Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » झुळूक » Archive through May 23, 2006 « Previous Next »

Jayavi
Monday, May 22, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है रे!!

Princess
Monday, May 22, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहे जयावी

प्रिन्सेस


Meenu
Monday, May 22, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

princess एकच गाव दे गं पण छानसं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं दे.. आणी हो नदिही हवी हं त्या गावात बारमाही वाहणारी.... ;)

Poojas
Monday, May 22, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याजणी काय मस्तं लिहिताय..
ए मी पण होते join ...


कुणीतरी असावं आपलं
मनातलं समजून घेणारं..
आपल्या कणभर दु:खाने
मनस्वी अस्वस्थ होणारं..
एकटेपणाच्या वळणावर
बोलकी साथ देणारं..
दूर दूर तरी नकळत
खूप काळजी घेणारं....!!!


Psg
Monday, May 22, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा माऊडी, correct आहे एकदम! :-)

Meenu
Monday, May 22, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटणं आपल्या हाती नसतं कधीच
कधी वाटेल तुला आपण पक्षी व्हावं
असं का वाटलं याला उत्तर नाहि
तसचं असतं प्रेमाचहि
कोणाबद्दल प्रेम का वाटावं
याला उत्तर नाहि
तसच अमक्याबद्दलच वाटावं असं
प्रेम ठरवुन करता येत नाहि
प्रेम सागराच्या लाटेसारखं
मुक्त प्रतिसाद देतं
तिनं ठरलेल्याच मार्गानी वहाव अस सांगता येत नाही


Shyamli
Monday, May 22, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow मीनु....
पूजा...सहिच
देवा तु का गप्प होतास एवढा वेळ
येऊ दे अजुन सहिये!!!!
आणि कविराज वैभव कुठे गेलेत...?
माउडि


Athak
Monday, May 22, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा वा एकसे बढकर एक कविता , लिहीत रहा असेच छान छान .


Devdattag
Monday, May 22, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय आहे श्यामलि.. थोडा विषय' हे कधी बदलणार' कडे गेला होता.. त्यामुळे शांत होतो..:-)
दिवे घ्या सगळ्यांनी


Shyamli
Monday, May 22, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदी नाही का कुठेतरीच प्रगट होते
डोंगरावरुन खळाळत सुटते
जाणार कुठे आणि दीशा कोणती
कुठे तिला कळते..?
पुढे जाऊन सागर आहे का
कड्यावरुन आत्मघात
हे सुधा कुठे कुणाला विचारते?

श्यामली!!!


Poojas
Monday, May 22, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

THANKS A LOT.... SHYAMLI !!!

Princess
Monday, May 22, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
मलाही नाही माहित आपली कविता दुसर्‍या विभागात कशी हलवतात ते... तू सांग ना

आता झुळुकेवर झुळुकाच येतिल याची काळजी घेइन मी.


Princess
Monday, May 22, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी

अग मी मुळी सुद्धा
personally
घेतलेले नाहिये. पण माझ्या त्या कविता वाचुन मलाच काहीतरी विचित्र वाटायला लागले. तुझे प्रश्न वाचुन तर धस्सच झाले...

आणि तू कशाला पोस्ट डिलिट करतेस??? कारण तुझ्या कवितेनेच तर जुगलबंदीत मजा आलिये.



Mrinmayee
Monday, May 22, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, स्मी, प्रिंसेस, मीनू खूप खूप सुंदर झुळुका!!! देवदत्ता, तुझ्या झुळुका अप्रतीम, नेहमी प्रमाणे..:-)
खालिल झुळूक, देशाच्या सद्य स्थितीला बघता स्वातंत्र्यवीराच्या मनातील भावना..
देऊनी सर्वस्व माझे
उजळल्या मी दीपमाळा
लावीली होळी तयांची
तरिही अंध्:कार काळा

ह्यावर उत्तर ही सुचल...
व्यर्थ ना बलीदान तुमचे
दीपही ना व्यर्थ जाती
चेतवूनी अंतराग्नी
आम्ही क्रमतो मार्ग राती

रात्र काळी दिन काजळे
चालणे क्रमप्राप्त होते
उजळीती जे मार्ग माझा
ते तुझेच दीप होते


Lopamudraa
Monday, May 22, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळकेवरही बरच काही होउन गेलय... मस्त आहेत सगळ्या... झुळुका...!!!!
मैत्रीणिंनो थांबु नका... वहात रहा... अशाच सुगंधी झुळुका येउ देत...म्रिन्मयी, princess.,shyaamalii,poojaa,meenu,smitaa..best !!!!


Princess
Monday, May 22, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावनांचा कल्लोळ झाला
अन शब्दांचा गोंधळ झाला
मलाच कळले नाही
मी काय लिहिले...
भावना मनात राहिली
अन शब्द वाहुन गेले.


Smi_dod
Monday, May 22, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावनांचे वादळ शमत नाही
शब्दसुरांशी नाते हि जुळत नाही
रंगरेषांशी असलेली नाळ माझी
तुटलीय.....
शब्दावाचुन,रेषांवाचुन कशी जगतेय मी
माझे मलाच कळत नाही..


Princess
Tuesday, May 23, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता
nice one !!!

}

Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी .... धमाल चाललिय अगदी .... चारोळी नाहिये पण छोटी आहे म्हणून इथे टाकतो

तू म्हणालास ना ....
मी तुला प्रत्येक कवितेत दिसले होते ...
ते त्या सुंदर डायरीत जपलेल्या कवितांमध्ये ......?
की .....
अर्धवट लिहून फाडून टाकलेल्या ?


Princess
Tuesday, May 23, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग तु मला दिसली होतिस ती त्या फाडुन टाकलेल्या कवितांमध्येच....

कारण प्रयत्न करुनही तुझ्या इतकी सुंदर कविता जन्मलीच नाही...

वैभव, तुला उत्तर देताना हात थरथरताय माझे. पण तु म्हणतोस त्याप्रमाणे कळा सुरु झाल्या की बाळ जन्मायलाच हवे नही का?? :-)






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators