Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 11, 2006 « Previous Next »

Kandapohe
Tuesday, May 09, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, मिनू, स्वप्नगंधा छानच! :-)

Meenu
Wednesday, May 10, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा, स्वप्नगंधा सुंदर ग..

बापु, कांद्या धन्यवाद...


Poojas
Wednesday, May 10, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू,, दिनेश,, श्यामली
जयवि,, जो_एस सर्वाना धन्यवाद

बापू
काही म्हणा..पण कुठल्याही कवितेला दाद द्यावी,
तीही तुम्हीच.. आणि समिक्षा करावी तीही तुम्हीच..!
तुम्ही ग्रेट आहात…….. !!!!

निनवी आणि मूडी..,
हा गझलेचा आणखी एक प्रयत्न्न..खास तुमच्यासाठी
:-
}

Poojas
Wednesday, May 10, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"खन्त.."

मज काय मिळाले काय गमावून बसले
का हिशोब चुकला कधीच कळले नाही..

मी जमाखर्च मान्डला चुकान्चा पुन्हा
प्रारब्ध भोगल्यावाचून टळले नाही..

झेलल्या उरावर कित्येक जखमा हसूनी
पण नयनातून अश्रू ओघळले नाही..

मी ओन्जळ होऊन तुझा सहारा झाले
तुज सावरले, ज्योतीसम जळले नाही..

पोळले हात सोसल्या तप्त मी ज्वाळा
मज खन्त एक तव रक्त उसळले नाही..!!!


Vaibhav_joshi
Wednesday, May 10, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा ...

ही मस्त आहे ... फक्त तू गज़ल म्हणत असशील तर पहिल्या ओळीत
वळले नाही, ढळले नाही,आढळले नाही
असं काहीसं यायला हवं होतं.बाकी मीटर बहुतांशी मस्त पकडून ठेवलंयस ...
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कविता असो वा गज़ल पण छान झाली आहे


Marathi_mitra
Wednesday, May 10, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा... पुजा
खुपच छान..!

अमोल


Moodi
Wednesday, May 10, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पूजा फारच सुरेख. निनावी बाकी मार्गदर्शन करेलच, पण आता रंगायला लागल्यात तुझ्या गझलेरूपी कविता.
स्वप्नगंधा सुरेख कविता..


Swapnagandha
Wednesday, May 10, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks to all..
pooja chan lihite aahes..


Ninavi
Wednesday, May 10, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मार्गदर्शन? मी?
मूडे, कोण भेटलं नाही का सकाळपासून?


पूजा, वैभवने सांगितलं आहेच वरती.
इथे छान माहिती आहे बघ. गज़ल लिहायची तर रदीफ़, काफ़िया, बहर ( वृत्त) म्हणजे काय ते नीट माहिती करून घे. तुला मुद्दाम सांगायचं कारण तुझ्याकडे प्रतिभा, कल्पना आणि वृत्ताची समज already आहे. थोडं हे तंत्र शिकायचा अवकाश आहे. की मायबोलीला एक चांगली गज़लकार मिळेल.

Dineshvs
Wednesday, May 10, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा, छान आहे कविता. अनुस्वाराचे तेवढे जमायला हवे. अर्थात तो फक्त ईथे पोस्ट करायच्या बाबतीतला मुद्दा आहे. कवितेच्या गुणवत्तेचा अजिबात नाही.


Ameyadeshpande
Wednesday, May 10, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली च्या मुखपृष्ठावर वैभवच्या ओळी झळकल्या आहेत :-)

Pkarandikar50
Wednesday, May 10, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pooja
कोणाला, केंव्हा, कशाबद्दल दाद मिळून जाईल, खरंच सांगता येत नाही.मी काही मराठी साहित्याचा अभ्यास केलेला नाही, वाचनहि अगदीच तुटपुन्जे आहे. गुलमोहर वर जेव्हढ्या कविता मी वाचल्या, तेव्हढ्या कदाचित पुस्तकातल्या वाचल्या नसतील. कसली समीक्षा नि कसले काय. मनात येइल ते आपल्या मित्र-मण्डळींजवळ बिनदिक्कत व्यक्त करायचे ह्याला काही समीक्षा म्हणत नाहीत. असो. माझ्या कॉमेंटस तुला आवडल्या, मनापासून दाद द्यावीशी-घ्यावीशी वाटलं, ह्यातच सारं काही आलं.
बापू.


Naadamay
Thursday, May 11, 2006 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही पाऊलखुणा सोडल्या नाहीत
म्हणून काय मी वाट चाललोच नाही?
कुणी मला पाहिलंच नाही
म्हणून काय या रस्त्याने मी गेलोच नाही?

मी तर माझ्याही नकळत
चालत राहिलो या विस्तीर्ण पठारावर
काही ओळखीचं पाहत
आणि काही नवं शोधत
माझ्या हातास काही लागलं नाही
म्हणून काय हातात येऊन काही सुटलंच नाही?

कधी बरोबर होती आणखीही पावलं
पण बर्‍याचदा तरी मी एकटाच
कधी सुखाने सावली हो-ऊन गोंजारलं
तर कधी दुःख ऊन हो-ऊन तापलं
जबर उन्हाने कोरडे झालेत डोळे
म्हणून काय मी रडलोच नाही?

कळेनाहीसं झालं जेव्हा
मलाच माझ्या चालण्याचं ध्येय
कुणीतरी दीपस्तंभ बनून
तेव्हा दिव्यप्रकाश दाखवला
अजून मी तिथवर पोहोचलोच नाही
म्हणून काय मी तो पाहिलाच नाही?

का तरी मी खुणा सोडाव्या?
का कुणाच्या नजरेस यावं?
पकडणं अशक्य असलं जरीही,
का चालू नये मी प्रकाशाच्या ओढीनं?
कुणीतरी दाखवलाय ना प्रकाश?
मग तो मिळाल्यावर आपोआपच कळेल सारं.....!





Poojas
Thursday, May 11, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


'नादमय'
.. फ़ारच छान

तुम्ही सगळेच जण कित्ती छान मार्गदर्शन करता.
मला इतक प्रोत्साहन दिल्याबद्दल, मी तुम्हा सर्वान्ची
अत्तिशय ऋणी आहे...!!!!!!

निनावी,
"गझल" हा काव्यप्रकार इतका शास्त्रशुद्ध आहे, हे तुझ्यामुळे कळले.
मला जमेल असे वाटत नाही... पण मी प्रयत्न्न मात्र नक्की करेन.
कारण आता माझ्याकडे माझ्या चुका सुधारुन देणारी
माझी हक्काची दोस्तमन्डळी आहेत ना...!!!!!!!!!


Marathi_mitra
Thursday, May 11, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय..

पकडणं अशक्य असलं जरीही,
का चालू नये मी प्रकाशाच्या ओढीनं?

खुपच सुरेख...


अमोल


Poojas
Thursday, May 11, 2006 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तव आस अन्तरी, तुझा रेशमी भास
तू श्वास सुगन्धी, स्पर्श तुझा मधुमास

तू अबोल अवचित, साद मला घालावी
त्या मधुर स्वराची,मलाच ज्ञात मिठास

तू अधीर अलगद, तनूस स्पर्शून जावे
त्या क्षणिक सुखाचा, मनास या हव्यास

नि:शब्द तुझ्या प्रीतीत, गुन्तला जीव
मज प्राणाहूनही प्रिय तुझा सहवास

मम काव्यालाही तुझ्या स्मृतीन्चा गन्ध
तुज स्मरण्याचा हा, माझा खुळा प्रयास


Lopamudraa
Thursday, May 11, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे.. वा नादमय, पुजा... नविन मंडळी सुंदर लिहिलेय...
अजुन येउ द्या...


Princess
Thursday, May 11, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा, खरच खुप छान लिहितेय तू.... लगे रहो

नादमय, सुरेख


Ruchita
Thursday, May 11, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा, नादमय..खुपच सुरेख लिहिताय..

"तू अबोल अवचित, साद मला घालावी
त्या मधुर स्वराची,मलाच ज्ञात मिठास "
खुपच सुन्दर..........


Lopamudraa
Thursday, May 11, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षण ते

कळीचे हळुच फ़ुलणे,
शिरशिरि देही...
वार्‍यावर ते डुलणे..
व्याकुळता अडवुन.. नजरेत
कुणाची वाट पाहणे..
शुन्यात हरवुन..
स्वता:शीच रमणे..
आणि बावरे होणे..
आठवांचे चांदणे मनामध्ये घुमणे..
हसुन त्याचे बघणे आणि
अन काही न मागणे..
कळिस वाटे
स्वर्ग सुखही त्यापुढे तोकडे..
ओढही लागली,
आतुर पाकळी झाली..
स्पर्शास त्या हुरळुन
ती नकळत बहरुन गेली,
अवखळ क्षणी त्याचे रंग पांघरुन
तन झाले... इंद्रधनुशी..
माखुन गेले पंख...
फ़ुलपाखराचे.....
सुंगंधी पराग कणाने..
पंखावरी जपुन ठेवली..
भेट ही त्या वेड्या प्रेमविराने...
रंगुन गेले क्षण ते...
लाजलेल्या... नव्या किरणाने...!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators