|
poojaa.... mast best!!!... tuhi diggajaamdhyee yetes g,... chinu.. mi navin aahe g.. diggaj vaigaire mhanun nako mala...!!!
|
आयला हा तर कवियित्रींचा बीबी झालाय मस्त आहेत कविता लोपा, मिनू,पूजा,रुचिता सगळ्याच जणी सुरेख लिहीताय ... नादमय .... सुंदर कविता .. आवडली !!!
|
R_joshi
| |
| Monday, May 15, 2006 - 7:37 am: |
| 
|
माझ्यासाठि मी माझ्यासाठी जगताना मी स्वत:लाच हरवत होते दुस-यासाठी जगताना स्वत:लाच सापडत होते. माझ्यासाठी जगताना एकटीच मी चालत होते नव्याने जगविण्यासाठी एखादयाला नव्या धारेत मिसळत होते माझ्यासाठी जगताना अर्थ जीवनाचा हरवून बसले जीवनासाठी जगताना सर्व अर्थ फोल ठरले माझ्यासाठी जगण मी आता सोडुन दिलय इतरासाठी जगण्यातच मि आता समाधान मानलय प्रिति
|
Meenu
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:23 am: |
| 
|
आयला हा तर कवियित्रींचा बीबी झालाय काय वैभव आरक्षणासाठि भांडायचा विचार नाहिये ना.... ))
|
Ruchita
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:45 am: |
| 
|
लोपा, निनावी, पुजा, मिनु, वैभव धन्यवाद.....पुजा, "क्शितिज" छानच आहे ग..लोपा तु ओनलाइन येणार होतीस ना?
|
Naadamay
| |
| Tuesday, May 16, 2006 - 1:03 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी! अजून एक प्रयत्न:- नेहमीचीच रात्र आणि नेहमीचंच आकाश तरीही काही नवं असल्याचा आहे आज भास कळतच नाही मला यास सत्य म्हणू की भास काहीतरी वेगळं आज आहे मात्र खरंच खास कालपर्यंत पांघरूण सारून दिसली रात्र आज त्या पांघरूणात अलगद शिरली रात्र कालपर्यंत चंद्र पाहण्याची ओढ होती मला आज चंद्रच स्वये लाजून झाला फक्त माझा चांदण्यांची चमचम आज नुसती माझ्यासाठी आणि त्या रातराणीचा सुवास तोही माझ्यासाठी बहुदा कालपर्यंत दृष्टी बंदच होती माझी सवयच नव्हती माझ्या या श्वासांना सुगंधाची माहिती नव्हतं मला रात्र सुंदरही दिसते काळ्याकुट्ट अंधारातही लख्ख उठून दिसते वीज अशी सळसळून उजळून लकाकते अंधाराच्या कोंदणात जणू तेजच विसावते कालपर्यंत जागं मला घड्याळच करायचं सकाळ झाल्याचं भान मला तेव्हा कुठे यायचं आता मी देवळातला मंत्रगजर ऐकतोय बहुदा आज मांगल्याचा उत्सव सुरू होतोय
|
नजर तुझ्या नाजूक वेलीला सलाया लागल्या नजरा बहर हा यौवनाचा ओळखाया लागल्या नजरा कुठे अल्लड ऋतू गेला, नव्हाळी काय ही बाई तनूला पेलवेना भार अन उमलायची घाई तुझ्या झुलण्यावरी आता झुलाया लागल्या नजरा लपाया ना कुठे जागा ! छळाया लागल्या नजरा दिठी सजली फुलांनी गंध नेला दूर वारयाने जणू प्रत्येक भ्रमराला दिली आमंत्रणे त्याने सभोती सारख्या मग गुणगुणाया लागल्या नजरा तुझा पाहून मोहर, मोहराया लागल्या नजरा जरी तू टाळिशी अन पापण्यांना झुकवुनी घेशी तरी का अंतरी तू हुरळुनी, गंधाळुनी जाशी कशी ही गोडशी सलगी कराया लागल्या नजरा तुझ्या नजरेसही का आवडाया लागल्या नजरा VJ
|
Aaftaab
| |
| Tuesday, May 16, 2006 - 3:13 am: |
| 
|
ultimate, VJ !! jabardsat ...
|
Naadamay
| |
| Tuesday, May 16, 2006 - 3:41 am: |
| 
|
वैभव, खरोखरंच अप्रतिम लिहिलंय!
