Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 23, 2006 « Previous Next »

Kashi
Monday, May 22, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ashwini frarach sundar..
vaibhav tumhi pustak kadhach...!!!

Lopamudraa
Monday, May 22, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pooja,bee, ashwini, vaibhav... tar nehamipexaa chaan ...!!! ek divs late tar itkii ghaai jhaalii sagalyaa kavitaa vaachaayachii ..!!!!

Ninavi
Monday, May 22, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, अश्विनी, ग्रेट!!!

पूजा, ' गुंतू नको.. चुक्कून पण..'? इतका चॉईस असता तर काय हवं होतं!!
मस्त लिहीलंयस.


Jayavi
Monday, May 22, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव....... अ प्र ति म !
बी, एकदम सही!
देवदत्ता.... अहा......सुंदर!
पूजा...... एकदम पटलं. इतकं गुंतायला नकोच कोणामधे. पण ते आपल्या हातात कुठे असतं?
अश्विनी, कल्पना खूप आवडली.....आयुष्यालाच मग आपण द्यायला सुरवात करायची......मस्तच!
काय मस्त फ़ुलतोय हा गुलमोहर! निनावी....किधर है आप?


Ninavi
Monday, May 22, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, मैं हूं इधरीच.
( पण वेळ येईल तेव्हाच कळा येणार ना?)


Moodi
Monday, May 22, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी खुपच सुरेख ग. आमच्या मनातले बोलुन दाखवलेस. मायबोलीकर बनल्यापासुन प्रथमच कविता वाचली तुझी. अनेक चमकते पैलू आहेत तुझे.

Meenu
Tuesday, May 23, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर आश्विनी चुक्कुन सुद्धा गुंतायच कसं नाहि याचा मात्र खरचं सविस्तर विचार करायला हवाय..... मला वाटतं आपण मार्ग शोधायला काय हरकत आहे सर्वांनी मिळुन..

मलाही असच वाटतय कि असा choice नसतो.. नसतो का पण खरच.....


Jyotip
Tuesday, May 23, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

VJ,पुजा, निनावी, बी,देव....सगळेच अप्रतिम...

Shyamli
Tuesday, May 23, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकीही वेडी होऊ नकोस की
स्वत्वासून दूर जाशील..
केवळ त्याचाच......
पूजा...केवळ वाह.......


Naadamay
Tuesday, May 23, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी! जगातल्या इतक्या थोर थोर लोकांमधे अगदी सहज वावरायला मिळतंय, भाग्यच आहे माझं!
सगळेच छान लिहिताहेत...


Maudee
Tuesday, May 23, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी,:-)
तुझ्या कवितेने ख़ूपच विचारात टाकलेय मला.....
तुझी सगळी कविता मला मनापासून पटली....

स्वगत -
प्रश्न फ़क्त इत्काच आहे की तो turning point आता आलाय हे कळनार कसे???
कदाचित ते लक्षात येईपर्यन्तच बरेच दिवस जातील


Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय,मीनु,पूजा,अश्विनी,देवा ....
पुढ्च्या कवितेची वाट पहायला लावतील अश्या कविता .... मस्त !!!

सर्वांचेच मनःपूर्वक आभार ...
मृण्मयी, खरं सांगायचं झालं तर मायबोली हे घर झालंय आणि कवितेचा बीबी म्हणजे वहीतलं पान .... सुचलं की इथेच लिहायचं .... घरात वावरणारी मंडळी येतात,वाचतात ... काही काही जण शेजारी बसून असतात लिहीतानाच ... मग अश्या आपल्या लोकांशी फुकट काय अन विकत काय ... हो ना ? पुस्तक काढेन तेव्हा जरूर कळवेन .. सध्या आपण घरात एकत्र बसून लिहू आणि वाचू
:-)


Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Parents .....

आई स्निग्ध शांत रात
मेघ होई माझा तात
दुडुदुडु बालपण
पुन्हा उरात उरात

मेघ रुध्द ओला ओला
पाणी भरलं डोळा डोळा
फक्त तुझ्यासाठी पोरा
काळा झालो पांढर्‍यात

रात्र कूस होई माझी
चाल तीच अंगाईची
मन निरागस शांत
नीज निवांत निवांत

उजाडेल संभ्रमात
खोल खोल आत आत
मेघ नभात लपेल
रात लपे प्रकाशात

पुन्हा दोघांची चाहूल
कधी घरात घरात
कधी आई स्निग्ध रात ?
केव्हा मेघ होई तात ?


Rmd
Tuesday, May 23, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav: 'miss you' keval ahe! mast ch.

ashwini: agadi man otalayas.. far chhan.

Zaad
Tuesday, May 23, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"miss u" ani 'मार्ग' manapasun awadalya!

Chinnu
Tuesday, May 23, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Excellent vaibhav , मी सुद्धा खुप मिसते आईबाबांना! बाकिच्या कविता अजुन वाचल्या नाहियेत.

Chinnu
Tuesday, May 23, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजही आठवले,
ते तुझे कसमसुन भेटणे,
जणु कधी भेटलोच नाही..
मग थोडे उन,
थोडा पाउस..
ती थेंब थेंब पाण्यावरची गाणी..
पण शेवटल्या वळणावर अशी काही वळलीस
ज़णु कधी काही घडलेच नाही..
अजुनही अडकली आहे ती कागदाची होडी
काय करणार ती तरी,
हल्ली पाउसही पडत नाही..


Lopamudraa
Tuesday, May 23, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा.. वा चिनु... great लिहित जा ग, किती सुंदर लिहितेस...!!!

Ninavi
Tuesday, May 23, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा चिन्नू! क्या बात है!!

Jayavi
Tuesday, May 23, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुरेख!
चिनू, WOW! Terrific! लिखते रहो रे!
अगदी आसुसून वाचतोय आम्ही तुमच्या कविता.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators