.. आम्हाला भारत स्वतंत्र झाला होता की नाही इथपासून शंका आहेत...
|
व्वा..सगळ्याच कविता एकदम सुंदर सुधीर निनावि.. स्वा.वि.दांची आठवण करून दिलीत
|
Shyamli
| |
| Wednesday, May 24, 2006 - 10:47 am: |
| 
|
बोलायचे काहीच होते बोलले काहीतरी ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी स्वप्नातली मुर्त तीही राहीली स्वप्नांतरी ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी साहवेना ही व्यथा तू भेट ना रे क्षणभरी ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी ऐक ना अखेर ही रे चालले मी दुसर्या तीरी ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी..... श्यामली!!!
|
Chinnu
| |
| Wednesday, May 24, 2006 - 2:29 pm: |
| 
|
पूजा, नादमय, केप्या, देवा, मुकमन खुप खुप धन्यवाद! श्यामले, फार आर्त हाक मारलिस ग सख्याला! निनावी, Ajinkya is simply beautiful! अगदी सहज सुंदर कविता. मुडी, जया म्हणतेय त्याप्रमाणे तु सर्वांना दिलेल्या दादेला दाद!
|
Poojas
| |
| Wednesday, May 24, 2006 - 3:03 pm: |
| 
|
'' आता हवा तो महात्मा ..'' त्या तरुण मनाला गवसत गेल्या स्वातंत्र्याच्या वाटा.. त्याच्या नयनी होत्या तेव्हा आनंदाच्या लाटा.. क्रांती प्रगती स्वातंत्र्याची उर्मी तयात होती.. पण.. शत्रूजवळी शस्त्रास्त्रांची गुर्मी हातात होती.. तो लढला प्रसंगी नमला..पण जिद्द कधी ना हरला.. मायभूमीच्या ऋणात ऋणकर बनूनी तो राहीला.. मग एकवटून बळ सामर्थ्याने केला त्याने संघर्ष.. मरणाला सामोरे जाता, मनी समाधान व सहर्ष.. तो एक महात्मा अमर होऊनी.. स्मृतीत मिसळून गेला.. तो परमात्मा तो विश्वात्मा.. इतिहास घडवूनी गेला.. तो गेला.. हे सत्य तरी पण.. कुणा न त्याची जाण.. (पण.. आता देवा...ऽऽऽ) आचार भ्रष्ट हा करण्या नष्ट असाच कोणी आण.. देवा.. असाच कोणी आण... !!!
|
Ashwini
| |
| Wednesday, May 24, 2006 - 3:20 pm: |
| 
|
निनावी, ' तू नसताना ' सुरेख! नादमय...मस्त! वैभव, ' अजून ' अप्रतिम!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 24, 2006 - 9:16 pm: |
| 
|
निनावि, अजिंक्य छानच. मला अजुनहि वाटतय, खरा ईतिहास आपल्याला कधी कळलाच नाही, कळणारहि नाही.
|
निनावी, तू नसताना खूप आवडली. ओव्या गात फिरणारे जाते, व्वा! क्या बात है! बापू
|
Naadamay
| |
| Thursday, May 25, 2006 - 12:25 am: |
| 
|
येथील सर्वच कवितांना मनापासून दाद मला दिलेल्या दादेबद्दल सर्वांना धन्यवाद!
|
सुमती, नादमय,रुपा,वैभव,पूजा,निनावि&श्यामली...कोणि राहिले नाही ना.... इतके छान लिहिता आहात की...वाचुन धन्य झाले....!!!!
|
Namaskar, Mee Mazee 1lee Kavita Post Karto ahi, Kashi vatli te klva. Tumchah Mitr Ganesh Kulkarni

|
श्यामली खरेच मस्त आहे कविता. कोणितरी माझ्या मनातल्या ओळी लिहिल्या असच वाटल...
|
नादमय.. नाहिच मला कळत निनावी.. अंजिक्य.. श्यामली.. ओठातले शब्द.. पूजा.. आता हवा तो आत्मा.. गणेश.. किती छान झालं असतं.. सर्वच कविता छानच आहेत.. 
|
Jyotip
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:20 am: |
| 
|
ऐक ना अखेर ही रे चालले मी दुसर्या तीरी ओठातले हे शब्द माझे राहीले ओठांवरी..... श्यामली मस्त...... निनावी, ' तू नसताना ' छान वैभव भाऊ नेहमी प्रमाणे उत्तम
|
|
|