वाहमस्तच ग प्रिन्सेसह्हन आहे उत्तर
|
Smi_dod
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:03 am: |
| 
|
तुझ्या फ़ाडुन टाकलेल्या कवितांचे तुकडे नक्किच माझ्या साठीचे असतिल.. एकदा केलेस ना तुकडे माझ्या मनाचे.. आता कवितेचे कशाला?
|
तुला काय ठाऊक म्हणा कुणी निघून गेल्यावर काय वाटतं तुला तर हे ही माहीत नाही की उन्हात देखील मळभ दाटतं
|
Princess
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:15 am: |
| 
|
सखे, शब्दानेच घात केला बघ... हवे तसे शब्द कागदावर उतरलेच नाही... म्हणुन कवितेचे तुकडे केले. पुन्हा तेच झाले बघ, तू अचानक समोर आलिस अन हवे ते शब्द बाहेर पडलेच नाही तुझ्या मनाचे तुकडे करायचे नव्हते मला, पण ऐनवेळी शब्दानी दगा दिला.
|
Maudee
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:26 am: |
| 
|
princess , जबरदस्त दिलं आहेस explanation ..... just excellent याबद्दल माझ्याकडून तुला...

|
Rmd
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:32 am: |
| 
|
मळभ दाटून येतं तेव्हाच ओघळू शकतात सरी तुला कळलं नाही कधी मी तुझीच आठवण जपली उरी sorry तुमच्या मधेच लिहायचा आगाऊपणा करत्ये. पण अगदीच रहावलं नाही
|
Princess
| |
| Tuesday, May 23, 2006 - 3:37 am: |
| 
|
माउडी, धन्यवाद... माझी mail मिळाली असेलच.
|
स्मिता,वैभव,प्रिंसेस,रुपा... आम्ही आहोत वाचक बर... थांबलेय पुढे वाचायला.... !!!बहर आलाय झुळुकेला...
|
जेव्हा तुझी आठवण येते... शब्दांचे उमाळे... कवितेतुन वाहु लागतात.. तुला कधी कळेल.. फ़ुले रात्रीसुध्दा जागु लागतात...!!!
|
Maudee
| |
| Tuesday, May 23, 2006 - 4:19 am: |
| 
|
हो ग री पण केलाय....
|
Ruchita
| |
| Tuesday, May 23, 2006 - 4:29 am: |
| 
|
म्हणे तुझ्या कविता दु:खाने ओथम्बलेल्या असतात पण ते शब्द कागदावर उमटायला दु:ख हि तुच देतोस ना...
|
Smi_dod
| |
| Tuesday, May 23, 2006 - 4:29 am: |
| 
|
रात्री जागणारी फ़ुले तुला कुठुन दिसणार दिवसा सुध्दा बंद असलेल्या डोळ्याना रात्रीचे काय कळणार
|
काव्य मी लिहावे एवढी योग्यता माझी कुठे शब्दरूप तुच आता बाकी सर्व अगदी मिथे
|
दु:ख गे माझ्या मनीच तुझ्या कवितेत मी जाणिले मग ओधल्या हास्यास आता माझ्या लेखणीने बाणीले
|
तुझ्यात हरवुन माझी मी ना राहीली... काय काय सांगु तुला... कशी कशी या जीवाने... तुझी वाट पाहीली... तुझ्या भेटीचे स्वप्नही आता ना राहीले... जीवाचे या आता... सुखाचे वेडही हरपले...!!!
|
ऐकली पुन्हा पुन्हा रे हाय मुरलि फिरुन वाजली स्पंदने चिपळीत काही काही टाळांत वाजली
|
Smi_dod
| |
| Tuesday, May 23, 2006 - 5:03 am: |
| 
|
तुझ्यात हरवलेल्या मला मी पण कुठले उरले तु गेल्यावर मात्र हे प्रकर्षाने जाणवले.... गेलास तेव्हा मी कोण याचेही भान नव्ह्ते विरहाने तुझ्या मी कोण हे जाणवले..
|
विरहाने व्याकुळ... मन एकच मागणे त्याचे धन... इतका निष्ठुर नको होउस.. नजरेला नजरेपासुन दुर नको करुस...!!!
|
कसा जावा क्षण विरहाचा.. आताच तर बरसायचे थांबले नभ... अजुन कवडसाही नाही उन्हाचा... आज.. असेच राहणार वाटते मळभ आभाळवर आणि असह्य विरह... पसरलेला दारापुढच्या... वाटेवर...!!!
|
Princess
| |
| Tuesday, May 23, 2006 - 5:27 am: |
| 
|
वाह लोपा खुप छान
|