|
Ashwini
| |
| Tuesday, May 23, 2006 - 10:25 am: |
| 
|
श्यामली, अमेय, काशी, लोपामुद्रा, निनावी, जयावी, वैभव, rmd, maudee, मूडी, मीनू सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मूडी, अग आजकाल पूर्वीसारखं कविता लिहीणं होत नाही. पण इथे इतक्या छान छान कविता वाचून लिहायची उर्मी परत उसळून आली. मीनू, choice नसतोच असं नाही. फक्त तो स्विकारणं किंवा न स्विकारणंही कधी कधी अवघड होऊन बसतं. Maudee, turning point आलाय हे लक्षात येईपर्यंत खूप दिवस जातातच. कळत नाहीच लवकर कारण आपल्या आशा अपेक्षा अतिशय चिवट असतात. पण एक क्षण असा येतो की आपोआपच कळतं आता दुसरा मार्गच नाहीये. वैभव, चिनू...मस्त!
|
>>>अजुनही अडकली आहे ती कागदाची होडी काय करणार ती तरी, हल्ली पाउसही पडत नाही.... chinnu सुरेख... वळीव कोसळावा तसं वाटलं... किंवा tv वर कधी avalanche पाहिला आहेस का बर्फ़ाचा? तसा आभास घेऊन आलीये तुझी कविता...
|
Ashwini
| |
| Tuesday, May 23, 2006 - 10:43 am: |
| 
|
तुम्हाला कविता आवडल्याने उत्साह वाढलाय. ही आणखी एक.. माझा चंद्र आकाशीचा चंद्र हवा हा हट्टही रामालाच शोभतो इतरांना त्याचा ध्यास उद्ध्वस्त करून टाकतो माझा चंद्र कधीकधीच माझ्या आकाशात चमकतो आणि माझा बाकी वेळ त्याला शोधण्यात जातो सार्या रात्री अमावस्येच्याच एखादीच रूपेरी बनते अन् तिच्या सौम्य प्रकाशाने उरलेल्या रात्री उजळून टाकते आता या अंधार्या वाटा इतक्या भयावह नाही वाटत कारण ' त्याचं ' थोडसं चांदणं मी बांधून ठेवलय घट्ट मुठीत
|
Chinnu
| |
| Tuesday, May 23, 2006 - 11:22 am: |
| 
|
अश्विनी, खूप खूप खूप छान. You said it all! असच चांदणे थोडफार आमच्यासाठिही सांडत जा नेहेमी! लोपा, निनावि, जया, अश्विनी धन्यवाद. सगळ्या कविता वाचुन मलाही उर्मी आली! तुम्ही गोड मानुन घेतलत तेवढे पुरे. amey, thanks a lot. I'm honoured!
|
>>>ameyaa
subuk subuk ....
|
Ninavi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 11:55 am: |
| 
|
वा अश्विनी!!!! सही!!!! हे भलत्याच मात्रांचे वळसे द्यायला लागलीस की गं एकदम. 
|
Moodi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 12:08 pm: |
| 
|
चिनु इतके दिवस मग रोमात का होतीस? सुरेख!!! अश्विनी व्वा!! यापुढे या शीतल चांदण्यांचा सहवास नेहेमीच दे. 
|
Chinnu
| |
| Tuesday, May 23, 2006 - 12:23 pm: |
| 
|
बर बाबा एडिटले. अमेय, अमेया नव्हे! मुडी धन्यवाद ग. मी अधुनमधुन झुळुकेवर असायचे. आताही झुळुकेवरच होते, पण झुळुकेची कविता झाली. त्यमुळे ह्य बीबीवर पोस्टले. बी, मी आताच वाचली तुझि कविता. छान लिहिली आहेस. हळु हळु वाचत आहे मी कविता.
|
Poojas
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:34 pm: |
| 
|
चिनू.. छान..!! अश्विनी.. मस्तं..!! तुझ्या कवितेवरून मलापण ' रात्री ' बद्दल लिहायचा mood आला.. पण.. गद्यकविता झालीय. असो.. एक नवा प्रयोग दोस्त लोक !!
