Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » झुळूक » Archive through May 23, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Tuesday, May 23, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नजरेच्या कोपर्‍याने तुला शोधने...
तुला माझ्याच कडे पाहतांना पकडणे...
हलके हलके हसुन... माझ्यातच रमणे...
सवयीचे झालेय...
हातातल्या कागदावर
नकळत तुझे नाव लिहुन जाणे...
आणि मग हसुन ते खोडणे...
सवयीचे झालेय...!!!


Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान
मस्त जमलिय ही


Meenu
Tuesday, May 23, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अरे सारखं अस मनातल्या मनात काय बोलतोयस
कळणार कसं रे मैत्रिणीं ना..


Shyamli
Tuesday, May 23, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>स्पंदने चिपळीत काही
काही टाळांत वाजली>>
वा देवा....

आज वैशालीचा दिवस...
वा वा मस्तच ग!




Jyotip
Tuesday, May 23, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहित आहे आता
तु परत कधी येणार नाहीस
मनाचे तुकडे करणार्‍यावर चिडता तरी येत
पण देवाल आवडलेल्या माणसावर मी तरी कसे चिडायचे…...


Jayavi
Tuesday, May 23, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,श्यामलीशी अगदी सहमत....... आज तुझाच दिवस :-)

Jo_s
Tuesday, May 23, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

joytiछानच, शेवटच्या ओळीतला इंपॅक्ट चटका लावणारा

Jo_s
Tuesday, May 23, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, स्मि. , देवद्त्त, प्रिन्सेस सगळेच जोरात आहेत. मस्त.
सुधीर


Poojas
Tuesday, May 23, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा...काय ??
आज एकदम mood में !!
मस्तच... सगळ्यांच्या झुळुका एकदम सहीच.


Sania
Tuesday, May 23, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातल्या भावना तुला कधी क.ळ्नार नाही
न लिहिलेले वाचने तुला कधी जमनार नाही


Jaaaswand
Tuesday, May 23, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया मित्रांनो,
सगळेच जण अफ़ाट लिहिताय चालू द्या :-)

भिजता भिजता मन माझे
चार ओळी लिहून गेले
सगळे उतरले शाईतून पण
अश्रू डोळी राहून गेले


जास्वन्द...


Sania
Tuesday, May 23, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातल्या भावना तुला कधी कळणार नाही
न लिहिलेले वाचणे तुला कधी जमणार नाही


Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंदा बरेच दिवसांनी जोशपूर्ण आगमन..
गुड वन रे..
वाचतांना त्या चार ओळी
मन माझेही दाटून गेले
वेचतांना ती शब्दफुले
अश्रु तुझेही भेटून गेले


Jaaaswand
Tuesday, May 23, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे देवा... मस्तयं :-)


तुझ्या जाण्यानंतर मी
मात्र कधी खचलो नाही
त्यानंतर तूच काय पण
माझा मलाच भेटलो नाही

जास्वन्द...


Ruchita
Tuesday, May 23, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलि, पुजा, जया..तुम्हाला अनुमोदन..
वैशु खरच ग आजचा दिवस तुझाच बर
अशी कशी लोपा आमची
रंगात खुलुन आली
नाही नाही म्हणताना
आजचा दिवस घेउन गेली:-
सगळ्यान्च्या झुळुका सुरेख..
वैशु तुला मेल पाठवलेत याहू वर


Athak
Tuesday, May 23, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुक जोरदार वाहतेय आज , छान लिहिताहेत सगळे

Sania
Tuesday, May 23, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेचताना ती शब्द्फुले
मन माझे भिरभिरले
बोलायचे नसतानाही
डोळे मात्र फितूर झाले


Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेटण्यास काय सखे
रोज मला मी भेटतो
तू आल्यावरीच राणी
हा योग नेमका गाठतो


Mukman2004
Tuesday, May 23, 2006 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज निवांत वेळ मिळाला आणी latest झुळुका वाचल्या..
सगळ्याच great!!! असेच बरसत रहा……

हेवा वाटतो रे तुम्हा लोकांचा.. 

तिकडे कवितांचा BB पन छान वाहतोय.
गुलमोहर फ़ुलला आहे मायबोलीचा.
असाच फ़ुलु द्या आणी आजुन असे छान छान बहार दार वाचायला द्या.


Sania
Tuesday, May 23, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिताय सगळे, मी आजच पहिल्यांदाच लिहिलं, मजा आली




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators