Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 21, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 21, 2006 « Previous Next »

Naadamay
Saturday, May 20, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू किती बदललीस

चिमुरडी धार हो ऊन बर्फातून निघालीस
गिरिकंदरातून तू खळखळत वाहिलीस
निसर्गाच्या सौंदर्याने सुंदर हो ऊन गेलीस
सुस्वर संगीताची रागरागिणी आळवलीस
वाहत वाहत स्वतःची व्याप्ती तू वाढवलीस
गेलीस ज्या ठायी तिथे मंगल हो ऊन गेलीस
ईश्वराचे चरण धुवून नम्र दासी झालीस
साधूच्या अर्घ्यातून अर्पण सूर्याला जाहलीस
गोडीने तहानेची खळगी भरून टाकलीस
ज्ञानासह विज्ञानाला वरदान तू ठरलीस

तुझ्या नकळतच तू संथ भव्य दिव्य झालीस
एक दिवस जाऊन सागरात सामावलीस......
आणि मग तू किती बदललीस

सर्वस्व बहाल सहजी केलेस तू संगमात
आता तुझा ठावच लागत नाही या समुद्रात
नाही तुझे माधुर्य इथे न मायाही अंतरात
कोमल सुस्वरांचे रूप पालटले रौरवात
सोडून आलीस घर तुझे या वेगळ्या जगात
समर्पण श्रेष्ठ तुझे ठरतसे त्रिभुवनात
तुला सोडून झरे तुझे गेले आपुल्या नादात
नियतीने बंदच केली तुझ्या माहेराची वाट
एकली तू शांत तरीही रमसी तुझ्या स्वप्नात
वात होता तप्ततम फिरूनी जासी आकाशात...

पुन्हा उगम पावण्यासाठी.....?





Marathi_premi
Saturday, May 20, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा बालपण अगदी डोळ्या समोर उभं राहिलं फारच छान!
नादमय सुरेख!


Ruchita
Saturday, May 20, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा..तुझ्यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली "बालपणाचा काळ सुखाचा"
नादमय..सरितेचे वाहणे सुरेखच..
अमेय...:-)


Poojas
Saturday, May 20, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी..!!

नादमय.. खूपच छान
Something Different !!


Jyotip
Saturday, May 20, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु ख़ुपच छान आहेत कविता,पुजा बालपण सुरेख़

Poojas
Saturday, May 20, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्योती..
गुलमोहोर वर तुझं स्वागत..!!


Jyotip
Saturday, May 20, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स पुजा
मी इथे फक्त वाचायला बरका



Vaibhav_joshi
Saturday, May 20, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुद्र ....

कधी कधी हा समुद्र बघतो अन वाटतं
छ्या ! काय हे जिणं साला
ह्या फेसाळणारया भावना, ह्या उसळणारया लाटा...
काय ह्यांचा उपयोग?
कुठलातरी किनारा शोधायचा..क्षणभर भेटायचं... परतायचं ...
येताना वाळूतल्या पाऊल खुणाही पुसायच्या ...
हो... उगाच कुणाला कळायला नको ..
आला होता .. सांत्वन शोधत
मग बुडणारया सूर्याची आग
उरात साठवुन घ्यायची.. रात्रीपुरती..
दाह दाह नुसता...
हं .. अजून आग व्हायला हवी
त्याशिवाय पाऊस पडणार नाही.. इतरांसाठी..
मोती कढणार नाही.. इतरांसाठी

कधी कधी हा समुद्र बघतो अन वाटतं
छ्या ! काय हे जिणं साला
कुणाची तरी पौर्णिमा, अमावस्या ठरवणार ...
ह्याची भरती अन ओहोटी..
मनाप्रमाणे वागायची पण खोटी?
कधीतरी भरकटत येणार एखादं तारू
उसळू नकोस म्हणून पाया पडणार
पैसा वाहणार ... अन तुडवुन निघून जाणार...
मग गिळलेल्या पैशाशी इमान राखत
बसायचं... लाचारी चाखत ...
काही... काहीच नाही स्वतःच्या हातात?
मग हो ना कोरडा ठक्क...कळू दे जगाला किंमत...
आहे नियत?
अं हं.. आता असंच चालायचं हे चक्र ...

