Ruchita
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:21 am: |
| 
|
लोपा सुरेख.."ती फुलराणी" ची आठवण झाली तुझी कविता वाचताना.
|
Shyamli
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:48 am: |
| 
|
वैशाली.. .. .. .. मस्तच 
|
Ruchita
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:58 am: |
| 
|
नित्य तु ह्रुदयात असावेसे वाटते सतत तुझ्या जवळी बसावेसे वाटते काहीतरी गुणगुणत रहा तु माझ्या कानात गोड तुझे बोल मी ठेविन माझ्या मनात गोड तुझा स्पर्श मला हवाहवासा वाटतो प्रत्येक वेळी सर्वदा नवानवासा वाटतो अलवार तुझ्या स्पर्शागणिक ह्रुदयाचि तार झन्कारते पण मन मात्र कुठल्यातरी भितीने हुरहुरते वेड्या मना आवरु कशी मला काहिच कळत नाही तुच आता सान्ग जरा मला काहिच सुचत नाही
|
रुची, छान शब्दात भावना मांडलिये.. कवितेला नाव दे ना!!!
|
Ninavi
| |
| Thursday, May 11, 2006 - 9:33 am: |
| 
|
>>>>> माझ्या हातास काही लागलं नाही म्हणून काय हातात येऊन काही सुटलंच नाही? क्या बात है, नादमय! सुंदर. गुलमोहोरावर तुमचं स्वागत. पूजा, जमतंय.. जमतंय.. ए बाई, मी चुका काढत्ये असं समजू नकोस गं, पण मात्रा मोजून बघ बरं. मतल्यात पहिल्या ओळीत २० आणि दुसरीत २१ होतायत मला वाटतं. पण कविता म्हणून सुंदरच! तुला जमणार हे नक्की! कारण गज़लेला तंत्रं सांभाळणं आवश्यक असलं तरी मंत्र हा मुळात काव्य चांगलं असलं पाहिजे हाच आहे. आणि तो तुला जमलाय.
|
काय सुरेख कविता लिहिता तुम्ही सर्व वाचत रहाव्याश्या वाटतात सारख्या मायबोलिमुळे मला मराठी कविता वाचायची आवड निर्माण झाली. मी मराठी कविता कधीच वाचल्या न्हवत्या कुठे छान आहे हा BB पूजाची मला अंतरी भास खुप आवडली
|
Meenu
| |
| Friday, May 12, 2006 - 1:02 am: |
| 
|
स्पर्धा.. माझी कधीच नव्हती रे स्पर्धा तुझ्याशी करावी कशी तुलना पृथ्विची नभाशी माझी स्पर्धा आहे माझ्याशी कालच्या 'स्त्री' बरोबर आजच्या 'स्त्री' ची रोज मी माझ्यावरच विजय मिळवते.. मीच हरते आणी मीच जिंकते.. रोज नवी आव्हानं मी हसत पेलते.. येणारी कित्येक संकटं सहज झेलते.. तु मात्र स्पर्धेत न उतरताही हरतोस.. जेव्हा वादात माझं शिक्षण अन पगार काढतोस.... आणी ज्या स्पर्धेत मी नाहि उतरले कधी तीहि मीच जिंकते.. उरते परत एकदा माझी स्पर्धा माझ्याशी...फक्त माझ्याशी.....
|
मीनू, छानच. त्या चित्रकवितेवरच्या `मी` ला पण लागू होइल. 
|
मीनु, मस्त ग.. .. .. .. .. .. .. !!!
|
मीनु,सहीच गं आवडली कविता
|
Poojas
| |
| Friday, May 12, 2006 - 7:14 am: |
| 
|
मिनू कसं बरं तुला इतकं छान सुचतं? "तू मात्र स्पर्धेत न उतरताही हरतोस..." अप्रतिम...!!! रुची खरंच खूप भावस्पर्शी लिहीलंयस.. लोपा.. "क्षण ते..".. ..लाजवाब ! :-)
|
Meenu
| |
| Friday, May 12, 2006 - 7:18 am: |
| 
|
पूजा, मयुर, लोपा, KP धन्यवाद...
|
Maudee
| |
| Friday, May 12, 2006 - 7:19 am: |
| 
|
सुन्दर...... "तू मात्र स्पर्धेत न उतरताही हरतोस"
|
Poojas
| |
| Friday, May 12, 2006 - 7:20 am: |
| 
|
विस्कटलेल्या चित्रावरचे विखुरलेले रंग कुस्करलेल्या फ़ुलांमधला घुसमटलेला गंध... अंधारलेल्या वाटेवरची गोंधळवणारी वळणे संसाराचा दाह सोसून चितेवरती जळणे... सारं काही ओसाड भग्न्न आणि भकास रुक्ष वाळवंटात एका निवडुंगाचा प्रवास... तहान कोरडी त्याची सवे तप्त उन्हाच्या ज्वाला घेईल मोकळा श्वास कसा काट्यांचे कुंपण त्याला... काट्याने होती जखमा काट्याने निघतो काटा आयुष्याच्या वळणावर काट्यांच्या पाऊलवाटा... भरवसा कसा ठेवावा जखमेने काट्यांवरती जखमेतून विव्हळणार्या अश्रूंच्या नात्यावरती... जे मलाच ठाऊक नाही ते तुला कसे सांगावे उपभोगातून घडलेले ते भोग कसे भोगावे... जो प्रश्न निरुत्तर होता तो सलतो आहे मनात जो डाव मांडला होता तो मोडून जाई क्षणात... मग कशास जगणे आता ते मरण अटळ येणार स्वप्न्नील सुखाचा माझ्या निष्पाप बळी घेणार... पण रोज मरण भोगूनही जग सारे जगते आहे मृत्यूच आपला उघड्या डोळ्यांनी बघते आहे... तरीही जगण्याची आशा मृत्यूचा केवळ भास जगण्यास पुन्हा जन्मावे घेऊन चिरंतन श्वास.......!!!!! }
|
वा...!!! best पूजा... मस्त....!!!
|
जीवनसागरा... खोल खोल गर्ता आणि उंच उंच लाटा... गर्ता आहे प्रत्येकाच्या मनात ज्याला त्याला.. ठाव नाही लागत त्याचा अजुन कोणाला... गर्त्याचे लाटेशी नाते, जसे अंतरंग स्वप्नांशी जोडले जाते बुडता बुडता आकाशी.. नेती या लाटा.. त्या खाली अंधार्या भुयारी.. दगडांच्या वाटा.. लाटेवरती क्षणांचे फ़ेसाळते बुडबुडे... सारे क्षण.... ते बापुडवाने बुडबुड... उडती... नाही ठसे नाही खुणा काही त्यांचे उरती...!!! मासोळीला हवा गर्ता आणि लाटांना किनारा..... ज्याचा त्याचा आहे इथे वेगवेगळा सहारा... अनंत विस्ताराचा आहे खोल तुझा गाभारा.... सायंकाळी आवरायचा लाटांचा खेळ सारा...!!! खोल खोल गहन तु.. जीवनसागरा.. नाही माहित उंची तुज पामरा.. तरीही आवडते तुझ्यात प्रतिबिंबित व्हावयाला म्हणुन गाठते तुला नभ ते क्षितीजाला...!!! उमजले तिथेच मला वेडे स्वप्न लाटेचे.. भिडण्याचे आकाशाला... घेउन उदराशी बिज.. अंकुरण्या किनार्याला... खोल खोल गर्ता आणि उंच उंच लाटा....!!!
|
Ninavi
| |
| Friday, May 12, 2006 - 9:13 am: |
| 
|
मीनू, झकास!! रुचिता, लोपा, पूजा, मस्त. चालू द्या.
|
Chinnu
| |
| Friday, May 12, 2006 - 9:31 am: |
| 
|
मीनु पंचलाईन्स सही आहेत. पुजा फार छान! लोपा, थोडे प्रयत्न केले तर तुझी कविता छान गेय होईल. उंच उंच लाटा, सहिये! मला तुम्हा सगळ्या दिग्गज्जांसरखं येत नाही. जमेल तेव्हा लिहीन नक्की! आत्ता फक्त जे अल्पमतीला पटले ते सांगते बापडी! राग मानुन घेवु नका.
|
Meenu
| |
| Monday, May 15, 2006 - 12:18 am: |
| 
|
निनावी, चिनु धन्यवाद.. पूजा तुहि खूप छान लिहितेस ग.. मला सध्या वेळच होत नाहि.. कितीतरी सुचलेलं तसच वाहून जातं कागदावर उतरवायला होतच नाहि.. कामांमधे..
|
Poojas
| |
| Monday, May 15, 2006 - 3:01 am: |
| 
|
"क्षितीज.." क्षितीजावरती विखरुन गेले लाल केशरी रंग.. निळ्या आभाळावरी उमटले रुधिराचे तरंग.. क्षणात रजनी मावळली अन दिशा प्रकाशित झाल्या.. लगबग झाली सृष्टीची अरुणोदय समीप आला.. पायघड्या धरणीच्या आणिक सागर घाली स्न्नान.. प्रभात समयी वसुंधरेवर भूपाळीचे गान.. अर्घ्य म्हणून मग मीही माझे काव्य समर्पण केले.. काव्यामधल्या प्रतिभेला रवी चरणी अर्पण केले.. तेव्हापासून ओंजळीत तेजाची कवने झाली.. नव्या प्रभाती नवे काव्य रचण्याची उमेद आली..!!!
|