Chinnu
| |
| Thursday, May 11, 2006 - 4:23 pm: |
| 
|
निनावी, अगदी उच्च! लोपा, स्वप्नाचा कवडसा, ओले स्वप्न खुप सुंदर. तुझ्या कवितेत, तन झाले इंद्रधनुष्यी = i.ndradhanuShyee असे लिही.
|
Meenu
| |
| Friday, May 12, 2006 - 1:05 am: |
| 
|
निनावी सुंदर...... आणि लक्षात येतं.. ' जिवंत आहोत तर अजून आपण..' क्या बात है..
|
Ruchita
| |
| Friday, May 12, 2006 - 3:58 am: |
| 
|
"जिवंत आहोत तर अजून आपण"... निनावि खुपच छान
|
Poojas
| |
| Friday, May 12, 2006 - 8:28 am: |
| 
|
लोपा.. श्वासांची आस.. मस्तच गं निनावी.. गुरु... आपका जवाब नही तुमच्या शब्दांवर आम्ही फ़िदा बरं का..:-)
|
चिनु.. तु आता लिहित का नाहिस..!! रुचिता, चिनु,पूजा... धन्यवाद.. निनावि गुरु... चारोळी मस्त.. नेहमीप्रमणे..
|
पूजा, शामली, रुचिता अन लोपा, खूप सुंदर,आणि यथार्थ शब्दात गुंफलेल्या तुम्हा सगळ्यांच्या झुळुका वाचायला आवडल्या! देवदत्ता, तुझे 'जवाब' अगदी लाजवाब!
|
Poojas
| |
| Friday, May 12, 2006 - 10:45 am: |
| 
|
तुझ्यापेक्षा तुझा विचार मीच जास्त करते अन विचारांच्या भागाकारात तुझीच बाकी उरते..
|
Spuranik
| |
| Monday, May 15, 2006 - 10:13 pm: |
| 
|
तुझ्यामध्ये सतत रहाणारी मी तुझ्यात स्वतःला शोधू पहाणारी मी अन् माझ्या मध्ये भरलेला तू पण माझ्यात भरूनही उरलेला तू
|
Aavli
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:54 am: |
| 
|
jara jordar aani bharghos livha
|
हे असं क्षणभरंच येणं आणि भेटून जाणं कसंबसं विझत आलेल्या श्वासांचं काही काळासाठी पेटून जाणं
|
मी अजूनही बोलतो कितीदा सभोवतीच्या अंधाराशी तू अजूनही चांदवा नभीचा प्रकाशगीते अगम्य गाशी
|
Shyamli
| |
| Saturday, May 20, 2006 - 3:31 pm: |
| 
|
पेटणं आणि पेटवणं यात फार फरक आहे पेटणारा जळतो आणि पेटवणारा फक्त बघतो श्यामली!!!
|
अपरात्री श्वासांना लागे विसावण्याची अनाम आशा उजाडले की सुरू होतसे जिवंततेचा खुळा तमाशा
|
हळू बोल रे गावामधल्या भिंती जाग्या, वारा हाले कोण बोलले काय बोलले फक्त एवढी चर्चा चाले
|
Shyamli
| |
| Saturday, May 20, 2006 - 3:44 pm: |
| 
|
काय रे मॅच का?
|
खरेच का ह्या जगात येवुन मनाप्रमाणे जगतो आहे ? रोज स्वतःच्या डोळ्यांनी मी मरणे माझे बघतो आहे
|
नाही गं श्यामली ... मूड लागलाय
|
किती कोरडा इथे उन्हाळा श्रावण देखील हरतो आहे तरी एकटा काट्यांसंगे निवडुंग इथे मोहरतो आहे
|
Shyamli
| |
| Saturday, May 20, 2006 - 3:51 pm: |
| 
|
खरेच का मी ईथे आहे काल तीथे केंद्रस्थानी होते आणि आज.......... परीघावर आहे श्यामली!!! हम्म चांगलय चालु दे
|
दिशांदिशांना पुकारतो मी तुझे नाव घेऊन अताशा उगाच वेड्या मनास चाळा प्रतिसादाची भोळी आशा
|