छ्या ! काय हे जिणं साला...
कधी कधी हा समुद्र बघतो अन वाटतं...
कशाला बघतो मी ह्याला?
समुद्र कधी बघतं का कुणी?
आरशात?


Poojas
Saturday, May 20, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

VJ ... नेहमीप्रमाणेच.. मस्तं..!!

''समुद्र कधी बघतं का कुणी?
आरशात?''

शेवट नाही कळला मला..
कदाचित.. मला तितकी समज नाही म्हणून असेल.... but nice one !!


Ameyadeshpande
Saturday, May 20, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, समुद्रात आलेलं उधाण जाणावतयं चांगलच... असाच खळखळत ठेव पण त्याला...

Ninavi
Saturday, May 20, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! काय बहरलाय हा बीबी.

वैभव, नादमय, सुंदर रे. दोन वेगळे दृष्टीकोन.
पूजा, बालपण मस्त, पण जरा लांबली का गं?
मीनू, सगळ्याच चांगल्या आहेत.


अमेय, मी सीनीअर झाले हे तुझ्याकडून आत्ताच कळलं मला.
(स्वगत : म्हणजे आता हे दात विचकणं शोभणार नाही बहुतेक. )

Moodi
Saturday, May 20, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय व्वा! अप्रतीम. खरे तर हे शब्द पण कमी पडतील तुमच्यासाठी. शब्दसमुद्रातील रत्नांचे भांडार आहे तुमच्याकडे.

पमाची उणिव प्रकर्षाने जाणवतीय आता. पमे कधी येतीयस ग?


Vaibhav_joshi
Saturday, May 20, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय
सुंदर रे .... मूडीला माझं अनुमोदन


Poojas
Saturday, May 20, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी..
अगं आणखी २ कडवी होती.. गाळली मी इथे..
मूळ कविता सुचली तेव्हा पहिली ५ कडवीच होती.
मग एका काव्यवाचन स्पर्धेसाठी मी हीच कविता निवडली..
आणि वेळेत बसायला हवी म्हणून मग पुढची ६ कडवी add केली.
पण.. तरिही हा विषयच असा आहे की.. जितकं लिहू तितकं कमीच आहे.


Vaibhav_joshi
Saturday, May 20, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंग्रॅच्युलेशन्स ...

एखाद्या दिवशी
कविता सुचत नाही म्हणजे नाहीच...
कासावीस .... कासावीस ...
जणू धडपड धडपड चालु असते
आतमध्ये ...
आणि प्रत्येक विचाराला
शरीर हादरवून टाकणारी
एक प्राणांतिक वेदना
प्रत्येक कळ आधीपेक्षा जीवघेणी
आता शक्य नाही म्हणायचं अन तरीही
वाट बघत रहायचं...
मग एका अतिशय बेसावध क्षणी
अस्तित्वाचा पडदा फाडत
स्पष्ट ऐकू येतो .... आतला आवाज ...
आणि मग बरेच आवाज ...
Congratulations ! What a cute baby

VJ


Shyamli
Saturday, May 20, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन हो जोशी...
बाळ छान आहे हो


Vaibhav_joshi
Saturday, May 20, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Typing mistake होती श्यामली ... धन्यवाद

Ameyadeshpande
Saturday, May 20, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी दात विचकावण्याचा आणि सिनीयर होण्याचा काय संबंध... आपले झक्की सर जर इतके छान चावत असतात सगळ्या bb न्वर मग तुला दात विचकवायला काहीच problem नाहीये
ल. तो. मो. घा... दिवे घ्या :-)


Ameyadeshpande
Saturday, May 20, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोशी साहेब आहो अशी प्रत्येक वेळी अंतरीक कळ उमटून केवढ्या तरी cute babies ना जन्माला घातलय तुम्ही इथे... congratulations प्रत्येक वेळी हे असं अभिनंदीत होण्याबद्दल :-)

Jayavi
Sunday, May 21, 2006 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय,पूजा अप्रतिम!
वैभव, तुझं काय करायचं रे? JUST TOOOO GOOD! सागराला बघताना असा विचार मला मात्र कधीच आला नाही. काहीतरी उदात्त, भव्य, दिव्य... असं वाटतं नेहेमी. पण तुझी कविता वाचल्यावर..... कुछ तो भी बदला अंदर.
congratulations पण सुरेखच! आता तुझ्या कवितांची चटक लागलीये :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators