Shyamli
| |
| Monday, May 08, 2006 - 5:31 am: |
| 
|
कदाचीत लागतिलही सुर आणि जन्मेलही गीत नवे परी दुखर्या मना हे.... सलच वाटति हवे हवे श्यामली!!!
|
ते उगीच कुढणे का कौतुक लागे उगा तुझ्या मनाला बघ निसर्ग सांगतो घे रूप नवे नव्या हर एक क्षणाला
|
Shyamli
| |
| Monday, May 08, 2006 - 6:02 am: |
| 
|
वा देवा सहीये.. .. ..
|
उख़ाणा एक हिरव्यागार वनराईत जास्त बाभळीचेच काटे .... च नाव घ्यायला मला तर बाई लाज वाटते .... च नाव घेतो, .... चा प्रियकर .... तु जाऊ नको, मी येतो लवकर शैलेन्द्र
|
नाव तुझे घेता घेता मी गीत विसरलो आहे तुझी वाट पाहून पाहून मी माझ्यातच हरवलो आहे
|
Poojas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 7:01 am: |
| 
|
ज्या वळणावरती भेट आपुली तिथे तुझा मी निरोप घ्यावा.. तू मला पाहता मागे वळूनी सुसह्य होई सख्या दुरावा..!!!
|
Chinnu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 8:55 am: |
| 
|
पुजा छान आहे ग. श्यामली तुला सलही आवडले! वा वा!!
|
Shyamli
| |
| Tuesday, May 09, 2006 - 12:17 pm: |
| 
|
धन्यवाद चीनु.. .. .. ..
|
Ruchita
| |
| Thursday, May 11, 2006 - 4:41 am: |
| 
|
श्यामलि सल छानच आहेत, पूजा तुझ्या दुराव्यासाठी..... साहवेना हा आता दुरावा लवकर ये परतुनी सखया वाट पाहुनी डोळे शिणले उभी आहे मी वळणावर या
|
आयुष्याच्या अनोळखी वळणावर.... तु भेटावा... अगदी अचानक... असा का स्वप्नाचा कवडसा पडावा मनावर...
|
ओल्या पापण्यांवर ओले स्वप्न... धरले रोखुन... का कुणास ठाउक भीती वाटते... जायचे ओघळुन...
|
Ruchita
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:51 am: |
| 
|
अलवार तुझी चाहुल मन वेडे हुरहुरते सत्य कि आभास हा पाचोल्याग़त भिरभिरते
|
महिरले मन झाला पुन्हा आभास अडखळला पहा पुन्हा तो श्वास जरी ठाउक आहे पुन्हा नव्हे तो रास मन उगाच धरते न येणार्याचा ध्यास
|
Shyamli
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:02 am: |
| 
|
जरी हे असती आभास हेच रे माझे श्वास सोडु कसा सांग सख्या लागला मनास ध्यास श्यामली!!!
|
तू माझीच हवी होता मलाही ध्यास मी तयार होतो व्हाया तुझाच दास तुझ्या होकाराची होती मजला आस खंत एक, जमले नाही जोवरी होते श्वास
|
निसटत्या क्षणात... आयुष्याच्या रानात... रुतला काटा.... निराळ्याच मार्गाला लागल्या सार्या वाटा... ठेवुन मनात बोचरा.. कोपरा... गर्द सावलीच्या... हिरव्या.. जखमा...!!!
|
श्वासात तुला गुंफ़ुन.. माळायचे.. छोटाशा अयुश्यात.. फ़क्त एवढेच मागणे होते... जाता.. जाता मी फ़क्त तुझाच हे तुला सांगायचे होते..
|
Ruchita
| |
| Thursday, May 11, 2006 - 7:46 am: |
| 
|
ख़ुपच उशिर केलास रे होकार तुझा कळविण्यास विझणार्या या ज्योतिला होता फक्त तुझाच ध्यास
|
श्वासाला माझ्या आस तुझी.. निसटत्या क्षणांना हवी साथ तुझी... रेखाटतेय... तुझे अधुरे चित्र... मिसळुन प्रेमाचे रंग... वाट शोधते सरीता जशी सागराची...........!!!
|
Ninavi
| |
| Thursday, May 11, 2006 - 9:46 am: |
| 
|
ही अशी जीवघेणी कळ उठते काळजात आठवणीसरशी.. आणि लक्षात येतं.. ' जिवंत आहोत तर अजून आपण..'
|