|
Ninavi
| |
| Sunday, May 21, 2006 - 2:17 am: |
| 
|
वैभव, What a cute baby! अमेय, ' अभिनंदीत'?? म्हणजे आपण अभिनंदक का? 
|
Ninavi
| |
| Sunday, May 21, 2006 - 3:30 am: |
| 
|
सॉरी.. सॉरी.. तुम्ही बरंच काही सांगताय आणि मला काहीच कळत नाही त्यातलं अलाण्या देशातलं अराजक, फलाण्या देशातला भ्रष्टाचार कुठे पूर, कुठे अवर्षण, प्यायच्या पाण्याचीही मारामार.. वाईट वाटतं हो ऐकून, पण काय करावं समजत नाही सॉरी.. खरंच सॉरी.. आणि खरं सांगू का, माझं तितकंसं लक्षही नाहीये शेजारच्या काकू आजारी आहेत ना, त्यांना डॉक्टरकडे न्यायचंय.. कामवाल्या सखूबाईंची लेक काल बाळंत झाली, तिच्या मुलासाठी काहीतरी घ्यायचंय.. सॉरी.. माझं राहू द्यात... घ्या ना शिरा अजून.. तुम्हाला आवडतो, माहीत आहे मला.. सॉरी हं, पण त्या अवर्षणग्रस्तांसाठी काय करताय म्हणालात?...
|
Jayavi
| |
| Sunday, May 21, 2006 - 5:36 am: |
| 
|
निनावी सही.... एकदम सही!
|
Shyamli
| |
| Sunday, May 21, 2006 - 5:48 am: |
| 
|
निनावे जागिचेस काय ग अजुन? छाने सॉरी
|
Athak
| |
| Sunday, May 21, 2006 - 6:56 am: |
| 
|
मला पण काही कळल नाही , सॉरी
|
Meenu
| |
| Monday, May 22, 2006 - 12:16 am: |
| 
|
धन्यवाद सर्वांनाच माझ्या कवितांना दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल.. त्याच तर पुढचं नविन काहि लिहायचा हुरुप देतात.... बापु खरं सांगायचं तर तुमची अंत वरती दिलेली प्रतिक्रिया मला तितकीशी कळली नाहिये... तुम्हि थोडं अजुन स्पष्ट कराल का? मला सुधारणा करायला नक्कि आवडेल.. जगणं चा form मात्र मला स्वत:ला खुप आवडला. सुचलं तेव्हा लिहिताना असा काहि form ठरवला नव्हता. पण कविता लिहुन झाल्यावर मात्र अतिशय भावली. कारण एक म्हणजे मला जे काही सांगायचं होतं ते सगळं त्यात आलय. दुसरं कारण म्हणजे अगदि कमी शब्दात प्रत्येक ओळित दोन शब्द..
|
Meenu
| |
| Monday, May 22, 2006 - 12:30 am: |
| 
|
वैभव.. समुद्र सुंदर... नादमय, पुजा छान.... निनावि अगदि असचं होतं गं खुप मस्त उतरलयं sorry मधे
|
Naadamay
| |
| Monday, May 22, 2006 - 12:33 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी! वैभव, निनावी सुरेखच! हल्ली मी कविता लिहितो नव्हे, त्या मला होतात! सांगावंसं वाटतं जेव्हा आपलं गूज कुणाला मग ते कुणीतरी मी स्वतःच का असेना! तेव्हा शब्द बरसू लागतात भावना लयबद्ध होतात... हल्ली मला कविता होतात.. गण वृत्त मात्रा कधी जमतात कधी नसतात.. मुक्त असले शब्द तरी छंदातून प्रगटतात स्त्री नसलो तरीही सृजनाचा स्वानंद देतात.. हल्ली मला कविता होतात.. आवड नसते अडचण विषयही नसतो तसा मनच उगमस्थान त्याचा ठाव लागावा कसा प्रेमकाव्यातही मग अध्यात्माचे रंग भरतात.. हल्ली मला कविता होतात.. पण मग यापूर्वी अशा का होत नव्हत्या मला? भावना होत्या गोठलेल्या की दुष्काळ होता शब्दांचा? सर्व घटनांचा योग ठरलेला योग्य वेळीच कळा येतात.... हल्ली मला कविता होतात........
|
वा नादमय! सुरेखच! वैभव च्या पाठोपाठ आता तुम्हाला पण का तुमचं ही अभिनंदन करायला हवं मग ही वाली अगदी गोजीरवाणी झालीये फ़क्त एक suggestion ... "भावना होत्या मेल्या" पेक्षा "भावना होत्या गोठल्या \ झोपल्या" जास्त बरोबर वाटेल असं वाटतं... झोपेतून जागं होता येतं हो... मरून जाणं कायमचच असतं... कलाकृतीची चूक काढत नाहीये, ती मुळातच सुरेख आहे... पण एक छोटासा अभिप्राय फ़क्त.
|
Ninavi
| |
| Monday, May 22, 2006 - 12:48 am: |
| 
|
नादमय, छान आहे बाळ. अमेय, या बीबीचं नाव बदलायला लागणार की काय! 
|
तेच म्हणणार होतो निनावी "सॉरी" खूपच अर्थपूर्ण आहे... विचारांचा गाभा भरून राहिल्या सारखा वाटतोय त्यात
|
Naadamay
| |
| Monday, May 22, 2006 - 1:15 am: |
| 
|
अमेय, सूचना मनापासून ग्राह्य आणि मी बदललाय तो शब्द. धन्यवाद!
|
आत्ता वाचून झाल्या सगळ्या कविता.. वेड चाललंय.. एक नंबर अगदि.. वैभव.. समुद्र आणि बाळ दोन्हि अप्रतिम.. सुरेख मांडलय पूजा, मीनु सगळ्याच छान.. मीनु अंत जास्त आवडली नादमय.. सुरेख.. निनावि.. 'सॉरी'.. खरंय..
|
Ninavi
| |
| Monday, May 22, 2006 - 2:46 am: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स निनावी निनावी

|
Maudee
| |
| Monday, May 22, 2006 - 3:05 am: |
| 
|
superb!!!!!!! बालपण, नदी, समुद्र...... "सग्ळ्यानाच फ़ार छान कविता झाल्यात....." " sorry " जर मी कुणाच्या कवितेबद्दल अभिप्राय दिला नसेल तर.....सगळ्या कविता एकदमच वाचल्यामुळे अस घडू शकत...... " u all have got cute babies "
|
Athak
| |
| Monday, May 22, 2006 - 3:14 am: |
| 
|
असेच छान छान सुंदर गोजिरवाणे प्रसवत रहा
|
Moodi
| |
| Monday, May 22, 2006 - 4:07 am: |
| 
|
वा नादमय.... " सर्व घटनांचा योग ठरलेला " सुरेख!! 
|
Jayavi
| |
| Monday, May 22, 2006 - 4:28 am: |
| 
|
नादमय, खूपच सुरेख! खरंच, योग्य वेळ आली की मगच होते प्रसूती
|
Poojas
| |
| Monday, May 22, 2006 - 4:38 am: |
| 
|
CONGATULATION & CELEBRATION... गुलमोहोर वरिल सर्व पालकांना व त्यांच्या गोजिरवाण्या बाळांन माझ्या तर्फे ही सप्रेम भेट..!! 
|
कौतुकाबद्दल सर्वांचाच आभारी आहे ..... शिल्पा ..... इतक्या कविता वाचतानाच अभिप्राय राहून गेला ना ? मग sorry काय ? वाचत होतीस हा ही एक प्रकारचा अभिप्रायच की .
|
|
|