|
"असो" म्हणजे? आहे कुठे ती गद्य कविता?
|
Ninavi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:51 pm: |
| 
|
पुन्हा तेच. रात्रीबद्दल आहे ना, मग फक्त मोठ्या माणसांसाठी असणार ती. 
|
Poojas
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:55 pm: |
| 
|
'' रात्र... '' हल्ली रात्र मला फार जवळची वाटते.. !! अंधाराने व्यापलेली.. काळोखात कोंडलेली.. पण.. तरीही.. असंख्य नक्षत्रांनी वलयांकीत.. म्हणूनच कदाचित..' ती ' मला ' माझी ' वाटते.. !! किणकिणणारी कांकणं..क्वचितच इवल्याशा धक्यानेही.. खळकन फुटतात.. अगदी तस्संच.. एखाद्या रात्री.. नि:शब्द वेगाने..एखादंच नक्षत्र.. पृथ्वीच्या ओढीने.. आकाशातून झेपावतं.. आणि.. मी मात्र.. त्याच्या साक्षीने का होईना.. खोल आंतर मनातली एखादि तरी सुप्त इच्छा.. मनातल्या मनात त्याला बोलून दाखवते.. माझं नशीब त्याच्यावर सोपवून.. मी निश्चिंतपणे झोपी जाते.. ! पण त्याचंही दुर्दैव असं..की.. ज्या ओढीने त्यानं हा अंत्:कालाचा तेज:पुंज प्रवास केला.. त्याचाही शेवट केवळ मातीत मिसळून व्हावा.. ?? मग.. माझ्यापेक्षा ते नक्षत्रंच मला जास्त कमनशीबी वाटू लागतं... निदान तेव्हातरी.... माझ्याइतकं नशीबवान या जगात कुणीच नसतं !!! म्हणूनच माझं रात्रीशी जरा जास्तंच पटतं.. माझ्या नशीबाचं पुन्हा पुन्हा कोडकौतुक करण्यासाठी का होईना... त्या रात्रीची मी वाट पाहते.. कदाचित........ म्हणूनच...... हल्ली रात्र मला फार जवळची वाटते.. !!!
|
Poojas
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:02 pm: |
| 
|
पोस्टताना कविता delete झाली.. आणि पुन्हा सगळं लिहावं लागलं.. हुश्श्श्श्श ऽऽऽ म्हणून late झाला. माफी असावी दोस्त लोक !!
|
आ SSS ई SSSSSSSS बघ ना निनावी कसं करतेय
|
Moodi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:43 pm: |
| 
|
पूजा सुरेख ग. डोळ्यासमोर चित्र उभे केलेस. कसे तुला एवढे चटकन सुचते हेच कोडे वाटते. एक अल्बम आठवला, पाहिलास का? चांदनी राते, सब जग सोए हम जागे, तारोंसे करे बाते चांदनी रा ss ते. कवितेतील गोड चांदणी आहेस तू. 
|
मस्त... ग.. पूजा... रात्र.. बर्याचदा जास्त जवळची वाटते... दिवस पुढे पुढे पळवतो...,निस्तब्ध रात्रच असते...,माझेही असेच काहिसे विचार आहेत...!!!
|
Ninavi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 11:17 pm: |
| 
|
तू नसताना.... दिवसाच्या उदास सावल्या उगीच अजून लांबतात सहज चालता चालता पावलं जागच्या जागी थांबतात सूर तर पुरतेच हरवतात, शब्दही सापडत नाहीत शब्द सापडले तर त्यात अर्थ उमटत नाहीत.. श्वास येतात जातात आणि चालू असतं ह्रदय नकोनकोशी वाटणारी रुक्ष यांत्रिक लय काहीतरी शोधतात डोळे, निराश परत येतात कान सांगून ऐकत नाहीत, सतत चाहूल घेतात.. तसे वरवर सगळे 'व्यवहार' सुरळीत सुरू असतात हात पाय चालत असतात, ओठसुद्धा हसतात त्याच त्याच ओव्या गात फिरत असतं जातं ते सुरळीत चालणंच मग असह्य होत जातं.. कोरडी तप्त माती आतुर अधीर कण न कण रात्र रात्र ताणलेला तो एकच कातर क्षण तुझ्या नाठाळ आठवणी.. खोल खोल रुजलेल्या उशाशी स्वप्नांच्या राशी.. आसवांत भिजलेल्या.. आता येशील तेव्हा सगळं तुझं तुला देईन म्हणते.. आता बरसशील तेव्हा त्यात मीही वाहून जाईन म्हणते..
