Miss You .... मोगर्याचा गंध केवळ येतसे वार्यावरी रान मोहाचे नव्याने पेटते वणव्यापरी मी तुला कित्येकवेळा बोललो आहे,सखे भेटल्याविण भेटण्याची ही तर्हा नाही बरी चांदण्यांनो जा तिला सांगून या माझी दशा ... ऐकतो काहीतरी हा, बोलतो काहीतरी सोडले आहे अताशा मी निवारा शोधणे आठवांचा पूर येतो नेमका माझ्या घरी मोकळे केलेस ना तू मेघ ते डोळ्यांतले ? कोरड्या देशात माझ्या बरसल्या ओल्या सरी चालली माझ्या दिशेने प्राक्तनाची वाट ती केशरी मेंदीत रेषा झाकली आहे जरी VJ
|
Poojas
| |
| Monday, May 22, 2006 - 6:36 am: |
| 
|
सुभानल्ला ऽऽऽ बहोत खूब !!! as usual great...! खूपच छान V J .. 
|
Bee
| |
| Monday, May 22, 2006 - 6:45 am: |
| 
|
मार्ग... खूप काही उरल आहे ती वाट मात्र मागे पडली; पुढची नकोशी आहे तिच पायाशी कशी आली? रिक्त ओंजळ कमी पडावी समोर इतकं वेचायचं आहे; 'ईदम न् मम' चा सुर आतला मी घोकत आहे चार पावलं मागे जातात नवी आठ समोर पडतात पुढे की मागे करता करता माझे मार्गच बदलतात..
|
Psg
| |
| Monday, May 22, 2006 - 6:46 am: |
| 
|
वैभव, तुझं inspiration काय आहे? u are a gifted poet! सुंदर!
|
Shyamli
| |
| Monday, May 22, 2006 - 6:46 am: |
| 
|
भेटल्याविण भेटण्याची ही तर्हा नाही बरी>>> आहाहा..... .. सुरेखच रे! वैभवा साष्टांग नमस्कार तुला ह्याच पण गाणं होईल छान!!! 
|
Shyamli
| |
| Monday, May 22, 2006 - 6:49 am: |
| 
|
रिक्त ओंजळ कमी पडावी समोर इतकं वेचायचं आहे;>> वा....बी.... छानच
|
वैभव खासच रे.. बी छान रे
|
Dha
| |
| Monday, May 22, 2006 - 7:03 am: |
| 
|
वैभव, मी तुझ्या कवितांची fan झाले रे.... मस्त च लिहितोस. वसुधा
|
Saavni
| |
| Monday, May 22, 2006 - 7:22 am: |
| 
|
अरे उन्हाळ्यात बाहेर गुलमोहर बहरतो तेव्हाच असा मायबोलीवर ही बहरावा हा ही योग असा ठरलेला होता का . एकदमच झकास. हल्ली मला कविता होतात तर एकदम besht.
|
Moodi
| |
| Monday, May 22, 2006 - 7:31 am: |
| 
|
फार सुरेख!! वैभवची प्रत्येक कविता मोगराच फुलवते. 
|
हाय ती नजर अन ती कमान डोळ्यावरी मी इथे शहिद आता नाव माझे आहे शरी स्मरे मला ती मिलनाची बेधुंद रात रातराणीचा गंध मी माळला आहे उरी वेचिल्या मी चांदण्या होत्या त्या रात्री सखे दैव माझे हाय आज एक ना उरली करी सोडले आहे तसे मी मलाही मोजणे माझे नसे काहिच आता एक ह्या देहापरी गुंतले जे श्वास होते प्रीये तुझ्यातही चालणे त्यांचे अताशा बात नाही आहे खरी मागणे माझे सखये दुसरे नाहि काहि तरी एक अश्रु तुही वहावा माझिया गे पंजरी
|
Poojas
| |
| Monday, May 22, 2006 - 8:08 am: |
| 
|
रे सख्या मागू नको ते सोबती अश्रू खरे.. तू नसे तेव्हा तयाचा डोह डोळ्यांशी उरे.. ते दिल्यावर रिक्त मी मग श्वास मोजावे किती.. अंतरीच्या आसवांना रुक्ष होण्याची भिती..!!!