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:34 am: |
| 
|
वसंत असा आहे... ह्या शहरातील वसंत उदास उदास आहे बहरुन आहे, डवरुन आहे गाभ्यात मात्र पोखरुन आहे कोकीळेचा इथे कळिरव आहे घनदाट झाडीत सुर आहे आसमंत चौफ़ेर तल्लीन आहे निरव क्षणी मात्र खंत आहे मंगलधुन अशी पहाट आहे सानगोजिरी दुपार आहे, तिन्हीसांजेची लाली आहे ऐन राती डोळ्यात कृष्णमेघ आहे ह्या शहरातील वसंत वैशाख वणव्यात तळपत आहे माझ्यासह जीन जगत आहे माझा सोबती सहचर झाला आहे..
|
वैभव.. .. .. .. गाळलेल्या जागा भरून घे रे आत्तापासून
|
क्या बात है... तुझा पाहून मोहर, मोहराया लागल्या नजरा. सुरेखच रे वैभव...
|
Aparnas
| |
| Tuesday, May 16, 2006 - 6:12 am: |
| 
|
वैभव, नादमय,रुपल खूपच छान कविता. बर्याच दिवसांनी वैभव ची कविता वचायला मिळाली
|
Bgovekar
| |
| Tuesday, May 16, 2006 - 6:32 am: |
| 
|
प्रिती वा! छानच लिहिलस गं! तुझा हा नवा पैलु आताच कळला मला.. लिहित रहा गं.
|
Giriraj
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:12 am: |
| 
|
वैभव,काही आमच्यासाठीही सोडत जा की राव! इतकं निरखून पाहू नये या वयात.. Thunderbolt ने घायाळ व्हायचास!
|
Zaad
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:26 am: |
| 
|
मेंदीभरल्या हातात ओले हळ्दीचे हात पोरी हासून गं घेती नाव कुणाचे ओठांत? मेघभरल्या नभात चांद बसला लपून पोरी आळ्वून गं घेती नाव कुणाचे ओठांत? राघू पिंगट अंगाला जाती करूनि लगट पोरी मुर्डून गं घेती नाव कुणाचे ओठांत? पांदी मधल्या वाटेत फूल दिसता अव्चित पोरी वाकून गं घेती नाव कुणाचे ओठांत? रान भारल्या मातीत असे पेटले होरीत पोरी झिंगून गं घेती नाव कुणाचे ओठांत? चंद्रमवळी सप्रात साजण आला गं भरात पोरी लाजून गं घेती नाव कुणाचे ओठांत? पौषा मधल्या थंडीत साजण नाही गं घरात पोरी जागून गं घेती नाव कुणाचे ओठांत? सुन्या उदास अंगणी दिवा तुळशीचा जळे पोरी आठ्वून गं घेती नाव कुणाचे ओठांत? डोळा भरल्या पाण्यात बुडे आठवांचा गाव पोरी जपून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
|
शेवटची एकच वाचली. झाडा जबरदस्त रे.
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 8:49 am: |
| 
|
व्वा!! नादमय अन झाड अतिशय सुरेख. रुपल माझ्यासाठी जगण आता सोडुन दिलय, इतरांसाठी जगण्यात आता समाधान... फारच छान. बी छान सुरुवात रे( आधी होतासच तू पण बर्याच दिवसानी लिहीलेस म्हणुन)
|
Shriramb
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:43 am: |
| 
|
झाड, सुंदर! VJ , सही!
|
Poojas
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:46 am: |
| 
|
आज "गुलमोहोर" खर्या अर्थाने मोहोरलाय... काव्य-बहरच जणु..!!! वैभव, नादमय, झाड, बी....सगळ्यांनीच आरक्षणाच मनावर घेतलेलं दिसतंय...!!!! एकदमच सही लिहिलंय सर्वांनी..:-) प्रिती....सुरेखच गं
|
|
|