|
मस्त कविसंमेलन भरले आहे. सगळेच मस्त. कुणाकुणाला वाह करावे सुचत नाही. चिन्नु खूप दिवसांनी? लिहीत जा. मस्त जमली आहे. 
|
Devdattag
| |
| Wednesday, May 24, 2006 - 12:03 am: |
| 
|
निनावि, अश्विनी, चिन्नु सुरेखच.. वैभव पॅरेंट्स कल्पना चांगली, शेवटही चांगला पण तुझ्या प्रतिभेनुसार अजुन चांगली उतरली असति असं वाटतंय.. अर्थात हा माझा दृष्टिकोन झाला..
|
Jo_s
| |
| Wednesday, May 24, 2006 - 12:12 am: |
| 
|
२८ मे हा विर सावरकरांचा जन्म दिवस, त्या निमित्त परत एकदा
ये परतुनी ये हिंद भूमीच्या विरा तिज नसे तुजवीणा प्यारा या जगतीचा अन्य कोणता तारा हे विरा ये विरा तू पुत्र तिचा, एकमेव अद्वितीय मातृभूमी तुला, तव प्राणाहुनही प्रिय तू वदलासी, त्वरे परत येईन तुज वीण तिचा, कंठी आला प्राण करू उशीर नाको तरी आता रे बघ तगमग माते चित्ता रे तुजवरीच तिची आशा रे त्वरे धावुनी ये, मातेच्या आधारा हे हिंद भूमीच विरा, हे विरा ये विरा हा देश आता अखंड खंडीत होई नित्य कुणी गट नवा नव्या दिशेला जाई भुमातेवर या, नित्य होती किती वार शुर पुत्र तिचे, अगणित होती ठार कूट-रणनीतीचे, न दिसे कुठे तरी तेज खड्ग सन्यस्तच, गंज चढे त्या आज अर्थ-नीतीसही भुलवी पश्चीम वारा दारीद्र्य बेकारीची न खंडीत होई धारा या दिशाहीन देशा सावरण्याला अखंड देशाचे, तव स्वप्न पुरे करण्याला त्वरे भेदुनी ये, चक्र व्युह हा सारा हे हिंद भूमीच विरा, हे विरा ये विरा बुद्धिमान अती, तू महान द्रष्टा साहलेस किती, आंदमानीच्या कष्टा पचविल्यास त्या जन्मी, दोन जन्म ठेपा मार्सेलीस उडी आंग्ला, अजून लाविलं धापा भूमते प्रती किती त्याग तू केला घर वित्त चित्त, चरणी वाहुनी गेला तरी त्याग व्यर्थ तो आता रे उरी स्वार्थ भरे प्रत्येकाच्या रे हा देश पोखरे भ्रष्टाचार, अरे तत्त्व नीतीचा, मार्ग तुझा दाखविण्याला तव त्याग सार्थ करण्याला, हे विरा ये विरा महायोगी, तू महाकवी कमलाकर तर्कशुद्ध विचार, लेखणी धारदार दूरदर्शी तू विज्ञानवादी वादात हारती तुजपुढे प्रतिवादी इतिहासाची लिहिली सहा सोनेरी पाने सातवे घडवीले स्वकर्तुत्वाने ती आम्रवृक्षवत्सलता, नवकुसुमयुता त्या सुलता तुज आळवितो, तो बालगुलाबही आता या सार्याचे भविष्य पुढे घडविण्याला ये परतुनी ये हिंद भुमिच्या विरा तिज नसे तुजवीणा प्यारा या जगतीचा अन्य कोणता तारा हे विरा ये विरा ........ ....... सुधीर
|
|
|