|
Poojas
| |
| Monday, May 22, 2006 - 8:10 am: |
| 
|
कुणासाठी.. कुणासाठी इतकीही वेडी होऊ नकोस की त्याची सवय होईल.. त्याच्या शिवाय जीणं भकास दिवस कसा उदास जाईल.. इतकीही वेडी होऊ नकोस की स्वत्वासून दूर जाशील.. केवळ त्याचाच विचार करुन स्वत्:पासून पोरकी होशील.. इतकीही वेडी होऊ नकोस की अपेक्षांचं होईल ओझं.. वेळीच आवर सावर स्वत्:ला उरलं सुरलं अवसान तुझं.. शहाणी हो.. विसर सारं.. गुंतू नक्कोस.. चुक्कून पण.. चुकांमधून शिक थोडं.. चिंतू नकोस वेडे क्षण..!!!
|
Himscool
| |
| Monday, May 22, 2006 - 8:24 am: |
| 
|
सध्या कवितांचा पूर आला आहे इकडे... आणि त्यातून चार पाच दिवसांनी भेट दिल्यामुळे खुप कविता वाचल्या त्यामुळे जरा डोक्यात गोंधळ उडाला आहे. सगळे खूप छान लिहित आहे.. कौतुक करताना काय शब्द वापरायचे तेच कळत नाही आहे. कविता करता येत असती तर कवितेत व्यक्त केले असते पण तो आपला प्रांत नाही. अशाच कविता सगळ्यांना वेळोवेळी प्रसवू देत आणि माझ्यासारख्यांना त्यांचे कौतुक करायची संधी मिळू दे...
|
देवदत्ता, पूजा, बी खूप प्रतीभावान आहात. सुंदर कविता. वैभव तुझ्या कवितांना कौतुक करायला शब्द सापडत नाहीत. इतकं अप्रतीम काव्य मायबोलिकरांना (चकटफ़ु) वाचू देतोस हे तुझ मोठेपण. पण ह्यांचा संग्रह छापलास तर विकत घेऊनही वाचू
|
वैभव,पुजा,बी,देवदत्त सगळ्यांच्याच कविता एकदम मस्त आहेत. वैभव, Mrinmayee म्हणते ते अगदी खरं आहे संग्रह छापलास की नक्की विकत घेऊ.
|
Ninavi
| |
| Monday, May 22, 2006 - 9:31 am: |
| 
|
जियो वैभव!!!! मस्त!!!!! पूजा, ही वैभवची आहे ना, याला म्हणतात गज़ल. मी कसली गुरू!!
|
Ashwini
| |
| Monday, May 22, 2006 - 9:57 am: |
| 
|
वैभव, miss you...ultimate . सगळे नविन जुने लोकपण मस्त लिहिताहेत. खूप दिवसांनी कविता टाकायचं धाडस करते आहे. Turning Point पुरे झालं आता हे स्वतःसाठी जगणं राहून गेलेले हिशेब आयुष्याकडे मागणं जे तुला हवं आहे ते नाहीये आयुष्याकडे आता उपयोग नाही घालून देवाला साकडे आयुष्य जिथे देणं थांबवतं तिथे याचना मिटून टाकावी आयुष्यालाच मग आपण द्यायला सुरूवात करावी पापण्यांपाशी साठलेल्या अश्रूंनी आता माघारी फिरावे पुढे आलेल्या हाताने अन् पुसावी दुसर्यांची आसवे
|
Shyamli
| |
| Monday, May 22, 2006 - 10:01 am: |
| 
|
वा वा अश्वीनी एकेक ओळ उच्च आहे..... 
|
आयुष्यालाच मग आपण द्यायला सुरूवात करावी! अश्विनी मस्त! श्यामली तुझ्या त्या font कलर मुळे पटकन कळत नाहीये काही लिहिलं आहे की नुसतीच smiley आहे ते
|