Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 18, 2006 « Previous Next »

Meenu
Wednesday, May 17, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका सुंदर.. सहि कहा भाई एकदम बढिया..

Ninavi
Wednesday, May 17, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, सुंदर गं. ' बाकीची वादळं' आपली म्हणता आली असती तरीसुद्धा पूर्ण होणार होती का ही कविता? कोण जाणे..

Chinnu
Wednesday, May 17, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नी, शेवटली ओळ काही कुठेतरी अडखळली ग. कविता छान आहे तरी!

Ajjuka
Wednesday, May 17, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धवट अशासाठी..
कविता पुर्ण तर वाटतेय पण ती माझ्यासाठी पूर्ण नाहीये..
इतर वादळं आपली म्हणता आली असती तर ही कविता आलीच नसती ना..
कविता पुढे सरकूच शकत नाहीये..
म्हणून अर्धवट..


Dineshvs
Wednesday, May 17, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा, त्या हाताच्या मालकाला काय वाटत असेल, गाडीतल्या माणसाकडे बघुन ? का काहिच वाटत नसेल ?

Naadamay
Thursday, May 18, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा, वैभव, अज्जुका...खूपच छान.

Sumati_wankhede
Thursday, May 18, 2006 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता....

आता अव्हेरायचेच सारे...
म्हटले तरी... जमणार नाही;
हे तुलाही कळते... मलाही कळते.

कसे अव्हेरायचे आता
दिवस रात्रीचे ध्यास
कळत नकळत एकरूप होऊन
श्वासांत गुंफलेले श्वास
आसुसून दिले घेतले
मनीमानसी शब्दस्पर्श
कणाकणात भिनलेले
हसू आसवे, क्षोभ अन हर्ष
आता विसरायचेच सारे...
म्हटले तरी... जमणार नाही;
हे तुलाही कळते.... मलाही कळते.

विसरता येईल कधी का
अमृतपान्हा तव मायेचा
तडे सारे लिंपून धरिशी
स्निग्ध दुधापरि छत सायीचा
गर्द सावलीसम मज वेढून
तुझ्याच यौवन्याची झाड
दडायचेही कधी घुसमटून
तुझ्याच पापणीच्या आड
आता फिरायचे माघारी...
म्हटले तरी... जमणार नाही;
हे तुलाही कळते... मलाही कळते.


Poojas
Thursday, May 18, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" विसरता येईल कधी का...अमृतपान्हा तव मायेचा
तडे सारे लिंपून धरिशी...स्निग्ध दुधापरि छत सायीचा"

अगदी मनस्वी लिहिता तुम्ही..सुरेखच...!!


Poojas
Thursday, May 18, 2006 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश..
माझी कविता वाचून निदान तुम्हाला प्रश्न तर पडला..!!
त्या हाताच्या मालकाला काय वाटत असेल, गाडीतल्या माणसाकडे बघुन ? का काहिच वाटत नसेल ?

त्या कोवळ्या जीवाला काय वाटणार हो..
आणि जरी काही वाटलंच तरी काय फायदा
आयुष्य जस्सं आहे तस्सं त्याने स्वीकारलंय..!
हां.. नाही म्हणायला थोडीशी इर्षा किंवा मत्सर जाणवेलही..
पण त्या निरागस जीवाचं त्यात काय चुकलं..?
आपल्याच बाबतीत देव असा का वागलां..?
असं वाटणं स्वाभाविक आहे....

पण शेवटी हे सगळेच प्रश्न अनुत्तरित राहतात.
आपणंच हतबल ठरतो.. हे नाही नाकारता येणार..!!





Lopamudraa
Thursday, May 18, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती... great !!! .. .. .. .. .. ... ... .. ...

Vaibhav_joshi
Thursday, May 18, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर
आहे ही कविता


Meenu
Thursday, May 18, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या हाताच्या मालकाला काय वाटतं खरा मार्मिक प्रश्न आहे हा.. असं वाटतं असेल का कधी...

काय सांगु मला काय वाटतं

काय सांगु मला काय वाटतं
हात पुढे करतो तेव्हा...

वाटतं आता तरी
मिळेल पोटाला घास,
मनात नसते त्या क्षणी
रंगीत फुग्याची आस.

नकोचं असतं मलाहि
लाचार हे जीणं,
तुम्हापुढं हात पसरणं,
वाचवायचं असतं फक्त शिव्या नि मार खाणं

आईबाप सारं झूठं
बस अजुन काही बोलत नाही
पण पोटची आग या सार्‍या
पोकळ गप्पांनी विझत नाही

नको मला सहानभुती
देणार तर हात द्या
मदतीचा, मायेचा,
तुम्हालाहि असेल कोणी
पोर माझ्या वयाचा...



Devdattag
Thursday, May 18, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु.. माझाही एक प्रयत्न

साहेब दोन पैसे द्या हो गरिबाला
जेवण नाहिये दोन दिवस नशीबाला
वा आणले क्से मी डोळ्यामध्ये पाणी
हातातोंडाचा अभिनय, लढविली शक्कल आणि
त्या नजरा बेपर्वा अन बेदरकार
मग मी ही जातो बेशर्मेने दारोदार
कुणी सोडवण्यासाठी माझा ताप
देई पैसे कधी, कधी काढी माझा बाप
तसं त्याचही अताशा काही वाटत नाही
पायाखालचे काटेही आता बोचत नाही
पण येतात समोर काही त्या नजरा डबडबलेल्या
माझ्याविषयीची कोरडी सहानुभुती अन कणव दाटलेल्या
माझ्या मनालाही उगीच त्यांचा राग येतो
आणि पुढे गेलेला हात आपोआप मागे येतो


Poojas
Thursday, May 18, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू..

मी माझी व्यथा मांडली.. पण तू तर त्या हाताच्या मालकाची
व्यथा मांडली... आणि ती पण इतक्या सहज शब्दांत.. शब्दातले
आर्तं भाव भिडतात गं.. सुरेखच


..पूजा..


Poojas
Thursday, May 18, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता..
वाऽऽऽ....
"पायाखालचे काटेही आता बोचत नाही .."
वास्तवाचं भान राखून लिहिलयस रे... यशस्वी प्रयत्न

..पूजा..


Meenu
Thursday, May 18, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा खरयं रे हि बाजुही खरिच आहे..

Krishnag
Thursday, May 18, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, मिनु, सुरेख!!
एकाच व्यथेच्या दोन्ही बाजू!!
पण मूळ मात्र अजूनी खोलात!!



Meenu
Thursday, May 18, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मूळ मात्र अजूनी खोलात!! >>> कृष्णा काय म्हणतोस ते नाहि रे कळालं

Krishnag
Thursday, May 18, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, तिसरी बाजू!! ती देखील शोधायला हवी!! ह्या दोन्ही ज्या वरकरणी दिसणार्‍या किंवा सहज मनात येणार्‍या!!
अजूनही काही असेल जे प्रवृत्त करते!!

हा विषय मनास स्पर्शून गेला म्हणून तदनुशंगाने मनात काही विचार आले म्हणून असे वाटले असो!!


Devdattag
Thursday, May 18, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृष्णा माझ्याही मनात होते ते पण लिहिले नाही त्यावर..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators