|
Paragkan
| |
| Tuesday, May 16, 2006 - 10:20 am: |
| 
|
वाह झाड खास!
|
नादमय,वैभव,बी,& झाड... छान...कविता...!!!.. .. . . .. .. ..
|
Chinnu
| |
| Tuesday, May 16, 2006 - 11:06 am: |
| 
|
झाडा, सहीये! वैभव बी, welcome back! , गिरी अहो नुसते बोलत थांबलात काय? होवुन जावु द्या की!
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:32 pm: |
| 
|
वैभव, गंधाळुनी, शब्द फारच आवडला. बी, अरे आताच परत गेलास ना म्हणुन तसे वाटतेय तुला. वसंत तर सगळ्यांच्या आनन्दासाठीच असतो. झाड, सुंदर, एखाद्या वनवासींच्या पाड्यावर गायले जावे असे हे गीत आहे.
|
Giriraj
| |
| Tuesday, May 16, 2006 - 1:06 pm: |
| 
|
क्या बात है,झाड!!! सुंदर! चिन्नु
|
Ashwini
| |
| Tuesday, May 16, 2006 - 2:38 pm: |
| 
|
वैभव, झाड, अतिशय सुरेख.
|
Ruchita
| |
| Wednesday, May 17, 2006 - 12:24 am: |
| 
|
वैभव मोहोराचा घमघमाट खुपच छान दरवळतोय बर का.. झाड... सुन्दरच गीत आहे..मी तर चालही लावलिय त्याला..धन्यवाद बरे का, येत्या गणपती ला फेर धरुन नाचायला छान गाणे दिलेस
|
Zaad
| |
| Wednesday, May 17, 2006 - 1:30 am: |
| 
|
आभार मंडळी!!! दिनेश,खरंय....एखाद्या पाड्यावर गायला हे गाणं छान आहे. रुचिता, चालीसाठी उलट तुलाच धन्यवाद. तू लावलेली चाल ऐकायला मला खूप आवडेल. रेकॉर्ड करून मेल करू शकशील का?
|
Poojas
| |
| Wednesday, May 17, 2006 - 2:45 am: |
| 
|
सिग्न्नलपाशी गाडी थांबली,की...कित्येक चिमुरडे हात.. त्यांच्या त्या केविलवाण्या नजरा..जीवाच्या आकांताने पुढे सरसावतात. इतरांचं माहित नाही, पण.. मी स्वत्: मात्रं त्या कोवळ्या जीवांसाठी काहीच करु शकत नाही, हि सल सारखी टोचत राहते. माझी हतबलता मी माझ्या काव्यात व्यक्तं करण्याचा प्रयत्न्नं केलाय! "उपाशी...." माझ्या अपेक्षा.. अपेक्षांचे ओझे.. ओझ्याखाली दबलेले.. दिवास्वप्न्नं माझे.... स्वप्न्नातला वारा.. वार्यातला श्वास.. श्वासातला स्पर्श.. स्पर्शातली आस.. कोवळासा जीव.. शरीर निर्जीव.. डोळ्यातून माझ्या.. पाझरते कीव.. त्या दोन हातांत.. दयेची याचना.. नजर हताश.. मनी विवंचना.. अनाथ एकटा.. लाचार पोरका.. आपुलासा वाटे.. तो जीव परका.. त्याच्या मुखी घास.. मी भरवावा.. भुकेचा वणवा.. त्याचा शमवावा.. हात माझा जावा.. माझ्या ताटापाशी.. पुन्हा तो हताश........ होते मी स्वत्: उपाशी...!!!! ...पूजा... }
|
धन्यवाद दोस्त्स ... पूजा .... सामाजिक विषय घेतलास ... मस्त ... जरा चेंज .... मी पण जॉईन होतो तुला
|
सरकार ..... ही संसद नाही बिलकुल व्यापारी कट्टा आहे दैनंदिन येथे भोळ्या स्वप्नांचा सट्टा आहे सिंहासन कवळुन बसती, सरकार म्हणवुनी घेती लाचार गळ्याच्या भवती साहेबी पट्टा आहे शालीन वागण्यावरती जायचे थांबवू आता ही सफेद कुठली खादी, हा नट्टापट्टा आहे ते पिढ्यापिढ्यांनी आता श्रीमंत जाहले लेको ते नशीब नाही अपुल्या नशिबाची थट्टा आहे लोकांची निवड कराया लोकांना हिंमत नाही हा लोकशाहीच्या नावे कायमचा बट्टा आहे VJ
|
Aparnas
| |
| Wednesday, May 17, 2006 - 2:59 am: |
| 
|
पूजा, खूपच छान कविता, वाचून खरंच खूप हताश वाटलं मला...मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही म्हणून...
|
पुजा, अगदी मनाला स्पर्शुन गेली बघ तुझी कविता छान मांडलीस वैभव, शेवट अगदी खरा आहे
|
Poojas
| |
| Wednesday, May 17, 2006 - 3:37 am: |
| 
|
"हे नशीब नाही अपुल्या नशीबाची थट्टा आहे.." वा सरकार.. वा धन्यवाद.. वैभव, सानिका, अपर्णा..!!
|
nehamipramaanech poojaa...best, vaibhav.....same .. .. .. !!!!
|
पूजा, खरच मन पिळवटुन टाकलेस तु. वैभवा मस्त रे. लोकांची निवड कराया लोकांना हिंमत नाही हा लोकशाहीच्या नावे कायमचा बट्टा आहे एकदम सत्यपरिस्थिती मांडलीस. अमोल
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:56 am: |
| 
|
अर्धवट कविता.. आकाशाखाली खूपशी वादळं एकच आपलं! बाकीची.. दूरून बघायची एखादं 'बाकीचं' वादळ येऊन जातं नेस्तनाबूत करून जातं ही पडझड आतल्याआत जिरवायची शांत होत राह्यचं आपल्याच वादळाला मिठीत ठेऊन द्यायचं..
|
वाह !!!!!! !!!!!!!!!!!!!! ......................
|
ajjuka mastch g>. .... ........... .. . !!!
|
Poojas
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:53 am: |
| 
|
नीरजा.. सुंदरच पण.. शिर्षक ...."अर्धवट कविता.."??? ये बात कुछ हजम नही हुई कारण कमीतकमी शब्दांत बर्याच गोष्टींचा खुलासा करुन देते तुझी कविता... अप्रतिमच.. .. ..!!!
|
|
|